चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मापृ, हा सिनेमा मी चित्रपटगृहात पाहिला टोरोंटोमध्ये. नेफ्लिवर दिसला नाही, इतरही कुठल्या प्लेटफॉर्मवर दिसत नाहीये.

Searching पाहिला . आवडला.
पूर्ण चित्रपटाच taking फार वेगळं आहे.
डेव्हिडच्या स्क्रीनवरच्या virtual वावरातून त्याची मनस्थिती अचूक कळते .
! च्या जागी . वापरण , एखादं वाक्य पूर्ण लिहून डिलीट करणं , कथी फाईल नुसतीच हाईड करणं तर कधी पूर्णपणे डीलीट करणं , संदर्भ शोधण्यासाठी जूने चॅट्स भराभरा चाळणं
शेवटी गुन्ता सुटत असताना , "अरेच्च्या , प्रत्येक फ्रेम आपणही नीट निरखून पाहिली असती तर काही धागेदोरे आपल्यालाही सापडले असते" असं वाटत राहिलं .
सोशल मिडियाचं आभासी जग , त्यावरचे so called मित्र मैत्रिणी , लोकांच्या एखाद्या घटनेवरच्या reactions , त्यान्च्या comments सगळं फार उत्तम रितीने मांडलयं - आणि ती उत्तम रीत म्हणजे नेमकं कसं ते चित्रपट पाहूनच समजून घ्यावं.
highly recommended movie

स्त्री पण पाहिला ( पाहिली ?? Wink )
काही काही संवाद जबराट आहेत.
पंकज त्रिपाठी , खुराना आणि रा.रा फार आवडले. जबरदस्त टायमिंग आहे त्यांचं
"पन्ना पलटो" Biggrin
"ठीकठीक " वाटला overall Wink

ती उत्तम रीत म्हणजे नेमकं कसं ते चित्रपट पाहूनच समजून घ्यावं.

>>> अगदी!

फक्त एकच वाटलं मला, नेट-सॅव्ही नसणार्‍या व्यक्तीला हा सिनेमा बोअर्/डोक्यावरून जाणारा वाटेल.

वक्रतुंड महाकाय नावाचा मराठी सिनेमा लागला होता रविवारी. चांगला होता पण शेवट कळला नाही. एक सलग गोष्ट नाही तर एका धाग्याला गुंफलेली (गणपतीचं टेडी) वेगवेगळी माणसं आणि त्यांचं वागणं.

बायोस्कोप पाहिला तूनळीवर. एक होता कावळा आणि बैल आवडले. सगळेच आवडले पण त्यात हे दोन जास्त. मंगेश देसाईची तडफड बघून आपल्याला शहरात सगळ्या गोष्टी किती आरामात मिळतात याची जाणीव होते.

यूट्यूबवर चक्क वरूण धवनचा ‘ऑक्टोबर’ सापडला. प्रिंट उत्तम आहे. सिनेमाही आवडला. एकदम वेगळ्याच धाटणीचा आहे.

फक्त एकच वाटलं मला, नेट-सॅव्ही नसणार्‍या व्यक्तीला हा सिनेमा बोअर्/डोक्यावरून जाणारा वाटेल. >>> हां . ते ही आहे .
आम्ही हाडाचे नेटकरी . सोशल मिडीया जास्त वापरत नसले तरी . कलिग्जनाही रेको दिलाय . पाहू त्यांच काय म्हणणं आहे.

मंगेश देसाईची तडफड बघून आपल्याला शहरात सगळ्या गोष्टी किती आरामात मिळतात याची जाणीव होते.+१...तो ३९९९ चा शर्ट चा सीन भारी आहे.

मी आत्ता जरा वेळापूर्वी कल्की केकलाह आणि सुमीत व्यास अभिनीत रिबन पिच्चर पाहिला..
एकदंर ठिके.. हे दोघेही आवडतात त्यांच्या प्रॉब्लेमशी रिलेट करु शकली नाही.
मेट्रोसिटी मधे रहणार्‍या अन दोन्ही वर्किंग पेरेंट असलेल्यांना कदाचित जास्त जवळचा वाटेल.. छाने..

यूट्यूबवर चक्क वरूण धवनचा ‘ऑक्टोबर’ सापडला. प्रिंट उत्तम आहे. सिनेमाही आवडला. एकदम वेगळ्याच धाटणीचा आहे.

