हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅरीला डंबलडोर हॉगवार्ट मधील त्याच्या ऑफिसमधुन अ‍ॅपरेट करुन किंवा पोर्ट की वापरुन लिटल हँगलटनला नेत नाही >> मी कधी असं म्हटलं? मूडीरूपी क्राऊच कपला पोर्टकी बनवून नेतो.

वॉल्डोमोरचा वाँन्ड मोडायचा प्रश्नच कुठे येतो? त्या सिमिटरीमधल्या सिन नंतर हॅरीचा वाँन्ड तरी कुठे मोडतो? त्या दोघांच्या वाँन्डचे नुसते द्वंद्व होते.. व रिझल्ट इज ड्रॉ! >>> हेही काही कळलं नाही. मी कुठे काही म्हटलंय वाँड मोडण्याबद्दल?

मॅलफॉय मनरमधल्या घटनेनंतर, म्हणजे हॅरी डॉबीची ग्रेव्ह खणत असतांना शेल कॉटेजवर फिडेलियस चार्म वापरतात. >>

चैत्रगंधा, रॉन जेव्हा परत येतो तेव्हा हॅरी आणि हरमायनीला सांगतो की मी बिल आणि फ्ल्युर कडे गेलो होतो आणि बिल इज सिक्रेट कीपर फॉर शेल कॉटेज आणि आर्थर वीजली इज सिक्रेट कीपर फॉर द बरो. त्यामुळे तो चार्म आधीच परफॉर्म झाला होता.

बाय द वे.. टॉकिंग अबाउट मेमरी पेन्सिव्ह... हॅरी जेव्हा डंबलडोरच्या ऑफिसमधे पहिल्यांदाच त्या पेन्सिव्ह मधे जात असतो.. तेव्हाही मला प्रचंड भिती वाटत होती की आता हा बाबा परत कसा येणार? त्या समुद्राच्या बाजुच्या केव्ह व त्यातला तो लेक त तिथले डंबलडोरचे पोशन पिणे.. या सीन इतकाच तो .. हॅरी पेन्सिव्ह मधे प्रथमच व तेही एकटाच उतरतो तो प्रसंग मला भितीदायक वाटला होता.. Happy

चैत्रगंधा, रॉन जेव्हा परत येतो तेव्हा हॅरी आणि हरमायनीला सांगतो की मी बिल आणि फ्ल्युर कडे गेलो होतो >> हे बरोबर.
बिल इज सिक्रेट कीपर फॉर शेल कॉटेज आणि आर्थर वीजली इज सिक्रेट कीपर फॉर द बरो. >> हे मॅलफॉय मनर नंतर. रॉन spattergroit ने आजारी नसून हॅरी बरोबर आहे हे उघड झाल्यावर सगळ्यांना बरो मधून काढून मार्गारेटकडे नेतात.

आत्ता पुस्तक नाहीये. नेट वर हे मिळाले.
“. . . lucky that Ginny’s on holiday. If she’d been at Hogwarts they could have taken her before we reached her. Now we know she’s safe too.” He looked around and saw Harry standing there. “I’ve been getting them all out of the Burrow,” he explained. “Moved them to Muriel’s. The Death Eaters know Ron’s with you now, they’re bound to target the family—don’t apologize,” he added at the sight of Harry’s expression. “It was always a matter of time, Dad’s been saying so for months. We’re the biggest blood traitor family there is.” “How are they protected?” asked Harry. “Fidelius Charm. Dad’s Secret- Keeper. And we’ve done it on this cottage too; I’m Secret-Keeper here.

Harry Potter and the Deathly Hallows, Chapter 24 (The Wandmaker)

तु असे लिहीले आहेस की हॉगवार्टमधुन हॅरी लिटल हँगलटनला जाउ शकतो.. कधी गेला तो हॉगवार्ट मधुन तिथे? फक्त डंबलडोअरने पेन्सिव्ह मधुन त्याला तिथली सैर घडवली तेव्हाच... कारण एक्सेप्ट डंबलडोर्स ऑफीस.. हॉगवार्ट मधे इतर कुठेही अ‍ॅपरेट किंवा डिसॅपरेट किंवा पोर्ट की वापरता येत नाही... तो कप हॉगवार्ट स्कुलच्या बाहेर .. मेझमधे ठेवला असतो.. व म्हणुन मुडीचा तोतया त्याचे पोर्ट की मधे रुपांतर करतो किंवा करु शकतो व तिथुन तो त्याला लिटल हिंगलटनच्या सिमिटरीत घेउन जातो.

