हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी हो... जिम डेलने ड.न्बलडोरचा आवाज काय काढला आहे!

प्रत्येक पुस्तकात किती उत्कन्ठा ठेवली आहे पुस्तकाच्या शेवट पर्य.न्त... प्रिझनर ऑफ आझकाबान मधे हॅरीला फायरबोल्टचा ब्रुम कोण देतो हे जाणुन घ्यायला मी खुप उत्सुक होतो.. सिरिअस ब्लॅकने दिला हे शेवटी हॉगवार्ट एक्स्प्रेसमधे ते सगळे समर व्हेकेशनला घरी परत जात असतात तेव्हा आपल्याला कळते..

तसेच गॉब्लेट ऑफ फायरमधे हॅरीचे नाव कोण टाकते ते पण मला जाणुन घ्यायचे होते..

आणी या पुस्तका.न्मधले मला खुप आवडलेले काही कॉन्सेप्ट्स... ड.न्बलडोरचे पेन्सिव्ह...हर्माइनीचे टाइम टर्नर, विझर्ड लोका.न्ची पोर्ट की व अ‍ॅपरेट व डिसॅपरेट होणे, फ्लु पावडर..

सगळ्यात आवडते कॅरॅक्टर... अल्बस ड.न्बलडोर!

कॅरॅक्टर आय हेटेड मोस्ट...... डोलोरस अ.न्ब्रिज!

मुकुंद, वेलकम टू द क्लब!
ग्रिफिंडोरची तलवार worthy Gryffindor कडे वेळ आली की आपोआप येते असं काहीतरी आहे.

जिज्ञासा.. Happy

पण बर झाली ती तलवार त्याच्याकडे आली ते... मला खुप रुख रुख लागली होती.... ते जेव्हा ड्रॅगनच्या पाठीवरुन ग्रि.न्गॉटच्या बॅ.न्केतुन त्या तलवारीवाचुन इस्केप होतात तेव्हा..).. आता तो हो क्रक्स तर मिळाला ..पण तो नष्ट कसा करणार याबद्दल... पण जे के रॉलिन्सकढे सगळी उत्तरे होती... नशीब! Happy

आणी एक... हॅरी पॉटर सिरिज ज्या.न्ना मुव्हीज बघुन ए.न्जॉय करायची आहे त्या.न्च्यासाठी...

देअर इज सि.म्पली नो वे यु कॅन गेट द लेव्हल ऑफ डिटेल्स अबाउट द स्टोरी अ‍ॅ.न्ड कॅरॅक्टर्स.. देअर इनर डायालॉग्स...डायालॉग्स बिट्विन कॅरॅक्ट्रस..पेन्सिव्ह एक्पिरिएन्स..अ‍ॅ.न्ड व्हेरिअस एक्स्पिरिएन्सेस अ‍ॅ.न्ड मेनी मेनी सिन्स ऑथर हॅज डेवेलप्ड विथ हर रायटि,ग स्किल्स! देअर इज सि.न्पली नो वे...!

यु विल डु इनजस्टिस टु धिस सिरिज इफ यु आर गोइ.न्ग टु जस्ट वॉच द मुव्हिज!

इट इज अ शिअर जॉय टु रिड ऑर लिसन द डिटेल्स! यु विल मिस आउट ऑन अ ग्रेट जॉय! सो प्लिज प्लिज..रिड ऑर लिसन धिस सिरिज!

बाबो एव्हढ सगळं ऐकणं म्हणजे जबरा पेशन्स लागणार,
रच्याकने मला ऐकायला अजिबात आवडत/जमत नाही. ५-१० मिनिटात मला झोप लागते. त्यापेक्षा वाचायला फार आवडतं, कितिही वेळ वाचु शकतो (न झोपता Wink )

मी ही ऑडियो बुक्स रोज कामाला जाता येता गाडी चालवत असताना गाडीत ऐकली... डिजिटल ऑडियो बुक्स..रोज ३० मिनिट्स जाताना... ३० मिनिट्स येताना.. काही तास घरी .. विकएन्डला.... जुनमधे सुरु केली सिरिज.. काल स.न्पली.

हॅरी पॉटर स.न्पुर्ण सिरिज ११७ तास.. लॉ.न्गेस्ट बुक.. ऑर्डर ऑफ फिनिक्स.... २७ तास... जिम डेलने या पुस्तकात १३४ जणा.न्चे आवाज काढले आहेत... शॉर्टेस्ट बुक... हॅरी पॉटर अ‍ॅन्ड फिलॉसॉफर्स स्टोन.. ८ तास..

