मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला उत्तम कॅमेरा आणि बॅटरी अशी दुभती गाय हवी आहे. अर्थात फार महागडा म्हणजे २०-२५ हजार किंवा त्याहून जास्त खर्च करण्याची इच्छा नाही.
फोन चा पूर्ण पिळून वापर करतो त्यामुळे दोन तीन वर्षात त्याचा कंटाळा येतो आणि नवे तगडे फोन्स हवे वाटतात त्यामुळे जास्त महाग न घेता, डिसेंट बजेट फोन घ्याला प्राधान्य
वापर - भरपूर इंटरनेट, ऑफिस आणि अन्य कामेही सुरू असतात
गेम्स - फारसे हेवी नाहीत पण चेस, पझल, एखादा ब्रेन टिजिंग असतोच असतो
कॅमेरा - रगगड वापर, फोटो आणि व्हिडीओ सतत सुरू असतात
गाणी ऐकणे, युट्युब, आणि फेसबुक ही प्रमुख बॅटरी ड्रेनर्स

आशु, तुझ्याकरता एकच फोन वन-प्लस. जरी महाग असेल तरीही एकदम फ्लॉलेस फोन आहे. तगडी बॅटरी आणि डॅश चार्ज अनबिलीवेबल आहेत. एक रेअर अँड्रॉईड जो २/३ वर्षे पहील्या दिवसासारखा चालतो. आणि हो, याला ओएस अ‍पडेट्स ही मिळतात...

अर्थात ३०के+ द्यायची तयारी असेलतर मग आयफोन ६एस चा नक्की विचार कर.

बजेट फोन्स करता माझं मत तरी मोटो ला. मोअर/लेस सगळे बरे आहेत. डिसेंट परफॉर्म करतात काय जी किंमत असेल त्यास...
बाकी ऑनर, विवो, ओपो ला माझा तरी पास... रेडमी त्यातल्यात्यात जरा बरा.

ब्रँड चॉईस मध्ये -
१. वन प्लस / अ‍ॅपल (सिंगल सिम, स्क्रीन लहान तुलनेनं इ)
२. मोटो
३. सॅमसंग (लेटली यांचेही फोन्स बजेटमध्ये असून डिसेंट परफॉर्म करतात)
४. रेडमी/एमआय

मोटोचा मी पुराना ग्राहक आहे. जी२, जी ३ आणि सध्या जी ४ प्लस वापरत आहे. पण लिनोव्होने टेकओव्हर केल्यानंतर मोटोची ती क्वालीटी राहीली नाही असे वैयक्तिक मत. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे बॅटरी. ३००० एमएच सुरुवातीला वर्षभर टकाटक चालते, नंतर जीव टाकायला सुरुवात करते.
त्यांचे ५००० बॅटरी वाले फोन फक्त ई सिरीज ला आहेत, पण त्यात त्यांनी बजेट चिपसेट, जीपीयु आणि अॅव्हरेज कॅमेरा टाकून वाट लावली आहे.
अजून एक म्हणजे आगामी सगळे फोन सहा इंची आहेत, जे खुप मोठे होतात. बाईकवर जाताना खिशात ठेवणे अशक्य. तेवढ्यासाठी मला कित्येकवेळा बॅग न्यावी लागेल.

५.२ ते ५.५ सुटसुटीत.

आयफोन नको असण्याची अनंत कारणे आहेत.

मी पण चांगल्या फोनच्या ( बजेट) शोधात आहे.
कॅम्राचे सेवड फोटो साइज चारपाच एमबीपेक्षा जास्ती येणारा हवा, सेपरेट मेमरी स्लॅाट हवेच आहे - २+१ स्लॅाट. OTG ,WIFI direct आणि hotspot हवेच.

