हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण आता डोक्यात त्या त्या पात्राला एक आवाज स्वतःच दिला असल्याने तो तसा नसेल, तर बहुधा मी पुढे जाणार नाही. पण एकदा प्रयत्न करून बघेन.
>>>
मी मागे एकदा ऑडिओ बूक्सबद्दलच्या चर्चेत नेमके हेच म्हणालो होतो. फिक्शन ऑडिओ बूक्सवर ऐकणे मला जमले नाही. नॉन-फिक्शन मात्र खूप ऐकले. गाडी चालवण्याचा वेळेचा सदुपयोग होत असे.
गेम ऑफ थ्रोन्सचे ऑडिओ बूक्स रॉय डॉट्रिस २००पेक्षा अधिक वेगवेगळे आवाज/लकबी काढून सादर करतो. मी ते ऐकण्याचा पण प्रयत्न केला मात्र नाही जमले Sad

माझ्या डोक्यातल्या रास्कॉलनिकॉवचा आवाजाचा आणि त्या पुस्तक सादर करण्यार्‍याचा कधी मेळ बसला नाही. आमचे आजोबा दूरदर्शनवरचे महाभारताबद्दल एकदा म्हणाले होते की कौरव-पांडवांच्या डोक्यातल्या प्रतिमा आणि दूरदर्शवरचे अभिनेते यांचा मेळ बसत नाही.

वर कुठल्यातरी पोस्टमधे भास्कराचार्य म्हणतात १० -१२ डेथ इटर्सनी सगळी मिनिस्ट्रीऑफ मॅजिक ताब्यात घेतली आहे... मला मिनिस्टरी ऑफ मॅजिक खुपच पुचाट वाटली.. तिकडे बुक ५च्या शेवटी डंबलडोर आर्मीची सहा पोर टोर सिरिअस ब्लॅकला शोधायला.. तो धोक्यात आहे असे हॅरीला वाटल्यामुळे.. मिनिस्टरीत प्रवेश करतात.. मग थोड्या वेळाने ऑर्डर ऑफ फिनिक्सची माणसे येतात.. डेथ इटर्स.. व्हॉल्डोमोर्ट सकट तर तिथे असतातच.. त्या सगळ्य्यत तुंबळ युद्ध होते.. ते युद्ध डंबलडोर त्याच्या पराक्रमाने संपवतोही... व मग हिंदी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणे... ऑराज व कॉर्नेलिअस फज उगवतात.... हे सगळे तिथे घडत असताना ऑराज ना त्याचा सुगावाही लागत नाही ... Happy

जिम डेलने कॉर्नेलिअस फजचा आवाजही मस्त काढला आहे.

डंबलडोर, हॅरी व हर्मायनी नंतर मला आवडलेले कॅरॅक्टर म्हणजे.. डॉबी! डॉबीचा आवाजही जिम डेलने अफलातुन काढला आहे.

डंबलडोर मरतात तेव्हा खुप जिव्हारी लागले.. डॉबी मरतो तेव्हाही खुप वाइट वाटले.

टण्या, खरं आहे. फिक्शनबद्दल मी साशंक आहे.

मुकुंद, हो. डॉबीबद्दल वाचून मला रोलिंगला जे मिळेल ते फेकून मारायची इच्छा झाली होती. पूर्ण सिरीजभर काहीही गरज नसताना स्वतःला धोक्यात घालून बिचारा हॅरीसाठी जीव टाकत राहिला, त्याच्या नशिबी हे का लिहावं रोलिंगने!

<अमुक एक गोष्टीला पोर्टकी बनवलं आणि ती पकडून तो तिकडे गेला, हेच घडलं ना?! >
अर्थात! मी पोर्टकी बनवणं अशक्य आहे असं म्हटलेलं नाही. पण डंबलडोरच्या डोळ्यांसमोर इतकं सहज हॅरीला पळवणं फार कठीण असेल.

एकच संधी होती हॅरीला लगेच पळवायची. ती म्हणजे तो क्रमसोबत फिरत जंगलाजवळ जातो तेव्हा. पण तेव्हा बार्टी क्राउचला गायब करणे ही इम्पोस्टरसाठी प्रायोरिटी असते हे एक. आणि क्रम, हॅरी आणि क्राउच असे तिघे असताना त्याला पळवणं जास्त मेसी प्रकरण झालं असतं.

