Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.facebook.com
https://www.facebook.com/abpmajha/videos/10160870039920271/
Trio interview
स्मिताचे तिच्या इंटरव्ह्युत
स्मिताचे तिच्या इंटरव्ह्युत कबुल केलेय की ती कन्फ्युझ्ड असण्याची अॅक्टिंग करत होती. आस्ताद आणि रेशमही दुजोरा देत म्हणाले की तिची एक स्ट्रॅटेजी होती ती. मग तिला फेक म्हणावे का? कारण आता बाहेर आल्यावर ती फारच सॉर्टेड, स्पष्ट विचार मांडतेय. एवढे दिवस अभिनयच केला बिग बॉसच्या घरात.
पण असं करून तिने साधलं काय?
पण असं करून तिने साधलं काय?
आता परत बघतेय बिबॉचे शॉट्स!
आता परत बघतेय बिबॉचे शॉट्स!
पहिल्या आठवड्यातच आस्ताद बोलल्यामुळे मेघा रडलीय.
इकडे आरती बोलल्यामुळे स्मिताही रडलीय... ओठांच काही केलंय म्हणे तिने प्रियंका चोप्रासारखं!
पण असं करून तिने साधलं काय?
पण असं करून तिने साधलं काय?
>>>
म्हणाली ना के एमाझ्यावर फोकस राहत होता, शिवाय ती हार्मलेस वाटली लोकांना आणी इथं पर्यंत आली
स्मिताचा इंटरव्ह्यु आहे
स्मिताचा इंटरव्ह्यु आहे बॉलिवुड स्पाय वर, ती म्हणते मेघा डॉमिनेटींग आहे आणि तिचा गृप मराठी ऑडीयन्सना झेपणार नाही इतका जास्तं अॅग्रेसिव खेळत होता असं स्मिताला वाटलं म्हणून ती त्या गृप मधे नाही गेली .
याविरुध्द रेशम गृप दुसर्या टोकाचा, फार काही करतच नव्हता त्यामुळे तिला एकटीच्या डोक्यानं चालायचं स्वातंत्र्य होतं म्हणून तिथे राहिले
सईबरोबर एक टास्क एकत्र केलं तर ती म्हणे सारखी कॅमेरा बघून कुठे कॅमेरा अँगल चांगला आहे बघून वागायची.
पुष्कर म्हणे भयंकर अन्कम्फर्टेबल झाला होता शेवटच्या २ दिवसात , जेंव्हा व्होटींग संपल्यावर जुने हाउसमेट्स आत शिरले होते , सगळे सांगत होते
कि स्मिता मेघा टॉप २ असणारेत !
हो पुष्कर शेवटी व्हिझिबली
हो पुष्कर शेवटी व्हिझिबली जिटरी दिसत होता. शिवाय तेव्हाच सईच्या दोस्तीच्या सालीवरून पाय घसरून खोलात चालला होता. सैर भैर वागत होता . सईशी बोलताना सारखे चोरासारखे इकडे तिकडे बघणे शेवटी विकोपाला गेले होते .
सई पण बिथरल्यासारखीच झाली होती. ती तर सरळ म्हणे की मला आवडले नाही हे लोक आलेले. त्यांचा रोम्यान्टिक माहोल खराब झाला असेल ना 
मेघा, स, पु मधे मला स पु बोअर
मेघा, स, पु मधे मला स पु बोअर वाटले. मनातून फार आनंद झाला आहे मेघासाठी असं नाही वाटलं. ती म्हणाली शेवटचे दहा दिवस सर्व कामे मेघा करत होती. एरवी पण मेघाच करायची की सई blanket ओढून बसायची नाहीतर पुष्कीकडे चुगल्या करायची.
स्मिता एका interview त म्हणाली backbitching आवडायचं नाही, त्यामुळे कोणी करत असेल तर हो का, असं का म्हणून confused असल्याचं दाखवायची किंवा निघून जायची तिथून.
