मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks फिल्मी.. पहिला flipkart वर... छान वाटला...

सॅमसंग चा एम ३१ एस पण पाहा नवीन लाँच आहे आणि तगडे फीचर्स आहेत.
अत्यंत सुरेख क्वालिटीचा एस-अ‍ॅमोलेड इन्फिनीटी ओ डिस्प्ले
६००० एमएएच बॅटरी (३०वॉ जलद चार्जिंग)
६ जीबी रॅम, १२८ जिबी स्टोरेज, ४ कॅम्स
फुल सॅमसंग वन सॉफ्टवेअर (बाकी एम सीरीज सारखं वॉटर्ड डाऊन वर्जन नाही. अपवाद - एम४०)

अ‍ॅमेझॉन वर पहिला सेल ६ ऑगस्ट ला आहे. प्राईम मेंबर असाल तर लवकर अ‍ॅक्सेस मिळेल.
बाकी चायनीज पेक्षा सॅमसंग उजवे वाटताहेत मला. मागच्या महिन्यांपासून बायडी एम४० वापरतेय. उत्तम अनुभव.
एम ३१ एस ची किंमत बहुधा २०के. पण माझ्यामते वर्थ.

नेक्स्ट अप, वन प्लस नॉर्ड जरा वर २५ के मध्ये. उत्तम पीस आहे हा सुद्धा.

जर १५ के बजेट डेडलाईन असेल तर एम३०/ एम३१/ एम४०/ एम२१ इत्यादी आहेत.

मुद्दाम रेडमी/ एमआय इ. नाही सुचवलेत. चालणार असतील तर एमआय ए३ पाहा; उत्तम पीस विथ प्युअर अ‍ॅन्ड्रॉईड. अ‍ॅन्ड्रॉईड वन.
इश्यू एकच स्क्रीन ७२० पी आहे.

आयफोन चालणार असेल तर Xr बेस्ट डील. मी गेले वर्षभर वापरतोय. फारच आवडलेला पीस. फेस रिकग्निशन वर्क्स लाईक चार्म.

फोन कुठलाही घ्या, चांगला हेडफोन/ इअरफोन नक्की घ्या. फार कामाला येतो आताशा. घरून काल्म व्हायला इ. करता.
हेडफोन झोन ही साईट ट्राय करा विचार करणार असलात तर. सगळ्या बजेट्स मधले पीस अवेलेबल आहेत.

हॅपी हंटींग अ‍ॅड शॉपिंग Happy

>>मी गेले वर्षभर वापरतोय. <<
रिलायंस जियो इ-सिम सपोर्ट करतात असं वाचलं, तुम्ही टेन-आरचा ड्युएल सिम (इ आणि रेग्युलर सिम) दोन्हि एकत्र वापरले आहेत का? भारतात सपोर्ट, कवरेज कसं आहे?

हो, जिओ च ई-सिम आहे. नवीन घेणार असलात तर डायरेक्ट ई-सिम घेता येतं. आधीचं फिजिकल सिम असेल तर ई-सिम कन्व्हर्ट करून देतात.
दोन्ही टाईप्स चे सिम्स त्यांच्या माय जिओ अ‍ॅप मधून मॅनेज करता येतात. (ई-सिम म्हणजे फक्त फिजिकल कार्ड नाहीय बाकी इट वर्कस अ‍ॅज युज्वल)
अ‍ॅक्टीव्हेशन प्रोसेस ला जेमतेम १५/२० मिनिटं लागतात - डॉक्यूमेंट प्रोसेस या वेळात होते आणि पुढे २/३ तासात सिम/ई-सिम अ‍ॅक्टिव्हेट होतं.

अ‍ॅक्टिव्हेट झाल्यावर फोन सेटिंग्स मधून प्रायमरी/ सेकंडरी इ. आणि डेटा स्विचिंग इ. सेटिंग्स बदलता येतात.