काय आहे, इतर कुठच्या वेळी हॅरीला पळवलं असतं, तर कुणीतरी दुसऱ्याचा त्यात हात आहे हे लगेच लक्षात आलं असतं. पण मेझमध्ये असं काही होणं, हा अपघात म्हणून गणला गेला असता.

<कसं? तोही प्रश्न आहेच. अ‍ॅवाडा केडाव्रा वापरून झालेला मृत्यू कसा लपून राहिला असता?>

क्रम इंपेरियस कर्सखाली होता. त्याने केल्याचं दाखवता आलं असतं. इम्पोस्टर तेवढं जमवू शकलाच असता की.

ही एक शक्यता झाली. मुळात Triwizard tournament ही डेंजरस आहे, आणि त्यात आधी बऱ्याचदा बरेच चॅम्पियन्स मेल्याचं पुस्तकाच्या सुरुवातीलाच आहे. It is a binding contract. त्या टुर्नमेंटला स्वतःचं मॅजिक आहे. Anything can look like an accident. सॅड्रिक मरणं हा एक अपघात होता, हेच मिनिस्ट्री सांगते की जगाला. वोल्डेमॉर्टने सोळाव्या वर्षापासून केलेले अनेक खून दुसऱ्यांच्याच नावावर खपलेले असतात नाहीतरी.

<शेवटी त्याने तेच केलं खरं तर.>
पाचव्या पुस्तकात जेव्हा मिनिस्ट्री तो परत आलाच नाही या भ्रमात सगळ्यांना ठेवायला धडपडत असते, तेव्हा तो जायंट्सना आपल्या बाजूने वळवत असतो. फजने डिमेंटर्स काढून टाकायला नकार दिलेला असतो, पण वोल्डेमॉर्ट त्यांना आपल्या बाजूने वळवून त्याचे डेथ इटर्स सोडवून घेतो. पूर्ण वर्षभर तो तयारी करत असतो, उघड काहीच करत नाही.

मुळात हॅरी मेला असता, तरी डंबलडोर आणि ऑर्डर ऑफ द फिनिक्सने लढणं सोडलं नसतं. त्यामुळे त्याचं परत येणं, त्याची आर्मी पूर्ण जमा झाल्याशिवाय जगाला कळू देणं त्याला परवडणारं नव्हतं. मला 'cursed child' आवडलेलं नाही, पण त्यात अनेक घटना वेगळ्या घडल्या असत्या तर काय झालं असतं, हे छान दाखवलं आहे. त्यातल्या एका alternate भविष्यात हॅरी शेवटच्या युद्धात मरतो, आणि तरी ऑर्डर लढणं चालू ठेवते, असंही आहे.

थोडक्यात हॅरी मरो न मरो, वोल्डेमॉर्टला इतर अनेक धोके होते. मिनिस्ट्रीने पाचव्या पुस्तकात इतका दुबळेपणा केला नसता, तर तो अजून खूप वीक झाला असता. पण तसं घडलं नाही.

हॅरीचे नाव ट्रायविझर्ड टुर्नामेंट मधे आल्यानंतर 'ते कसं काय?' ह्याचा डंबलडोर पाठपुरावा का करत नाही?

इथे सगळे प्रकांडपंडीत आहेत. मी तर बिगीरीच्या लायकीचा नाहीये.
सगळे भाग बघुनही अनेकदा लिंक नाही लागत.

मी वाचलंय त्याप्रमाणे जो सिक्रेटकिपर असतो त्याने जर दुसऱ्या विश्वासू माणसाला सिक्रेट सांगितले तर तो दुसरा माणूस सुद्धा सिक्रेट किपर होतो. 7 व्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. जेव्हा ते तिघ सिरियस च्या घरी जातात तेव्हा रॉन सांगतो.

हायझेनबर्ग... मित्रा..मी बायबल.. दोन्ही.. ओल्ड टेस्टामेंट व न्यु टेस्टामेंट.. अथ पासुन इथपर्यंत वाचली आहेत.. रामायण व महाभारत वाचले आहे.. गीता वाचली आहे.. झालच तर ऑडेसी व इलिअड सुद्धा वाचले आहे. >> बाबो.. आदर , आदर आणि फक्त आदर.