स्मिता फेक आहे असं मला नाही वाटत कारण ती सईला म्हणाली मी येडा बनके पेढा खात नसेल कशावरून आणि ती माझी strategy नसेल कशावरून. तरी सईने हे पुष्कीला सांगताना जाम खिल्ली उडवली स्मिताची. शेवटी प्रेक्षकांनी स्मिताच्या आधी सईला काढून खिल्ली उडवली सईची. तिने म मां आलेले घरात तेव्हाही सांगितलं की मी कधी कधी येडा बनून पेढा खाते. म मां चं आपल्याला आधी दाखवलं नव्हतं पण कुठेतरी बघितलं मी. तिने हिंड दिलेली पण कोणी विश्वास नाही ठेवला.
पुष्कर म्हणे भयंकर
पुष्कर म्हणे भयंकर अन्कम्फर्टेबल झाला होता शेवटच्या २ दिवसात , जेंव्हा व्होटींग संपल्यावर जुने हाउसमेट्स आत शिरले होते , सगळे सांगत होते
कि स्मिता मेघा टॉप २ असणारेत ! >>> ते अगदी शेवटी पण लक्षात आले की. जेव्हा ह खा दोघी असतील शेवटी आणि सर्व पब्लिक म्हणाले स्मिता मेघा असतील तेव्हा कसला चेहेरा पडला पुष्करचा ते. स्मितासारखं ग्रेसफुली तो घेऊ शकला नसता तेव्हा बाहेर पडला असता तर.
स्मिता कधीच कोणाबद्दल वाईट
स्मिता कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही, असं हिंदीतल्या गुरुमितने पण सांगितलं. तो दहा बारा वर्ष ओळखतो तिला, तो आणि त्याची बायको देबनिता खास फ्रेंड्स आहेत स्मिताचे.
अंजुताई, हा गुरमित आणि
अंजुताई, हा गुरमित आणि देबनिता असलेलं कपल्सचं हिंदी बिबॉ मी पाहिलं होतं. अतिशय छान! तो एकमेव हिंदी बिबॉ सिझन मी पाहिलेला. त्या आधी मी जर्मन बिग ब्रदर पाहिलं होतं. भाषा 100% कळत नसूनही मला आवडलं होतं, गुंतले होते. इकडे बिग ब्रदर 24 तास बघण्यासाठी उपलब्ध आहे! कम्प्लिट trasperancy! मात्र त्याचं पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. मी आपले 1 तासांचे रोजचे भागच पहायचे.
ते पाहून आपल्या देशात पण हा कन्सेप्ट आहे का? हे पहायला चेक केलं, तेंव्हा बहुतेक मला हे हिंदी बिबॉ सापडलं. नक्की काय ते नीट आठवत नाही.
ह्या कपल्स वाल्या बिबॉत एकेका कपल ला डुप्लेक्स रो हाऊस दिले होते राहायला आणि अशा रो हाऊसेस ची कॉलनी बनवून ऍक्टिव्हिटीज च्या वेळी ऍक्टिव्हिटीज आणि आधी आणि नंतर आपापल्या घरी अशी भन्नाट कल्पना होती. मला नक्की आठवत नाही, पण बहुतेक हेच देबनिता गुरमित कपल जिंकलं होतं. गोड आहेत हे दोघं फार! स्मिताचे मित्र, बघून छान वाटलं
स्मिता रेशम आस्ताद त्या
स्मिता रेशम आस्ताद त्या स्मिताच्या सरप्राईज पार्टीत जे काही बोलले, ते किती खोटारडेपणाचं वाटलं. चेहरा काही वेगळं दाखवत होता आणि तोंडातून बाहेर पडणारे शब्द काही वेगळेच होते! पार उतरलेला चेहरा रे आ चा. आणि मेघाला जळवायला स्मिता सोबत मैत्रीच्या आणाभाका घेतल्यासारख्या स्पष्ट दिसत होत्या.
