मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Camera किती मेगापिक्सेल्स यापेक्षा सेव झालेला फोटो किती एमबी'चा आहे ते पाहावे. आणि क्वालटी.

बाकी सिनिअर सिटिजननी प्रसेसरचा बाऊ करण्याची गरज नाही.>>>>
ठीक आहे, मोटो इ5 प्लसच उदाहरण घेऊ.
प्रोसेसर snapdragon 425 आणि 5000 mah ची बॅटरी. स्टॉक अँड्रॉइड, आणि बनवलेला आहे 28nm टेक्नॉलॉजीवर.
आता 28 nm वर बनवलेला प्रोसेसर काय बॅटरी एफिशियनसी देईल? शिवाय क्वाड कोर. बाकी सगळं जाऊ दे, व्हाट्सअप्प वर अनेक ग्रुप असले तरी फोन लॅग करेल.
प्राईस तुम्ही सांगितली ७५००. १.४ ghz चा प्रोसेसर डे टू डे कामे नीट हँडल करेल?
They don't deserve a good phone, because they are senior citizens असं तर नाही ना?

7nm वर टेक्नॉलॉजी पोहोचली असताना, आपण 28 nm चा प्रोसेसर रिकमेंड करूच शकत नाही.
१४ nm चा प्रोसेसर २५०० mah ची बॅटरी जेवढा वेळ चालवेल, तेवढाच २८ nm चा प्रोसेसर ५००० mah ची चालवेल.
मात्र १४ nm ची इफीसीयनसी २८ nm पेक्षा कित्येक पटीने अधिक असेल.

Camera किती मेगापिक्सेल्स यापेक्षा सेव झालेला फोटो किती एमबी'चा आहे ते पाहावे. आणि क्वालटी.>>>>
हेसुद्धा अर्धसत्य आहे, कॅमेरा किती चांगला परफॉर्म करेन हे सेन्सर आणि ऑप्टिमायझेशन वर अवलंबून असतं.
आता हे बघा,
रेडमी 7s मध्ये सॅमसंग चा 48 मेगापिक्सल चा सेन्सर आहे, आणि 7प्रो मध्ये सोनीचा IMX586 आहे, जो फ्लागशीप असून ONEPLUS 7 PRO मध्येही वापरलाय. मग हा कॅमेरा चांगला परफॉर्म करणारच. मग फोटो साईझ 8 9 MB येईल. करण डिटेलिंग जबरदस्त असेल.
पण जर यात आपण सेटिंग मध्ये १२ MP साईझ सिलेक्ट केली, तर फोटोची क्वालिटी कमी होणार नाही, डिफॉल्ट सेन्सर मुळे, पण झुम करताना पिक्सेल फाटतील, आणि साईझ कमी होईल.
ऑप्टिमयझेशन चा विषय पुन्हा कधीतरी, बेस्ट उदाहरण गुगल पिक्सेल फोन.

मोटोच्या साईटवरून (इ५ प्लस)
"Operating system
Android™ 8.0, Oreo™

Processor
Qualcomm® Snapdragon™ 435 processor with 1.4GHz Octa-core CPU and Adreno 505 GPU

Memory (RAM)
3 GB‡‡
---
वाटसप ग्रुप मेसेज वाढले तर फोन हँग का होईल?
३ जीबी RAM पैकी २ जीबी फ्री आहे.
------
कँम्रा ची पिक्सेल साईज -
//Rear camera hardware
12 MP, f2.0, 1.25um big pixels, LED flash, PDAF (Phase Detection Autofocus), Laser Autofocus

Rear camera software
HDR, Panorama, Manual Mode, Burst Shot, Best Shot, QR code/Barcode Scanner, Slo-motion mode, Video Stabilization

Rear camera video capture
1080P(30fps), 720P(30fps), 480P(30fps)

Front camera hardware
8 MP, f2.2, 1.12um, Selfie Flash/Light//

----------------
5000mAh battery दोन दिवस पुरते सहज.
---------
मल्टिटास्किंग - दोन एप्समध्ये रूट ट्रेसिंग + फोटो/विडिओ पाचसहा तास होते. (( रेडमी नोट 4 मध्ये दोन एप्समध्ये रूट ट्रेसिंग एकाचवेळी होत नाही.))
फोटो " उन्हाळी भटकंती माथेरान (२)" धाग्यात आहेत.
----------
जास्ती मेगापिक्सेल्स क्यामराचा फोटो मेमरीमध्ये सेव करून पुढच्या फोटोसाठी सेन्सर लवकर क्लिअर करण्यासाठी प्रसेसर फास्ट लागतो. PUBG gameसाठीही फास्ट लागतो. सि सिटीजनना या गेममध्ये इंटरेस्ट बहुतेक नसेल. धडाधड फोटोही ते काढत नसावेत.
जाहिरातींचा भडीमार करणारे फोन्स त्यांना त्रासदायक ठरू शकतात. महागडा फोन हरवणे हेसुद्धा विचारात घ्यावे.

