तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

Happy
ईशाचा तोच तो ड्रेस दाखवितात...लाल निळा पिवळा......टाईट बाह्यांचा!!
इशाला रडता येत नाही अजिबात...विचित्र तोंड करते....! आणि खरंच कसला खरखरीत आवाज.....!! पत्र्यावर सुरीने घासल्या सारखा......!
विक्रांत मात्र एकदम मस्त दिसत होता..पिवळा शर्ट - ब्राऊन चेक्सची पँट..... पाणी भरलेले आर्त डोळे, अव्यक्त प्रीतीचे न बोललेले पण ऑलमोस्ट ऐकू येणारे शब्द, मोहवून टाकणारी बॉडी लँग्वेज..... Happy

आधी बाबांनी बॅग पकडली >>> अन त्या ईतक्याश्या बॅगेत, सगळ्या डाळी, पिठं, तांदुळ , गहु, कपडे अन ईतर गरजेच्या वस्तु आरामात मावल्या >>>>>>मलाही अगदी हाच प्रश्न पडलेला. आमचे तर साधे दोन दिवसांचे कपडे पूरत नाहीत तेव्हड्या बॅगेत.

तिचं डोकं आपटलं तेव्हा तो पटकन डोक्यावर हात ठेवेल असं वाटलं. बॅग बसमधून उतरवताना धरेल असंही वाटलं पण नाही. दुरून बघत बसतो नुसता.

अव्यक्त प्रीतीचे ऑलमोस्ट ऐकू येणारे शब्द, मोहवून टकाणारी बॉडी लँग्वेज..>> परफेक्ट. ती आवडते हे स्वतःशीही कबूल करवत नाहीये त्याला पण मग मनही ऐकत नाहीये आणि मग तिच्यामागे फरफट होतिये त्याची.

ईशाचा तोच तो ड्रेस दाखवितात...लाल निळा पिवळा >>>> मला त्यात काही वाटत नाही, म्हणजे तीची आताची जी आर्थिक स्थिती दाखविली आहे ते पाहता मोजकेच कपडे दाखविले ते ठिकच आहे

फारेन्ड यानी तिची बँगलोर ला ट्रान्स्फर अनाउंस झाली तो एपि बघावा..
सगळे मोजुन १०-२० वेळा बँगलोर म्हणाले असतिल..आणि इतकी ज्युनिअर.. मुलगी सोडुन जात नाहिये तर दुसर्या ऑफिस मधे जातिये .. त्या वर कंपनी मालकासहित सर्वांनी येवढा मोठा सोहळा का केला असेल?
इथे माझ्या ऑफिस मधे एका सिनिअर सरांची अत्ताच बदली झाली दुसर्या ऑफिस ला ते जॉइन पण झाले .. कलिग्ज मिळुन बहेर जेवायला जायच ठरवलं आहे .. ते पण इन्फॉर्मल..
येवढा बुके... मोठी मिटिंग .. आणि ओनर ने देणे म्हणजे डोक्यावर पाणी
लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड सारखा घव्घवा

भावार्त डोळे, अव्यक्त प्रीतीचे ऑलमोस्ट ऐकू येणारे शब्द, मोहवून टकाणारी बॉडी लँग्वेज.....
ती आवडते हे स्वतःशीही कबूल करवत नाहीये त्याला पण मग मनही ऐकत नाहीये आणि मग तिच्यामागे फरफट होतिये त्याची.>> येस्स एक्झॅक्टली !अगदी माझ्या मनातलं !!
आमचे तर साधे दोन दिवसांचे कपडे पूरत नाहीत तेव्हड्या बॅगेत.>> जाऊद्या हो तिच्याकडे तसेही कमीच दाखवलेत ड्रेसेस .. बाकी डाळ तांदूळ मसाले थोडेसेच दिले असतील .. मला आधी वाटलं कि बस च्या पोटात (डिक्की त ) अजून एक बॅग ठेवली असेल ..पण एवढ्या ब्यागा नसाव्यात प्रोडक्शन हाऊस कडे Wink
पण मला नेहेमी तिच्या चपट्या पर्स चं आश्चर्य वाटतं .. त्यातच डबा बाटली मोबाईल .. तरी ती टम्म फुगलेली / भरलेली /जड कधीही दिसत नाही . नायतर आमच्या पर्सा कितीही आवरा ..कायम जड ओझं Sad