नवीन Submitted by ललिता-प्रीति on 19 September, 2018 - 14:38 >>> लिंक द्या ना

एक चित्रपट आहे, ज्यात श्रीराम लागू हे (बहुतेक) पॅरिसमधील एक धनाढ्य उद्योगपती असतात. चित्रपटाच्या सुरुवातीलाच अति मद्यसेवनानंतर बंगल्याचा जिना उतरत असताना पडून त्यांचा मृत्यू होतो. त्याला मीडिया कव्हरेज मिळते.
त्यांची पत्नी तरुण असते. आणि तीन मित्र मग तिला मिळवण्यास मागे लागतात, त्यातील एक (बहुतेक) विनोद खन्ना असतो. हा चित्रपट २०-२५ वर्षांपूर्वी टीव्हीवर लागला होता. चित्रपट छान पकड घेत असतानाच लाईट गेली म्हणून पुढे बघता आला नाही.
मी नंतर चित्रपटाचे नाव आठवण्याचा खूप प्रयत्न केला, अनेकांना विचारले, पण व्यर्थ.

कुणाला हा चित्रपट आठवतोय का?

कल्की केकलाह >>>> कल्की कोचलीन

'सर्चिन्ग' विषयी इथे वाचून सर्च केल गुगलवर. तर मला हया चित्रपटाची ही भन्नाट साइट सापडली.

http://www.searching.movie/site/

बादवे, हा सिनेमा मला कुठे पाहायला मिळेल? Uhoh

कल्की केकलाह >>>> कल्की कोचलीन>> बरोबर आहे माझं.. तिचं नाव केकलाह असच आहे कोचलीन नाही.

टीनाचं बरोबर आहे.

She reveals how it's REALLY pronounced in an interview with Miss Malini! So you DON'T pronounce Kalki Koechlin's last name as it's written! In a recent interview with Miss Malini's team, the actress revealed that the pronunciation of​ her last name is actually 'Kekla'!
https://www.cosmopolitan.in/celebrity/news/a2775/omg-weve-been-pronounci...

शिरीष कणेकरांनी लिहीलं होतं की ती कल्की, कालची का आजची याच्याशी आम्हाला काय करायचंय.
बायोस्कोपमध्ये संदीप खरेने काम केलंय, अजिबात आवडला नाही त्यात तो. त्याचं ते गोग्गोड बोलणं कविता ऐकतानाच छान वाटतं.

यूट्यूबवर चक्क वरूण धवनचा ‘ऑक्टोबर’ सापडला. प्रिंट उत्तम आहे. सिनेमाही आवडला. एकदम वेगळ्याच धाटणीचा आहे. >>> मला खूप आवडला होता तो - प्रचंड स्लो आहे तरीही! हॉस्पीटलचे वातावरण आणि तो मूड तंतोतंत उभा केला आहे. त्याच्याशी रिलेट नाही होता आले तर सिनेमा आवडणे कठीण आहे.

एक दोन reviews मध्ये वाचले होते - आपल्यामुळे शिउली अशा अवस्थेत आली या अपराधीपणाच्या भावनेतून डॅन तीची काळजी घेतो. चित्रपटाची नसच नाही सापडली review लिहीणार्‍यांना Sad

प्राइमवर पण आहे.

मी नेफ्लि सब बंद करून प्राईम घेतले व एकाने झी 5 पण दिले. सध्या तेच बघतेय.

झी5 वर सिलवट ही एक शॉर्ट फिल्म पाहिली, खूप आवडली.

सूर्य की अंतिम किरणसे सूर्य की पहली किरणतक हे नाटक नाटक ह्याच रुपात पाहिले. पात्रनिवड व अभिनय आवडला. अमोल पालेकरचा मराठी अनाहत त्याच नाटकावर आधारित आहे म्हणून मग चित्रपट यु ट्यूबवर पाहिला. तितकासा आवडला नाही. विषय नीट मांडलेला तर नाहीच पण हंपीसारख्या स्थळी दिवसा व रात्री चित्रीकरण करायची परवानगी वाया घालवली असे वाटले. एकही दृश्य मनावर ठसणारे दिसले नाही. देबु देवधर नाव वाचून अपेक्षा होत्या. पुरातत्व खात्याने परवानगी दिली हे मोठ्या अगत्याने श्रेयात लिहिले म्हणून कळले.

अजून शोधाशोध केल्यावर यु ट्यूबवर मूळ नाटकाचा एक संक्षिप्त प्रयोग आढळला. त्याचा शेवट बघितल्यावर डोक्यात गोंधळ झाला. झी5 वरच्या नाटकाला, वारस नाही म्हणून इंग्रज संस्थाने खालसा करत होते ही पार्श्वभूमी आहे. नाटक मी पहिल्यांदा पाहिले, त्याचा विषय व पात्रे बरीच संतुलित वाटली, मानवी वाटली. चित्रपट त्यानंतर पाहिला. त्याला दहाव्या शतकाची पार्श्वभूमी आहे. यातली सगळी पात्रे गुडीगुडी वाटली. कसलाच संघर्ष नाही. यातली राणी अजिबात पटत नाही कारण तिला काय वाटते/वाटले हे बाहेर येतच नाही.