आणी जिम डेलने नरेट केलेली ऑडियो बुक्स ऐकताना तुला झोप येउच शकणार नाही याची मला १०० टक्के खात्री आहे..

जिम डेलचे नाव गुगल करुन बघ... त्याचे रिव्ह्युज बघ.. ही इज सिन्पली अमेझिन्ग!

आणी ८ मुव्हिज ... फार तर १६ तास... यु आर शॉर्ट चेन्ज्ड फॉर १०० हवर्स बाय मुव्ही मेकर्स... :)

मीही ऑडिओबुक्सच ऐकली आणि तुमच्यासारखंच 'हे आपण आधीच का वाचलं (ऐकलं) नाही?!' असंच वाटलं. ब्रिलियन्ट स्टोरी अ‍ॅन्ड स्टोरीटेलिंग!

कुठल्याशा रीव्ह्यूत वाचलेलं एक निरीक्षण कायमचं लक्षात राहिलंय - या कथेत मॅजिक आहे, चमत्कार आहेत, गुड व्हर्सेस ईव्हिलमधलं इटर्नल द्वंद्व आहे, अगदी ख्रिस्मसच्य सुट्ट्यांचा वगैरेही उल्लेख आहे, पण 'देव' ही संकल्पना दुरूनसुद्धा येत नाही. सगळं बेस्ट अ‍ॅन्ड द वर्स्ट आहे ते ह्यूमनच आहे! कोणीही कितीही संकटात असलं तरी देवाची करुणा वगैरे भाकताना दिसत नाही. कोणाला कुठल्या देवाचा वर किंवा शाप नाही - जे आहे ते आपापल्या कर्माचं फळ आहे.
मला फार नवलाईचं वाटलेलं आणि भयंकर पटलेलं हे निरीक्षण.

या कथेत मॅजिक आहे, चमत्कार आहेत, गुड व्हर्सेस ईव्हिलमधलं इटर्नल द्वंद्व आहे, अगदी ख्रिस्मसच्य सुट्ट्यांचा वगैरेही उल्लेख आहे, पण 'देव' ही संकल्पना दुरूनसुद्धा येत नाही. >> थेट किंव वरवर नाही पण व्हाया ख्रिस्टॅनिटी आहे असे मला वाटते...
७ होर्क्र्क्सेस = ७ डेडली सिन्स
Pride = Ring
Wrath = Diary
Greed = Locket
Envy = Diadem
Gluttony = Cup
Lust = Nagini
Sloth = Harry Potter

असे प्यारलल काढले (खूप अ‍ॅपरंट प्यारलल आहे हे) तर ख्रिस्टॅनिटीची देवाला मानणारी सगळीच शिकवण कव्हर होते.

हो. रिसरेक्शन ऑफ हॅरी आफ्टर डायिंग, मेल्यावर 'किंग्स क्रॉस' अश्या नावाच्या ठिकाणी जाणे, तिथे डंबलडोरसारखी 'गॉड' व्यक्ती भेटणे, इ. इ.

पण तुम्ही डीप रूटेड कल्चरल सिम्बॉलिझम/विज्डम आणि धर्म/देव यात गल्लत करत नाही आहात का?
पंचमहापापांची कल्पना हिंदू संस्कृतीतही आहेच की!

>>> पॉटर्स आणि डंबलडोर ह्यांच्या ग्रेव्हवरचे पॅसेजेस बायबलमधली क्वोट्स आहेत
हे आठवत नाही.

चला, त्या निमित्ताने ऐकते पुन्हा! Happy
आता ऐकल्यावर मत बदललं तर नक्की सांगेन. Happy

पण तुम्ही डीप रूटेड कल्चरल सिम्बॉल्स आणि धर्म्/देव यात गल्लत करत नाही आहात का? >> नाही. जिझस रिसरेक्शन, जिझस-लाईक फिगर डायिंग टू प्रोटेक्ट अदर पीपल ह्या डीपली ख्रिश्चन थिऑलॉजीतल्या गोष्टी आहेत. ह्यात कल्चरल काहीही नाही.