आ आणि रे दोघंही म्हणे मला खात्री होती स्मिता जिंकणार म्हणून, ते विसरले वाटतं, प्रत्येकवेळी स्मि वीक कंटेडर समजून तिला आयदर प्रोटेक्शन देणे, फिनालेत सोबत ठेवणे, जेणेकरून आपण जिंकू, ही त्यांची स्ट्रॅटेजी होती आणि बैलगाडी टास्क मध्ये तर ती वीक याच कारणाने तिला नॉमिनेट होण्यापासून वाचवायला बघितलं आणि रे आउट झाली होती..
असो, मात्र स्मिताच्या आईने तिला दिलेला कानमंत्र- हा गृप सोडू नको, तो बरोबरच म्हणायला हवा! आज ती हरून सुद्धा सगळी व्हिलन गॅंग (पोट दुखी असुन का असेना) तिच्या आनंदात सहभागी आहे. मेघा मात्र एकटी आहे जिंकूनही. स्मिताच्या पार्टी ऑर्गनायझर्स नी मेघाला आणि सपु ला नाही बोलावलं, हे फारच कोतेपणाचं लक्षण वाटलं. ह्या ठिकाणी गृप वगैरे का पाहिला त्यांनी? बाहेर आल्यावर सगळं विसरायचं, हे यांचं आपापसात ठरलेलं होतं ना? अर्थात, आपल्याला आतली बातमी माहिती नाही, बोलवूनही हे आले नसतील का? पण मला नाही वाटत, बोलावल्यावर आले नसते हे लोक..
तो आस्ताद पण आमच्या कट्ट्यावर हिला बोलवू, एकत्र भेटू वगैरे बरंच बोलला. यात स्मिताच्या यशात सहभागी या पेक्षा मेघाच्या यशात सहभागी नाही, हे अधोरेखित करणं त्याचा शो करणं त्याला अपेक्षित असल्यासारखं वाटलं. पक्के जळकुटे लोक! पण स्मिताच्या दृष्टीने बेस्ट!! आता कायम तिच्यावर गुंडांचा वरदहस्त राहील.
अंजुताईच्या भाषेत बोलायचं, तर मला आता मेघाची काळजी वाटते. सामान्य माणसांनी जरी तिला करोडो हातांनी उचलून धरले असले, तरी फिल्म इंडस्ट्रीची भाषा मात्र तिच्यासाठी विशेष पॉझिटीव्ह वाटत नाहीये. त्यामुळे मेघाचा पण आनंद झाकोळून गेल्यासारखा जाणवला तिच्या मुलाखतींमधून..
तिच्याऐवजी स्मिता जिंकली असती, तर फार जबरदस्त सेलिब्रेशन झालं असतं बिबॉ कडून आणि त्यात सगळे सामील झाले असते, मेघाची विनरशिप बळजबरीने बहाल केल्यासारखी वाटली. तिच्याजागी पु, आ, स्मि कोणीही असते, तर माहोल काही वेगळा असता, असं वाटतं.
ह्या कपल्स वाल्या बिबॉत एकेका
ह्या कपल्स वाल्या बिबॉत एकेका कपल ला डुप्लेक्स रो हाऊस दिले होते राहायला आणि अशा रो हाऊसेस ची कॉलनी बनवून ऍक्टिव्हिटीज च्या वेळी ऍक्टिव्हिटीज आणि आधी आणि नंतर आपापल्या घरी अशी भन्नाट कल्पना होती. मला नक्की आठवत नाही, पण बहुतेक हेच देबनिता गुरमित कपल जिंकलं होतं. गोड आहेत हे दोघं फार! स्मिताचे मित्र, बघून छान वाटलं. >>>>
अग ते bb नाही ना, वेगळं होतं काहीतरी लहान मुलांना सांभाळायचे होतं. राखी सावंत आणि तो तिच्याशी लग्न करणार होता कॅनडा वाला तो ही होता.