हायझेनबर्ग... तिच्या निव्वळ स्टोरी टेलींग व कॅरेक्टर डेव्हलपमेंटच्या स्किल बद्दल जर डिबेट करायचा असेल तर कॉफी तयार ठेव.. >>> अहो... मी पण तुमच्यासारखाच कट्टर पॉटरहेड आहे... रोलिंग बाईंच्या स्टोरी टेलींग व कॅरेक्टर डेव्हलपमेंटच्या स्किल बद्दल माझ्या मनात अपरंपार आदर आहे. अनेकदा तिला मनातल्या मनात दंडवत घातले आहेत.

आपली क्रिकेट बद्दलची चर्चा सुद्धा बाकी आहे.... Happy >> त्याही आधी टेनिसची... तुम्ही डाऊन द मेमरी लेन तर सोडून द्या... ब्रेकफास्ट विथ चँपिअन सुद्धा सोडून दिले... तेही अजून फेडी रिटायर्ड झालेला नसतांना.. ते टेनिसचे बाफ ओस पडले तुम्ही काढता पाय घेतल्या पासून...
माझ्या कथांचा एक हक्काचा दर्दी चाहता सुद्धा तुम्ही हिरावून घेतला... आधी हा जुना बॅकलॉग सेटल करा तोवर मी हॅरी पॉटरच्या ऑडिओ बुक्सचेपहिले पारायण ऊरकतो.. Proud

अर्थात हायझेनबर्ग यातही डिबेट करू शकतील म्हणा Light 1 >> Lol अ‍ॅडमिनने मला मायबोली आंदणच दिलेली आहे.
पण काहीही काळं गोरं, चांगलं वाईट किंवा काँग्रेस बीजेपी नसतं... त्यामुळे डिबेट तर कुठेही शक्य आहेच... अपवाद हॅरी पॉटर जिथे डिबेट नाही तर कौतुकासाठी चढाओढ करावी लागेल.

डेथ कर्स उलटल्यावर व्होल्डेमॉर्टची वॉन्ड तिथेच पडली असेल तर ती त्याला कोणी दिली- अशी चर्चा झाली आहे वर. माझ्या मते डेथ कर्स उलटल्यावर त्याच्या मॅजिकल पॉवर्स गेल्या, तरीही तो तिथून निसटून जाण्यात यशस्वी झालाच, म्हणजेच तेव्हा तो वॉन्ड घेऊनच निसटला असणार.

मला असा प्रश्न अगदी शेवटी पडला- बेलॅट्रिक्सच्या वॉन्डबद्दल. मॅलफॉय मेनरमध्ये तिचा वॉन्ड हिसकावून घेतलेला असतो. हर्मायनी तोच वापरून ग्रिंगॉट्समध्ये शिरते. त्यानंतर सगळे हॉग्वर्ट्सला पोचून तिथे फायनल लढाईच आहे. त्यात बेला कोणाचा वॉन्ड घेऊन लढते? आणि तिच्या पॉवर्सही कमी होत नाहीत. म्हणजेच, वॉन्ड-जादूगार बॉन्ड किती महत्त्वाचा आहे? डेथ स्टिकच्या वेळी याच मुद्द्यावर पुस्तकात चर्चा झाली आहे.

पण डंबलडोरच्या डोळ्यांसमोर इतकं सहज हॅरीला पळवणं फार कठीण असेल. >>> तेच केलं हेच तर सांगतोय. डंबलडोर बघतच होता टास्क. त्या वेळेसच ते सोपं कसं झालं? ह्याउलट डंबलडोर २४ तास हॅरीला बघत नसावा, त्यामुळे उदा. डंबलडोर आंघोळ करत असताना वगैरे हॅरीला पोर्टकी देणं हे प्लॅन म्हणून जास्त व्हायेबल आहे. बट व्हॉल्डेमॉर्ट हॅड टू मेक द मोस्ट कन्व्होल्युटेड प्लॅन ज्यात मोस्ट एक्सपिरीअन्स्ड ऑररला आधी किडनॅप केलं, मग इंपोस्टरने हॅरीचं नाव गॉब्लेटला देऊन ते बाहेर येईल ह्याची खात्री करणारा चार्म टाकला, मग वर्षभर वेगवेगळ्या टास्कमध्ये त्याची मदत करत गेले, हे करताना वर्षभरात प्लॅन उघडकीस येण्याची शक्यता वगैरे जाऊच दे.

