हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पडलेला अजून एक प्रश्न ,
हॉग्वार्ट्स मध्ये इतकं काय काय होत असत सतत , तरी डम्बलडोर त्याकडे द्यायला पाहिजे तितकं लक्ष का देत नाही ? उदा.
१) लॉकहार्ट फसव्या आहे हे त्यांना समजलं नसेल ? त्यांच्या सारख्या ग्रेटेस्ट ऑफ विझार्ड ला आणि लै भारी लेगीलीमेन्स ला हे पाहता येऊ नये ? आयला पोरांचं एक वर्ष खराब झालं यामुळं ..
२) हेच परत फेक मूडी बाबत पण !

Dumbledore must've known I'd run out on you.
No, he must've known, you would always want to come back >>>> सातवं पुस्तक. रॉन परत आल्यावर आहे हे बोलणं.

पुढचं ..
तुम्हाला माहिताय कि DADA च्या शिक्षकाची जागा बाधित आहे , time अँड अगेन हे सिद्ध होत आहे . तुम्ही शतकातून एकदा जन्माला येणाऱ्या महान जादूगारांपैकी एक आहेत . तुम्हाला त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ओळखतात .
तुम्हाला हि बाधा दूर करता येऊ नये ?
चला असा मानूया कि टॉम रिडल काळ्या जादूमधला जगात भारी जादूगार आहे , त्यानं केलेली बाधा हटवणे सोपं नाही . म्हणजे ती ओळखणं आणि दूर करणे . मग तुम्ही हरी ला का सांगता कि " I know his style , i tought him "
बर , तरी म्हणूया कि तुम्हाला काळ्या जादूमधलं ओ कि ठो कळत नाही , पण तुमच्या दिमतीला तुमचा विश्वासू स्टाफ आहे , स्नेप ! त्याला हाताशी का घेत नाही ?

वर जी चर्चा झाली त्या संबंधी इकडे आहे असं एका लिंक वर लिहिलयं, इच्छुकांनी लाभ घ्यावा - How did voldemort get his wand back after he was in was exile

उत्तर स्वतः जेके ने दिले आहे.

पुजारी तुम्ही. म्हणता ते ठिक आहे.. डि अ डा आ शिक्षकांबद्दल व गिल्डरॉय लॉकहार्ट बद्दल..

पण स्वतः डंबलडोरच हॅरीला अनेक वेळेला कन्फेस करतात की ते आता म्हातारे होत चालले आहेत.. एज इज गेटींग हिम... व त्यामुळे ते ग्रेटेस्ट विझर्ड असले तरी ते आता व्हल्नरेबल आहेत असे वाचकांना वाटायला तिने वाव ठेवला आहे.

डंबलडोर. व हॅरीमधले पाचव्या सहाव्या व सातव्या पुस्तकांमधले संवाद मला खुप आवडले.... माणुस कितीही जरी मोठा असला. व झाला... पदाने व वयाने... तरी तो परीपुर्ण होतो अस होत नाही ... त्याच्यातही ड्रॉबॅक्स राहुनच जातात..

डंबलडोरचे व हॅरीचे पात्र खर्‍या अर्थाने शेवट्च्या ३ पुस्तकातच खुलते असे मला वाटले पुस्तके ऐकताना.

आणी पाचव्या पुस्तकाच्या अखेरी जेव्हा डोलोरस अंब्रिज संपली असे आपल्याला वाटते व. डंबलडोर हॅरीला म्हणतात की ते स्वतः हॅरीला शिकवणार आहेत.. स्वतः खुद्द जातीने लक्ष घालणार आहेत... तेव्हा मला वाटले होते की आता तरी सहाव्या पुस्तकात स्वतः. डंबलडोरच डि अ डा आ चे सिक्षक होणार की काय... फायनली! Happy

ट्रायविझार्ड कप आणि पोर्टकी बद्दल पिशी अबोली यांनी लिहिलेलं स्पष्टीकरण मला आवडलं.
पुजारी, डम्बलडोर सर्वज्ञ नाही, सगळे प्रॉब्लेम्स त्यानेच सॉल्व्ह करायला हवेत, असंही नाही. इम्पर्फेक्शन्स मुळे पुस्तकांतली उत्कंठा वाढती राहते.