आमच्याकडे भरपूर व्हॉट्सअप ग्रुप असलेल्या ज्ये ना कडे मोटो सी प्लस आहे तो छान चालतो काहीही हँग बिंग होत नाही.
मला भारतात वापरायला इ५ प्लस किंवा जी ६ घ्यायचा आहे. कोणी ऑलरेडी वापरत आहेत का?

Sd435???
(तसाही हा प्रोसेसर जुनाटच आहे. रिकमेंडबल नाहीच.)
लिंक देऊ शकाल?
तसंही ऑपरेटिंग सिस्टम जुनाट असली, (9.0 वर चालणारे ढिगाने फोन उपलब्ध आहेत.) प्रोसेसर जुनाट असला, तरीही ते ज्ये. ना. आहेत, चांगले कॉन्फिग देऊन उपयोग काय अशी धारणा दिसते.
असो.

@अज्ञातवासी - सगळे प्रतिसाद वाचलेत, सगळ्यात आधी विनाकारण जास्त लोड घेऊ नकोस. प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असतात, आणि विचारसरणीसुद्धा.
तुझी प्रोसेसरची यादी बघितली, रिकमेंडबल फोनची यादी बघितली. वर कॅमेराच दिलेलं एक्स्प्लेणेशन बघितलं, साक्षात दंडवत तुला _/\_ विनाकारण माझंच कसं खरं हे सांगण्यापेक्षा मस्त प्रत्येक गोष्टीत लॉजिकल एक्स्प्लेणेशन देत गेलास तेही आवडलं. SD636 डायरेक्ट आऊटडेटेड म्हटल्यास ते तर भारीच...
पण एक सांगते, इथे प्रत्येक ग्रुपचे स्वतःचे सरदार असतात, त्यांना दुसऱ्या कुणाने ग्रुपवर घुसखोरी केलेली आवडत नाही. म्हणून जमलं, तर स्वतःचा धागा काढ. तू खूप छान लिहू शकशील असा विश्वास आहे.

बाबांनो जेथे तुम्हाला अज्ञातवासी यांचा लेख नाहीतर प्रतिसाद दिसेल तिथे व्वा अज्ञा काय भारी लिहितोस असा प्रतिसाद टाकायचा नाहीतर ते डुआयडी ने लॉगिन करून अशी खंत व्यक्त करतात.

सध्या रिअलमी ३ प्रो चांगला आहे म्हणतात. १०nm फॅब्रिकेशन असेलला प्रोसेसर आहे ,२.२ GHz. माझ्या भावाने घेतला आहे.रिव्ह्युज चांगले आहेत.

बाबांनो जेथे तुम्हाला अज्ञातवासी यांचा लेख नाहीतर प्रतिसाद दिसेल तिथे व्वा अज्ञा काय भारी लिहितोस असा प्रतिसाद टाकायचा नाहीतर ते डुआयडी ने लॉगिन करून अशी खंत व्यक्त करतात.

Submitted by सप्रस on 16 June, 2019 - 01:49

सगळ्यात आधी, तुझा काय संबंध? तुझा या चर्चेत काय संबंध. ते सोड. आमच्याकडे एक म्हण आहे, लगीन लोकाच आणि नाचतय *****. मी स्त्री आहे म्हणून तुझ्या स्तराला उतरता येणार नाही, अशा भ्रमात राहू नकोस. तुझ्यापेक्षा घाणेरडे नमुने मी माझ्या खऱ्या आयुष्यातही बघितलेत, आणि देवदयेने त्यांची जिरवली सुद्धा आहे.
माझी प्रोफाइल बघ. प्रोफाईलला किती वर्षे झालेत तेही बघ. नुकताच अंड्यातून बाहेर आलेला तू, तुझे धागे वाचलेत मी, पण तू प्रतिसाद द्यायच्याही लायकीचा नाहीस. कुठल्यातरी इथून हकालपट्टी केलेल्या घाणीचा पुनर्वतार तू, विनाकारण मला ज्ञान शिकवू नकोस. तू कुणाचा डु आय डी आहेस, याची जाणीव आहे मला. विनाकारण उचकावू नकोस.
विनाकारण डु आय डी म्हणत बोंबा मारत हिंडायच्या.
जमलं तर विपु मध्ये मोबाईल नंबर टाक. मग तुला समजेल कोण डु आय डी आहे ते.
माझ्याविषयी पिंका टाकायची गरज नाही समजलं? तुझे नेहमीच गिऱ्हाईक पकड!!