बाकी पॉटर्सची ग्रेव्हही चर्चच्या ग्रेव्हयार्डात असते. Wink

मुकुंद, स्वाती +१
चित्रपट बघितले आहेत पण पूर्वी पुस्तकं का नाही वाचली ही खंत आज मुलाला पुस्तक वाचून दाखवताना फार्फार जाणवते. गेल्याच महिन्यात सुरुवात केली आहे आणि सध्या बेड टाईम स्टोरी बुक म्हणून चालू आहे. पुस्तकात अक्षरश: जादू आहे, सगळं डोळ्यासमोर आणण्याची.

रोलिंग बाईंनी तिच्या स्वतःच्या ख्रिस्तियानिटीवरचा विश्वास पुस्तकांमागची मोठी प्रेरणा आहे हे बूक सीरीज संपल्यानंतर अनेकदा सांगितले आहे.
पण अगदी त्रोटकपणे खोलात वगैरे जाऊन नाही.
आधी म्हणालो तसे... टू गॉड व्हाया रिलिजन..सीरीजच्या शेवटाकडे जिथे गूड वि. ईविल द्वंद्व ईंटेन्स होते तेव्हा तर तिचा हा विश्वास खूपच प्रकर्षाने दिसत राहतो.
ती आफ्टरलाईफ बद्दल ही पॉझिटिवली (त्यावर विश्वास असण्याबाबत) बोलल्याचे आठवते आहे.

हायझेनबर्ग... मित्रा..मी बायबल.. दोन्ही.. ओल्ड टेस्टामेंट व न्यु टेस्टामेंट.. अथ पासुन इथपर्यंत वाचली आहेत.. रामायण व महाभारत वाचले आहे.. गीता वाचली आहे.. झालच तर ऑडेसी व इलिअड सुद्धा वाचले आहे.. पण हॅरी पॉटर वाचायला ( ऐकायला) घेतले तेव्हा त्या गोष्टींमधला कुठलाच पुर्व दुषित व्ह्यु ठेवला नव्हता.. एक निव्वळ स्टोरी स्टोरी टेलींग या व्ह्युने हॅरी पॉटर सिरिज ऐकली व प्रचंड भावली.

नाहीतर व्हॉल्डोमोर्टने त्याच्या आत्म्याचे सात तुकडे आपण आंब्याच्या फोडी बशीत करतो तसे सुरीने करुन.. व्यवस्थित ७ हो क्रक्समधे ठवले का असे प्रश्न पडले असते.. पण हे सगळे विझर्डिंग वर्ल्ड आहे हे
ग्रुहितच धरल्यामुळे असे व त्यात काही रिलिजि़अस सिंबल्सचे साधर्म्य आहे का असे प्रश्नच मनात आले नाहीत किंवा मी स्वतःला विचारलेच नाहीत. नाहीतर जादुच्या काड्या काय.. उडते झाडु काय.. ते व तश्या असंख्य प्रश्नांनी मन भांडावले असते. एक निव्वळ स्टोरी टेलिंग म्हणुन ही सगळी पुस्तके मला खुप आवडली.

हायझेनबर्ग... तिच्या निव्वळ स्टोरी टेलींग व कॅरेक्टर डेव्हलपमेंटच्या स्किल बद्दल जर डिबेट करायचा असेल तर कॉफी तयार ठेव.. आपली क्रिकेट बद्दलची चर्चा सुद्धा बाकी आहे.... Happy

भरत... धन्यवाद!

आणी एक माझे निरिक्षण... या ७ पुस्तकांमधे तिने किती कॅरॅक्टर्स रंगवली आहेत... नुसती जंत्रीच आहे.. पण( एक मंडॅगस फ्लेचर सोडुन) कुठेच असे वाटले नाही की एखादे पात्र उगाच रंगवले आहे... आणी ही सगळी पात्रे सगळ्या पुस्तकात सुसंबद्ध ठेवायची ही काही चेष्टा नाही!

तिच गोष्ट वेगवेगळ्या जागांबद्दल..अगदी नंबर ४ प्रिवेट ड्राइव्ह पासुन ते हॉगवार्ट कॅसल मधले वेगवेगळे भाग.. उदा. ग्रिफिंडॉर कॉमन रुम ,फॅट लेडी दरवाजा व तिचे वेगवेगळे पासवर्ड्स ,डंजन्स मधली स्नेपची पोशन रुम, मार्बल स्टेअर केस, रुम ऑफ रिक्वायरमेंट, डंबलडोरची हेडमास्टरची रुम, लिकी कॉल्ड्रन, प्लॅट्फॉर्म ९ ३/४, बरोज, १२ ग्रिमोल्ड प्लेस, हॅग्रिडची झोपडी, श्रिकिंग शॅक, फोरबिडन फॉरेस्ट, बथिल्डा बॅगशॉटचे घर, लिटिल हँगलटन मधले मार्व्हलो गाँटचे घर व तिथली सिमिटरी, गॉडरिक हॉलोज मधली सिमिटरी,मरॉडर्सचा मॅप, मोनिंग मर्टलची बाथरुम,मिनिस्टर ऑफ मॅजिकची बिल्डिंग, क्विडिचच्या मॅचेसचे वर्णन, ग्रिंगॉटची बँक.....काय डिटेल्समधे वर्णन आहे सगळ्याचे.. अगदी डोळ्यासमोर उभे राहते सगळे.