घरात एक लेनोवो K6 NOTE आहे. 3 +32 जीबी ( 1.5+24 available), qualcom 435.
कॅम्रा 16,8
रेडियो फार भारी + वन टच एफेम रेकॉर्ड आणि सेवड mp3 फाइल दुसऱ्यास देता येते.
फुल स्क्रीन व्ह्यु फाइंडर, चांगले फोटो.
( मागच्या वर्षी १४ह)
जवळपास स्टॅाक अन्द्रोइदandroid 6.1 marshmallow तो 7.0 upgrade लगेच मिळाले. तसा काही फार फरक नाही दोन्हींत. गुगल प्रॅाडक्ट्स प्रिलोडेड आहेत परंतू ते मला हवेच होते. बाकी रॅाम खाणारे ब्लोटवेर नाही. वेबसाइट्स गुगल -docs , photos, blogger,फेसबुक, क्रोम,फायरफॅाक्स इत्यादिच्या डेस्कटॅाप्स पेजेजही फुल लोड करता येतात. अॅप्स व्यतिरिक्त त्यांचीही गरज लागते आणि कंम्प्युटरकडे धावावे लागत नाही. दहा हजारच्या फोनमध्ये फुल पेजेज येणे मला अत्यावश्यक वाटते. ५.३" स्क्रीन चांगला एजटुएज दिसतो.
लेनोवो- मोटोरोला यांची चार सर्विस सेंटर्स मुंबईत घाटकोपर,बोरिवली इत्यादि ठिकाणी आहेतच हा मोठा आधार. कुणाला एखादा फोन द्यायचा झाल्यास नोकिया,सॅमसंग किंवा सर्विस मिळणारा असावा लागतो. नाहीतर हुआवे ,एचटिसी आहेतच.
( माझा अनुभव लिहिला आहे. कसा वाटतो?)

MI Note 5 Pro चांगला आहे ३० तास बॅटरी चालते. फोटो कमी उजेडात पण चांगले येतात! १५ के च्या आता उत्तम फोन गोरिल्ला ग्लास आहे.
६४ जीबी रोम आहे! उत्तम फोन.
१२+५ एम पी मुख्य आणि २० एम पी फ्रण्ट कॅमेरा.

मला एक मठ्ठ फोन हवा आहे.

म्हणजे नॉन स्मार्ट. फक्त अगदी छोट्यात छोटा अन स्लिम हवा. फक्त बोलण्यासाठी. बॅटरी स्टँडबाय चांगला हवा, सिनियर सिटीझन फ्रेंडली असला तर उत्तम.

कोणता रेकमेंड कराल?

आरारा, सॅमसंग गुरू सीरीज आहे चालू अजून. त्यातले काही मॉडेल्स जबरी होते, ते चेका एकदा. पण त्यात ४जी सिम बहुधा चालणार नाही. सो, त्या कंपॅबिलिटीज एकदा चेक करून घ्या...

>>सिनियर सिटीझन फ्रेंडली असला तर उत्तम.>>

ते हरवतात किंवा स्मार्टफोन वापरता येत नाही म्हणून स्वस्तातला फोन देणे अंतिम महागच पडते.

बारकी स्क्रीन काही उपयोगाची नाही. जियोफोन २ ही घेऊ नका. वाटसपचा फेसबुकचा पेजचा गोंधळ आहे.
फोन हा फक्त फोनम्हणून वापरण्याचा काळ आता राहिला नाही.
आजोबाआजीनाही नातवंडाचे फोटो पाहणे, पाठवणे, रेडिओ ऐकणे, विडिओ पाहणे हे करायचे असते.

नवीन नोकिया ( HMD GLOBAL) ही जुनी नोकिया नव्हे!! सगळी नोकिया नावावर भंकसगिरी आणि भंपक किंमती.