मी कमी बघितलं पण गुरुप्रीत देबनिता चांगले आहेत खूप हे त्यात कळत होतं.
सानी छान लिहिलंस. आता कौतुक
सानी छान लिहिलंस. आता कौतुक करतायेत स्मिताचं. तिला विक समजून ती जाईल हे गृहीत धरलेलं दोघांनी त्या स पु बरोबर नेहेमी मीन्स आ रे स पु हे नेहेमी स्मिता जाईल आत्ताचं हे गृहीत धरत होते.
आ ने स्मिताचा फोटो वाचवला कारण तो म्हणाला स्मिता विक आहे, म्हणून ती मला फिनालेला हवीय माझ्याबरोबर, मी तिच्या पुढे जाईल नक्की. आधीच गेला तिच्या. रे पण आधी गेली. आता काहीही कौतुक करतायेत. मेघा नको म्हणून स्मिता किंवा पुष्कर जिंकावे वाटत होतं दोघांना शेवटी.
अग ते bb नाही ना, वेगळं होतं
अग ते bb नाही ना, वेगळं होतं काहीतरी लहान मुलांना सांभाळायचे होतं. राखी सावंत आणि तो तिच्याशी लग्न करणार होता कॅनडा वाला तो ही होता.>>> अरे हो! बरोबर! शोधलं आणि सापडलं, मी हा शो पाहिला होता तर.. 2009 साली टेलिकास्ट झाला होता, पार विसरले गेले होते, काय पाहिलं ते.. फार मस्त रिऍलिटी शो होता हा. बरोबर, राखी सावंत पण होती यात!
https://en.m.wikipedia.org/wiki/Pati_Patni_Aur_Woh_(TV_series)
ही लिंक ओपन केली, तर ह्या नावाच्या सिनेमाची लिंक उघडतेय. इकडे पेस्ट केल्यावर हे होतंय.
अंजुताईच्या भाषेत बोलायचं, तर
अंजुताईच्या भाषेत बोलायचं, तर मला आता मेघाची काळजी वाटते. सामान्य माणसांनी जरी तिला करोडो हातांनी उचलून धरले असले, तरी फिल्म इंडस्ट्रीची भाषा मात्र तिच्यासाठी विशेष पॉझिटीव्ह वाटत नाहीये. त्यामुळे मेघाचा पण आनंद झाकोळून गेल्यासारखा जाणवला तिच्या मुलाखतींमधून.. >>> खरं आहे. प्रोजेक्ट मिळतील तिला पण स्मिताला जास्त मिळतील तिच्यापेक्षा. तसंही स्मिता आधीही बिझी होती, bb साठी ती कामे सोडून आली होती असं खुद्द bb ने शेवटी सांगितलं.
फिल्म मधली लोकं थोडी अपसेट कारण रे रा सु ह्यांना धूळ चारली मेघाने. त्यामुळे ती लोकं स्मिताचे कौतुक करत होते, मेघापेक्षा असं वाटलं. नाईलाज झाला त्यांचा पब्लिक सपोर्ट मुळे. स्मिताबद्दल पण नाराजी असेल की ही कशी काय पुढे आली इतक्या दिग्गज grp मधून. रेशम पण मुलाखतीत म्हणाली स्मिताला कसं काय voting जास्त होतं माझ्या आणि आस्तादपेक्षा. पण मेघापेक्षा स्मिता बरी ह्या न्यायाने हर्षदा, सई ता कौतुक करत होते तिचं बहुतेक.
सर्वजण फुल टू जेलस on मेघा.
जर votes मिळाली असतील स्मिताला ह्या बऱ्याच लोकांकडून तर ती दुसरी असण्याची शक्यता असावी किंवा पुष्कर अगदी थोड्या मताने पुढे असेल. मेघा अति अति अति पुढे असणार.
