मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबा म्हणूनच चांगले फोन सांगितले, जे प्रोसेसर आणि बिल्ड वाईज दणकट आहेत.
टॅबविषयी जेन्यूनली माहिती नाही.

मी मागच्या आठवड्यात एमाआय ए२ घेतला. स्टॉक अँड्रॉईड (अँड्रॉईड वन). सुरेख आहे फोन. जरा मोठा आहे पण एमाआय चे म्हणून कुठलेच अ‍ॅप्स नाहीत; जे काय २/३ आहेत ते ही डिलीट्/अनइन्स्टाल केलेत. जरा मोठा वाटतोय फोन पण सध्या चालवतोय.
४/६४ स्नॅपड्रॅगन ६६० एआय, कॉन्एआय, १४ ला मिळालं. ड्रॉबॅक असे सध्यातरी काही नाहीत. युएसबी टाईप सी पोर्ट आहे पण हेडफोन जॅक नाही. मी तसंही ब्लूटूथ हेडफोन्स वापरतो सो काही अडचण आली नाही. बॉक्स मध्ये टाईप सी टू ३.५ एमएम हेडफोन जॅक कन्वर्टर मिळालं आहे. मेमरी कार्ड स्लॉट नाही.

मोटो वन पावर पाहा. एकदम तगडा फोन विथ अँन्ड्रॉईड वन. ५००० मीअँप बॅटरी विथ टर्बो चार्जर. जरा भद्दाडा वाटेल पण चांगला आहे. मी हेच दोन फोन्स (एमआय ए२ आणि मोटो वन पावर) कन्सिडर केले होते, स्टॉक अ‍ॅंड्रॉईड म्हणून.
अँन्ड्रॉईड वन, फोन्स ला २ का तीन वर्षे गुगल कडून लेटेस्ट ओएस + दर महिन्याला रिक्युरिटी अपडेट्स मिळण्याची ग्यारंटी आहे. यात कुठल्याच प्रकारच ब्लॉटवेअर किंवा त्या पर्टीक्युलर कंपनीचे स्वतः चे अ‍ॅप्स वगैरे नसतात. जसं गुगल नी अँन्ड्रॉईड बनवलंय तसं च्या तसं आपल्या वापराकरता अव्हेलेबल असतं. ( अर्थात सगळे पर्टीक्युलर कंपनीचे स्वतः चे अ‍ॅप्स अ‍ॅपस्टोअर वरून डालो करण्याची सोय असतेच)

धन्स योकु.
मोटो बद्दल अजून पण लिहा कोणी वापरत असल्यास. तोही चायनीज ब्रँड आहे पण जरा हाय एन्ड आहे.

मी मोटो जी 3, मोटो इ4 आणि मोटो जी4 असे वापरले आणि मी जबरा फॅन आहे मोटोचा
नो नॉनसेन्स फोन आहे स्टॉक andriod मुळे
खणखणीत चालतो आणि टिकतो
दोन आघाड्यांवर मात्र मार खातो
कॅमेरा क्वालिटी जी त्यांनी आता जी5 ला खूपच सुधारली आहे
आणि बॅटरी बॅकअप
सुरुवातीला बरा चालणार फोन वर्षा दीड वर्षाने साफ झोपतो आणि दिवसातून दोनदा चार्ज करावा लागतो.
त्यामुळे नाईलाजाने मी रेड मी नोट6 प्रो ला शरण गेलो
हाही फोन मस्त आहे
तगडी बॅटरी आणि टॉप नॉच स्क्रीन
फक्त ब्लॉतवेअर पोत्याने आहेत

जी5 एस प्लस वापरते आहे, मस्त आहे फोन
बॅटरी बॅकअप मध्ये मार खातो, फुल वापर असेल तर ८ तासत ड्रेन वीक्डेझ ला

