खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह

Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अत्रे?

काही / पताका / ही / एक / _ _ री ? Proud आता मी फक्त काहीच्या काही अंदाज मांडतोय.

: D
उभयान्वयी अव्यय.
उरलेले दोन शब्द एकाच शब्दाचे लिंग आणि वचन बदलून.
बहुतेक हे कोणीच ऐकलेलंही नाही.

मला घाटे वाटले होते, पण फ्यामिली इन्फो नव्हती, आणि ह्या पुस्तकाचं नावही ऐकलं नव्हतं. मस्त नाव भरत.

वि द घाटे, मगाशी पोतदारांपर्यंत पोचले होते पण नात्यांमध्ये कन्फ्युज झाले.

हुश्श.वि.द.घाटे
दत्तकवी, अनुराधा पोतदार, प्रियदर्शन पोतदार.

उ _ _ _ _ | _ | _ _ लो
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली कादंबरी. तीन शब्द.

Pages