मी भाग १ ते ५ ची पारायणं केलीत, त्यालाही तीनचार वर्षं झालीत. सहा आणि सात एकेकदाच वाचलेत

मी सातव्या पुस्तकातला ...क्रिचर्स स्टोरी .... हा चॅप्टर परत ऐकला.. त्यातुन हा उलगडा तर झाला की व्हॉल्डोमोर्ट सोबत क्रिचरला स्वतः रेग्युलसच त्या केव्हमधे जायला सांगतो. तिकडे क्रिचर ते हो क्रक्सचे खरे लॉकेट ज्या जादुच्या पोशनमधे वॉल्डोमोर्ट्ने बुडवुन ठेवले असते ते पोशन पितो व क्रिचर आता तिकडेच मरेल असा विचार करुन वॉल्डोमोर्ट एकटाच त्या बोटीतुन परत जातो. जायच्या आधी लॉकेट परत नव्या जादुच्या पोशनमधे तो बुडवुन ठेवतो असा माझा अंदाज...

बर मग नंतर क्रिचर तिथुन डिसॅपरेट होउन रेग्युलस कडे परत जातो व रेग्युलस क्रिचर सोबत परत केव्हमधे जातो, ते पोशन रेग्युलस पितो, हो क्रक्सचे खरे लॉकेट काढुन तिकडे नकली लॉकेट ठेवतो व मरायच्या आधी रेग्युलस ब्लॅक क्रिचरला सांगतो की ते लॉकेट घरी घेउन जा व नष्ट कर.

आता मला पडलेला मोठा प्रश्न... त्या नकली लॉकेट वर परत जादुचे पोशन कुठुन येते? मला वाटले होते की जादुचे पोशन फक्त वॉल्डोमोर्टलाच बनवता येत असते... का रेग्युलस ब्लॅक कडे एक स्पेअर बादलीभरुन तसेच जादुचे पोशन असते का की जे तो मरायच्या आधी नकली हो क्रक्सच्या नेकलेसवर ओतुन मरतो? कारण डंबलडोर व हॅरी जेव्हा केव्हमधे जातात तेव्हा...ते बादलीभरुन पोशन ...नकली हो क्रक्सच्या लॉकेटवर असते ...जे डंबलडोर पितात...

कोणाला याचे उत्तर माहीत आहे का? नकली हो क्रक्सच्या लॉकेटवर जादुचे पोशन कुठुन येते?

बरीच चर्चा होऊन गेली इथे. भास्कराचार्य, तुम्ही एक वेगळा धागा काढा. लुप होल्सबद्दल चर्चा करायला.

>>चैत्रगंधा, मूडीरूपी क्राऊचने कपला ठेवायची जबाबदारी स्वतःकडे घेऊन गपचूप कपला पोर्टकी बनवले. ह्यात मिनिस्ट्री अ‍ॅप्रूव्हल कुठेही नाही. मिनिस्ट्रीचा कपला कुठेही घेऊन जायचा विचार नव्हता. त्यामुळे त्यांनी ते अ‍ॅप्रूव्ह करण्याचा प्रश्न येत नाही.
>>>>>
ग्रेव्हयार्डमधून परत येतांना कपला पकडल्यावर हॅरी सेड्रीकच्या शवासकट मेझच्या बाहेर येऊन पडतो. ग्रेव्हयार्ड ते मेझच्या बाहेर हा पोर्टकीचा पाथ कोण सेट करायला जाईल. त्यावरून मला असं वाटतं की मेझच्या आतमधून ते मेझच्या बाहेर असा ओरिजिनल पाथ असणार जो बार्टी क्राऊच ने via graveyard असा बदलला.

क्रक्सच्या लॉकेटवर जादुचे पोशन कुठुन येते? >> वोल्डीने काही जादू नक्कीच केली असेल त्या बेसिनला autofill बनवायला. आपोआप भरले जात असेल.