पुढचा फॅक्टर - प्रोसेसर
प्रोसेसर इज द हार्ट ऑफ आणि फोन. तुमचा फोन कोणतं काम कसं करेल, किती कामे एकावेळी करेल, आणि मुख्य म्हणजे किती क्षमतेने करेन, हे प्रोसेसर ठरवतो. याचे प्रमुख प्रकार -
Duel Core
Quad Core
Hexa Core
OCta Core
Deca vote
म्हणजेच द्विभुज, चतुर्भुज, षष्ठभुज, अष्टभुज व दशभुज.
आता कुणीही म्हणेन, द्विभुज पेक्षा चतुर्भुज चांगला, आणि सो ऑन.
तर हे खरंय, आणि नाही सुद्धा!!!
कारण त्यांच्या भुजांच्या संख्येव्यतिरिक्त, त्यांचं भुजाबळ हा महत्वाचा फॅक्टर आहे, आणि ह्या दोन्हींचे कॉम्बिनेशन कुठल्याही दिवाईस ला पावरफुल बनवते. तर भुजाबळ म्हणजे क्लोकिंग स्पीड!
उदा.
ज मी Quad core चा फोन घेतला, आणि दुसरा Duel core चा असेन, तर पहिला फोन एकाचवेळी चार अँप चांगल्या रित्या रन करेन, दुसरा फक्त दोन.
पण समजा पहिल्याचा क्लोकिंग स्पीड असेल, 1.2 ghz आणि दुसरा duel core वाल्याचा क्लोकिंग स्पीड असेल, 2.0 ghz, तर दुसरा दोन्ही app चांगल्यारित्या चालवेल, पण पहिला त्या क्षमतेने काम करु शकणार नाही.
(पहिल्यात चार सामान्य माणसे काम करतायेत तर दुसऱ्यात दोन पैलवान!)
म्हणूनच octa कोर चे फोन दहा हजारातही मिळतात, आणि पन्नास हजारातही!
काही चांगले प्रोसेसर - शक्तीनुसार चढत्या क्रमाने:
मेडियाटेक - हेलिओ A22, P22, P23, P25, X10, P60, P70
अपकमिंग - P80, P90
स्नॅपड्रॅगन - 425, 430, 625, 626, 450, 636, 660, 835, 710, 845
अपकमिंग - 670, 675, 855
किरीन - 710, 970, 980
सम मोस्ट पावरफुल फोन्स बाय प्रोसेसर -
सॅमसंग GALAXY नोट 9, वनप्लस 6T, honor mate 20 pro, honor magic 2, नोकिया 8.1 प्लस, पोको F1, Asus zenfone 5z
अजून काही फॅक्टर पुढच्या प्रतिसादात!

माझ्याकडे साम्संग प्रो जे ७ . त्यात battery फंक्शन मध्ये जाउन त्यातले पावर सेविन्ग मोड मध्ये जाउन मॅक्स सिलेक्ट केले तर १०० % बॅटरी ४ दिवस चालते. त्यातले हवे ते फंक्शन वेक अप करता येते हव्या त्या वेळेस. विषेष्तः बॅटरी कमी होउन पाक पुक व्हायला लागले की अगदी १० -२० टक्के असलेली बॅटरी ८-९ तास बॅटरी लाइफ एक्सटेंड होते हा मोठा दिलासा आहे. व जीवात जीव येतो. खास करून प्रवासात धीराची बाब आहे. नेट हवे तेव्हा वापरता येते वॉइस कॉल चालू राहतात. एकदा तर मी ५ दिवस एका चार्जिंग मध्ये वापरून टेस्ट केला. आत्ताच १७% ब्याट्री सेविन्ग मध्ये १८ तास एक्स्टेन्ड झाली

आणि बॅटरी बॅकअप
सुरुवातीला बरा चालणार फोन वर्षा दीड वर्षाने साफ झोपतो आणि दिवसातून दोनदा चार्ज करावा लागतो>> मी मोटो जी3 गेले 3 वर्ष वापरत आहे, अपवादात्मक दिवशी दोनदा चार्ज करावा लागला. नेहेमी फोन 15℅ च्या खाली आला की परत चार्जिंगला लावायचा, या प्रकारे अजूनही दिवसभर फोन वापरून बॅटरी टिकलेली असते. फोन सतत चार्जिंगला लावू नये, बॅटरीचा परफॉर्मन्स गंडतो आणि लवकर बदलायची वेळ येते.

माझवापर अमाप आहे
हेवी गेम्स नसले तरी फावल्या वेळात चेस आणि ल्युडो खेळतो ऑनलाइन
कामासाठी आणि संपर्कात राहण्यासाठी व्हाट्सएप आणि फेसबुकवर असतो
म्हणजे इंटरनेट ऑन असतेच आणि मुबलक फोटो आणि व्हिडिओ काढण्याची आवड
आणि मायबोलीवर
यामुळे खपाखप बॅटरी ड्रेन होते

आशु, तू वर मी सांगितलेला मोटो वन पावर पाहा. 5000 मिली अँप अवर बॅटरी जबरदस्त आहे. टर्बोचार्ज असल्यानी चार्ज लवकर होईल.