मला तर हॅरीच्या बरोबर ७ वर्ष राहुन त्याच्या विझर्डिंग वर्ल्डचा अनुभव घेउन आल्यासारखे वाटले.

आणी हॅरीसारखेच मी सुद्धा थ्रु अँड थ्रु डंबलडोर्स गाय! Happy

आणी हो.. हॅरी व डंबलडोर समुदाच्या बाजुला असलेल्या केव्ह मधे जातात ती केव्ह... काय वर्णन आहे त्या केव्हचे पुस्तकात... मला तो सगळ्यात भितिदायक प्रसंग ..सगळ्या पुस्तकांमधला.. वाटला..

स्टोरी टेलिंग आणि कॅरॅक्टर बिल्डिंगबद्दल डिबेट म्हणजे त्याला दोन बाजू असायला हव्यात ना?
की त्यातले फायनर फायनर पॉइंट्स आठवून आठवून दाद देत बसायचं?
अर्थात हायझेनबर्ग यातही डिबेट करू शकतील म्हणा Light 1

आणखी गोष्टी म्हणजे प्रसंगांची रचना, मुख्य पात्रांचं मोठं होत जाणं, एका समांतर जगाची निर्मिती आणि सात पुस्तकांत विणलेले त्याचे धागेदोरे , त्यातले कच्चे दुवे शोधणं (जसं वर त्या डायरीबद्दल आलंय) आव्हानात्मक व्हावं इतकी घट्ट वीण, अगदी सहज गळ्यात उतरवलेली तत्त्व्/सुविचार (काय म्हणाल ते).

एक गंमतीदार प्रसंग आता आठवला. Triwizard tournament -yule ball साठी हॅरी आणि रॉन पार्टनर शोधत असतात आणि पुरेसे नकार मिळाल्यावर त्यांना लक्षात येतं की हर्मायनी सुद्धा एक मुलगी आहे.
चित्रपटांमुळे त्या त्या पात्रांना चेहरे मिळाले, हे एक झालं. अर्थात काही काही चेहरे नाही रुचले. स्पेशली सिरियस ब्लॅक.

स्टोरी टेलिंग आणि कॅरॅक्टर बिल्डिंगबद्दल डिबेट म्हणजे त्याला दोन बाजू असायला हव्यात ना?
की त्यातले फायनर फायनर पॉइंट्स आठवून आठवून दाद देत बसायचं?.. अनुमोदन! Happy

हो... तो युल बॉल व त्या आधीच्या काही दिवसात झालेले हॅरी व रॉन मधले संवाद खुप मजेशीर होते... पौगंडावस्थल्या मुलांची मानसिकता तिने अगदी बरोबर पकडली आहे.. Happy

हर्माइनीच्या कॅरॅक्टरबद्दल काय बोलणार? अतिशतय मस्त कॅरॅक्टर रंगवले आहे तिचे... हॅरी व डंबलडोर इतकेच तिच्या कॅरॅक्टरला महत्व आहे.. ती जर हॅरीची एवढी चांगली मैत्रिण नसली असती तर हॅरीचे काय झाले असते? वेळोवेळी तिने त्याला साथ देउन , मदत करुन, सल्ले देउन वाचवले असते ..तिच्यातली हुशारी डंबलडोर सुद्धा जाणुन होता..म्हणुनच त्याने हॅरीला हो क्रक्सची बाब तिला सांगायाला सांगीतली होती... रॉन मात्र अगदीच हा दाखवला आहे...नशिबाने तो हॅरी व हर्माइनीचा दोस्त बनला.. पण रॉनच्या फॅमीलीने,मात्र हॅरीला सरोगेट मुलासाराखे वागवले... खासकरुन मॉलीने..

