हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर रुट्स म्हणुन १० तासांची एक अप्रतिम टिव्ही मालिका अतिशय बघण्यासारखी आहे ...

<<

अप्पा,

तुम्ही कुंटा किंटे ची मुख्य भूमीका वालं रूट्स नावाचं पुस्तक वाचलं नाहिये? :सरप्राईज्ड:

मला या गोष्टी च पुस्तक वाचताना पण अप्रूप वाटत राहिले होत आणि आत्ता mugglenet वर meme बघितल्यावर हसू आलं कि , व्हॉल्डेमोर्ट बाकी कसा का असेना , त्यानं आधी हॅरी ची परीक्षा संपू दिलेली आहे अन मगच कायतर भानगड केली आहे ..
( विद्यार्थ्यांनाच विद्यार्थ्यांची सहानुभूती असते .. )

रोलिंग बाई नि dursley घराण्याचं पुढं काय झालं ते कुठं लिहलय का ?

माझ्या ८ वर्षांच्या भाचीला माझ्याकडचा हॅ पॉ पुस्तकांचा बॉक्स्ड सेट बघून अगदी खजिना गवसल्यासारखं झालं. तिला मी पहिलं पुस्तक दिलं वाचायला, तर तिने ते ३ दिवसात वाचून संपवलं. आता तिला दुसरं हवंय. मी तिच्याशी निगोशिएट करून एक दोन महिने पुढे ढकललंय ते, पण ३+ भाग मी तिला अजून १ वर्ष तरी देऊ नये असा विचार करतेय.

बाकी आपण हॅ पॉ चे बिग फॅन. कितीतरी वेळा सगळी पुस्तकं वाचून झालीयत. तरी पुन्हा वाचायला घेतली तर खाली ठेववत नाहीत.

टॉम रिडल डायरीच्या माध्यमातून जिनीचा बळी देत अशी नेमकी कुठली प्रोसेस पूर्ण करणार असतो जेणे करून यूनोहू चे 'वेरी मच अलाईव' असे रिटर्न होणार असते?

हॅपॉमधल्या विनोदांवर निराळा धागा निघेल इतके मटेरियल आहे. फार मार्मिक, खुसखुशीत विनोद आहेत पुस्तकांत. रोलिंगबाईंची टिपिकल ब्रिटिश विनोदबुद्धी फार बारकाईने घटनांमधील विसंगती टिपते. विशेषतः रॉनचे कॅरेक्टर फ्रेंड्समधल्या चँडलरची आठवण करून देते. माझ्या मते, दुसर्‍या भागात सर्वात फक्कड विनोद आहेत, बरेचसे लॉकहार्टमुळे होणारे. वेगवेगळ्या जीवांच्या वेगवेगळ्या धारणा, मगल- विझार्ड यांचं निरनिराळं विश्व, जादूच्या इतिहासातील चमत्कारिक कहाण्या, विनोद खुप वेगवेगळ्या प्रकारे सापडतो.
एक मासला: 'चौदाव्या चेटकीनी दहनाची प्रथा निरर्थक होती' या विषयावर निबंध लिहिण्यासाठी हॅरी रेफरन्स शोधत असतो तेव्हा हिस्टरी ऑफ मॅजिक या पुस्तकातल्या बर्‍याशा परिच्छेदावर त्याची नजर पडते. त्यात लिहिलेलं असतं. 'अनेकदा जादुगारांना जाळणं निरर्थक ठरत असे. जादूगार एक सोपासा जादू रोधक मंत्र टाकत आणि मग त्यांना आगीतून धग लागण्याऐवजी केवळ गुदगुल्या होत असत. किंचाळण्याचं नाटक करणारे जादूगार जादूगरणींना खरे तर काहीच त्रास होत नसे. अश्याप्रकारे जाळून घेण्यात वँडेलिन नावाच्या एका जादूगरणीला एवढी मजा वाटत असे की वेश पालटून ४७ वेळा तिने जाळून घेतले होते.' :प