आणी तु म्हणालास की चौथ्या पुस्तकाच्या सुरुवातीला व्होल्डोमोर्टला वाँड कसा मिळाला.. मी त्याचा असा निष्कर्ष काढला की हि लॉस्ट हिज वाँड अ‍ॅट द एंड ऑफ थर्ड बुक..

जाउ दे.. असा किस काढत बसलो तर या पुस्तकातल्या बर्‍याच गोष्टी खटकु शकतात.. एक ओव्हरॉल स्टोरी म्हणुन ही सिरिज जबरी आहे यात वादच नाही... Happy

How are they protected?” asked Harry. “Fidelius Charm. Dad’s Secret- Keeper. >>> हा अजून एक घोळ. जर आर्थर सिक्रेटकीपर असेल तर बिल हॅरीला इतर लोक कुठे आहेत ते कसं सांगू शकेल? आता ह्यात पुन्हा बिलसुद्धा तिथला सिक्रेटकीपर आहे वगैरे थिअरी, पण ते तसं कुठेच म्हटलं गेलं नाही.

रॉनचा डायलॉग आता मलाही थेट आठवत नाही. घरी जाऊन बघतो. तुम्ही म्हणताय तसं असू शकेल.

<त्याचबरोबर, हॉगवार्ट्समधून पोर्टकी वापरून जर हॅरीला लिटल हँगलटनमध्ये नेता येत असेल, तर मग कपला पोर्टकी बनवायची आणि विशेष प्रयत्न करून हॅरीला चौथा चँपियन म्हणून एंटर करणे आणि वर्षभर जिंकवत बसणे इ. प्रताप करायची काय गरज, ते कळत नाही.>

दोन कारणं:
वोल्डेमॉर्ट परत येतो तेव्हा म्हणतो 'He(Harry) is highly protected both at Hogwarts and outside, in ways of which even he is not aware' असं काहीतरी. हॉगवर्टमधून हॅरीला पळवून नेणं तितकंसं सोपं नसावं.

दुसरं, पाचव्या पुस्तकात सिरीयस सांगतो की 'Nobody apart from his death eaters was supposed to know he'd come back. But you survived to bear witness'

शेवटच्या टास्कमध्ये हॅरी मेला असता, तर तो एक अपघात आहे असं दाखवता आलं असतं. कुणालाच कळलं नसतं की वोल्डेमॉर्ट परत आला आहे, आणि त्याला जायंट्स वगैरेंना recruit करता आलं असतं. लगेच पुढे सिरीयस म्हणतो

He is certainly not going to try and take on the ministry of magic with only a dozen death eaters.

इतर कोणत्याही वेळी मूडीच्या रूपातील क्राउचने त्याला पळवलं असतं तर डंबलडोरला कळलं असतं की काहीतरी चालू आहे, ते वोल्डेमॉर्टला परवडलं नसतं.

तु असे लिहीले आहेस की हॉगवार्टमधुन हॅरी लिटल हँगलटनला जाउ शकतो.. कधी गेला तो हॉगवार्ट मधुन तिथे?<<<<<
चौथ्या पुस्तकात. Voldemortला त्याचे शरीर परत मिळते त्यासाठी हॅरीचे रक्तही वापरले गेले आहे.

तो कप हॉगवार्ट स्कुलच्या बाहेर .. मेझमधे ठेवला असतो.. व म्हणुन मुडीचा तोतया त्याचे पोर्ट की मधे रुपांतर करतो किंवा करु शकतो व तिथुन तो त्याला लिटल हिंगलटनच्या सिमिटरीत घेउन जातो. >>> हॉगवार्ट्स ग्राऊंडलाही तोच नियम लागू आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या आत/बाहेर याचा संबंध नाही.