जिओ वायफाय कॉलिंग सपोर्ट करतं सो इनडोर कव्हरेज उत्तम आहे. पुण्यात ओव्हरऑल कव्हरेज आणि डेटा स्पीड्स चा खूप काही इश्यू नाही.
मी प्रायमरी एअरटेल वापरतो पण व्हॉईस कॉलिंग (इनडोर, ऑन वाफयाय), जिओ जास्त चांगलं चालतं एअरटेल वायफाय कॉलिंगपेक्षा.

नॉर्मल एलटीई/४जी सेल्यूलर कॉल असेल तर दोन्ही जवळपास सारखे आहेत.

ई-सिम सपोर्ट म्हणाल तर तसा वेगळा काही सपोर्ट नाही लागत.
पण फोन फॉरमॅट केला आणि डिजिटल सिम वाईप केलत तर पुन्हा स्टोर ला जाऊनच डेटा प्लॅन अ‍ॅड करायला लागतो. आणि हो डिजिटल सिम कुठल्याही मोबाईल शॉपी कडून नाही घेता येत, रिलायन्स डिजिटल च्या शॉप मध्येच जायला लागतं.
(आता आयफोन च्या नव्या अपडेट मध्ये डिजिटल सिम ठेवून बाकी फोन फॉरमॅट/ फॅक्ट्री रिसेट करता येतो.)

धन्यवाद योकु, सविस्तर उत्तराबद्दल. इ-सिम मल्टिपल प्रोफाइल सपोर्ट करत असल्याने भारतभेटित प्रिपेड प्लॅन घेउन तो प्रोफाइल तिकडे असताना वापरायचा विचार आहे. आय होप, जियो प्रिपेड प्लॅन्स करता हि इ-सिम देतात...

हो. प्रिपेड/ पोस्ट्पे दोन्हीकरता जिओ इ-सिम देतं.
एअरटेलही इ-सिम देतं.

सध्या हे दोनच भारतीय प्रोव्हायडर्स इ-सिम आणि वायफाय कॉलिंग देतात

माझ्या आधार कार्डाशी जोडलेला माझा भारतीय मोबाईल क्र. बंद पडला आहे. (सिम खराब झाले आहे.) सेम नंबरचे नवीन सिम मी भारतात नसल्याने घेता येत नाहीये. तसंच नवीन (फ्रेश) नंबरही घेता येत नाहीये माझ्या नावावर. (सेम कारण - मी भारतात नाही म्हणून).
नवीन नंबरचे सिम घेताना आयरीस मेजरमेंट/फिंगर प्रिंट घेतात असं कळलं.
तर आता काय ऑप्शन्स आहेत मला? समजा माझ्या बहिणीने एक फ्रेश नंबर घेतला (माझ्यासाठी म्हणून - पण तिच्या नावावर) तर तो नंबर जोडला तर चालेल का आधारला?

मी भारतात नाही म्हणून

- आधार कार्डाचं महत्त्व { अशा व्यक्तींसाठी } संपले आहे. १८० दिवसांपेक्षा अधिक दिवस भारताबाहेर असल्यास आधार बंधनकारक नाही. बँक तुमचे अकाउंट गोठवू शकत नाही.
UID च्या माहिती मध्ये हे आहे आणि ते बऱ्याच अधिकारी वर्गास ज्ञात नसते. ( याबद्दल एक अरविंद कोल्हटकर यांनी एक लेख लिहिला आहे कुठेतरी.)

बाकी माझाही आधारशी संलग्न मोबाईल क्र. अस्तित्वात नाही तरी काही अडत नाही. इ वेरिफिकेशनला ओटीपीसाठी दुसरा नंबर दिला तरी चालतो. पत्ता ,फोन, नाव बदलले की प्रत्येक वेळी नवीन आधार काढायला कोण जाणार?

