बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईल्डकार्ड जिन्कत नाहित त्याना मोस्टली शोला धक्का द्यायलाच आणतात,( आता मेघाला कदाचित जास्त पे केल असेल कलर्सने)

वाइल्ड कार्ड बिगबॉस नक्कीच काही हेतूनी पाठवतात, जसे नंदकिशोरला बॅड मॅन म्हणूनच पाठवला आउंना इन्स्टीगेट करायला.
इथे सध्या शो मोनोटोनस होत होता , टीआरपी नव्हती म्हणून मेघाला शो मधे नवीन ट्विस्ट द्यायला,काहींना मोटिव्हेट करायला , काहींना इन्स्टिगेट करायला, थोडक्यात सूत्रं हलवायला बोलावलय बहुदा !
त्याआधी सुरभिलाही वाइल्ड कार्ड ठराविक हेतूनी आणल होतं , जे ती बरोब्बर निभावतेय !
इथे मेघा किंवा सुरभि जिंकतील कि नाही फार पुढचा प्रश्न, त्यांचा कन्टेन्ट देण्याचा मह्त्त्वाचा रोल निभावला तरी त्यांना भरपूर फायदा आहे, जोवर अपेक्षित कन्टेन्ट देत आहेत तोवर रहातीलच.
पण दिलेली जवाबदारी अपेक्षेप्रमाणे नाही निभावली तर काढतीही तितक्याच सहज बिबॉ जसं नेहाला काढलं २ स्ट्राँग स्लेब्स्जना तिच्याबरोबर नॉमिनेट करून आणि आता अनुप जलोटाचं एलिमिनेशनही बरोब्बर प्लॅन केलय, काही कन्टेन्ट देत नसल्याने !
त्यासाठी बिबॉनी ३-३ चे गृप्स प्लॅन करून बनवले, करणवीर-श्री-अनुप इथे अर्थात अनुप जलोटा झाले नॉमिनेट.
दुसर्या गृपमधे उर्वशी-सुरभि-सोमि.
इथे उर्वशीला नॉमिनेट करु शकली असती मेघा मग अनुप जलोटा नसते एलिमिनेट झाले म्हणून सुरभिला केलं , सुरभि काही एलिमिनेट होत नाही !
तरीही मेघा मस्तं वाइल्ड कार्ड एंट्री आहे, सगळे किती बोलत होते तिच्या स्ट्राँग प्रेझेन्स बद्दल, तो दुसरा २२ वर्षाचा जो पोरगा आलाय त्याला मात्र पब्लिकने कच्चा लिंबु बनवलय.
मराठी बिबॉ मधे डोक्याला त्रास होयचा मेघाला शो मेकर्सनी अनेक प्रकारे डिमोटीव्हेट केलं , रेशमसाठी पुष्करसाठी पार्शल धोरण ठेवलं तेंव्हा !
इथे तसा डोक्याला त्रास नाही होणार कारण पब्लिक मेघाचा गेम पुन्हा पहायला मिळतोय एवढ्यावरही खुष आहे !

Maybe या आठवडय़ात अनुप जलोटा जाणार...

तसं सुरभी बरोबर बोलली काल.. मेघा टास्क पण करते आणि किचन पण सांभाळते..

मेघा भारी पडणार आहे सगळ्यांवर. Atleast तिच्याकडून चिकाटी म्हणजे काय आणि ती टास्कमधे कशी लावायची हे नक्की शिकतील बाकी सगळे. या वीकमधे सेफ असेल ती पण पुढच्या वीकपासून तिचा धोका सगळ्यांनाच जाणवेल. आणि मग पुढे प्रत्येक वीकला ती नाॅमिनेटेड असेल.
रड्या रडायचा थांबला वाटतं. Uhoh अखिलाडू खिलाडी.

आज मेघाचा छळ..
मेघा पुरून उरेल सर्व टॉर्चर्सना हे माहितीच आहे..!

मेघा चा छळ...म्हणजे ती त्या संधी चं नक्की सोनं करणार Happy
जास्त छळ ..जास्त सिंपथी Happy
गो मेघा गो.....मराठी मद्धे मेघा ला सगळे रडे लोकं भेटले होते..."आपण मराठी..लेव्हल सोडायची नाही..वगैरे वगैरे..." त्यामुळे तिच्यातली प्लेअर बाहेर यायला कमी वाव मिळाला..आता ईथे तिला खरी टक्कर आहे..बघु त्यांना पुरुन उरते का ते...