चौथ्या पुस्तकाच्या सुरुवातीला व्होल्डोमोर्टला वाँड कसा मिळाला.. मी त्याचा असा निष्कर्ष काढला की हि लॉस्ट हिज वाँड अ‍ॅट द एंड ऑफ थर्ड बुक.. >>> त्याची वाँड पॉटर्सच्या घरानंतर कुठे असू शकेल, असा विचार करा. थर्ड बूक वगैरे फार लांबची गोष्ट आहे.

हो श्रद्धा.. तो जातो तिथे पण हॉगवर्टच्या किल्ल्यातुन नाही... तर त्याच्या बाजुला असलेल्या मेझमधे असलेल्या कपरुपी पोर्टकीमुळे..हॉगवर्टच्या किल्ल्यात डंबलडोरने जादुने अ‍ॅपरेट डिसॅपरेट किंवा पोर्ट की ला बंदी घातली असते.. एक्सेप्ट हिज ऑफिस...

वोल्डेमॉर्ट परत येतो तेव्हा म्हणतो 'He(Harry) is highly protected both at Hogwarts and outside, in ways of which even he is not aware' असं काहीतरी. हॉगवर्टमधून हॅरीला पळवून नेणं तितकंसं सोपं नसावं. >>> पण अंती तेच झालं ना! अमुक एक गोष्टीला पोर्टकी बनवलं आणि ती पकडून तो तिकडे गेला, हेच घडलं ना?! त्यामुळे हे असे डायलॉग फक्त लेखिकेच्या सोयीसाठी वाटतात.

दुसरं, पाचव्या पुस्तकात सिरीयस सांगतो की 'Nobody apart from his death eaters was supposed to know he'd come back. But you survived to bear witness'
शेवटच्या टास्कमध्ये हॅरी मेला असता, तर तो एक अपघात आहे असं दाखवता आलं असतं. >> कसं? तोही प्रश्न आहेच. अ‍ॅवाडा केडाव्रा वापरून झालेला मृत्यू कसा लपून राहिला असता?

He is certainly not going to try and take on the ministry of magic with only a dozen death eaters. >> शेवटी त्याने तेच केलं खरं तर. Proud एक वर्ष प्रॉफेसीसाठी थांबला आणि उघडकीस आल्यावर जोरदार विध्वंस. मिनिस्टर फॉर मॅजिक बदलावा लागला पंधरवड्यात.

मी चुकुन तिसर्‍या पुस्तकाच्या शेवटी वाँडचे द्वंद्व झाले असे म्हणालो.. ते चौथ्या पुस्तकाच्या शेवटी झाले.. असो..

हॅरीच्या आइवडिलांना मारल्यावर हॅरीला मारताना कर्स उलटला.. पण व्हॉल्डोमोर्ट मेला नाही.. किंवा त्याचा वाँडही नष्ट झाला नाही.. पुस्तकात असे म्हटले आहे की त्याचा वाँड नाहीसा झाला? मे बी आय मिस्ड समथिंग?

पण जाउ दे.. असला किस काढण्यात मजा नाही... म्हणजे एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेण्या ऐवजी त्या पदार्थाचे तुकडे तुकडे करुन .. तेही इतके बारीक बारीक .. की मुळ पदार्थाची चवही तुम्हाला लागणार नाही.. Happy

हॅरीच्या आइवडिलांना मारल्यावर हॅरीला मारताना कर्स उलटला.. पण व्हॉल्डोमोर्ट मेला नाही.. किंवा त्याचा वाँडही नष्ट झाला नाही.. पुस्तकात असे म्हटले आहे की त्याचा वाँड नाहीसा झाला? मे बी आय मिस्ड समथिंग? >>> त्याचं शरीर नष्ट झालं. तो वाँड घेऊन अल्बानियाला पळू शकत नव्हता. सो बहुधा वाँड तिथेच पडली असेल. मग तिचं काय झालं? असा तो प्रश्न आहे.

असला किस काढण्यात मजा नाही >>> ते तुमचं मत झालं. Happy मला वाटते बुवा मजा असा विचार करण्यात. बाकी इतकं सगळं असून मला हॅरी आवडतो हे मी आधीच सांगितलं आहे. त्यामुळे तसा काय प्रॉब्लेम नाही. Happy

आणी एक.. इथे हॅरी पॉटरचा धागा बघुन मी ही सिरिज वाचल्यावर मला ती सिरिज आवडली हे लिहायला आलो.. ज्यांना ही सिरीज आवडली नाही किंवा खटकली त्यांची मते बदलायचा हेतु नाही..