पण जनरल कालचा भाग मला जरा बोर झाला .. किती तो हट्टी पणा आणि गळेपडूपणा .. आता उतरलीस ना गाडीतून मग जा ना गुमान घरी आणि मग २ तास घे त्या सुभा ला कोपच्यात आणि विचार खडसावून .. इथे रस्त्यात काये ?!
तिला ओरडताना लोकमान्य अन् तिनं भोकाड पसरलं की बालगंधर्व आठवतात>> Lol

सुभा तिला घरी घेउन येतो , स्वतःच्य बेडरुममधे झोपवतो, आणि बाई एकदम निरागस बालकासारखी झोपुन जाते तिथे . असे दिसतेय प्रोमोत.

ती ईशा जर एवढं करून सुभा ची ह्या/मागच्या जन्मीची मुलगी निघाली ना तर इशाचा आणि आपला मस्त पचका होणार Happy
लम्हे सारखी स्टोरी असेल नाहीतर पूर्वी (स्मृतिभ्रंश / किंवा ... व्हायच्या आधी) गार्गी फुले ही शिल्पा तुळस्कर असणार Lol म्हणून तो नेहमी तिचे फोन उचलतो, तिला आता काही आठवत नाही पण त्याला सगळं लक्षात आहे Lol

स्वतःच्या घरी नाही नेत..वाटेत कुठंतरी आसरा घेऊन थांबलेत. इशाबाई तिथंही निवांत लोळतायत. डेस्क/ऑफीस /ऑफीसमधलं कोणी नुसतं दिसलं तरी गुंगी येते तिला बहुतेक Happy
आता जब वी मेट पिक्चर सुरु झालाय. प्रवासात प्रेमाचा स्वीकार होणार असं दिसतंय.

तिचे एकूण एक वागणे तंतोतंत सुभाने एच आर कडे तुरंत तक्रार करावी व हॅरेस्मेंट ची केस नोंद वावी अशीच आहे. त्रास दायक पिपाणी निव्वळ. मला बघायला अन कंफर्टेबल होते मला वाट ते प्रेक्षक वर्गाची एकत्रि त फँटसी असेल म्हणून चालली आहे मालिका.

क्षक वर्गाची एकत्रि त फँटसी असेल म्हणून चालली आहे मालिका.---- बरोबर.
बहुतेक सगळ्या मालिका fantasy element मुळे चालतात.

तिचे एकूण एक वागणे तंतोतंत सुभाने एच आर कडे तुरंत तक्रार करावी व हॅरेस्मेंट ची केस नोंद वावी अशीच आहे. त्रास दायक पिपाणी निव्वळ. मला बघायला अन कंफर्टेबल होते >> अमा अगदी अगदी. काल मी खूप दिवसांनी पाहिला एकच भाग पण मला जाम चिड आली. विस आणि ईशा दोघांचीही अर्थात ईशाची जास्त. किती ते मागे लागणं लोचटासारखं Angry अरे असेल त्याची काही मजबूरी. पर्सनल स्पेस वगैरे असते की नाही. सारखं काय कबूल करा, कबूल करा.

अर्थात लेखक केड्या म्हटल्यावर आनंदीआनंदच असणार हे उघड आहे.

सुभाने एच आर कडे तुरंत तक्रार करावी व हॅरेस्मेंट ची केस नोंद वावी अशीच आहे. >>सुभानं का तक्रार करावी? तोच तर मागे लागलेला दिस्तोय ना आता/?

सुभानं का तक्रार करावी>> अहो तो अ‍ॅसेट रिच आहे. ही फार पहिल्या दिवसा पासून मागे लागलेलीच आहे. तयाचा रिस्पॉन्स तळ्यात मळ्यात असाच आहे. जरा जेंडर रिव र्स करून बघा आतापरेन्त # मीटू झाले असते.