हिंदी bb त नक्की मेघाला
हिंदी bb त नक्की मेघाला बोलावतील. पण तिने आता फक्त bb चं करत राहू नये.
स्मिताचे कपडे, ज्वेलरी फक्त
स्मिताचे कपडे, ज्वेलरी फक्त चार दिवसात टीम ने तयार केलं म्हणे. ते व्यवस्थित pack केलं एकत्र पण bb ने सगळे उघडून packing वगैरे काढलं, मिक्स झालं होतं, त्यामुळे कशावर काय घालायचं हे स्मिताला नक्की माहिती नव्हतं, ती मनाने घालत गेली.
ग्लामर, task, helping nature आणि no bitching ह्या गोष्टींमुळे bb नी पण शेवटी शेवटी स्मिताला इथपर्यंत आणायचं ठरवलं असणार, चांगलं वागणारा मेम्बर पण फिनालेपर्यंत पोचू शकतो आणि top ३ होऊ शकतो हे दाखवायचं असणार.
अग सानी, स्मिताच्या पार्टीत
अग सानी, स्मिताच्या पार्टीत सगळ्यांना आमंत्रण होतं. तिने तिच्या wall वर मेघा, सई , पुष्कर, ऋतुजा ते विनीत भोंडे सर्वांना missed केलं असं लिहिलं आहे, अगदी ए to z नावं आहेत सर्वांची रा, जु ग, ह खा, चौगुले सर्वच. तुमच्या commitment मुळे तुम्हाला यायला जमलं नसेल, मी समजू शकते पण परत करूया पार्टी असं लिहिलं आहे.
ती म्हणाली ना प्रेस कॉन्फरन्समध्ये की बाहेर जाऊन मी सर्वांशी संबंध ठेवणार, सर्वांना भेटायला मला आवडेल.
अस्ताद, रेशम वगैरे मेघाशी
अस्ताद, रेशम वगैरे मेघाशी काही संबंध ठेवणार नाहीत असं वाटतंय. बाकी राजेश, सुशांत वगैरे ठीकच वाटले.
पण अ रे नी मैत्री ठेवली नाही तर मेघाचं काय बिघडणार आहे? त्या दोघांच्या बोलण्यावर काही मराठी / हिंदी इंडस्ट्री चालत नाही. त्यामुळे मेघानं त्यांना 'हुडुत् ' करावं. गेले खड्ड्यात. इतके कोत्या मनाचे असतील तर बसा कोपर्यात भातुकली खेळत. मेघाकरता आख्खं आभाळ मोकळं आहे.
तसंही मेघा, सई आणि पुष्कर ही मंडळी तालेवार आहेत. मनात आणलं तर हे प्रोड्युसर बनून दुसर्या गटातील लोकांना रोजगार देऊ शकतात.
स्मिताच्या पार्टीत रे आणि आ चे चेहरे अगदीच पडले होते. ही कोण ज्युनियर आणि हिचं आपण कौतुक करायचं टाईप लुक्स होते. उगा मारून मुटकून आले होते. असल्या मित्रांपेक्षा एकटं राहणं परवडलं. आणि मेघा एकटी कुठाय? इतके सगळे प्रेक्षक आहेत की तिच्यामागे.
जियो मेघा! जियो स्मिता!
आस्ताद म्हणत होताना नाईलाजाने
आस्तादने स्मिताच्या पार्टीत स्वयंघोषित ट्रायो रे.आ.स्मि डिक्लेअर केला पाहिलं का

बिबॉ मधे ट्रायो म्हणजे फक्त मेसैपु, त्यांना फुटेज मिळलं म्हणून अस्तादच्या डोक्यात आला का हा ट्रायो ?
बाकी आस्ताद म्हणत होताना प्रेस कॉन्फरन्सला कि नाइलाजाने मेघाला भेटावं लागणार (स्वप्नालीमुळे .)