माझ्याबरोबर बरेचसे फंडामेंटल ख्रिश्चन्स काम करतात.... त्यातल्या बर्‍याचश्या जणांनी त्यांच्या मुलांना ही पुस्तके वाचायला मनाई केली आहे.. व्हॉट अ पिटी! Sad

भास्कराचार्य.. नो वरीज... Happy मी नवा फॅन आहे.. तुमच्या इतका विचार किंवा अभ्यास त्यावर केला नाही .. एक स्टोरी टेलींग म्हणुन त्याचा आस्वाद मी घेतला व खुप खुप मजा देउन गेली ही पुस्तके..

हॉगवार्ट्समध्ये आणि ग्राऊंड वर अ‍ॅपारेट /डिसॅपरेट होता येत नाही. पण triwizard tournament साठी ministry rights वापरून ते प्रोटेक्शन तात्पुरते बायपास करणे शक्य असावे असा अंदाज .

आणी खर म्हणजे जिम डेलच्या आवाजात ही सर्व पुस्तके ऐकुन या पुस्तकांचा आस्वाद द्विगुणीत झाला.. ज्यांना ही पुस्तके परत वाचायची आहेत त्यांना एक वेगळा अनुभव हवा असेल या पुस्तकांचा तर जिम डेलने नरेट केलेली ऑडिओ बुक्स जरुर जरुर ऐका..

जिम डेलने या पुस्तकात १३४ जणा.न्चे आवाज काढले आहेत <<< ओह! मला वाटायचे ऑडिओ बुक म्हणजे नुसतेच एकसुरी वाचन असणार. आता हे मिळवून ऐकावे असे फार वाटू लागले आहे.

मुकुंद, ऑडिओ बुक्स कुठे मिळाली?

त्याचं शरीर नष्ट झालं. तो वाँड घेऊन अल्बानियाला पळू शकत नव्हता. सो बहुधा वाँड तिथेच पडली असेल. मग तिचं काय झालं? असा तो प्रश्न आहे.>> ती वाँड पॅटिग्रु घेऊन जातो ना?

नाही नाही गजाभाऊ - ऑडिओ बुक्स हा एक अमेझिंग प्रकार आहे. अगदी प्रत्येक पात्रासाठी वेगळा आवाज, लकबी वगैरे वापरून पुरेशी(च) नाट्यमयता आणतात वाचणारे.

राहावत नाही म्हणून - मराठीत 'रारंगढांग'चं ऑडिओबुक ऐकलं होतं - फार फार निराशा झाली. मराठीत सिनेमा हे बरेचदा पडद्यावरचं नाटक वाटतं तसं हे ऑडिओबुक हेही रेकॉर्ड केलेलं नाटकच वाटलं.

इथल्या पोस्ट्स वाचून मला कॉम्प्लेक्सच आला आहे. 'असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी!' Proud
तुम्ही मंडळींनी किती पारायणं केली आहेत? Happy

ऑडिओ बुक्स हा एक अमेझिंग प्रकार आहे. अगदी प्रत्येक पात्रासाठी वेगळा आवाज, लकबी वगैरे वापरून पुरेशी(च) नाट्यमयता आणतात वाचणारे. <<< सही. Happy
मी सगळी मालिका एकदा सलग वाचली आहे. नंतर काही संदर्भ/भाग आठवतील तसे ते ते पुस्तक काढून वाचतो अधूनमधून. सिनेमा एकही पाहिलेला नाही. इथेही रेंगाळतो - http://harrypotter.wikia.com. यात एक वाचायला घेतले की अधूनमधून येणार्‍या लिंकांमधून कुठे कुठे फिरून यायला होतं. (वरच्या कोपर्‍यात 'सर्च' ऑप्शन आहे.)

>>> नंतर काही संदर्भ/भाग आठवतील तसे ते ते पुस्तक काढून वाचतो अधूनमधून
हे मात्र ऑडिओबुकमध्ये अवघड होतं.