मुलगा मागे लागला असता एखाद्या मध्यमवयी न बाईच्या तर तिचे झाले असते ना. कदाचित आपल्याला कोणी भाव देते आहे ह्याचा सुखद अनुभव.पण त्यामागे स्वार्थ आहे हे लक्षात येउन ही न वळणे. नोकरी गेलीच असती त्या मुलाची. इथे पाळण्यात ठेवून प्रेमा तुझा रंग कसा चालले आहे. नॉट डन यार. आजकाल आठवी नववीतली पोरे पोरी पण असले प्रेम करत नाहीत. इशा कहर आहे. त्यात ती आई उठ सूट एम डीला फोन!!

विक्रांत मात्र एकदम मस्त दिसत होता..पिवळा शर्ट - ब्राऊन चेक्सची पँट..... पाणी भरलेले आर्त डोळे, अव्यक्त प्रीतीचे न बोललेले पण ऑलमोस्ट ऐकू येणारे शब्द, मोहवून टाकणारी बॉडी लँग्वेज..... Happy ..रीयली एकदम प रफेक्ट .... मनातल बोललात..

ती ईशा जर एवढं करून सुभा ची ह्या/मागच्या जन्मीची मुलगी निघाली ना तर इशाचा आणि आपला मस्त पचका होणार Happy
लम्हे सारखी स्टोरी असेल नाहीतर पूर्वी (स्मृतिभ्रंश / किंवा ... व्हायच्या आधी) गार्गी फुले ही शिल्पा तुळस्कर असणार Lol म्हणून तो नेहमी तिचे फोन उचलतो, तिला आता काही आठवत नाही पण त्याला सगळं लक्षात आहे Lol >>>>> :)) Lol

सुभाने एच आर कडे तुरंत तक्रार करावी व हॅरेस्मेंट ची केस नोंद वावी अशीच आहे. >>सुभानं का तक्रार करावी? तोच तर मागे लागलेला दिस्तोय ना आता/? : हो .... ति तर जात होती ... हा च गेला ना थाबवायला

खरंच जेव्हा love confession चा सीन दाखवतील ना, नको नको वाटेल. सुभा इतका छान व्यक्त होईल....with and without डायलाॅग्ज पण....आणि ही रडूबया कचरा करून टाकेल पूर्ण सीनचा. Uhoh
कशी कुणी दुसरी छान हिरोईन मिळाली नाही यार यांना. Angry

लिफ्ट मागितली म्हणून तो ओरडतो तिच्यावर; त्यावर तिला रडू येणंही समजू शकतो; पण ते रडणं शाळकरी मुलीसारखं का दाखवलंय? Uhoh 'आई....सरांनी मला वाऽऽ केलं ऽऽ...' असे भाव होते तिच्या चेहर्‍यावर Uhoh

फ्रस्ट्रेशन, अपमान, अगतिकता, तो प्रेमाची कबुली देत नसल्याने झालेली सैरभैर अवस्था, हे सगळं त्या रडण्याच्या २-४ सेकंदांच्या सीनमध्ये दाखवायचा चान्स होता तिला...

अर्थात त्या २-४ सेकंदांत हे सगळं दाखवता येईल हे आधी दिग्दर्शकाला वाटायला हवं. Uhoh

खरंच जेव्हा love confession चा सीन दाखवतील ना, नको नको वाटेल. सुभा इतका छान व्यक्त होईल.. >>>>> हो ना... खावुन टाकेल पुर्ण सीन.. तो

पण तो सीन दिवाळी च्या शुभ मुहूर्त्ता वर दाखवती ल......