हायझेनबर्ग जी

कुठली प्रोसेस असं पुस्तकात नाही लिहलेले.(बहुतेक) मला वाटत कि, voldy ने असंही जादूच्या (त्यातल्या त्यात काळ्या जादूच्या ) सीमारेखा विस्तारित केलेल्या आहेत . त्यामुळं जिनीच्या आत्म्याच्या द्वारे तो स्वतः च पुनरुत्थान करून घेणार असणार .. कारण तो म्हणतो हरी ला, कि त्या मुलीनं तिचा स्वतःचा थोडा आत्मा च डायरी मध्ये घातल्यामुळं मला तिचा ताबा घेता आला . >> Ginny poured out her soul to me, and her soul happened to be exactly what I wanted… I grew stronger and stronger on a diet of her deepest fears, her darkest secrets. I grew powerful, far more powerful than little Miss Weasley. Powerful enough to start feeding Miss Weasley a few of my secrets, to start pouring a little of my soul back into her…
दुसरं म्हणजे horcrux पासून परत जिवंत होता येईल असे मंत्र जो horcrux करतो त्या ला अर्थातच माहित असणार . ( झपाटलेला pic मधल्या गाजलेल्या संवाद प्रमाणे .. माझा आत्मा आत , तुझा आत्मा बाहेर !!फक्त त्या चित्रपटात तात्या चा आत्मा लक्ष्या च्या आत जाणार असतो.. इथं वेगळं होईल.. जीनी चा आत्मा बाहेर पण त्याच मटेरियल वापरून टॉम स्वतःच शरीर उभं करणार )

पुम्बा जी
होय.. रॉन च्या तोंडी बरेच पंचेस आहेत !
he's lost his marbles .. (1st book ) चा पुढचा पंच अगदी आपल्यातला वाटतो.

पुजारी... जेव्हा डंबलडोर चौथ्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनाउंस करतात की १०० वर्षांनी परत एकदा ट्रायविझर्ड टुर्नामेंट हॉगवार्ट मधे यंदा होणार आहे तेव्हा फ्रेड विझली जोरात ओरडतो... यु आर जोकिंग! त्याला उत्तर म्हणुन डंबलडोर म्हणतात की नाही .. हा जोक नाही .. पण नुकताच समरमधे त्यांनी एक ट्रोल,लेप्रिकॉन व हॅगचा एक मस्त जोक ऐकला... पण प्रोफ मेगॉनगल खाकरुन डंबलडोरना आता तो जोक सांगण्याची वेळ आणी जागा नाही असा इशारा करतात..... Happy याचा अर्थ तो जोक नक्कीच लहान मुलांसाठी नसावा असा मी निष्कर्ष काढला पुस्तक ऐकताना.

पण बहुतेक आपल्याकडे आपण जसे एक पाकिस्तानी, एक भारतिय व एक अमेरिकन एकत्र जात असतात असे सुरु होणारे पुष्कळ जोक्स ऐकतो...तश्या धर्तीवर तो आयरिश- ब्रिटिश मिष्किल जोक असावा. खरेखोटे डंबलडोरच ( म्हणजे जे के रोलिंग्सच ) जाणो. Happy

पण हे होत असताना बॅगग्राउंड मधे प्रोफेसर मुडीच्या( खर म्हणजे तोतया मुडी उर्फ बार्टी क्राउस ज्युनिअरच्या) एंट्रीचे वर्णन मला खुप आवडले पुस्तक ऐकताना!

आ रा रा... तुम्ही मला आप्पा म्हणुन संबोधत आहात का कुणाला? तुम्ही काहीतरी गल्लत करत आहात... मी मुकुंद आणी फक्त मुकुंद! आप्पा नाही, राव नाही की पंत नाही! Happy

हायझेनबर्ग... मला नाही वाटत .. टॉम रिडलला जिनी विझलीला मारायचे असते.. तिला डायरी द्वारे गुंतवुन त्याला कळते की तिला हॅरी किती आवडतो.. त्यातुन त्याला समजते की तिला चेंबर ऑफ. सिक्रेट मधे आणले की हॅरी तिला वाचवायला नक्कीच येणार... व तिथे तो हॅरीचा नायनाट( बॅसीलसच्या मदतीने) करु शकतो.

पुजारी... जिनीच्या मरणाचा व हो क्रक्स चा काहीच संबध नाही... किंवा तिच्या मरणाने त्याला शरीर परत मिळवायचे नसते..

