मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वतः ला अ‍ॅन्ड्रॉईड वन डिवायसेस उत्तम वाटतात. फटाफट सियुरिटी अपडेट्स मिळतात. एम आय युआय, सॅमसंग वन वगैरे सारखी काही वेगळी भानगड नस्ते. प्युअर गुगल.
अर्थात काही मिस पण होतं उदा. अ‍ॅपलॉक, बिल्टइन क्लिनर इ. पण हे सगळे अ‍ॅप्स स्टोर वरून घेता येतात.

सध्या आयफोन वापरते आहे, पण चार्जिंग ईश्यू आहे. Interim प्लिज दुसरा स्वस्त फोन सुचवा. एका माबो मैत्रिणीचा Infinix hot 7 pro पाहिला आणि आवडला. अँड्रॉइड फोनची सवय राहिली नाही, पण तरीही महिन्या भरासाठी वापरून पहावासा वाटतो आहे. तुमचा काय सल्ला?

फटाफट सियुरिटी अपडेट्स मिळतात.
त्याचा काही उपयोग होत नसावा.

बिल्टइन क्लिनर इ.
एका फोनमध्ये नाही, पण storage>>apps>> यादी येते त्यात वरचे दोनतीन apps एकेक उघडून clear cache करतो. ब्राउजर आणि फोटोज मध्ये अधिक एमबी जमा होतात. त्या काढतो.
----
दुसरा स्वस्त फोन सुचवा.
एकदम आइफोनवरून किती खाली येणार, बजेट 10-13, 15-18 हजार किती? क्याम्रा इंम्पॉर्टन्ट? साईज? कारण जुन्या फोनच्या साईजचा घेणे .

Infinix hot 7 pro काही खास नाही . प्रसेसर p22, os XOR5 आहे. Based on Android 9 असली तरी गुगल android 9 नाही. स्क्रीन फुल एचडी नाही.

मला स्वतः ला अ‍ॅन्ड्रॉईड वन डिवायसेस उत्तम वाटतात. फटाफट सियुरिटी अपडेट्स मिळतात. एम आय युआय, सॅमसंग वन वगैरे सारखी काही वेगळी भानगड नस्ते. प्युअर गुगल.
अर्थात काही मिस पण होतं उदा. अ‍ॅपलॉक, बिल्टइन क्लिनर इ. पण हे सगळे अ‍ॅप्स स्टोर वरून घेता येतात.

Submitted by योकु on 19 August, 2019 - 21:47

+१

Mi A3 launch झालाय. पण फुल HD डिस्प्ले नाहीये. राम पण फक्त ४ गब च आहे. त्यापेक्शा अ२ ६ग्ब बरा.

मी आयफोन वरून एमआय ए२ वर आलो. स्वस्तात मस्त आहे हा फोन. मी घेतला तेव्हा काही १३ चा होता आता १० हजारात मिळेल. ए३ मध्ये फार काय फरक नाहीय सो स्वस्तात मस्त पर्याय पाहाणार्‍यांकरता उत्तम फोन आहे.
काही लोकांना बॅटरी कमी वाटते पंण मला तरी तसं काही जाणवलं नाहीय. बर्‍यापैकी वापरून ऑलमोस्ट दिवसभर जाते बॅटरी. यात ८/९ तास ४जी वर आणि बाकी वेळ वायफाय सर्वकाळ कनेक्टेड असते. दोन सिम वापरत नाही मी.

सॅमसंग ए ७० घ्यावा असे सुचवेन. ब्याट्री चारहजार आणि प्रोसेसर स्नॅपड्रागन.

०दिलीप बिरुटे

मिडरेंजमधले फोन घ्यायचे असल्यास sAMOLED FHD स्क्रीनचे घ्या,कलर प्रोडक्शन खुप छान असते. विवो s1ला अमोलेड फुल एचडी डिस्प्ले आहे.बाकीचे फिचर्सपण छान आहेत. घ्यायला हरकत नाही.

Vivo Y17 पेक्षा S1 खुपच अप्रतिम आहे. मी सध्या तोच वापरतोय. स्क्रीन वरच फिंगर सेंसर आहे 6 जीबी पर्यंत रॅम वाढवता येतोय. बाकीचे डिटेल्स कंपेअर करुन बघु शकता.