हिरॉईन अनाकर्षक एखाद्या गाठोड्यासारखी ( शेपलेस पण आणि निर्विकार पण) नाही वाटत का? आणि हिरो सुजकट तारुण्य संपत आलेला प्रौढ, जे मिळतं आहे ते गाठोडं तरी हातचं जाऊ नये म्हणून प्रयत्नशील. लेखकाला अगदीच न फुलवता आलेली लव्हस्टोरी आहे. त्यामुळे मुलगी श्रीमंत पैसेवालयाच्या मागे लागणारी स्वार्थी आणि हिरो तरुण मुलीच्या मागे मजबूर म्हातारा वाटतो.
सुबोध इतका छान ऍक्टर आहे, एखादी छान इनोसंट (पण म्हणजे इशासरखी गबाळी आणि बावळट नाही) मुलगी आणि सेन्सिबल कथानक असतं तर फार सुंदर सिरीयल झाली असती. एखाद्या M&B पुस्तकासारखी. पण काहीच कारण नसताना दोघे 3-4 थ्या एपिसोडमध्ये प्रेमात पडल्याने त्यांची इंटेन्शन्स भलतीच वाटतात. बाकी एकुणातच सगळं इललोजीकल घटना प्रसंगांची भेळ वाटते आहे. इथे नियमित वाचते आणि सुबोध कौतुकाने ओथंबलेल्या पोस्ट्स वाचून परत पाहायचा मोह होतो, पण मग इशा हेटर्स मला त्यांच्या पोस्ट्स लिहून वाचवतात.

पण मला तो सीन खरंच आवडणार नाही बघायला.
बचकांड्या हिरोइणीसमोर सुभा कम्फेशन करताना आवडणार नाही.
काल पण तो इशा इशा करत मागे मागे फिरत होता ते ही नाही आवडलं.
एखादी थोडी मोठी दिसायला हिरोईण घेतली असती तर एवढा काय स्टोरीत फरक पडला असता?
ही तर एकदम इयत्ता चवथी वाटते.

<<<पण काहीच कारण नसताना दोघे 3-4 थ्या एपिसोडमध्ये प्रेमात पडल्याने त्यांची इंटेन्शन्स भलतीच वाटतात.>>>>>>>
अगदी. थोडं थोडं एकमेकांबद्दल काहीतरी वाटतंय.
त्यात आणि काही पुर्वजन्माचे किंवा पुर्वायुष्याचे संकेत / धागेदोरे मिळताहेत. त्यातुन प्रेम होतंय असं काही महिने सुरु ठेवायला हवं होतं.
मग अजुन वेगळाच सुभा बघायला मिळाला असता Happy
पण हे झट प्रेम पट ब्याह आहे
<<<हिरॉईन अनाकर्षक एखाद्या गाठोड्यासारखी ( शेपलेस पण आणि निर्विकार पण) नाही वाटत का? >> हो खरंतर शेपलेस कालच माझ्याही लक्षात आलं Happy

त्या दोघांच्यात प्रेम कसं फुललं वगैरे ला जास्त महत्व नसावं या मालिकेत ... मला वाटतं त्या नंतर च्या प्रवासाबद्दल असणार .. आणि सुभा काय ७-७ ८-८ वर्ष चालणाऱ्या पाचकट शिरेलीत काम करणारा वाटत नाही .. सो होपफुली कथा चांगल्या वळणावर राहील आणि वेळेत संपेल ..
हिरॉईन अनाकर्षक एखाद्या गाठोड्यासारखी ( शेपलेस पण आणि निर्विकार पण) नाही वाटत का? / बचकांड्या हिरोइणीसमोर >> आईगं अगदी कचराच केलात हो !
'आई....सरांनी मला वाऽऽ केलं ऽऽ...' असे भाव होते तिच्या चेहर्‍यावर
फ्रस्ट्रेशन, अपमान, अगतिकता, तो प्रेमाची कबुली देत नसल्याने झालेली सैरभैर अवस्था, हे सगळं त्या रडण्याच्या २-४ सेकंदांच्या सीनमध्ये दाखवायचा चान्स होता तिला >> हो हे मात्र अगदीच खरं आहे! बस मधून उतारण्यापासून तो सगळाच सीन एकंदरीत गंडलेला /बालीश /पाचकळ / आणि क्षणाक्षणाला Uhoh करायला लावणारा होता माझ्यासाठी तरी

पाणी भरलेले आर्त डोळे, अव्यक्त प्रीतीचे न बोललेले पण ऑलमोस्ट ऐकू येणारे शब्द, >>>>> पण ते इशाला कळायला हवे ना. हिची आपली सतत जबरदस्ती चालू आहे सुभावर. ती लहान मुले कशी आपल्या आईवडिलान्ना सारखे प्रश्न विचारुन भन्डावून सोडतात तशी ही सारखी विचारत सुटलीये त्याला.