>>>मुकुंद जी ,
मला असं वाटत कि regulas हा खरेच bright विझर्ड असावा. कारण तो voldy च्या अंतर्गत सांबांधातला माणूस होता . त्यामुळं कदाचित त्याला तो पोशन , krechar ने सांगितल्यावर लक्षात आला असेल आणि त्यानं तो तयार केला असेल .
>>>चैत्रगंधा यांचा मुद्दा पण असू शकतो , ऑटोफिल सिंक चा !
>>>प्राजक्ता शिरीन.. लिंक अति उत्तम आहे . बरेच काही समजले .
voldy ला वॉन्ड परत कसा मिळाला यापेक्षा मला तो त्याने operate कसा केला याच कुतूहल आहे . कारण he is frail , तात्पुरत्या मिळालेल्या शरीरात होता जेव्हा त्याने फ्रॅंक ला मारले .

>>> भरत जी ,
डम्बल्डर सर्वज्ञ नाही , कबूल!
कदाचित DADA च्या जागेसाठी कोणीच पात्र उमेदवार न मिळाल्या मुळे डम्बलडोर नि त्यांना कामावर ठेवले असावे.
have no choice .

Aapla pn number lava ki fans chya yaadit..mi hi khup mothi chahati ahe Harry Potter chya movies chi...Durdaivane ajun ek hi pustak nahi vachyla milal..Milalech tr aanandi aanand..
TV vr jevahi HP lagto mi na chukta baghte...mala agdi lahan ahes ka ata asa navrya kdun tomna mileparynt..:D
Pregnancy mdehi na chukta sagle parts pahile..tr navryala kalaji hoti aga HP mdla ekhada patra yaycha janmala..manus asla tr thik nahitr kahi khara nahi Lol Lol
Lahanpani eka maitrinichya vadilani tila vadhdiwasala..HP sarkhi jaadui chhadi n topi n adrushya vhaychi ti chadar dileli gift..Manatun vait vatlela pn mazya pappani tr ajun bhari surprise dila..saglya HP chya parts chya CDs aanun dilya...mag kay yeta jata diwas ratra HP cha jap...!!

ऑडिओ बुक्स्चे कौतुक ऐकून मीदेखिल ऐकायला सुरूवात केली आहे. नरेटर स्टिफन फ्राय. जबरदस्त अनुभव.

ऑटोफिल... ह्म्म ... हा विचार मी केलाच नाही ... खर म्हणजे ते सगळे विझर्डिंग वर्ल्ड असल्यामुळे काहीही करता येणे शक्य आहे.. त्यामुळे ते पोशन परत कोण भरते असले किरकोळ प्रश्न फक्त आपल्यासारख्या मगल बॉर्न माणसांनाच पडु शकतात.... Happy

मी जिम डेलचे ऑडिओ व्हर्जन ऐकले व जबरदस्त इंप्रेस झालो . पण मी अमेरिकेत आहे... मी अस ऐकले आहे अमेरिकेत जिम डेलचे व्हर्जन जास्त पॉप्युलर व सहज उपलब्ध आहे.. पण इंग्लंडमधे स्टिव्हन फ्रायचे व्हर्जन जास्त पॉप्युलर आहे. पण जिम डेल रॉक्स.... Happy

खर म्हणजे ते सगळे विझर्डिंग वर्ल्ड असल्यामुळे काहीही करता येणे शक्य आहे <<< सुरुवातीला माझेही असे मत होते. पण नंतर असं लक्षात आले की ते जगही एका मर्यादेतच फिरतं. उदा. काहीही करता येणे शक्य असते तर मॉली आयुष्यभर आपल्या परिवारासह गरिबीत काबाडकष्ट करत राहिली नसती. हॅरीची छडी मोडते तेंव्हा क्षणात ती दुरुस्त करता यायला हवी होती. तिथे त्या जगात जश्या सिद्धी (powers) सहज उपलब्ध आहेत त्या सिद्धींना नमवतील अशी तितकीच मजबूत आव्हानेही आहेत.