त्यातले कच्चे दुवे शोधणं (जसं वर त्या डायरीबद्दल आलंय) आव्हानात्मक व्हावं इतकी घट्ट वीण >> खरंतर मेजर प्लॉट पॉईंट्सबद्दल मेजर इश्युज आहेत, पण असू दे. मला(ही) हॅरी पॉटर आवडतो. Happy

< रॉन मात्र अगदीच हा दाखवला आहे>
या दोहोंच्या तुलनेत तो जास्त हाडामासाचा दाखवलाय. .
पण मडब्लड मूमेंट खास त्याचाच आहे.

चिमुरी.. तुझा पेट्रोनस क्रुकशँक आहे का? Happy

मायबोलीवरचे इंग्रजी स्कॉलर्स... व्हेरिटस पोशन, अ‍ॅनिमार्जी, ऑक्ल्युमंसी, हो क्रक्स वगैरे शब्द हॅरी पॉटरच्या आधी होते का?.. एक कुतुहल..

मला डायडम म्हणजे काय हे डिक्शनरी मधे बघायला लागले.. किती जणांना तो शब्द माहीत होता? Happy

लिहा की भास्कराचार्य. गोड गोड किती बोलणार? मराठी बाण्याला जागा. >>> गूगल करा भरपूर मिळतील चुका नाही म्हणता येणार त्रुटी म्हणू किंवा कंटिन्युईटी ठेवली गेली नाहीये असं.

एक आठवलेला - फ्रेड आणि जॉर्जचा OWL रिझल्ट परिक्षा झाल्या झाल्या कळतो तर ह्या त्रयीचा नाट्यमय होण्यासाठी खरी घुबडं आणून देतात.

भास्कराचार्य म्हणाले तसं तरी पण मला हॅरी पॉटर खूप खूप आवडतो Happy

मुकुंद यांचा उत्साह पाहून मजा वाटते आहे Happy बीन देअर डन दॅट फ़ीलींग आलं एकदम Happy एका कल्टमध्ये अनेक अनुयायी असतात, भारावलेल्या, अत्युच्च आनंदाच्या वेगवेगळ्या पाय-यांवर ते असतात, अशातच एखादा नवीन मेम्बर त्यांना जॉइन होतो, तेव्हा त्यांना जसा ’आपल्यासारखाच आणखी एक आला’ हा जो आनंद होतो, तसा या बाफवर नवीन हॅपॉ फॅन आला की मला होतो Happy

अनेकदा पुस्तकात असं आहे, सिनेमात तसं आहे वगैरे चर्चा चालते. मला वाटतं, पुस्तकातल्या घटना आणि सिनेमातली दृश्य ही एकमेकांशी कम्पेअर करूच नयेत, सिनेमात अनेक लिबर्टीज घेतलेल्या आहेत, काही गोष्टी दाखवलेल्याच नाहीत, तर काही जास्तीच्या दाखवल्या आहेत. सो चर्चा करताना/ त्रुटी शोधताना फक्त पुस्तकं बेस म्हणून असावीत नाहीतर फक्त सिनेमे.

कालच एक मस्त फॅन थिअरी वाचली मी... टेल ऑफ थ्री ब्रदर्सची. वाचली आहे का तुम्ही कोणी? मला इंटरेस्टिंग वाटली, लिहिते नंतर

व्हॉल्डेमॉर्टला चौथ्या पुस्तकाच्या सुरवातीला त्याची वाँड कशी मिळते, हा माझ्या दृष्टीने सर्वात विकेस्ट प्लॉट पॉइंट आहे, आणि हॅरी आणि त्याच वाँडचं कनेक्शन फारफार महत्त्वाचे असल्याने तो महत्त्वाचा आहे. रोलिंगने त्याचं दिलेलं स्पष्टीकरण (पुस्तकात नाहीच, नंतर मुलाखतीत) मला फार समाधानकारक वाटत नाही, 'चलता है' विभागातलं वाटतं.

त्याचबरोबर फिडेलियस चार्म, तो कसा वर्क होतो, इ.बद्दल अनेक गोष्टी मुद्दामून अनक्लीअर वाटतात. तुम्ही स्वतःच स्वतःचे सिक्रेटकीपर झालात, तर तुम्ही इतर कोणालाच दिसणारच नाही आणि तुमचा आवाजही त्यांना ऐकू येणार नाही इ. इ. ... त्याबद्दलच्या बर्‍याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्याने रोलिंगला अनेक कन्व्हिनियंट एस्केप मिळाले असं मला वाटतं. ते सगळे इथे सांगत बसत नाही. त्याचबरोबर रॉन डॉबीला शेल कॉटेजचा पत्ता सांगतो पण सिक्रेटकीपर बिल असतो इ. इ. घोळ आहेत.