अरेरे बाण वर्मी लागला वाटते. सडक्या मनोवृत्तीचे विचार शेवटी बाहेर आलेच. शेवटी पात्रता दाखवली म्हणायची. भाषेवरून कोणाची लायकी काय आहे ते ही समजले.

घाणीत उतरायचं म्हटलं तर हात बरबटणारच ना रे, म्हणून ती घाण मी सहन करेन असा होत नाही. तुझे नेहमीचे गिऱ्हाईक तुझ्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून मीही तुझा सडका प्रतिसाद चालवून घेईल अशा भ्रमात राहू नकोस. माझी मनोवृत्ती किती खालच्या थराची याची चिंता तुला नको.
विपु केलीये, इथे गोंधळ नको.

जे आधी लिहिलंय तेच परत विपुत टाकायचं यावरून या आयडीडीची विकृती समजते.विकृत लोकांना मी मोबाईल नंबर देत नाही. हा आयडी विकृत असून वैयक्तिक आयुष्यात आलेले मनस्ताप बाहेर काढण्यासाठी तो मायबोलीवर लिहित असावा, सडकी मनोवृत्ती आणि सडके विचार कोणाचे आहेत हे भाषेवरून सिद्ध होतय. जमलंच तर एखादा चांगला डॉक्टर गाठा आणि गोळ्या औषध सुरू करा.

ही चर्चा आहे. कोणी नवीन फोन घ्यायला दुकानात जातो तेव्हा दुकानदार तुमचे बजेट विचारून त्यामधले दोन चार फोन्स दाखवतो. तेव्हा त्या ओप्शनसमध्ये कोणता घेतल्यास काय मिळेल हे सांगण्याचा प्रयत्न.
नवा धागा काढून कोणीही लिहू शकतोच.
दर दोन वर्षांनी अधीकाधिक उत्तम तंत्रज्ञान स्वस्तात मिळणारच आहे. पंधरावीस हजार दोनदोन वर्षांनी खर्च करणार असणार तर चर्चाही वाचण्याची गरज नाही.
---------
मी घेतलाय इ५ प्लस, चांगला चालतो.

प्रसेसर एसडी 435/430 जुनेच आहेत. पण रिलाअबल आहेत. दोन्ही सिमस्लाटवर 4जी चालते.
हाई एन्ड गेम्ससाठी नाहीत. पण सि सिटिझनचा तो प्रश्न नसतो.
---------
बाकी 5जी वाले फोन्स या वर्षी /एक वर्षात येतील, ते घेण्याचा विचार असेल तर आता महागडे 4जी घेण्यात पैसे वाया जातील.

Srd सगळ्यात आधी तुमचा चर्चा करण्याचा अप्रोच खूप आवडला. त्यासाठी मी आजपासून तुमचा फॅन... आणि काही गोष्टीत मी लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर क्षमस्व!
माझा मुद्दा एकच आहे, की जर 7500 रुपये जर मोटो आकारत असेल, तर त्या तोडीचे फिचर त्याने द्यायला हवेत. (इ5 प्लस बहुतेक 10,000 की 11,000 ला लॉन्च झाला होता.)
जत
जर आपल्याला खरच पैसे खर्च करायचेत, तर

Asus Zenfone Max Pro M1 (Blue, 32 GB)
http://dl.flipkart.com/dl/asus-zenfone-max-pro-m1-blue-32-gb/p/itmf7gcrg...

फक्त १००० रुपये टाकून आपण मोटो इ5 प्लस पेक्षा जवळजवळ दुप्पट क्षमता असलेला फोन घेऊ शकतो. आणि यातही स्टॉक अँड्रॉइड आहेच.