क्रम इंपेरियस कर्सखाली होता. त्याने केल्याचं दाखवता आलं असतं. इम्पोस्टर तेवढं जमवू शकलाच असता की. >>> प्रायॉरि इन्कान्टेटेमने कळेल, की क्रमच्या वाँडने हॅरीला मारण्याचा स्पेल केलेला नाही.

तसंच, व्हॉल्डेमॉर्टला असंच वाटत होतं की स्नेप डंबलडोरचा माणूस होता. आणि स्नेपला डार्कमार्कवरून कळलंच असतं आणि त्याने डंबलडोरला सांगितलं असतं, हे व्हॉल्डेमॉर्टला कळणार नाही असं नाही. त्यामुळे हॅरीची डेथ काहीही दाखवायचा प्रयत्न केला तरी व्हॉल्डी पुन्हा आलाय, हे डंबलडोरला कळणारच होतं हे व्हॉल्डीला माहिती होतं. त्यामुळे तो सिरीयसचा डायलॉगच मुळात गंडलेला आहे. पण ते फक्त त्या कॅरॅक्टरचं गंडलेलं मत आहे, त्यामुळे ते ठीक आहे.

पाचव्या पुस्तकात जेव्हा मिनिस्ट्री तो परत आलाच नाही या भ्रमात सगळ्यांना ठेवायला धडपडत असते, तेव्हा तो जायंट्सना आपल्या बाजूने वळवत असतो. फजने डिमेंटर्स काढून टाकायला नकार दिलेला असतो, पण वोल्डेमॉर्ट त्यांना आपल्या बाजूने वळवून त्याचे डेथ इटर्स सोडवून घेतो. पूर्ण वर्षभर तो तयारी करत असतो, उघड काहीच करत नाही. >>> हेच सगळं डंबलडोरला व्हॉल्डी आलाय हे माहिती असूनही झालं. त्यामुळे तो सिरीयसचा डायलॉग पुन्हा निरर्थक ठरतो.

मुळात हॅरी मेला असता, तरी डंबलडोर आणि ऑर्डर ऑफ द फिनिक्सने लढणं सोडलं नसतं.>>> काय केलं वर्षभरात ऑर्डर ऑफ फिनिक्सने? एक तरी डेथइटर पकडला का? एक प्रॉफेसी गार्ड केली, (जे शेवटी नाहीच झालं) ह्या व्यतिरिक्त काय केलं?

थोडक्यात हॅरी मरो न मरो, वोल्डेमॉर्टला इतर अनेक धोके होते. >>> व्हॉल्डेमॉर्ट प्रॉफेसीच्या मार्गाने चालत होता, जी सेल्फ-फुलफिलींग होती. त्यामुळे हॅरीला मारल्यावर तो अमर होणार होता. आता प्रॉफेसीच खोटी आहे, आणि हॅरी मरूनही व्हॉल्डेमॉर्ट अमर नाही, असं असेल तर काही कल्पना नाही. तसं काहि ऐकिवात नाही.

तरीही तो तिथून निसटून जाण्यात यशस्वी झालाच, म्हणजेच तेव्हा तो वॉन्ड घेऊनच निसटला असणार. >>> तो त्याच्या व्हेपर फॉर्ममध्ये इकडे तिकडे फिरू शकतो, पण फिजिकल बॉडी नसताना वाँड उचलू शकत नाही. तो फक्त अ‍ॅब्स्ट्रॅक्ट सोलचा पिस आहे.

डेथ कर्स उलटल्यावर त्याच्या मॅजिकल पॉवर्स गेल्या, तरीही तो तिथून निसटून जाण्यात यशस्वी झालाच >> खरं तर तो व्हेपरोमार्ट अवस्थेत असल्याने वॉन्ड कसा घेतला असेल प्रश्नच आहे.