गजानन.. अरे नाही रे .. मी गमतीने म्हटले ते... खर म्हणजे जे के रॉलिन्सने इतकी जबरदस्त, डिटेल्ड व गुंतागुंतीची सुंदर कथा ओवली आहे ना... आणी ऑल्मोस्ट ऑलवेज... तिने मुद्देसुद लिहीले आहे व शंकांना जागा ठेवली नाही... म्हणुन त्या पोशनच्या मिस्टरीबद्दल कुठे माझे ऐकण्यात मिस झाले का असे मला वाटले म्हणुन तो पोशनचा प्रश्न मी इथे जाणकरांना टाकला.

रिफिलीन्ग चार्म >> पहा ६ वे पुस्तक
>>>Harry had not yet managed to bring off the Refilling Charm without saying the incantation aloud, but the idea that he might not be able to do it tonight was laughable: Indeed, Harry grinned to himself as, unnoticed by either Hagrid or Slughorn (now swapping tales of the illegal trade in dragon eggs) he pointed his wand under the able at the emptying bottles and they immediately began to refill.

अमेरिकेत पीबीएस चॅनलने नुकताच ग्रेट अमेरिकन रिड म्हणुन एक सर्व्हे घेतला... त्यात टु किलिंग अ मॉकिंगबर्ड या पुस्तकाला वाचकांनी पहिल्या नंबरचा कौल दिला... हॅरी पॉटर ३ नंबरवर...

बहुत ना इन्साफी! माझ्यातर्फे तिव्र निषेध!

( डायाना गॅबल्डनच्या आउट्लँडरला दुसरे स्थान मिळाले )

मुकुंद, हो तुम्ही गंमतीतच म्हटले होतेत. Happy

मला अनेकदा असे वाटते की हॅरी पॉटर वर तोकड्या सिनेम्यांऐवजी एखाद्या तगड्या दिग्दर्शकाकरवी टीव्ही मालिका काढली तर तुफान लोकप्रिय होईल.

To kill a mockingbird ही एक अभिजात साहित्यकृती आहे. खरोखर अद्वितीय.

To kill a Mockingbird >> हम, आमच्या Master of LAW च्या शिक्षकांनी या पुस्तकाचा एकदा शिकवताना उल्लेख केलेला आठवतोय. ( ते तेव्हा criminal justice system शिकवत होते ) तेव्हा ते म्हणाले कि यातला जो वकील आहे तो वाचून कुणालापण वाटेल कि बाकी काही नाही तरी या कारणासाठी आपण वकील झालं पाहिजे !

मला अनेकदा असे वाटते की हॅरी पॉटर वर तोकड्या सिनेम्यांऐवजी एखाद्या तगड्या दिग्दर्शकाकरवी टीव्ही मालिका काढली तर तुफान लोकप्रिय होईल. >>> प्रचंड अनुमोदन !

अवांतर,
To kill a mockingbird चा सिक्वेल (go set a watchman) अजिबातच नाही आवडला..

मला अनेकदा असे वाटते की हॅरी पॉटर वर तोकड्या सिनेम्यांऐवजी एखाद्या तगड्या दिग्दर्शकाकरवी टीव्ही मालिका काढली तर तुफान लोकप्रिय होईल. >>>
तरिही पुस्तकाची सर येणारच नाही, पुस्तक वाचताना एक इमेज तयार होते ति प्रत्येकाची वेगळी असल्यामुळे त्याला सिनेमा, टीव्ही न्याय देउ शकत नाही.

पुस्तक वाचताना एक इमेज तयार होते ति प्रत्येकाची वेगळी असल्यामुळे
<<

कन्या ६वीत गेली तेव्हा पहिल्यांदा हॅपॉ वाचायला सुरुवात केली होती. तिला मी सांगितलं होतं की हे जादूचं पुस्तक आहे. पुढच्यावेळी वाचशील तर याच पुस्तकाची स्टोरी वेगळी वाटेल.

