हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गॉब्लेट मध्ये हॅरी च नाव कोण टाकतो<<<<
बार्टी क्राउच ज्युनियर जो मॅड आय मूडी बनून आलेला असतो.

कॅरकरॉफ देखील जुना डेथ इटर असतो.

हॅरी आणि सेड्रिक मिळून कप उचलतात. मुळात फक्त हॅरीनेच त्या कपाला हात लावणं अपेक्षित असतं. पण सेड्रिकही त्या पोर्टकीमुळे त्या ग्रेव्हयार्डमध्ये पोचतो. म्हणून मारून टाकतो. (He orders pettigrew to "kill the spare")

Harry Potter and the cursed child कुणी वाचले आहे का? कसे आहे? मराठी अनुवाद उपलब्ध आहे का?

बार्टी sr. ला कोण मारतो..रिटा स्कूटर Happy पण अॅनिमॅगस असते..कोणत्या प्राण्यांच रूप घेते? आणि ती उंच बातमी बाई पण half giant असते का

बार्टी sr. ला कोण मारतो..> मॅड आय रुपातला बार्टि ज्यु.
स्कूटर नव्हे स्कीटर अ‍ॅनिमॅगस >> बीटल

Harry Potter and the cursed child कुणी वाचले आहे का? कसे आहे? मराठी अनुवाद उपलब्ध आहे का?>>
ईंग्रजीतुन वाचलय, जेके ची जादु नाही त्यात, शेवटी ते नाटक आहे, त्याला बर्‍याच मर्यादा आहेत. पण ठिक आहे, एकदा वाचण्या लायक आहे.

मी मिनु,
तुम्ही परत एकदा पुस्तक वाचा.. हे प्रश्न त्यात सगळे कव्हर झालेले आहे..एवढच ना।ई तर चित्रपटातही यातल्या बर्‍याचश्या गोष्टींची उत्तरे मिळतात

मगल्स ना का मारतात वोल्ड आणि डेथ ईटर्स, इतके सगळे खून करतो त्यात सिरियस फ्रेड लुपिन मूडी दम्बलडोर एवढे सगळे मरतात त्याचं वाईट वाटतं ना।। दम्बलडोर ची सगळी फॅमिली मारतो तो।

Harry Potter and the cursed child कुणी वाचले आहे का? कसे आहे? मराठी अनुवाद उपलब्ध आहे का?
<<
मराठी अनुवाद ठाऊक नाही.
पुस्तक फडतूस आहे. बोरिंग. स्टोरी लाईनही टिनपॉट आहे. रोलिंग बाईंचे 'मधुघटची रिकामे पडती घरी' झालेय अन त्यांनी फॅन फिक्शनला एंडॉर्समेंट देऊन (अजून) पैसे कमवा असा धंदा केलाय, असं म्हणावसं वाटलं वाचून.

मी आधी सगळ्या movies पहिल्या ....(ज्या खूप आवडल्या).. मग books वाचायला घेतले ...सगळे पार्टस वाचून झाल्यावर मग movies ना शिव्या घातल्या Proud Proud

काय लिहिलंय यार JKR ने .....हॅट्स off ....एकदा पुस्तक धरले कि संपवल्या शिवाय चैन पडत नाही ...आणि सातवा भाग संपल्यावर का संपला असे वाटत राहते Sad 'हॅरी' च व्यसनच लागले होते अगदी Happy

आता पुन्हा पहिला भाग वाचायला घ्यावा म्हणतेय ...बघू कसं जमतंय ते ....

हॅरी पॉटर अ‍ॅन्ड द कर्स्ड चाईल्ड अगदी काहीच्या काही आहे! पचलंच नाही.
पण तरीही जेकेचं कौतुक वाटलं. आपल्या सर्व लाडक्या पात्रांची, त्या गृहितकांची आपणच अशी कत्तल करावी याकरता सॉलिड डिटॅचमेन्ट हवी.

धन्यवाद टीना Happy
हॅपी बर्थडे हॅरी
belated हॅपी बर्थडे प्रो.नेविल Wink

हॅरी पॉटर अ‍ॅन्ड द कर्स्ड चाईल्ड अगदी काहीच्या काही आहे! पचलंच नाही.
पण तरीही जेकेचं कौतुक वाटलं. आपल्या सर्व लाडक्या पात्रांची, त्या गृहितकांची आपणच अशी कत्तल करावी याकरता सॉलिड डिटॅचमेन्ट हवी. < बरोबर.