बेलॅट्रिक्सच्या वॉन्डबद्दल. >>>
बेलाट्रिक्सने कोणा फ्रेंडली व्यक्तीचा वॉन्ड घेतला ( may be narcissa चा ). जसा हर्मायनीचा वॉन्ड हॅरीला चालत होता तसा तो तिच्यासाठी वर्क झाला असेल , किंवा तात्पुरता असाच कोणाचा तरी वॉन्ड वापरून तिने तिसर्‍या एका व्यक्तीचा वॉन्ड जिंकून घेतला त्यामुळे त्या वॉन्डचा allegiance आपोआप तिच्याकडे आला. अर्थात व्होल्डेमॉर्टची शिष्या असल्याने तिच्या डार्क पॉवर्स नक्कीच जास्त होत्या.

उदा. डंबलडोर आंघोळ करत असताना वगैरे हॅरीला पोर्टकी देणं हे प्लॅन म्हणून जास्त व्हायेबल आहे. >>> Lol
मी मागे लिहील तसं ministry approved authorized पोर्टकी असणे गरजेचे असेल प्रोटेक्षनमुळे . triwizard tournament मुळे अशी पोर्टकी आरामात मिळाली.
हॅरीची डेथ काहीही दाखवायचा प्रयत्न केला तरी व्हॉल्डी पुन्हा आलाय, हे डंबलडोरला कळणारच होतं हे व्हॉल्डीला माहिती होतं >> हे बरोबर. पण डंबलडोरला काही कळायच्या आधीच हॅरीला ताब्यात येऊन त्याचे रक्त वापरून परत येण्याची प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं होतं. एकदा तो पोवरफुल झाला की हॅरीला मारणे/डंबलडोरला कळणे हे किरकोळ.

हायझेनबर्ग... आय स्टँड हिअर गिल्टी अ‍ॅज चार्ज्ड! .... Happy कारण नंतर सांगतो.

मला अजुन एक प्रश्न आहे... हॅरी पॉटर स्कॉलर्सना... रेग्युलस ब्लॅक उर्फ आर जी बी... त्याला लॉकेटचा हो क्रक्स तिकडे समुद्राजवळच्या गुहेत आहे हे कोण सांगत? व त्याला तो कशाला पाहीजे असतो? त्याला माहीत असत का की तो हो क्रक्स आहे? क्रिचरची स्टोरी फक्त तिकडे ते कसे जातात तेच सांगते अस मला आठवत..

भा, ट्रायविझार्ड टुर्नामेंटचा प्लॅन फुलप्रूफ नव्हता हे उघड आहे. पण तरीही this was the best chance Voldemort had to get hold of Harry Potter under Dumbledore's nose (=while he was at Hogwarts). As you said, सिरीयसचं वाक्य हे त्याचं मत आहे फक्त.
मुकुंद, क्रिचरमुळे रेग्युलस त्या गुहेत जाऊन लॉकेट आणतो (म्हणजे क्रिचरला ते रिप्लेस करायला सांगून मरण पावतो). लॉकेट हॉरॉक्रक्स आहे याची त्याला काही कल्पना नसावी. He just wants to ruin Voldemort's plans.

जिज्ञासा.. पण ते लॉकेट तिकडे आहे हे त्याला कोण सांगत? व्हॉल्डोमोर्टचा कुठला प्लान त्याला माहीत असतो व तो त्याला हाणुन पाडायचा असतो?

मुकुंद, जिज्ञासा, R. A. B. च्या नोटमध्ये त्याने I have stolen the real horcrux and intend to destroy it as soon as I can. I face death in the hope that when you meet your match, you will be mortal once more. असं स्पष्ट लिहिलं आहे.

जिज्ञासा, फक्त कपलाच पोर्टकी बनवण्याने नक्की बेस्ट चान्स कसा झाला, हा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि तो तसाच राहणार.

चैत्रगंधा, मूडीरूपी क्राऊचने कपला ठेवायची जबाबदारी स्वतःकडे घेऊन गपचूप कपला पोर्टकी बनवले. ह्यात मिनिस्ट्री अ‍ॅप्रूव्हल कुठेही नाही. मिनिस्ट्रीचा कपला कुठेही घेऊन जायचा विचार नव्हता. त्यामुळे त्यांनी ते अ‍ॅप्रूव्ह करण्याचा प्रश्न येत नाही.