Hmm
बघितलं आताच..
बघता बघता comments पण वाचल्या तिथल्या...
बरेच non mahrastrian सुद्धा support करत आहेत मेघा ला Happy

फक्त ३ दिवस झाले येऊन पण मेघाने चांगलच हदरऊन सोडलय बिबॉ, घरातले मेंबर्स आणि सोशल मिडियाही !
घरवाले तर चांगलेच हदरलेत, श्रीसन्त म्हणे मान गये बिगबॉस क्या ब्रिलियन्ट स्ट्राँग एंट्री भेजी है.
शिव म्हणे आपण सगळे गेम खेळायचा प्रयत्न करत होतो, लेकिन ये अस्ली प्लेयर आयी है.
करणवीर म्हणे ये वाइल्ड कार्ड बहुत सही , शातिर है, अच्छेसे खेलेगी.
दीपक म्हणे शि इज टु गुड, लेकिन हमारेलिए अच्छी बात नही है.
दीपिका हादरली आहे २ दिवसात तिचा किचनवरचा कब्जा काढून घेतला.
सोमी सुरभि म्हणे दीपिका को झटका लगा होगा, ये टास्क भी करती है, किचनभी संभालती है.
थोडक्यात हिन्दी बिबॉ सुध्दा टेकोव्हर केलय , फक्त ओव्हरकॉन्फिडन्ट दिसण्यापासून वाचवाव मेघाने स्वतःला !
मेघामुळे सगळे इनसिक्युअर झालेत, शक्य तेंव्हा तिला नॉमिनेट करणार, मेघाला टार्गेट करणार नक्की.

बाकी मेघाला फुड टॉर्चर आणि उलट्या बघून बिबॉला जाम नॉस्टेलजिया आला असणार.. हेच ते घर, त्याच व्यक्तीवर टॉर्चर आणि त्याच अंगणात तशाच उलट्या Biggrin
पुष्किने दूधावर पणी दिलं पण तो श्रीसन्त तर दुधात लिक्विड सोप , व्हिम बार बुडवून देणार होता Uhoh नशीब बिबॉ ने थांबवलं !

दुधात लिक्विड सोप , व्हिम बार बुडवून देणार होता>>> काय?? डोक्यावर पडला की डोक्याला बॉल लागला आहे याच्या?

दुधात लिक्विड सोप , व्हिम बार बुडवून देणार होता>>> काय?? डोक्यावर पडला की डोक्याला बॉल लागला आहे याच्या? >>> अगदी अगदी. बापरे अतिच आहे हे.

पण दिपक कॅप्टन झाला का आणि कसा कारण मेघा हारणार नाही.
मिरच्या खायला लावणं हे फार झालं पण.
<
कसा झाला ते उद्या शुक्रवारी समजेल, पण कारण सहाजिक आहे , त्याला कमीत कमी टॉर्चर केलं, जर टार्गेट एकटी मेघाच असेल अख्ख्या घराचं तर हरणार सुध्दा तीच, अ‍ॅज गुड अ‍ॅज एकतर्फी मॅच.
कदाचित काही निगोशिएट केलं असेल किंवा तब्येत बिघडली असेल तर बिबॉ थांबवु शकतात तिला .
मिर्ची खायला लावणे फार झालं कि नाही यावर दोन्ही साइडने मतं येऊ शकतात त्या दूध-पाणी प्यायला लागलं तशीच !
त्रास होतो तर नव्हती खायची आणि पडायच होतं बाहेर, जशी सोमि खान बाहेर पडली, तेच तर टास्क होतं !
लिक्विड सोप हा खायचा पदार्थ नाही , म्हणून तिथे मात्रं थांबवलं बिबॉ ने.

त्रास होतो तर नव्हती खायची आणि पडायच होतं बाहेर, >>> हो बरोबर, पण ती मेघा आहे. ती नाही पडणार बाहेर पण मग झालेल्या त्रासाबद्दल बोलून काय होणार. तिचा choice होता तो.