पिंटरेस्टवर हॅरी पॉटरमधील वक्तव्य, संवाद, फोटोज आणि बरेचसे वेगवेगळे फॅक्ट्स.... इतकं काय काय आहे ना, मजा येते जाम वाचायला... भान हरपून जातं.
त्यापैकीच एक विचार तिथे असा मांडलाय की, हॅरीने जंगलात resurrection stone टाकून दिला, पण तो त्याने जपून ठेवला असता आणि युद्धानंतर सर्व गेलेल्यांना एकदा भेटायला बोलावून त्यांच्या कुटुंबियांशी, आप्तांशी भेट करून दिली असती तर... त्यांना शेवटचा निरोप घेता आला असता ना..
फ्रेडला विझ्लींचा, सीरियसला हॅरीचा, ल्युपिन-टोंक्सला टेडी आणि इतरांचा.... , रेग्युलसला क्रीचरचा, डम्बल्डोर, स्नेपही भेटले असते ना एकदा हॅरी आणि सर्वांना!
मला अजून एक प्रश्न पडलाय, बेलाट्रिक्सने सिरीयसला मारायची काय गरज होती? म्हणजे हॅरीचा एक तरी नातेवाईक जिवंत राहिला असता ना! विझ्ली कुटुंबीय आहेत, हे मान्य पण तरीही, सिरीयस त्याचा धर्मपिता आणि त्याच्या आई-वडिलांच्या इतक्या जवळचा होता, त्याचा मृत्यू खरंच इतका गरजेचा होता का?
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ल्युपिन आणि टोंक्स दोघांनाही का मारलं? टेडीचा काय दोष होता? हॅरीने पोरकेपणाचं जे दु:ख अनुभवलं ते पुन्हा टेडीच्या वाट्याला का?
मला तर वाटतं शेवटी हॅरीने सगळ्यांना स्नेपचं सत्य, त्याची भूमिकाही सांगायला हवी होती, त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर करायला हवे होते..

मला तर वाटतं शेवटी हॅरीने सगळ्यांना स्नेपचं सत्य, त्याची भूमिकाही सांगायला हवी होती, त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर करायला हवे होते..>> त्याच्या मुलाच नाव ठेवलेले न त्याने सेवरस.. मला वाटत त्याने सांगितल असणार सार्‍यांना स्नेप बद्दल नक्कीच..

बेलाट्रिक्स ने कुणाला मारायची काय गरज होती हा प्रश्न पडायलाच नको खतरत..ते पात्र जसं होतं त्यानुसार तरी तिने काहीही केलेलं पटणेबलच होत.. ती पागलच असते त्यामुळे तिने काही मुद्देसुद करण्याचा सवालच नाही. हे म्हणजे वोल्डीला ड्म्बीने मदत करुनही त्याने डम्बीच्या विरोघात का जावं अस म्हणण्यासारखं झाल..

हॅरीने जंगलात resurrection stone टाकून दिला, >> हे पिच्चर मधेच दाखवलय ना..पुस्तकात पन अस आहे?

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ल्युपिन आणि टोंक्स दोघांनाही का मारलं? टेडीचा काय दोष होता? हॅरीने पोरकेपणाचं जे दु:ख अनुभवलं ते पुन्हा टेडीच्या वाट्याला का?>> ह्या प्रश्नालापन काही अर्थ आहे असं निदान मलातरी वाट्त नाही.. आयुष्य कठिण आहे.. एखाद्यावर कृपा दाखवायची म्हणुन जबरीने एखाद्याला जिवंत ठेवण्यात काय हशील...सर्वांनी स्वतःच जगणं मान्य करुन्चालायला हवं अस मला वाटत..

ओके, प्रतिसादासाठी धन्यवाद टीना, मी फक्त माझ्या शंका विचारल्या...
पण सिरीयसला का मारलं बेलाट्रिक्सने हे विचारण्यामागचा खरा अर्थ रोलिंग बाईंनी असं का केलं? असा होता.. म्हणजे शेवटी हॅरीसोबत कोणीतरी त्याच्या जवळचं जिवंत राहिलं असतं तर...?