फोनबद्दल चाललेली चर्चा वाचतोय.
आसुस, रेडमी, रियलमी वगैरे फोन बद्दल अजूनही खात्री वाटत नाही (चायनिज असल्याने कदाचित). तसंच ते ओप्पो, विवो वगैरे पण.
मोटो आणि नोकिया त्यातल्या त्यात जुने ब्रॅन्डस असल्याने जरा ठीक आहे असं वाटतं.
srd आपण सुचवलेला पर्याय चांगला वाटला. पण माझी अडचण अशी आहे की ज्या सिनियर सिटिझन साठी फोन घ्यायचाय त्यांना सध्या फोनचा वापर फक्त फोन घेणे आणि करणे एवढाच माहित आहे. व्हॉट्सअप वर दूर असलेल्या नातेवाइकांचे , मुलांचे, नातवांचे फोटो कसे पहायचे हे समजवायला ही चांगलाच वेळ लागणार आहे. त्यात Moto E5 ची स्क्रीन फारच मोठी असल्याने परत साशंक झालो आहे.
तरी माहिती बद्दल धन्यवाद..

मित एक माहिती.
मोटो आता चायनीज झालाय. लेनोवोने तो विकत घेतलाय.
नोकिया ५.१ प्लस सोडून कुठलाही फोन मी रिकमेंड करणार नाही, (नोकियाच हवा असेल तर)

इ5 उत्तम फोन आहे
आई वडील दोघांनाही तोच घेऊन दिलाय
बॅटरी भरपूर चालते, दोन दोन दिवस
लॅग होत नाही
असुस आणि अन्य पेक्षा मोटो कधीही उत्तम वाटतो

मोटो इ५ प्लसपेक्षा Asus Zenfone Max Pro M1 जास्ती फीचरस देतो हे पाहिले होते पण Asus चे ओथराइज्ड सर्विस सेंटर कुठे, किती??
तिसरा पर्याय नोकिया 3.1 प्लस होता पण त्यात नोकियाने १४ जीबी मेमरी ब्लॉक केली आहे. मोटोने फक्त साडेपाच!. इथे प्रत्येक जीबीसाठी पैसे मोजावे लागतात अन फरक पाहा.

Android one नोकिया देणार, दोन ओएस अपडेट्स देणार पण मुळात गुगलवाले खूप बदल करणारे अपग्ररेडेड ओएस बनवत नाहीत, दुसरे म्हणजे सिक्युरिटी अपडेटस - चा खरच काही उपयैग होतो का? Apps नी फोनच्या काय वाटेल त्या परमिशनस घेतल्यावर काहीच उपयोग नाही.
------------
मला फोनमध्ये युएसबी ओटीजी फार महत्त्वाचे वाटते. ( फोनाला पेनड्राइव जोडून फाईल फोटो/विडिओ टाकले की टिविवर पाहायला मोकळे )नोकिया 5.1 प्लस मधल्या युएसबी सी पोर्टातून ओटीजी चालते का ते कुठे कळले नाही.
नोकियाची सर्वीस सेंटरस (अगोदर विंडोज फोनांसाठी होती ती आता एच एम डी ग्लोबल नोकियाला देतात) चा भरोसा वाटत नाही.
------
लेनोवोने मोटो घेतल्यापासून ते दोन्हींची सर्वीस देतात. मुंबईत चार आहेत. कुणा टपरीवाल्याच्या हातात तरी फोन देण्याची वेळ येणार नाही.
--------
(नोकियाच हवा असेल तर) -
माझ्याकडे दोन विंडोज फोन पाच वर्षं, दोन नोकिया आठ वर्षं अजून चालू आहेत पण हे बिघडले तर कोणीही हातात घेणार नाही. गायब. त्यामुळे ब्रँड बदलला.
-–---
शेवटी - लेनोवोने मोटो ब्रँडचा विश्वास जपल्यासारखा वाटतोय.
-----
फोन रिव्यु करणाऱ्यांना नवीन फोनस वापरून पाहायला मिळतात तसे काही आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे प्रत्येक युजरचे इथले फीडब्याकस इतरांना नक्कीच उपयोगी पडतील. चुकीचे समजही दूर होण्यास मदतच होईल.

ज्या सिनियर सिटिझन साठी फोन घ्यायचाय त्यांना सध्या फोनचा वापर फक्त फोन घेणे आणि करणे एवढाच माहित आहे. ~~~~~

काहीही अडचण येणार नाही . यामध्ये कोणतेही ब्लोटवेर (( जाहिरातींचे प्री लोडेड apps)) नाही. सिनियर सिटिझन साठी जेवढी फोन स्क्रीन मोठी तेवढे चांगलेच.