बापरे काय ते टास्क, मेघा सोमि दोघींच्या ओकार्या बघूनच मलाही मळमळायला लागलं !
सोमिचा जीव लगेच घाबरा झाला तिखटाच्या पाण्याचा ग्लास + मिरच्या काँबो नंतर तिने गिव्हप केलं
मेघानी मात्रं कच्ची कार्ली, कच्ची अंडी, हिरव्या मिरच्या, वसाबी, टोबॅस्को सॉस, ग्रीन चिली सॉस कसं एकावर एक खाल्लं तिचं तिलाच माहित, कामलीची जिद्द आहे , कोपरापासून दंडवत !
Btw काल पुष्करला पुन्हा शिव्या दिल्या मनातल्या मनात, त्या नमुन्याने मेघा ओकली म्हणजे दूध प्यायली नाही असं लॉजिक लाऊन तिला गिव्हप करायला लावलं होतं , नशीब इथले स्पर्धक कितीही अ‍ॅग्रेसिव्ह अस्स्ले तरी ओकारी लॉजिक नाही लावल पुष्कर सारखं !
रोमिलचं जेस्चर अगदीच awww होतं काल, सोमि आणि मेघाला त्रास होत होता म्हणून हाताला हळुच मध लाऊन जात होता, हात चोळण्याच्या निमित्तानी, अर्थात दीपिकाला सोमिचे हात दिसले आणि तिने चिटींग आहे असा हंगामा केला.
नव्या बातमीनुसार डबल एव्हिक्शन या वीकेंडला आणि नेहा परत येणार म्हणे !
बिबॉ काही घरातली गर्दी कमी करायला तयार नाहीत , सगळे परत येतायेत Proud
असो, नेहा येणे नक्कीच डिझर्व करते पण तिच्या येण्याने मेघाबरोबर मराठी व्होट्स डिव्हाइड होणार.
तरीही यावेळी तिने दीपिकाची गुलामी न करता मेघाला जॉइन करावं !

नेहाला परत आणणार असतील तर मेघा गेस्ट तर नाही ना, असं वाटायला लागतं किंवा नेहाला गेस्ट म्हणून आणतील.

Hahaha guys , stop doubting and don't believe on rumour videos , please trust me on this !
Megha's hubby himself confirmed , she is NOT a guest !
Not sure if Neha is coming as guest though!
Saba and Anup are eliminated.

दीपक new captain...
आज सलमान श्री ला मस्त झापणार आहे वाटत..

मेघाने दीपक आणि रोमिल सोबत डिल केली.
आधी ती बोलली की मी टास्क क्वीट करेन पण पुढच्या कॅप्टन्सी टास्क मध्ये तुम्हाला मला सपोर्ट करावा लागेल आणि भविष्यात कधीच मला नॉमिनेशन मध्ये टाकायचे नाही..
ही गोष्ट रोमिलने सबा आणि सुरभीला सांगितली..
पण त्या दोघींना ही डील मान्य नव्हती..
हे रोमिलने मेघाला सांगितलं. (हम आपसे झुठा प्रॉमीस नहीं कर सकते असच काहीतरी बोलला तो)

मेघाने मग फक्त रोमिल आणि दीपकला विचारलं की next time captain बनवणार का मग मला?
त्यावेळी सपोर्ट करावा लागेल तुम्हाला..
रोमिल बोलला contender बनण्यासाठी मदत करू आम्ही..
मेघा बोलली ते मी स्वतः बनू शकते.
दीपकने शेवटी सांगितले की आम्ही तुला next time सपोर्ट करू..
Romil फक्त मग एवढा बोलला की जर तेव्हा मी सुद्धा contender असेन तर मी neutral राहीन.
शेवटी मेघा train च्या खाली उतरली..
आणि बोलली की मला बर्‍याच गोष्टी clear झाल्या..
जाता जाता KV ने तिला hug केल.

श्रीला काम सांगितलं नव्या कॅप्टन ने तेव्हा रागाने झाडू मारत होता..

जेलमध्ये टाकायच्या आधी रोहित श्रीला बोलला होता की मी जसलीन किंवा रोमिल च नाव घेणार...
यावेळी जे तीन जण आधी कन्फेशन रूममध्ये जाणार त्यांनाच अधिकार मिळणार होता..
सबाने शिवाशीषच
शिवाशीषने रोमिलच
आणि रोहितने श्रीच नाव घेतलं.

दीपक कॅप्टन म्हणून त्याला दिलेल्या अधिकाराने त्याने रोमिल च्या जागी जसलीन ला जेल मध्ये पाठवलं.

रोमिल पण हुशार दिसतोय, त्याला पण mastermind म्हणतात काही जण. मेघापुढे त्याची हुशारी टिकेल का पण Lol

कविता thank u डीटेल्ससाठी.

Dj??

Pages