खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह

Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

_त _ _ _ चा _ _ हे
एक नाटक. लेखक वर मीच दिलेल्या एका कोड्यातील लेखिकेचे वडील Happy

_क_/ _ _ / _ _न/ _ _ (चार शब्द)

सेम विषयावर एक अमिताभचा सिनेमा आहे.

_ _ _ _ चा _हि _ _
पुस्तक. उपेक्षित होते का हे?

बरोबर!

वा.रा.कांंत
त्या तरुतळी विसरले गीत.

मागच्या पानावरचा एक प्रश्न राहिलाय.
साहित्यीक पतीपत्नींनी एकमेकांना लिहिलेलु पत्रे.

कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे?
पुस्तकाचं नाव माहीत नाही.

पत्र collection
पुस्तक नाव। कुसुमानिल

Pages