धन्यवाद एस आरडी.
आधारबद्दल मला एकच कन्सर्न आहे म्हणून ही शंका आली होती.
पीपीएफ मॅचुअर झाले की ती रक्कम मिळवायला आधारअशी संलग्न मोबाईल नं व्हॅलीड असावा लागतो असं काही आहे का?
कारण ईपीएफच्या बाबतीत ती रक्कम मिळवताना आधारचा मोबाईल नंबर चालू असणं आवश्यक होतं हे आठवतंय.

पीपीएफ मॅचुअर झाले की ती रक्कम मिळवायला

बँक खात्री करते की डिपोझिटर तोच आहे. इतर पासपोर्ट वगैरे डॉक्युमेंट दाखवू शकता.

सिनियर सिटीझनसाठी स्मार्टफोन घ्यायचा आहे. वय 80+
त्यांनी आजवर स्मार्टफोन वापरलेला नाही. सध्या कुठे येणेजाणे - मिसळणे बंद असल्याने त्यांच्या गुरूंची प्रवचने वगैरेंना जाता येत नाहीये. ते सगळे फोनवर बघा-ऐकायला मिळावे हा मुख्य उद्देश आहे. म्हणजे बहुतेक व्हॉटसप(किंवा इतर मेसेजिंग सर्व्हिस) आणि युट्यूब हे असावे.
खूप महागातला घ्यायचा नाहीये. परंतु बिघडल्यास सतत रिपेअर वगैरेला जाणे त्यांना शक्यही नाही आणि वसई गावात सगळी दुकानेही नाहीत.
तर सध्या कुठला बरा आहे?
रेडमीचेच घेणे बरे की अजून कुठली कंपनी आहे?

विवो २० पहा. ११५००/- किंमत आहे(डिस्काऊंट धरून) . वजनाने हलका आहे,आईसाठी घेतला आहे.वय ८७ आहे.
आधीचा मोटो होता.मुख्य म्हणजे यूट्यूबमुळे बरीच नाटके,वॉटसॅपमुळे परदेशी असणार्‍या भाच्यांशी बोलणे होत असे.
आधीचा देऊन नवीनची किंमत अजून कमी झाली.
आईलाही स्मार्टफोन नको होता.मात्र ३ वर्षात बरीच प्रगती झालीय.

योकुने वर नमूद केलेला "सॅमसंग चा एम ३१ एस "
अजूनही व्हॅलीड आहे का? की आता घेतो म्हटलं तर तो जुना आहे?

माझी अपेक्षा: चांगली बॅटरी लाईफ, दोन सिमकार्ड व्यवस्थित चालले पाहिजेत. १२८ जीबी स्पेस. कॅमेरा ओके असलेत तरी पुरे. आकाराने फार मोठा नको, एकंदर लांबी ६ इंच (त्यात स्क्रीन ५ ते ५.५ इंच) पुरे आणि ऑपरेटिंग सिस्टम अद्ययावत.
बजेट १८ हजार आहे.

कृपया माहिती/अनुभव असलेले फोन सुचवा.

---------
तसेच आता मिळणाऱ्या नवीन फोन्स मध्ये 5G चालेल का?
आता 5G चालेल असेच फोन घ्यावेत का की 5G ला अजून बराच अवकाश आहे आपल्याकडे?

माझ्या माहीतीप्रमाणे ५जी ला तसं पेनिट्रेट व्हायला ४जी पेक्षा जास्त वेळ लागू शकेल. कारण ५ जी नेटवर्क डिप्लॉयमेंट ला नेटवर्क डिवायसेस जास्त प्रमाणात लागतील. अर्थात हे माझं मत. फास्ट डिप्लॉय ची शक्यताही नाकारता येत नाही.
दुसरा मुद्दा, जिथे ४जी ऑन अ‍ॅव्हरेज १० एमबीपीएस च्या पुढे स्पीड्स देत नाही तर ५जी चं काय.
माझं मत नेहेमीप्रमाणे होम/ऑफिस फायबर ब्रॉडबँड च्या वायफाय ला. सुपिरिअर कनेक्टिव्हिटी विथ ९९% अपटाईम. आता वायफाय कॉलिंग आल्याने सिम ला रेंज नसेल तरीही वायफाय वरून कॉल्स राऊट होतात, सो ऑल्मोस्ट नो प्रॉब्लेम.