@ अज्ञातवासी , मला काहीच आक्षेप नाही कारण मीसुद्धा नेटवरच्या माहिती आधारेच लिहित आहे. त्यात चूक असू शकते.
आपण माहीत नसलेल्या गोष्टी नेटवर ,साइट,युट्युबवर शोधतो तेव्हा इंग्रजी -हिंदीतील भांडार सापडते. शिवाय ती माध्यमे वापरणे, तेच मराठीत अशक्य असते. इथे ते साध्य होतय.

ASus चे सर्विस सेंटर सगळीकडे आहेत, मुंबई उपनगरात तर फारच.
बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत.
सर्विस सेंटर च्या बाबतीत मात्र सॅमसंगला तोड नाही.
(मात्र भविष्यात तो फोन खराब होईल या भीतीने आताच लो स्पेक्स वाला फोन घ्यायचा हे तरी मला अनाठायी वाटतं.)

धन्यवाद srd आणि आशुचॅम्प.

इ५ प्लस आणि जी६ मध्ये जी६ ला गोरिला ग्लास आहे हा मेजर फरक आहे त्यासाठी २००० जास्त देऊन जी६ घ्यायचा विचार करत आहे. ५ G वाले फोन्स १-२" वर्षात येऊ शकतील का? त्यामुळे १०,००० पेक्षा जास्त किमतीचा घेणार नाही अन्यथा जी७ घेतला असता.

नुसते फोनला 5जी असून काय उपयोग
सर्व्हिस प्रोव्हायडर कडे असला पाहिजे ना
आताशी कुठे 4जी चा जम बसतोय अजून 5जी सगळीकडे यायला अमाप अवकाश आहे

जी६ मध्ये फुल एचडी स्क्रीन, जरा बरा प्रसेसर, गोरिला ग्लास दोन्ही बाजूस , कंम्पस, डॉलबी स्पिकर दिलाय। त्या बदल्यात ब्याटरी 5००० वरून 3000 टाकली. ती जेमतेम पुरणारी आहे फुल एचडी स्क्रीनला.
आता नवीन फोनात युएसबी सी पोर्टच येणार पण ओटिजी खात्री करावी लागेल.
Android 9 pie वर अपग्रेड होईल पण कॉल रेकॉर्डिंग गुगलने त्यातले काढले आहे.
----------
असुसचे सर्विस सेंटरस वाढले त तर चांगलेच पण टेकगुरू सारख्या कार्यक्रमात हा मुद्दा सांगत असत. स्पेअर पार्ट्स रिप्लेसमेंट येत नसावेत.

4जी चा जम बसतोय अजून 5जी सगळीकडे यायला अमाप अवकाश आहे

खरंय. शिवाय घरी 5जी नेट घेतल्यावर वाईफाइ स्पीडने मिळेलच. तरीही शक्यता लक्षात असावीच. रिलायन्स चे कधीही सुरू होऊ शकते 50-100 एमबीपीएस. ओटिए. 100-150 वायर्ड.

मोटो ई ५ प्लस आता ओनलाईन ७८०० रुपयांवर आला. घेतला. ( Moto e5 plus )
बेस्ट सिनिअर सिटिझन फोन आहे. >> मी सिनियर सिटिझन नाही, पण फोनचा वापर व्हॉअ‍ॅ, मेल्स, कॅलेन्डर, मॅप यासाठ करायचा आहे. जास्त पैसे टाकाय्चे नाहीत, तर मोटो ई ५प्लस योग्य होईल का?

मोटो ई ५प्लस योग्य होईल का?

- होय. PUBG game साठी नाही म्हणून सिनियर सिटिझन बोललो. आणि Refurbished certified 7000 ला दिसतो, पण विचार केला नवाच घेऊ.

मध्ये फुल एचडी स्क्रीन, जरा बरा प्रसेसर, गोरिला ग्लास दोन्ही बाजूस , कंम्पस, डॉलबी स्पिकर दिलाय। त्या बदल्यात ब्याटरी 5००० वरून 3000 टाकली.

अरे हो की! इ ५ प्लसमधेही गोरिला ग्लास आहेच पण जी६ मध्ये दोन्ही बाजूला आहे इतकंच. मला पाठच्या बाजूला गोरिला ग्लास नसेल तरी चालेल. मग इ५ प्लसच बरा. ७८०० ते ८००० रेंजमध्ये दिसतोय. अजून प्राईस ड्रॉप होईल काय? किंवा फ्लिपकार्ट अमेझॉनचे सेल्स असतील का? मला अगदी उद्याच नकोय पण प्राईस ट्रॅक करेन.

Pages