बॉलिवुड स्पाय मधे त्यानी दिलेल्या मुलाखतीत अचानक मेघाचे गोडवे गात होता चक्क , ती कशी डे १ पासून डिझर्विंग होती वगैरे!
बाकी इंडस्ट्रीत टॅलेंट, नशीब , पैसा सगळच लागतं, जे स्वतःला एस्टॅब्लिश्ड कलाकार म्हणवतात त्यांना बिग बॉस अजिबातच जमलं / झेपलं नाही.
तसच इथे आलेले टॉप ५ इंड्स्टीत सहज एस्टॅब्लिश होतीलच असही नाही.
पुष्करचा सिनेमा ‘ती आणि ती’ येतोय त्याच्या लाडक्या लंडन मधे पिक्चराइझ केलेला आणि शर्मिष्ठाची टिव्ही सिरियल येतेय म्हणे लवकरच कलर्स मराठीवर.
मेघा सईची बर्यापैकी शून्यातून सुरवात असेल, काही वर्ष दूर आहेत मराठी इंडस्ट्रीपासून.
मेघानी टॉक शो ची होस्ट बनावं एखाद्या
उगवत्या सुर्याला सलाम करणारी
उगवत्या सुर्याला सलाम करणारी इन्डस्ट्रि आहे ही, उद्द्या एक-दोन मालिकामधुन पॉप्युलर झाली मेघा तर यू नेव्हर नो, तिचे अॅक्टिन्ग स्किल मात्र मला खरच माहित नाहित , ते नाहिच जमल तर मुव्हिज काढाव्या मस्त, राजकारणात गेली तर तिथेही टिकु शकेल, मेघाचा उद्देश तिच नाव होण आणि पॉप्युलॅरिटी मिळण हाच होता जो नक्किच सफल झालाय.
स्मिताविषयी तिच्या टिमचे जे लोक गोड गोड बोलतायत त्यातले कितिजण हेच बोलले असते जर फायनल ५ मधे रेशम असती? काहीहि शेन्ड्या लावतात.. रेशम पण फिनाले मधे म्हणे मी स्वतःला तिथे इमॅजिन केल होत आणि स्मिता असणारच होती म्हणे? रियली ??हिच रेशम बैलगाडि टास्क नतर शरा बोलावुन सान्गत होती तु आणि स्मिता विक आहात म्हणु मी तुम्हाला वाचवल म्हणे वर मेघा कशी स्वार्थी आहे हे सान्गत होतीच की , शरा सै सारखी बालिश नसल्याने तिची मैत्री मेघाशी टिकुन राहिली .
आस्ताद तर त्याच्या उच्चासनावरुन सगळ्याना सतत त्रुच्छच लेखायचा
फिनाले तल्या एकुण एक स्पर्धकानी मेघाच कौतुक करताना म्हटल ती पहिल्या दिवसापासुन ठरवुन आली, अभ्यास करुन आली, जिन्कण्यासाठि खेळत होती , तिचा खुप अभ्यास झालाय , लेको तुम्ही का नाही केलात अभ्यास मग ? तुम्हाला कुणि नाही म्हटल होत का? भले!! तुम्ही जर झोपा काढायला अलात आणी सिगारेटी फुन्कत गप्पा मारत बसतायत वर म्हणतायत हिने कशाला अभ्यास केला?
स्मिताला फिटनेसचा अॅवार्ड मिळाला तो अगदी वेल डिझर्व्ह होता , तिला लोळत पडलेल मी एकदाही पाहिल नाही.
ते बिग बॉसचा अभ्यास हे काही
ते बिग बॉसचा अभ्यास हे काही केल्या मला झेपत नाही. मेघाने सगळे सीजन्स पाहिलेत, म्हणून तिने अभ्यास केला हे लॉजिक आहे का? अगदी एकूणएक जण म्हणायचं कि तिने अभ्यास केलाय. जसं काही स्पर्धा परीक्षा आहे अभ्यास करून पास व्हायला किंवा टॉप यायला.
