हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेथ इटर्सनी खऱ्या हॅरीला मारण्याच्या भीतीने कोणावरच जीवघेणा हल्ला केला नसता कारण वॉल्डीचा तसा आदेश असतो की हॅरी जिवंत हवा. तो स्वतः हॅरीला मारणार. >> हम्म हे पटतंय जिज्ञासा.

===
विचेस आणि विझार्ड्सना असलं काही झालं की चुटकीसरशी बरं होत असेल. >> च्यक्... तेपण आपल्यासारखेच सर्दीने त्रस्त होत असणार असा विचार करून मला किती आनंद झालेला Sad

मोडलेली हाडं जुळंणं पण पटकन व्हायचं. >> चेंबर ऑफ सिक्रेट्समधला डार्कआर्टटिचर आठवला Lol

वॉल्डीच्या डोक्यावर केसच नाहीत ना? >> लॉल टकलू वॉल्डी Lol त्याचं नाकपण कसलं मजेशीर आहे. पण टॉम रिडलमात्र बर्यापैकी हँडसम दाखवलाय.

गमभन, हे असं काहीतरी नव्या पुस्तकात आहे - cursed child - मधे. मला वाटतं त्यात हॅरी किंवा त्याचा मुलगा वोल्डी बनतो का असं काहीतरी आहे.

Polyjuice trace hote nasava... मलापण तेच वाटतंय. तो बार्टी क्राउच ज्युनियरपण म्याड आय मुडी बनुन येतो की हॉगवर्टात. शाळेत येऊन मग म्याआमु बनत नाही.

बरोबर अचे. पॉलीज्युसचा प्रभाव ठरावीक काळच राहतो त्यामुळे सतत प्यावे लागते.

मागील पानावर जिज्ञासाने 'तेव्हा ते हॉगवॉर्ट्समध्ये असतात त्यामुळे त्यांनी पॉलीज्यूस पोशन प्यायलं तरी ट्रेस झालं नाही.' असे लिहले आहे. म्हणून मी म्हणलं की 'बार्टीने म्याआमुच्या घरात ie शाळेबाहेर तो पोशन वापरलाय.'

जादुच्या दुनियेबाहेर जर अंडरएज जादुगराने जादुचा उपयोग केला तर तो ट्रेस होणार..आणि हॅरी अंडरएज असतो तसेच त्याच्या घरी असतो म्हणुन तो ट्रेस होऊ शकतो तसेच त्याच्याबरोबर असणारे सारेच जवळपास वाँटेड लिस्ट मधे असतात अन मिनिस्ट्री वॉल्डी च्या खिशात असते म्हणुनपन शायद इतर लोक पॉलीज्युस पितात..

पॉलीज्युस पोशन पिण्यावर बंदी असली तरी त्यावर ट्रेस असेल असं कुठही लिहीलं नाहीये. It is just banned i think.

त्या घरातून किमान एकतरी हॅरी बाहेर पडलेला दिसायलाच हवा. नाहीतर सगळेच मारायचे असा डेथइटरना आदेश असेल.>> +१ आणि तसा आदेश नसला तरी तेवढा विचार जर बथ्थड डेथइटर्सनी नाही केला तर सगळ्यांना मारत सुटतील असं ऑर्डरला वाटलं असेल. रिस्क जास्त आहे यात.

एक शंका: कोणाला पाॅलीज्युस पाॅशन पिऊन वाॅल्डी बनायाचे असेल तर तो कसे बनेल? वाॅल्डीच्या डोक्यावर केसच नाहीत ना? खो खो >> नख घातलं तरी चालतं. आता व्होल्डी वेळच्यावेळी नखं काढायचा का हे बेलाट्रिक्सला विचारायला लागेल.

हर्मायनी आणि रॉन अंडरएज नसतात कारण दोघांचा वादि हॅरीच्या आधी येतो. अॅपॅरिशन टेस्टच्या वेळी असा उल्लेख आहे बहुतेक.
डेथ इटर्सनी इतके डोके चालवले नसते हे पटलं!

हिंदीमधे डबींग आहे तेवढच ठिके...
कथा जिथली आहे तितलेच लोक घेतले तर जास्त अपील होतात माझ्यामते..
त्यांच्यामानाने आपले कलाकार फार थोराड वाटते मला..

वाचली बातमी...
मस्त अ‍ॅक्टर होते.. श्रद्धांजली _/\_

आज हॅरी पॉटरचा (पात्राच्या नाही तर पहिल्या पुस्तकाचा) २० वा वाढदिवस.
पुस्तकं, सिनेमे, ब्रॉडवे शोज, गेम्स, थीम पार्क, वेगवेगळे मर्कंडाइझ सगळे धरून रोलिंगबाईंना सुचलेली एक कल्प्नना जवळपास २५ बिलियन डॉलरची फ्रँचाईझी झाली .. हॅट्स ऑफ टू रोलिंगबाई..... टेक अ बाव.

Calling all Harry Potter Fans Happy

मे नुकताच नॉस्टॅल्जिक होउन हॅपॉ सिनेमे परत बघायला सुरुवात केलय. मागच्या पावसाळ्यात पुस्तकं पुन्हा वाचलि होती. मल पावसाळा आला की हॅपॉ ची आठवण येते. बहुतेक पहिल्यांदा मी हि पुस्तके पावसाळ्यात वाचायला घेतली होती म्हणुन असेल.

Hp फॅन्स - परत सुरु करूया ना धागा।। सध्या। hbo वर hp फिल्म्स दाखवत होते । सगळे नाही बघायला मिळाले। पण काही शँका आहेत विचारू का

प्रि ऑ अझ मध्ये त्या फॅट लेडीवर ब्लेड कोण मारतो>>
ब्लेड नाही, ते सिरियस ब्लॅक त्याच्या नखाने करतो..(कुत्रा बनुन)

Pages