त्याला शरीर चौथ्या पुस्तकाच्या शेवटी... लिटील हँगलटनच्या सिमिटरीत परत मिळते तेव्हा आपल्याला कळते की त्यासाठी ४ गोष्टी आवश्यक आहेत... फ्लेश ऑफ फेथफुल सर्व्हंट( पिटर पेट्युग्र्यु) ब्लड ऑफ एनिमी... (हॅरीचे ब्लड )... बोन फ्रॉम हिज फादर... जे पेटूग्र्यु त्याच लिटल हँगलटच्या सिमिट्रीत दफन केलेल्या टॉम रिडल सिनिअर च्या शवातुन आणतो... व स्वतः व्हॉल्डोमोर्टने बनवलेले खास पोशन...

खर म्हणजे व्हॉल्डोमोर्ट स्वतःच्या आत्म्याचे म्युटिलेशन करुन ६ हो क्रक्स ( सातवा हो क्रक्स ....हॅरीचा ...चुकुन झाला असतो) का करतो हे तर आपल्याला पुस्तक वाचुन कळते पण ते हो क्रक्स .. जे सगळे ( हॅरी व नगीनी सोडुन ) सगळे निर्जिव वस्तु असतात... मग तो मेल्यावर ते हो क्रक्स जिवंत .. शरीररुपात कसे रुपांतरीत होणार असतात? या साठी व्हॉल्डोमोर्टने काही तजविज केली असते का? हॅरी पॉटर स्कॉलर्स नी खुलासा करावा.. Happy

मुकुंद, भरत, पुजारी,
माझा प्रश्न Tom Riddle च्या तोंडाच्या (चित्रपटातल्या) या वाक्या संदर्भात होता

Yes, Potter. The process is nearly complete. In a few minutes, Ginny Weasley will be dead, and I will cease to be a memory. Lord Voldemort will return... very... much... alive.

म्हणजे डायरी च्या माध्यमातून टॉम यशस्वी झाला असता तर voldemort पुन्हा very much alive कसा होणार होता?

भरत... वॉल्डोमोर्ट्र हॅरीला पहिल्याच पुस्तकात( मी तर म्हणेन ... हॅरी एक वर्षाचा असल्यापासुन.. म्हणजे त्याला जेव्हा प्रोफेसर सिबिल ट्रिलोनीची प्रॉफेसी समजते .. तेव्हापासुनच हॅरीला मारुन टाकायचे असते.).. मारणार् असतो... पण मग हॅरी पॉटर ही सिरिज न होता एकच पुस्तक झाले असते... Sad

हायझेनबर्ग... वॉल्डोमोर्टला परत शरीर मिळायची पाककृती चौथ्या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला कळते.. म्हणुन मला असे वाटले की दुसर्‍या पुस्तकात त्याला जिनीला मारायचे नसुन फक्त हॅरीचाच काटा काढायचा असतो... जिनी वॉज जस्ट द मिन्स टु द एंड...

आणी दुसरेंम्हणजे दुसर्‍या पुस्तकात जिनीला मारुन जर वॉल्डोमोर्टला परत बॉडी मिळवायची असती तर मग तो अ‍ॅज अ टॉम रिडल.. टिन एजर म्हणुन परत आला असता... मग टॉम रिडल मोठा होउन झालेल्या वॉल्डोमोर्टचे काय झाले असते?... अगदीच काँप्लिकेटेड पुस्तक झाले असते Happy

टॉम रिडलची डायरी हॅपॉमध्ये असलेल्या अनेक तार्किक विसंगतींपैकी एक आहे आणि बहुधा सर्वात ठळक विसंगती आहे. चित्रपटातले उद्धृत केलेले वाक्य गोंधळात अधिकच भर टाकते. व्यक्तिशः मी चित्रपटातल्या वाक्याला मानत नाही कारण त्यात मूळ कथानकात बदल झालेले आहेत. पुस्तकाविषयी बोलायचे तर ....

हो-क्रक्सेस, हाफ ब्लड प्रिन्स चॅप्टर २३ - यामध्ये हो-क्रक्सचे रहस्य समजल्यावर डंबलडोर आणि हॅरी चर्चा करत असतात. डंबलडोर इथे डायरीचा विषय काढतो आणि याची नोंद घेतो की डायरीने हो-क्रक्सचे काम चोख बजावलेच - दडवलेला आत्म्याचा अंश सुरक्षित ठेवणे - पण एका हत्याराप्रमाणेही काम केले. टॉम रिडलला ती डायरी कोणीतरी वाचलेली हवी होती जेणेकरून तो त्या वाचकाकरवी बॅसिलिस्कला पुन्हा जागृत करू शकेल. हॅरी इथे नमूद करतो की वॉल्डीला अर्थातच तो स्लिदेरिनचा वंशज असल्याचे क्रेडिट हवे असणार.