यु ट्यूबवर जे पाहिले त्यातला काळ व राज्य चित्रपटातले , पण राणीचे वागणे चित्रपटातल्या राणीच्या आसपासही नाही. उलट ती नाटकातल्या राणीपेक्षाही चार पावले पुढे आहे. चित्रपट नाटकावर आधारित आहे, तिथे दिग्दर्शक स्वातंत्र्य घेऊन कथावस्तू बदलू शकतो. पण नाटके आधारित नाहीत तर मूळ नाटकाचे रंगमंचिय सादरिकरण आहे. मग दोन्ही नाटकात इतका फरक का हे कळले नाही.

म्ला एक प्रश्न विचारायचा आहे. इथले बहुसंख्य लोक हे जॉब होल्डर आहेत असे दिसते. देशात अथवा परदेशात . शिवाय कौटुंबिक जबाबदार्‍या तर आहेतच .हे सगळे चित्रपट पहायला किंवा एखादा चित्रपट पहायलाकिमान दोन तीन तास वेळ तुम्हाला कसा मिळतोम? म्हनजे तुम्ही हा वेळ कसा काढता अथवा अ‍ॅडजस्ट करता?

बाका, थेटरात चित्रपट पाहणारे फक्त 5 च्या खाली व 65 च्या वर असतात असे वाटते का तुम्हाला?

आवड असेल तर वेळ काढता येतो. आणि तशी आवड नसली तरी अगदीच काही करावेसे वाटत नसताना यु ट्यूब व इतर पर्याय आहेत जिथे पाहता येते. आता सगळे सर्विस प्रॉवायदर 4 g फास्ट सर्व्हिस स्वस्तात देतात, त्यामुळे मोबाईलवर सगळे काही पाहता येते, टीव्हीवर पाहतोय असेच वाटते.

साधनाजी , हे सगळे माझ्या टीव्हीवरही आहे. मी शक्यतो थेट्रात जात नाही कारण किमान४-५ तास जातात. आणि आयुष्यातले मौल्यवान ४-५ तास खर्च करावेत एवढ्या क्वालिटीचे चित्रपट येतही नाहीत. मग उगीच वेळ गेला अशी निराशा येते. एकीकडे आपण व्यायामाला, समाज सेवेला , नवीन काही शिकायला, महत्वाच्या कामाना , नातेवाइक मित्रासोबत वेळ घालवायला वेळ नाही म्हणतो आणि असे दर्जाहीन कार्यक्रम मग तो सिनेमा असो अगर मराठी / हिंदी मालिका पाहणे यात वेळ खर्च करतो हे पटत नाही....

बाका, घरकाम करताना मी काही बाही बघत करते. आजकाल लोकांना रात्री झोप येत नाही तेव्हा बघतात. पहाटे मी लवकर उठते तेव्हा तयार होताना सीरीअल बघते.

बाका, तुम्ही बरोबरच बोलत आहात. इतर विधायक कामे पडली असताना मोबाईल व टीव्ही पाहण्यात वेळ का घालवावा? पण हाही आयुष्याचा भाग आहे ना? मग पुस्तके तरी का वाचावीत? चित्रे का बघावी? गाणी का ऐकावी हा ही प्रश्न उभा राहतो. व्यायाम, मित्र, नातेवाईक हवेत तसेच थोडे मनोरंजन हवे, नवे विचार हवेत. हे सगळे हवंय त्यालाच माणूस म्हणतात ना? नाहीतर बाकी सजीव एकच चाकोरीबद्ध आयुष्य जगताहेत.

तुम्ही माबोवर नियमित येता, तुम्ही स्वतःचे काही फारसे लिहिलेले पाहिल्याचे आठवत नाही पण तुम्ही प्रतिक्रिया भरपूर देता. तुमची व्यक्त होण्याची गरज म्हणून प्रतिक्रिया येते ना. नाहीतर वेळ वाया जातो म्हणून माबो सोडणारे माझ्या ओळखित आहे. आपल्याला जे आवश्यक वाटते ते कुणाला वेळेचा अपव्यव वाटूं शकतो. असो, nothing personal. Hope you understand.

टाईम मॅनेजमेंट एक महत्वाचे टेक्निक आहे, जे मला कधी जमले नाही. भरपूर प्रवासामूळे विमानात, रेल्वेत वाचन भरपूर झाले, पण चित्रपट, टीव्ही बघणे जमलेच नाही, म्हणजे तेवढा वेळ मिळालाच नाही. थेटरात जाऊन चित्रपट बघणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट वाटायची. Titanic आला तेव्हा मी तो थेटरात बघितला होता, त्यांनतर थेटरात पाऊल ठेवले ते कट्यार काळजात घुसली बघायला.

पण माझे इतर कलीग्ज मात्र, चित्रपट, सिरियल्स, क्रिकेट मॅचेस बघून त्यावर लंच ब्रेक, टी ब्रेक ला चर्चा करायचे. कामात, घरात ते ही माझ्या एव्हढेच व्यग्र असायचे.

Pages