त्याचबरोबर, हॉगवार्ट्समधून पोर्टकी वापरून जर हॅरीला लिटल हँगलटनमध्ये नेता येत असेल, तर मग कपला पोर्टकी बनवायची आणि विशेष प्रयत्न करून हॅरीला चौथा चँपियन म्हणून एंटर करणे आणि वर्षभर जिंकवत बसणे इ. प्रताप करायची काय गरज, ते कळत नाही. (टूर्नामेंट फायनलच्या दिवशी अ‍ॅपारिशन किंवा इतर सिक्युरीटी हटवल्याचा उल्लेख नाही व त्याचं काही कारणही दिसत नाही.) मूडीरूपी क्राऊचने हॅरीला सरळ ऑफिसमध्ये बोलवून त्याच्या हातात रँडम पुस्तक पोर्टकी म्हणून ठेवले असते तरी काम झाले असते. किंवा हॉग्समीडमध्ये असताना सरळ त्याला 'माझ्याबरोबर चल' सांगून साईड-अलाँग अ‍ॅपारिशन करून फसवून नेले असते तरी काम भागले असते, इ. इ. (किडनॅपच करायचे होते आणि हॅरीचा विश्वास मिळवला होता तर नक्की अजून काय हवे ...)

आणि फ्रेड-जॉर्ज जोडगोळीला रॉन पीटर पेटिग्र्यूबरोबर ३ वर्षे ग्रिफिंडॉर टॉवरमध्ये झोपतोय हे दिसलं नाही इ. इ.

ह्या गोष्टी फक्त कंटिन्युइटीचे फ्लॉज नाहीत. पण आधी म्हटल्याप्रमाणे, असो. Happy कदाचित ह्यातलं काही आधी चर्चिलं गेलं असेल.

भास्कर्याचार्य... हॅरीला डंबलडोर हॉगवार्ट मधील त्याच्या ऑफिसमधुन अ‍ॅपरेट करुन किंवा पोर्ट की वापरुन लिटल हँगलटनला नेत नाही.. तर त्याच्या मेमरी पेन्सिव्ह मधुन फक्त त्याची स्वतःची जुनी मेमरी दाखवतो..

वॉल्डोमोरचा वाँन्ड मोडायचा प्रश्नच कुठे येतो? त्या सिमिटरीमधल्या सिन नंतर हॅरीचा वाँन्ड तरी कुठे मोडतो? त्या दोघांच्या वाँन्डचे नुसते द्वंद्व होते.. व रिझल्ट इज ड्रॉ!

बार्टी क्राउज ज्युनिअर उर्फ तोतया मुडी... त्याने हात धरुन हॅरीला डिसॅपरेट का केला नाही असे जर विचारले तर पहिल्याच पुस्तकात वॉल्डोमोरने हॅरीला मारले असही दाखवता किंवा लिहिता असले असते.. मग पुढचे सगळे रामायणच झाले नसते ... पण मग आपण सगळे हॅरीच्या विश्वाला व तिच्या गोष्ट सांगायच्या कलेला मुकलो असतो... नाही का? Happy

पुनम... देर आये लेकिन दुरुस्त आये... योग्य अ‍ॅनॅलॉजी दिलीस.. Happy

जिज्ञासा.. धन्यवाद.. नक्की बघतो ती लिंक...

व्हॉल्डेमॉर्टला चौथ्या पुस्तकाच्या सुरवातीला त्याची वाँड कशी मिळते, हा माझ्या दृष्टीने सर्वात विकेस्ट प्लॉट पॉइंट आहे..(पुस्तकात नाहीच, नंतर मुलाखतीत) मला फार समाधानकारक वाटत नाही, >> ++१

रॉन डॉबीला शेल कॉटेजचा पत्ता सांगतो पण सिक्रेटकीपर बिल असतो >>> मॅलफॉय मनरमधल्या घटनेनंतर, म्हणजे हॅरी डॉबीची ग्रेव्ह खणत असतांना शेल कॉटेजवर फिडेलियस चार्म वापरतात. त्यामुळे त्याआधी रॉन पत्ता सांगू शकतो.

पण बिल सिक्रेटकीपर चालत असेल तर जेम्स आणि लिलीच्या घराचे त्या दोघांपैकी एक चालले असते.

Pages