याचा अर्थ त्या डायरी मार्फत पझेशन होऊ शकते (डंबलडोरनुसार) पण वॉल्डीचा आत्मा त्या वाचकात जाऊ शकत नाही (पुन्हा डंबलडोरनुसार)! त्यामुळे वॉल्डी पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. हो-क्रक्स फक्त आत्म्याचा अंश सुरक्षित ठेवतात. संवादावरून असे दिसते की डायरीवर वॉल्डीने आणखीनही काही स्पेल्स टाकल्यामुळे ती केवळ हो-क्रक्स राहिली नाही. हे एस्टॅब्लिश होताच रोलिंगबाईंच्या हो-क्रक्स प्लॉटपॉईंटमध्ये गोंधळ होतो. दुसर्‍या पुस्तकात जाऊयात,

द एअर (heir) ऑफ स्लिदेरिन, चेंबर ऑफ सीक्रेट्स चॅप्टर १७ - इथे टॉम रिडल हॅरीला सांगतो की तो जिनीच्या डीपेस्ट फिअर्सच्या मदतीने ताकदवान झाला. अखेरीस तो इतका ताकदवान झाला की तो प्रथमच डायरीच्या पानांतून बाहेर पडू शकला. तसेच तो स्वतःला लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट असे संबोधतो. आणखी एक वाक्य भयंकर विचित्र आहे - "Twice -- in your past, in my future -- we have met. And twice I failed to kill you. How did you survive?"

प्रश्न असे - हा डायरीतून बाहेर येऊन कोणतेतरी रूप (कॉर्पोरिअल का असेना) कसा घेऊ शकतो? जर तसे असेल तर सहाव्या पुस्तकात दिलेली हो-क्रक्सची माहिती अपुरी आहे. जर तसे असेल तर मग इतर हो-क्रक्समधले वॉल्डी झोपले होते का? हो-क्रक्ससंदर्भातल्या नियमांविषयी चिडचिड व्हावी या दर्जाचे मौन बाळगले गेलेले आहे, पॉटरमोअरची ओळख झाल्यानंतर तर हे मुद्दे आणखीनच खटकतात. तसेच डायरीतल्या वॉल्डीला डायरीत राहूनही बाहेरच्या घटनाक्रमाची माहिती असेल तर त्या हो-क्रक्सेसमध्ये काहीतरी कनेक्शन असले पाहिजे. जर तसे असेल तर त्याला हॅरी चुकून हो-क्रक्स बनला आहे हे कळायला हवे होते. सातव्या पुस्तकात तेही घडत नाही. त्यामुळे या सगळ्याला हो-क्रक्स एक्स माकिना म्हणून, निराश होण्यापलीकडे वाचक काहीही करू शकत नाहीत.

सही लिहिले आहे पायस.
माझ्या मते हो-क्रक्स चा पूर्ण प्लॉट चेंबर ऑफ सीक्रेट पर्यंत रोलिंग बाईंच्या डोक्यात पूर्ण शिजला नसेल. (फारच लहान-तोंडी-मोठा-घास टाईप्स क्लेम करतोय मी) त्यामुळे असे ओपन थ्रेड्स राहिले आहे असे वाटते. टॉम रिडलने बॅसिलिस्कला समन करणे ठीक आहे पण हॅरीचा वाँड "you won't be needing it" म्हणत ऊचलून (फिजिकल अ‍ॅक्टिविटी) करणे सुद्धा जरा फार फेच्ड वाटते.
वर ऊल्लेखलेली 'जिनी रिलेटेड प्रोसेस' पूर्ण होऊन टॉम रिडलच्या फिजिकल फॉर्ममध्ये व्हॉल्डेमॉर्ट जिवंत होऊ शकत होता हे समजण्यासारखे होते जर त्याला तसे कन्विंसिंगली सपोर्टिंव पुरावे दिले असते. पण लिटिल हँगलटनच्या ग्रेवयार्ड मध्ये पार पडलेली एकमेव प्रोसेसच फिजिकल फॉर्म मिळवून देऊ शकते असाच सगळ्यांचा ठाम समज असल्याने डायरी->जिनी->रिडल->हॅरी->वॉल्डी हा प्रवास खूपच संदिग्ध राहून गेला आहे.