Nokia ६.१ plus किंवा Nokia 7 कसा आहे...घ्यावा म्हणतोय>>

नोकिया ७.२ घ्या , १८-१९ हजारात आहे. build quality चांगली आहे. features आणि नियमित security अपडेट येत असतात नोकिया फोन करता .

एंड्रॉइड ८ वर्जन एकदम बकवास
नॉट (एंड्रॉइड ७) बरा होता कैशे क्लिअर करायला एकत्र जमायचे.
८मध्ये प्रत्येक ऍप उघडून कैशे क्लिअर करायला लागते... वेळ काढू काम Sad any solution?

@अज्ञानी ,रुट करुन वर्जन डाउनग्रेड करा. XDA वरुन Nougat ची zip file कॉमवर घेऊन अनझिप करा .नंतर मोबल्यात ती फाईल घेऊन फ्लॅश करा.

मला वडिलांना फोन घ्यायचा आहे बजेट 6-7हजार, वापर फोन करणे / घेणेआणि whats app
फोन कोणत्या co चा घ्यावा आणि मॉडेल सुद्धा सांगा

रेडमी पेक्शा १-२ हजार जास्त देऊन एम-आय ए२. अन काहीऑफर असेल तर ए३ नक्की पाहा. एमाअय युआय जरा बगी आहे. ए२/३ मध्य अ‍ॅन्डॉईड वन असल्यानी प्यअर स्टॉक अनुभव. त्यातही ए३ पेक्षा ए२ ची स्क्रीन जास्त चांगली आहे जुनं मॉडेल असूनही.

Samsung A20 ( released April २०१९) 11.5 k
Rom ३२ GB ( 18 fb free);13 blocked )
Ram 3 GB ( 680 MB available ????) काय हे??
Resolution HD + फक्त

विवो,रिअलमी,रेडमी,ओप्पो यापैकी कोणता मोबाईल बँटरी व कँमेराचे दृष्टीने घेणे योग्य ठरेल.

@सूर्यगंगा,
सर्वच मॉडेल्स बघता येत नाहीत किंवा बघायला मिळत नाहीत परंतू टिप्स -

क्याम्रा --
48 megapixel लिहितात परंतू त्यात गोची असते. प्रत्येकात वेगळी आहे. कुठे फोकसिंग स्लो, कुठे प्रत्येकवेळी सेटिंग्ज मध्ये ओप्शन निवडणे, कुठे लो लाईट इनडॉर बरोबर नाही तर कुठे सेविंग फोटोसाईज फारच कमी असते.
फोन टेबलवर ठेवल्यावर क्यामरा पुढे आलेला असल्याने काचेला घासतो का?

ब्याटरी - 4000 एमएच हवीच. किंवा अधिक.

धन्यवाद srd.मी सध्या असूस झेनफोन वापरत आहे,बँटरी उत्तम आहे परंतू फोटो बरेचदा पेंटीग केलेल्या फोटोसारखे निघतात विषेशत: रात्रीच्या प्रकाशात. रेडमी मोबाईल मधून फोटो छान निघतात परंतू बहूतेक बँटरी प्रॉब्लेम राहतो,असे ऐकले आहे. चांगला कँमेरा मोबाईल किती मेगापिक्सल बघून घ्यावा.

फोन/ हँडसेट बनवणाऱ्या कंपन्या जे ' क्याम्रा मोड्युल' वापरतात ते सोनी ३८६/४८६/५८६ आहे. त्यामुळे रिझल्टस बरेचदा सारखे येतात.
मेगापिक्सेलचा आकडा बघून गिऱ्हाईक फोन घेते म्हणून त्यात लबाडी वाढली आहे. असं नसतं तर गूगल पिक्सेलमध्ये ४८चा क्याम्रा टाकला असता. तो बारा मेपि च आहे.
फोटो क्वालटी सेन्सर साइज वाढवावी लागते ती वाढवत नाहीत.
((खरं तर मोबाईलमध्ये फोटो ४-५ एमबी साइजचा फोटो मिळणे छान. ८-९ एमबीचा अतीउत्तम. चेक करा .))

Pages