अन हे असंच असतं. पुढच्या वाचनात वेगळे बारकावे, काँटेक्स्ट्स समजतात. मजा येते.

जिज्ञासा.. तुझी यु ट्युबची लिंक बघीतली. थँक्स!

प्राजक्ता.. तु दिलेली प्रश्नोत्तराची लिंकही चांगली आहे.

पुंबा.. इथे मॉकिंगबर्डबद्दल लिहीणे अवांतर होइल तरीही त्याबद्दल थोडक्यात लिहिल्यावाचुन राहवले नाही.

प्रश्न ते पुस्तक अभिजात कलेचा नमुना आहे की नाही हा नसुन सबंध अमेरिकन वाचकवर्गाने ते पुस्तक पहिल्या क्रमांकावर का निवडले हा आहे.

तुम्हाला जर अमेरिकेत क्रुष्णवर्णिय लोकांना इथे कशी वागणुक १७०० सालापासुन ते १९६८ पर्यंत ओव्हर्टली मिळाली व त्यानंतर आजतागयतसुद्धा... अलबत कोव्हर्टली...कशी वागणुक मिळते हे जर ठाउक असेल तर अमेरिकन लोकांनी हे पुस्तक व त्यातील प्रॉटॉगॉनिस्ट अ‍ॅडिकसला एवढे डोक्यावर घेतल्यातला फोलपणा जाणवला असता.. टु मी द कोरोनेशन ऑफ धिस बुक लुक्स हॉलो...या पुस्तकातले अ‍ॅडिकस फिंचने दाखवलेले धाडस आजच्या अमेरिकेतील ५ टक्के गोरे तरी दाखवतील का याबद्दल मी साशंक आहे. तसले हिरोइझम पुस्तकातच ठिक वाटते हे कटु सत्य अमेरिकेत आहे . तसच हे पुस्तक अमेरिकेत शाळा कॉलेजांमधे रेशिअल टॉलरंस व प्रेज्युडिस वर एक उत्तम लेसन मुलांना मिळावे म्हणुन शिकवले जाते. पण त्याच रेशिअल टॉलरंस व प्रेज्युडिस बाबत अमेरिकेत सद्य परिस्थीती काय आहे हा हॉनेस्ट प्रश्न स्वतःला विचारुन बघा ...मग तुम्हाला कळेल की मी वर निषेध का नोंदवला ते.

क्रुष्णवर्णिय लोकांना इथे कसे वागवले गेले आहे हे जर जाणुन घ्यायचे असेल तर रुट्स म्हणुन १० तासांची एक अप्रतिम टिव्ही मालिका अतिशय बघण्यासारखी आहे ... इच्छुकांनी जरुर बघा ती सिरीज...( १९७७.. अ‍ॅक्टर लव्हार बर्टन .. लहान मुलांसमोर बघु नये)

ओ ... आणी हॅरी पॉटरचे विश्व ज्या पद्धतीने जे के रॉलिन्सने उभे केले आहे ते माझ्या नजरेत तरी सर्वोत्तम साहित्याला शोभेल असेच आहे.. ही बाबही विसरुन कसे चालेल?

रच्याकने,
हॅपॉ वाचायला घ्यावं असं वाटलं ते ह्या धाग्यामुळेच, सो I owe you all and maayboli.
बहुतेक मी हॅपॉ चा पहिला मुव्हि पाहिला होता, रिलिज झाल्यानंतर काही दिवसांनी (तो ही काँपु वर) काही आवडलं नव्हतं ते प्रकरण. सो परत वाटेवर गेलोच नाही. आणि नंतर ते 'बालसाहित्य' म्हणुन दुर्लक्षलं गेलं.
हा धागा वाचल्यावर पहिलं पुस्तक घेतलं ते पायरेटेड ज.म. रोडवरुन, ते आवडल्यावर संपुर्ण सेट मागवला अ‍ॅमेझोनवर आणि वाचला. सध्या तरी २च वेळा वाचलिये सिरिज.

Pages