सॅमसंग ची एम सिरीज नक्कीच चांगली आहे. ६/८ जिबी रॅम आणि १२८ स्टोरेज वाला पीस १८के मध्ये नक्कीच मिळेल. शक्यतो स्नॅपड्रॅगन प्रोसेसर वाला पहा एक्सेनॉस पेक्षा.

धन्यवाद योकु, srd.
मध्येच मी होऊ दे खर्च, घेऊ या वनप्लस ९ मोड मध्ये गेलो होतो.
मग संध्याकाळी धुलाईयंत्राचा धाड धाड आवाज आला तेव्हा आठवलं की यंदा ते बदलायचे आहे. जलशुद्धीकरण यंत्राचा तीन वर्षाचे देखभाल कंत्राटही या महिन्यात संपणार आहे, ते ही खूप जुने झालेय आणि कंत्राट नुतनीकरणापेक्षा ते बदलणे योग्य राहील

परत M51 / ओप्पो फ१७ प्रो /या रेंज मध्ये आलोय.
घेतला की कुठला घेतला ते लिहीन इथे. अजुन काही दिवस व आहे, याचे कुणाचे अनुभव असतील, अजून काही सूचना असतील तर कृपया लिहा.

M51 ऐवजी F62 घ्यावा असे सुचवेन. त्याचा प्रोसेसर फ्लॅगशिप लेवल आहे सारख्याच किमतीत.
ओप्पो F17 प्रो हा फोन हा जुना झालाय, त्याऐवजी F19 प्रो प्रिफर करा. (तरीही दोन्ही फोन गुड व्हॅल्यू फॉर मनी नाहीत हे माझं वैयक्तिक मत)
ब्रँड हा इशू नसेल, तर redmi note 10 pro max सर्वोत्तम पर्याय. मोटो fusion + ही बघू शकतात, एकदम क्लीन experience.
Samsung galaxy note 10 lite हाही एक चांगला पर्याय आहे. ऍमेझॉन वर आता सेल मध्ये उपलब्ध आहे
5G फोन हवा असेल, तर mi 10 lite हा एक अतिशय चांगला फोन आहे.
(यामध्ये सगळ्या फोन मध्ये १२८ जीबी रॅम असून, सॅमसंग चे दोन जे फोन सजेस्ट केलेत, त्यात exynos चा हाय एन्ड प्रोसेसर आहे. बाकी फोन मध्ये snapdragon चे मिड रेंज प्रोसेसर आहेत.)

हो F62 च.
बदल केला आहे...

अजून एक
म51 व फ62 सोडून सॅमसंगचा कुठलाही मिड रेंज फोन घेऊ नका.
सगळे एकजात exynos 9611 प्रोसेसर वर चालतायेत, काही दिवसांनी हँग होण्याची गॅरंटी नक्की.
(म21, म30, म30स, म31, म31स, फ41 सगळे यातच येतात.)
जर फोन जास्त काळ वापरायचा असेल, तर snapdragon 720ग, 730ग, 732ग 750ग व 765ग वाले फोन चांगले.
Oneplus नॉर्ड हा अजून एक जबरदस्त 5g ऑप्शन, 25-26000 मध्ये

ओव्हरऑल माझी क्रमवारी सांगायची झाली तर

१. Samsung f62
2. Samsung m51
3. Redmi note 10 pro max
4. Mi 10 lite
5. Samsung note 10 lite
6. One plus Nord.
7. Moto fusion +
8. Poco x3

सॅमसंग F62 मध्ये प्रोसेसर Exynos 9825 आहे. रेडमी नोट १० प्रो मॅक्स मध्ये Qualcomm® Snapdragon™ 732G आहे.
दोन्ही पैकी कुठला चांगला आहे? कारण वर म्हटलंय एक्सीनॉस पेक्षा स्नॅपड्रॅग प्रोसेसरवाला पहा.
पण Exynos 9825 लेटेस्ट वाटतो.