एक वेळ पुष्कर किंवा सई पैकी
एक वेळ पुष्कर किंवा सई पैकी कुणी जिंकले असते तर गुन्हे माफ झाले असते. पण आता आईवडिल आणि पुष्करला बायकोकडून दणके नक्की आहेत.
वीणा लोकूर यांचा चेहरा शाळेत
वीणा लोकूर यांचा चेहरा शाळेत पहिला नंबर आला नाही तर हुशार मुलांच्या आयांचा होतो तसा झालेला...हा खेळ आहे हरणं जिंकणं तर होतं च हे कळत नसावे त्यांना
आणि पुष्की चे पण बरोबर
आणि पुष्की चे पण बरोबर लागणारेत घरी.... त्याची बायको कडक आहे आणि अस चालवून घेईल असं वाटत नाही... इतकी छान नाजूक बायको असताना त्या दंडगोबा च्या मागे काय हा वेडा झालेला
मी आयुष्यात पहिल्यांदा असा
मी आयुष्यात पहिल्यांदा असा फॅनगर्ल असण्याचा अनुभव घेतला आणि त्यात मजा आली. आधीचे जे थोडे हिंदी बिबॉ बघितले होते ते काहीसे अलिप्तपणेच पाहिले गेले - थोडाफार अपवाद श्वेता तिवारी आणि गौतम गुलाटी. पण या दोघांच्या बाबतीतही मी ते जिंकले पाहिजेत इतपतच विचार करत होते फार काही इन्व्हॉल्व झाले नव्हते. मी बघितलेल्या एका बिबॉचा विनर विंदू दारासिंग होता तेव्हा खूप चिडचिड झाली होती. तो फारच मर्कट्लीला करत असे.
बिबॉ मराठीचा दुसरा सिझन (आलाच तर) कोण कोण बघणार? - मी बघेन की नाही माहित नाही.
बिबॉ मधे ट्रायो म्हणजे फक्त
बिबॉ मधे ट्रायो म्हणजे फक्त मेसैपु, त्यांना फुटेज मिळलं म्हणून अस्तादच्या डोक्यात आला का हा ट्रायो ?>>> मी पण पाहिला तो व्हिडीओ.. पण नंतर असं कळलं की रे-आ- स्मि या trio साठी फॅन पेजेस आहेत इन्स्टाग्रामवर.. आणि ते सतत त्या तिघांचे मोमेंट्स टाकत असायचे..
मेघा ने आस्ताद ला खूप विचार
मेघा ने आस्ताद ला खूप विचार करून केप्टन्सी साठी पाठिंबा दिला होता की नाही ते माहिती naahee..
पण पुष्कर साई एवढे react होतील असा तिला पण वाटलं नसेल त्यात पुषकी आणि साई चे छुपे ..
ना दिसलेले स्वभाव बाहेर आले .. खरंतर थोडं react होऊन विषय तिथेच संपून गेला asataa..
smitaa कधीच खूप आवडली naahee.. खरी कशी आहे ते दिसलीच नाही असं वाटत raahila..
१०० दिवस स्वभावावर ताबा मिळवून राहल्यासाठी थोडीच आली hotee..
हा धागा बघून बघून बिबाॅची
हा धागा बघून बघून बिबाॅची आठवण यायला लागली म्हणून हिंदी बिबाॅ 11 बघायला गेले. मधलेच 2-3 एपिसोड बघितले. कानाचे पडदे फाटायला आले आणि डोकेदुखी मिळाली additional.
किती तो किचाट आणि भांडणं. मारामारी पण. आपलं मराठी बिबाॅ म्हंजे अगदी लुटुपुटुचा खेळच म्हणावा त्यासमोर. राजेश-सुशांतने आणि नंतर मेघा- पुष्कर कं चा राडापण साफ नांगी टाकेल.
Pages