' तुम्हाला माझ प्रेम स्विकायरायच नाहिये, ते कळल मला. आता सगळच सम्पल. ' हयाला काय अर्थ राहिलाय का? अरे एका माणसाने आपल्या प्रेमाला नकार दिला तर आयुष्य सम्पत का? ती सुभाच्या ऑफिसात राहून सुद्दा काम करु शकली असती की, मूव ऑन झाली असती की, बन्गलोर जायचा कसला हा फालतू हट्ट? हळूहळू ती विसरली असती सुभाला ( मग हि सिरियल हयाच आठवडया सम्पली असती. Lol ) पण नाही हिला तोच हवाय ना.

बॅग बसमधून उतरवताना धरेल असंही वाटलं पण नाही. दुरून बघत बसतो नुसता. >>>>> हि सगळी इशाबाळाची कृपा. 'माझ मी बघून घेईन. तुम्ही काही एक गरज नाही मदत करायची. ' अश्या म्हणाल्या हया मॅडम.

तो अनोऴ़खी माणसाकडून लिफ्ट मागणे मुर्खपणाच होता. बर सुभावर तिचा राग आहे हे मान्य. पण सुभा फुकट गाडी पाठवतोय, गाडीने जाऊया म्हणतोय, तर तिने त्याच, भलेही धुसफुस करत, अबोला धरत का होईना ऐकाव ना.

इशाचे बाबा म्हणत होते, जाताना मुलीने एकदा सुद्दा आपला विचार केला नाही. कसा करणार, हिच्या मनात तर सुभाच भरलाय ना.

बादवे, ती मायरा सुद्दा सुभाच्या प्रेमात आहे का? Uhoh 'सरान्ना काही झाल नसेल ना' म्हणून चिन्तेत होती ती.

अरे!काय हे? किती negative लिहिताय तुम्ही सगळे Sad मला आवडते आहे ही सिरीयल Happy मला इथे मोठी पोस्ट सिरियलच्या बाजूनी type करायचा कंटाळा येतोय. मी सहसा सुबोधच्या घरचे सीन fwd करते. बाकी थांबत-पळवत बघते.

आता पाणचट होत चालली मालिका.....मला तर अजून नक्की कुठल्या क्षणी सुभा या मेंगळीच्या प्रेमात पडला आहे ते च आठवत नाही... प्रेम वाटतच नाही दोघांत... तीच्याकडून बळजबरी,भोकाड पसरून हट्ट(मला पायजेच हा माझ्या स्वप्नाचा राजा (आणि त्याचं वैभव)), आणि याच्याकडून पण वात्सल्य,नाईलाज,काळजी .... असो...या मालिकेत सुबोध भावे नसता तर मी या मालिकेचं तोंडही पाहिलं नसत... फक्त त्याच्या नावावर खपवतायेत हे लोक खराब माल... आता त्याने मालिका सोडावी,त्याची रिप्लेसमेंट येवू दे..हिचा पिच्छा सुटू दे... आणि आपला छळ थांबू दे...

खरंच ते तोंडाचा चंबू करून रडणं अतिशय इरिटेटींग होतं. तिच्या त्या खरखरीत आवाजावरचा कळस!
ती प्रेमात पडलेली वाटत न राहता स्वार्थी, स्वकेंद्रीत वाटत राहते. तिच्यापेक्षा त्या मायराच्या सरांना काही झालं नसेल ना या वाक्यात सरांसाठी काळजी दिसून आली.

Pages