व्हॉल्डेमॉर्टने I who have gone further than anybody to conquer death सारखी बडबड रेग्युलस डेथ इटर असताना त्यांच्यासमोर आधीही केली असेल, आणि तेव्हा रेग्युलसला संशय आला असेल आणि मग लेक वगैरे पाहिल्यावर खात्री झाली, असं असू शकतं. होरक्रक्सेसची माहिती असण्याइतका तो हुशार असेल असा अंदाज आहे.

अरे पण त्याला .. म्हणजे रेग्युलसला..कोण सांगत की ते लॉकेट हो क्रक्स आहे व ते त्या गुहेत आहे म्हणुन?

क्रीचरला व्हॉल्डेमॉर्ट तिथेच तळ्यापाशी मरायला सोडतो, मग क्रीचर एल्फ मॅजिकमुळे व्हॉल्डेमॉर्टची सगळी सुरक्षा आपसूक भेदून मालक रेग्युलसकडे परत येतो. तेव्हा रेग्युलसला त्याच्याकडून तळं आणि लॉकेटविषयी कळतं. पण लॉकेट होरक्रक्स आहे हे त्याने स्वतः काढलेलं अनुमान असावं, कारण तो नोटमध्ये तसं स्पष्ट म्हणतो.

अच्छा.. म्हणजे एज्युकेटेड् गेस... Happy मला वाटले माझी एकाग्रता भंग पावली की काय सातवे पुस्तक ऐकताना.... खुप वेगाने व खुप घटना घडतात सातव्या पुस्तकात... Happy

चैत्रगंधा, मूडीरूपी क्राऊचने कपला ठेवायची जबाबदारी स्वतःकडे घेऊन गपचूप कपला पोर्टकी बनवले. ह्यात मिनिस्ट्री अ‍ॅप्रूव्हल कुठेही नाही. मिनिस्ट्रीचा कपला कुठेही घेऊन जायचा विचार नव्हता. त्यामुळे त्यांनी ते अ‍ॅप्रूव्ह करण्याचा प्रश्न येत नाही.
>>>>
कपला पकडल्यावर मेझ बाहेर येणे अपेक्षित होते म्हणजे पोर्टकी च झाली की.

कपला पकडल्यावर मेझ बाहेर येणे अपेक्षित होते >> असं कुठे कोण म्हणालं?!

The first champion to touch it will receive full marks. इतकंच म्हटलं आहे. इतरांनाही मार्क मिळणारच होते कपपर्यंत पोहोचून.

दादाहो.. मला नक्की आठवत नाही कुठल्या पुस्तकात हा डायलॉग आहे ते पण हॅरी डम्बल्डर ला विचारतो कि व्हॉल्डेमॉर्ट कडे शरीर नाही पण वॉन्ड कसा वापरतो ? तेव्हा डम्बलदोर पण याच विचारात पडलेला दाखवला आहे . (चू. भू. दे. घे. )

मुकुंद राव ,
ऑडिओ बुक्स ची किंमत लै असती काय ?
(भारतात )

पुजारी, चौथ्या पुस्तकात. हॅरीला स्वप्नात रिडल्सच्या गार्डनकीपरचा मृत्यू दिसतो तेव्हा. तेव्हा व्हॉल्डेमॉर्टला सुटलेल्या पेटिग्र्यूकृपेने नगिनीच्या विषापासून बनलेलं पोशन पिऊन* छोट्या बाळासारखं काहीतरी रूप प्राप्त झालेलं असतं, ज्यात तो वाँड पकडू शकतो, पण त्याआधी नाही.

*ह्यातही काहीतरी अचाट आहे. व्हेपर फॉर्ममध्ये तो पोशन पितो म्हणजे काय करतो? त्यात जाऊन नुसताच बुचकळत असावा, असा अंदाज आहे.

मुकुंद राव ,
ऑडिओ बुक्स ची किंमत लै असती काय ?
(भारतात )>>
होय अ‍ॅमॅझॉन २३हजार चारशे मागत आहे..
फुकटात पण मिळतो हो, इथे सांगु शकत नाही, गुगलबाबाला किंवा क्वोराला विचारा Wink

Pages