व्यक्तिशः मी चित्रपटातल्या वाक्याला मानत नाही कारण त्यात मूळ कथानकात बदल झालेले आहेत. >> हे बरोबर... पण चित्रपटनिर्मितीत रोलिंग बाईंचा अ‍ॅक्टिव सहभाग होता... त्यांनी तो सीन पास केला म्हणजे त्यांना त्यातले संवाद पुस्तकाला न्याय देतात असे जेव्हा वाटले असेल तेव्हाच ना?

मी पुस्तकं वाचून चार-पाच वर्षे ऊलटली.. त्यावेळी हातात पडलेला पुस्तकांचा सेट लागलीच परत द्यायचा असल्याने घाई घाईत वाचला होता... आता त्या पुस्तकांच्या आठवणी आणि सिनेमे ह्यांचा मेळ घालत बसणे हा एक फ्युटाईल ऊद्योग करत राहतो म्हणून प्रश्न पडत राहतात. Proud

तसेच डायरीतल्या वॉल्डीला डायरीत राहूनही बाहेरच्या घटनाक्रमाची माहिती असेल तर त्या हो-क्रक्सेसमध्ये काहीतरी कनेक्शन असले पाहिजे. >>

हे पुन्हापुन्हा वरच्या एक-दोन प्रतिसादांत येतंय म्हणून - जिनीने टॉमला 'फेमस हॅरी पॉटर'विषयी सांगितलं आहे.

"And why did you want to meet me?" Said Harry(sic).

"Well, you see, Ginny told me all about you, Harry", said Riddle. "Your whole fascinating history."

त्यामुळे डायरी-रिडलला ते कुठल्याही कनेक्शनमधून कळलं नाही, तर जिनीने सांगितलं. आणि मग त्याने हॅरीला लक्ष्य करायला सुरवात केली. त्याला सगळा घटनाक्रम माहिती असतो, असं नाही. जिनीकरवी हा घटनाक्रम फक्त माहिती होतो. म्हणूनच तो हॅरीला विचारतो, की तू हे कसं साध्य केलंस? (जे नवीन शरीरातल्या व्हॉल्डेमॉर्टला माहिती असतं, आठवा - डेथ इटर्सना आल्या आल्या दिलेलं भाषण. त्यामुळे माहिती इकडून तिकडे गेली नाही, ह्याला पुष्टी मिळते.)

"Haven't I already told you," said Riddle quietly. "that killing mudbloods doesn't matter to me anymore? For many months now, my new target has been - you."

तसेच तो स्वतःला लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट असे संबोधतो. >>> "You see?" he whispered. "It was a name I was already using at Hogwarts."

त्यामुळेच जिनीने 'हॅरीमुळे व्हॉल्डेमॉर्ट गेला' हे सांगितल्यावर रिडलला आपणच व्हॉल्डेमॉर्ट आहोत हे १+१ करता आले असणार.

अर्थात होरक्रक्स-रिलेटेड आणि वाँड-रिलेटेड नियमांविषयी चिडचिड व्हावी ह्या दर्जाचे मौन आहे हे बरोबर, पण ह्या मुद्द्याच्या बाबतीत तसं वाटत नाही.

लोकहो एक ध्यानात घ्या कि जेव्हा जेव्हा हो क्रक्स उघडला गेलाय तेव्हा riddle / वोल्डेमॉर्ट बाहेर आलेच आहेत. बघा, डायरी उघडली गेली तेव्हा रिडल आला, , लॉकेट नष्ट कारण्यावेळी उघडलं गेलं तेव्हा वोल्डेमॉर्ट बाहेर आला . अंगठी , हफल्पफ चा कप, रेवनक्लो चा डायडेम, नागिनी यांच्याबाबत रोलिंग बाई काहीच लिहीत नाहीत .
याचा अर्थ मला असा वाटतो कि वोल्डेमॉर्ट न अशी योजना केलेली होती कि हो क्रक्स जेव्हा उघडले जाईल तेव्हा हो क्रक्स मधल्या आत्म्याच्या तुकड्याला कोण उघडणार आहे त्याची अंधुक अशी कल्पना अली पाहिजे आणि त्यानुसार बाहेर आल्यावर त्यानं त्यावर कृती करायची आहे

योकु ,
ऑडिबल च काल रेजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला ,
फायनल स्टेज ला ते लगेच कार्ड नंबर मागतात त्याशिवाय प्रोसेस पुढं जात नाही . पोस्टपेड बिल सारखं आहे हे .