चैत्रगंधा, तुमचं रॉनच्या बाबतीत बरोबर असावं. पुस्तक वाचल्यावर फिडेलियस चार्म हॅरी तिथे पोचल्यानंतर केला असावा, असं मानायला जागा आहे असं वाटलं. Happy पण त्या चार्मबद्दल इतर प्रश्न आहेतच.

स्वाती... तुला १००% अनुमोदन.. मी तर गेली ४ वर्षे ऑडियो बुक्सच ऐकत आहे... गाडी चालवण्याच्या वेळेचा फार फार सदुपयोग होतो.... काही अतिशय सुंदर नरेट केलेली माझी काही आवडती पुस्तके म्हणजे... द गर्ल ऑन द ट्रेन... रिटन बाय पॉला हॉकिन्स, सन ( रिटन बाय फिलिप मायर), मॅटरहॉर्न .. रिटन बाय कार्ल मार्लँटस आणी कस्टर्ड्स लास्ट स्टँड.. अजुनही बरीच आहेत... असो.. ती ऐकल्यावरच त्याची मजा कळेल. असो.

पण जिम डेलचा हॅरी पॉटर एक्पिरिअंस वॉज द ज्वेल ऑन द क्राउनच म्हटले पाहीजे... खासकरुन डंबलडोर व हॅग्रिडचा आवाज तर जबरीच!

गजानन व टिना... तुम्ही जर अमेरिकेत असाल तर कुठल्याही पब्लिक लायब्ररीतुन डिजिटल बुक डाउनलोड करुन घेता येते... १ पुस्तक २१ दिवसांसाठी..

शेवटचे पुस्तक ऐकताना माझी खुप घालमेल होत होती... जवळ जवळ अर्धे पुस्तक होउनही हॅरीकडे तोपर्यंत फक्त नकली हो क्रक्सचे लॉकेट असते.. अजुन कुठली हो क्रक्स बाकी आहेत ( नगिनी सोडुन) हेही त्या त्रिकुटाला माहीत नसते... डंबलडोरही मरण पावला असतो...म्हणजे त्याची मदत शुन्य होणार असे वाटत राहते ... व तिथे बिल व फ्लर डेलकरच्या लग्नाचे पाल्ह्हाळ चालु असते... खुप राग येत होता ते ऐकताना...

आणी ते असली हो क्रक्सचे लॉकेट मिनिस्टर ऑफ मॅजिकमधे जाउन.. डिलोरस अंब्रिजकडुन काढुन घेतल्यावरही ती तळ्यातली ग्रिफेंडॉरची तलवार मिळेसपर्यंत मला चैन पडत नव्हते.अबब... किती अंत पाहायचा वाचकांचा... Happy

आणी शेवटचा डायडमचा हो क्र्क्स पण अगदी व्हॉल्डोमोर्ट यायच्या आधी... ५ मिनिटे असताना सापडतो

माझी इथे घालमेल घालमेल... Happy

>>> गाडी चालवण्याच्या वेळेचा फार फार सदुपयोग होतो....
अगदी!!
कित्येक पुस्तकं मी व्हॉल्यूममुळे वाचायला हातात घ्यायला घाबरले असते ती त्यामुळे सहज ऐकून झाली. 'क्राइम अ‍ॅन्ड पनिशमेन्ट', 'लॉर्ड ऑफ द फ्लाइज' वगैरेंसारखी. जिम डेल भारी आहे याला अनुमोदनच अनुमोदन!! Happy

योकु, ऑडिबल.कॉमची मेंबरशिप घेतली आहे. आता वॉलमार्टने त्यांचीही सर्व्हिस आणली आहे.
मुकुंद म्हणाले तशी लायब्ररीत मिळतात, सीडीज विकतही मिळतात.

एक रिंग सोडल्यास इतर सर्व होरक्रक्सेस १७ वर्षांच्या मुलांनी नष्ट केले, हे वाचताना १७ वर्षांच्या मला फार भारी वाटलं होतं. Lol

स्वाती, मुकुंद, ऑडिओ बुक्स मजेदार वाटतायत. पण आता डोक्यात त्या त्या पात्राला एक आवाज स्वतःच दिला असल्याने तो तसा नसेल, तर बहुधा मी पुढे जाणार नाही. पण एकदा प्रयत्न करून बघेन.

Pages