सिरीयस खरंच जिवंत असायला हवा होता.
बाकी मी स्नेपच्या आणि ऍलन रिकमनच्या प्रेमात पडलोय.
मृत्युंजयच्या कर्णानंतर सगळ्यात जास्त आवडलेलं कॅरेक्टर म्हणजे सिवीरस स्नेप.
आय लव्ह यू, स्नेप!

म्हणजे शेवटी हॅरीसोबत कोणीतरी त्याच्या जवळचं जिवंत राहिलं असतं तर...?>> त्याचे मित्र होतेच ना.. सगळं गुडी गुडी झालं असत तर मज्जा नसती आली.. त्या लोकांच्या मृत्युमुळे हॅरीच्या लढ्याला जास्त मिनींग प्राप्त झालं .. मेलेल्यांवर जास्त फोकस केला कि जिवंत असलेल्यांकडे दुर्लक्ष होतं ना.. बघा ना आता इथल्या डिस्कशन मुळे हॅरीवर मनापासुन जीव लावणारे हॅग्रिड, ह्र्मायनी, रॉन वगैरे चटकन डोक्यात यायला वेळ लागला मला.. मलातरी जशीच्या तशी कथा आवडली रोलिंगबाईंनी लिहिलेली.. सगळ्यात जास्त चटका लावणारा मृत्यु मला स्नेपचा आणि त्यानंतर डम्बी आणि सिरियस (हे दोघ एका पारड्यात मात्र) चा वाटला.. तिन्ही वेळेस रडली मी Sad

रिकमन मेल्यावर खुप खुप दु:ख झाल.. तुम्हाला अनुमोदन संशोधक..
बर्‍याच लोकांना मृत्युंजय हे पुस्तक आणि त्यात ग्लोरिफाय केलेला कर्ण रुचत नाही पण मला मात्र ते पात्र आणि पुस्तक मनाच्या खुप जवळ आहे..सगळं काही बरोबर नाही हे माहिती असुनही.. आणि हो त्याच्याप्रमाणेच मला स्नेप हे पात्र पन खुप खुप खुप आवडलेलं.. हॅपॉच्या सिनेमा व्हर्जन मधे एकमात्र पुस्तकातल्या पात्राला न्याय देऊ शकलेलं सही सही पात्र त्यानेच वठवलय..बाकीचे सगळे त्याच्यानंतर.. वोल्डी लिलीला मारतो तेव्हा तिला उराशी कवटाळून रडतो तो सीन अन ऑलवेजवाला संवाद..या बरोबरच इतरही सारे एकसोएक एक्स्प्रेशन.. कितीही लिहावं तरी कमीच..

अरे हो सिरियसवर फोकस केल्यामुळे बाकीच्यांकडे लक्षच गेलं नाही. सॉरी!

हर्मायनी रॉन हॅग्रिड विस्ली कुटुंबीय अशी बरीचशी मंडळी आहेतच की त्याच्याबरोबर .

तुझ्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन टीना, मी फक्त तिथे त्या पोस्टमध्ये काय विचार मांडला resurrection stone बद्दल ते सांगितलं,
बर्याrच लोकांना मृत्युंजय हे पुस्तक आणि त्यात ग्लोरिफाय केलेला कर्ण रुचत नाही पण मला मात्र ते पात्र आणि पुस्तक मनाच्या खुप जवळ आहे..सगळं काही बरोबर नाही हे माहिती असुनही.... > अगदी खरं, मलाही कर्ण जवळचा वाटतो, तसंच स्नेपबद्दलही वाईट वाटतं..

Fantastic beasts and where to find them पहिला, हॅरी च्या नखांची पण सर नाहीय त्या मोवी ला...

कुठेतरी वाचलं होतं, सगळे वीजली जिवंत राहणं हे प्रोबॅबलिटीच्या नियमाला धरून नसतं चाललं. एवढ्या मोठ्या युद्धात ९ विजलींपैकि १ तरी मारला जाणारचं असा विचार करून जे के ने फ्रेड्ला मारलं.

हॅरीचे सगळे जवळचे - रॉन, हर्मायनी, जिनी - सोडून सगळे अगदी हेडविज, डॉबी सगळ्यांना मारलं, कुठे आठवत नाही मिळालं तर लिंक देते इथे.

Pages