मानव सॉरी, लेट रिप्लाय देतोय.
प्रोसेसर विषयी थोडीशी माहिती
१. प्रोसेसर चे दोन भाग पडतात, एक सिपीयू आणि दुसरा जीपीयू
सिपीयू चांगला आहे हे बघण्याची ढोबळ पद्धत म्हणजे क्लॉक स्पीड आणि antutu बेंचमार्क
आता तुम्ही जे दोन प्रोसेसर म्हणताय, त्याचा क्लॉक स्पीड बघू
१. Exynos 9825 - 2.8 GHZ
२. 732G - 2.2 Ghz

म्हणजे 9825 जास्त पावरफुल आहे.

Antutu स्कोर
१. Exynos 9825 - 4,60,000
२. SD732g - 2,70,000

इथेही क्लीअरली exynos विनर ठरतो.

आता 9825 7 nm वर बनलाय, 732g 8 nm वर. जितके nm कमी, तितकी बॅटरी कमी लागते.

त्यामुळे 9825 हा क्लियर विनर ठरतो।।

थोडस पुढे जाऊन म्हणायचं झालं, तर snapdragon वाला फोन घ्या, ही झाली ढोबळ स्टेटमेंट, पण कुठला snapdragon वाला घ्या ते महत्वाचं.
9825 कधीही स्नॅपड्रॅगन 662, 665, 675, 678, 720, 720G, 730G, 732G 750G, 765G यांना मात देईलच. पण 855, 855+, 775G, 860, 865, 870, 865+, 888 यांच्या मागेच असेल (855 आणि 855+ आता जुनाट झालेत) आणि बाकीचे सर्व 30,000 च्या वर मिळतात.
म्हणून
7000 mah battery आणि सुपर amoled वाला फ62 हा बेस्ट ऑप्शन आहे.
अजून एक रेडमी ची miui ही अतिशय बग वाली ui आहे, आणि त्यात ads येतात. Samsung one ui is smooth as butter and clean.

खूप छान माहिती दिलीत अज्ञातवासी. खूप धन्यवाद.
रेडमीनोट 8 प्रो बायको वापरते आहे, त्यात जाहिराती येत असतात.

सॅमसंग F62 8GB/128GB ऑर्डर केला. ICICI ची ऑफर होती, २५00 कॅशबॅक आणि एक जुना फोन एक्सचेंज १९५० हे धरून २१५०० ला पडला.
हा अमेझॉनवर नव्हता आणि फ्लिपकार्ट वर फक्त 6GB वाला होता, तेव्हा सॅमसंग वेबसाइटवरूनच ऑर्डर केला.
डिलिव्हरी १ आठवडा आहे.

परत एकदा धन्यवाद, अज्ञातवासी आणि योकु.

स्टॉक android वाला नको होता का?
-------------
UI म्हणजे काही गोष्टी कापून काही वाढवतात बहुतेक. अर्थात वापरेबल RAM कमी होते.

Srd, हो थोडी RAM त्यात वापरली जात असेलच.
पण मी स्टॉक अँड्रॉइड आणि One UI यांची तुलना
इथे वाचली होती आणि मला One UI ठीक वाटली.

काही ऍप्स Samsung Paymini, Samsung Health, Samsung Members, Galaxy store वगैरे uninstall करता येत नाहीत. आणि Galaxy store नविन अपडेट उपलब्ध आहे असे नोटिफिकेशन अधुन मधून येते. पण ते एकदा दुर्लक्षित केले की परत येत नाही.

आता नव्या फोन मध्ये One UI 3.1 आहे त्यात अजून इम्प्रुव्हमेंट्स् असतील.

Pages