अर्थात आपण हे सगळे आता मंडे मॉर्निंग क्वार्टर बॅक सारखे पुस्तके वाचुन्/ऐकुन झाल्यावर.. भरपुर वेळ आहे तेव्हा या सगळ्या विसंगतींबद्दल विचार करत आहोत ... पण एका बाबतीत दुमत नसावे की हॅरी पॉटर वाचत असताना/ऐकताना कथानक एवढ्या वेगात पळत असते व इतक्या गोष्टी घडत असतात की वाचक खिळुन जातो व कथेशी एकरुप होउन जातो.

मला तर सातव्या पुस्तकात ते सगळे हो क्रक्स कधी एकदा सापडतात व त्यांचा नायनाट होतो असे झाले होते. त्याच्यातच लेखिकेचे गोष्ट सांगण्याचे कसब व तिच्या प्रतिभेची पोचपावती आहे.

हो क्रक्स च्या नियमाप्रमाणे जो कोणी त्याच्यात भावनिक गुंतवणूक करेल त्याचा ताबा वोल्डेमॉर्ट घेऊ शकत असतो. किंवा त्याला काही मानसिक त्रास होत असतो. ( पहा , रॉन ची चिडचिड , हॅरी ला पेट्रोनास न वापरता येणे इ-) किंवा उघडले गेल्यास प्रतिहल्ला पण करेल .
आता , पुस्तका प्रमाणे हेडमास्तर नि ती अंगठी (म्हणजे हो क्रक्स या दृष्टीने ) नष्ट करायला हॉग्वार्ट मधेच आणलेली आहे. आणि त्याच्या स्वतःच्या ऑफिस मधेच नष्ट केली आहे. ( संदर्भ फिनीसनिगेल्स : ) या मधल्या वेळात म्हणजे , लिटल हॅन्गलटॅन ते हॉग्वार्ट यावेळेत डम्बलडोर ना रिडल ने तसा काही त्रास दिल्याबद्दल कुठे काही उल्लेख आहे का ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा .

मुकुंद
वादेवादे जायते तत्वबोधः !
नाही का ? Happy

इथे कोणी त्यांना ७ मधले कुठले पुस्तक जास्त आवडले हे लिहीले आहे का? मला सर्वात जास्त आवडलेले ४ पार्ट्स... डेथली हॅलोज, गॉब्लेट ऑफ फायर, प्रिझनर ऑफ अझ्काबान आणी हाफ ब्लड प्रिंस ... इन दॅट ऑर्डर...पहिले पुस्तक सॉर्सरर्स स्टोन सुद्धा आवडले .. त्यात ४ प्रिव्हेट ड्राइव्ह, हॉगवार्ट कॅसल , प्लॅटफॉर्म ९ अँड ३/४, हॉगवार्ट एक्स्प्रेस व कथानकाची छान इंट्रोडक्शन होते. हाफ ब्लड प्रिंस व डेथली हॅलोज मधले डंबलडोर व हॅरी मधले संवाद मात्र मस्तच!

लिटल हॅन्गलटॅन ते हॉग्वार्ट यावेळेत डम्बलडोर ना रिडल ने तसा काही त्रास दिल्याबद्दल कुठे काही उल्लेख आहे का ?<<<<
ती अंगठीच मृत्यूचं कारण ठरली ना डंबलडोरच्या. त्यातला resurrection stone पाहून त्यांना ती हातात घालायचा मोह झाला आणि त्या अंगठीवरील कर्समुळे त्यांचा डावा पंजा पूर्ण डेड झाला. जर स्नेपने त्यावर लागलीच उपाय केला नसता तर ते वर्षभर राहिले नसते.

Pages