Micromax bharat ५ pro baddal ky mat ahe ? Koni use kraty ka ithe ? Features changle vattay

नवीन नोकिया ( HMD GLOBAL) ही जुनी नोकिया नव्हे!! सगळी नोकिया नावावर भंकसगिरी आणि भंपक किंमती. >> किंमती बद्दल खरे आहे पण फोन अजून पण चांगले आहेत. नोकिया 5 चा अनुभव चांगला आहे. गणपतीपुळ्याला MTDC रिसॉर्टमध्ये पहिल्या मजल्यावरून पडून देखील एकही ओरखडा नाही की काहीही बिघडले नाही. 2 महिने झाले या गोष्टीला, त्यावरून लक्षात आले फोनची बिल्ड quality अजूनही तशीच आहे. सध्याच्या परिस्थितीत, किंमत जास्तच ठेवली आहे सगळ्या मॉडेल्सची.

नोकिया रॅायल्टी/ पेटंट्सचे पैसे वाढले. १,३ मध्ये मिडियाटेक ६७३७, ८+१ किंवा १६+ २ जिबी हे फारच लो स्पेक्स झाले.फोनची बिल्ड quality चांगली हे बरोबर.

रेडमी फोन चे स्पेसिफिकेशन चांगले असतात मात्र बिल्ड कॉलेटी चांगले नसते असा अनुभव आहे.
त्यापेक्षा सामसंग किंवा आयफोन घ्यावा म्हणजे तीन-चार वर्षे आरामात चालतो

असूस बद्दल चांगलं ऐकून आहे. दणकट असतो वगैरे. माझ्या आॅफिसमध्ये काहीजण वापरत आहेत तीन चार वर्षांपासून.

मी गेल्या एका वर्षापासून Redmi 4A वापरत आहे, फोन तसा चांगला आहे पण बॅटरी बॅकअप कमी झाला आहे, दिवसातून दोनदा चार्ज करावा लागतोय

आ रा रा
खरंच घेऊन पहा
येईल feel

बजेट फोन्समध्ये
१) OTG असणे,
२) compass,
३) सेपरेट मेमरी कार्ड स्लॅाट
असणे फार महत्त्वाचे आहे आणि ते OPPO फोन्स देते.
--
सध्या Mediatek Helio P 20/25/60 चा वापर वाढतो आहे. आणि त्याचा रिपोर्ट चांगला आहे.
---
Oppo चा Realmi brand , Xiaomi च्या फोन्सना चांगलीच टक्कर देत आहे. Xiaomi चे स्क्रीन फार मंद वाटतात. मेमरी कार्ड स्लॅाट नसतोच.

OTG असणे,
२) compass,
३) सेपरेट मेमरी कार्ड स्लॅाट>>
ते नसलं तरी फार बिघडतं असं वाटत नाही... ६४ जीबी म्हणजे बक्कळ जागा असते खरंतर. आणि हायब्रिड स्लॉट असतो की... प्रत्येकाकडचे दोन सिम्स असतात असं काही नाहीये.
रेडमी ५ए ज्येनांना घेऊन दिला आहे. त्यात वेगळा मेमरी कार्ड स्लॉट आहे, दोन सिम स्लॉट्स व्यतिरिक्त. फोन बरा आहे. ज्येनांच्या वापरासाठी ३ -३२ जीबी चे स्पेक्स आणि कॅमेरा पुरेसे आहेत.

घरी आम्हा दोघांचे ऑनर/ honor चे फोन आहेत. कुठलाही फोन दोनतीन वर्षांनी बदलावाच लागतो त्यामुळे फार खर्च करायचा नाही असं माझं धोरण आहे. अपवाद नोकिया ल्युमिया चा. साडेतीन चार वर्षं झाली पण अतिशय उत्तम चालू आहे. पण आता ब्रँडचा हातबदल झाल्याने टेक्निकल सपोर्ट गेला. हळूहळू सिस्टीम आउटडेटेड झाली. बॅटरी अजूनही दणकट सपोर्ट देते.

हो फक्त रेडमि ५ए मध्ये 6हे स्लॅाट.

बजेट फोनमध्ये म्हणतो आहे. ६४ + ४ जीबी आता आवाक्यात येत आहेत.
ओटिजी सपोर्ट आणि वाइफाइ डिरेक्ट हॅाटस्पॅाट असला की १६ +२ जीबी चेही वापरता येतात.

Pages