अशुचाम्प मी तुम्हाला ASUS झेंफोन मॅक्स प्रो M2 सुचवेन!
एक स्नॅपद्रगन ६६०, ५००० mah ची बॅटरी, कोर्निंग गोरिला ग्लास ६, एकदम छोटी नोच, स्टोक अँड्रॉइड आणि स्लिम.
गेमिंग आणि व्युविंग साठी सर्वोत्तम!

जर १०,००० च्या खाली बजेट असेल, तर नोकिया ५.१ प्लस सर्वोत्तम!

योकु, iOS चा खंदा समर्थक android वर? कारण काय? सांगून ठेव, पुढच्या फोनबदलाच्या वेळेस उपयोगी पडेल.

आयफोनइतकी फोटो क्वालीटी android मध्ये घ्यायला गेलो तर खूप महाग पडते (वन प्ल्स ६ इ). २० हजारापर्यंत चांगला दुसरा कुठला android फोन आहे का क्वलिटि कॅमेरा असलेला (जास्त mp म्हणजे चांगला कॅमेरा हा भलामोठ्ठा गैरसमज आहे) ?

माधव MI A2 बघा, कॅमेरा क्वालिटी खतरनाक आहे.
रियलमी U1 ही चांगला आहे.

योकू आणि अज्ञातवासी
अहो मी घेतलाय आताच रेडमी नोट 6 प्रो
पहिल्याच दिवशी ऑफर मध्ये 13 हजार ला मिळला
64जीबी, 4 जीबी रॅम आणि 5000एमएच बॅटरी

धन्यवाद सर्वांचे!
मलाही मोटो खूप आवडतो. भारतात वापरण्यासाठी लेटेस्ट जी५ किंवा जी६ घेईन, इतरही मॉडेल बघेन.

माधव, अँड्रॉइड का घेतला त्याच एक महत्त्वाच कारण म्हणजे कॉस्ट, सध्याचे आयफोन कायच्या कायच महाग आहेत,
दुसर कारण म्हणजे बॅटरी बॅकअप. कुठलाच आयफोन दिवसभर बॅटरी बॅकअप देत नाही,
तिसर कारण म्हणजे नोटिफिकेशन्स हँडलिंग, समहाऊ आयओएस अँड्रॉइड एवढे सक्षम रित्या नोटिफिकेशन्स हँडल करत नाही.
चौथं कारण मराठी कीबोर्ड, गुगल इंडिक कीबोर्डवर जे मराठी टाईप होत त्याला तोड नाही, आयओएस मध्ये हिंदी लिप्यतरण आहे पण मराठी नाही.

काही गोष्टी अँड्रॉइड फ़ारच उत्तमरीत्या कफतो तर काही आयओएस मध्ये चांगल्या आहेत.
अँड्रॉइड वर जाहिराती आणि एकूणच ब्लॉट जास्त आहे
बाकी मला स्वतः ला फोटो इ बद्दल फार काय नाही सो सध्या चालतो आहे

स्पेसिफिकली एम आय ए2 का? तर मला नॉच डिस्प्ले फक्त आयफोनचा आवडला, बाकी कुणाचाही नाही (बाकी नॉच फोन्स मध्ये तळाला चिन आहे सो इट लुक्स लाईक डिस्प्ले has moved a bit upwards just to give that notch so overall it looks asymmetrical.
आणि दुसरं कारण म्हणजे अँड्रॉइड वन, सुपर स्टॉक अँड्रॉइड ज्यात 2 का तीन वर्षे लेटेस्ट अँड्रॉइड अपडेट ची गुगल खबरदारी घेणार (सध्या पाय मिळालं आहार यात व्हर्शन)
अँड्रॉइड वन मधला दुसरा फोन मोटो होता पण तो प्लास्टक बॉडी आणि जरा खालच्या फ्रॉसेसर वाला आणि बॅटरी मुळे जड म्हून नाय घेतला
नोकिया मध्ये सगळे अँड्रॉइड वन आहेत पण लेटेस्ट फोन्स मध्ये ते सगळ्याच दिवायसेस मध्ये नॉच देतायत सो मी ते बाद केलेत (फास्ट चार्जही देत नाहीत )

Happy

आयओएस मध्ये हिंदी लिप्यतरण आहे पण मराठी नाही~~~ आयओएस वि. अँड्रॉइड मधल्या बाकीच्या मुद्द्यां बद्दल सहमत. फक्त कि बोर्ड बाबतीत नाही. मी Language & Region मधे preferred language मधे मराठी प्रथम क्रमांकावर ठेवली आहे, तसेच keyboard मधे पण मराठी पर्याय निवडून ठेवला आहे, त्यामुळे मराठी टायपिंग व्यवस्थित येतं. अर्थात कीबोर्ड हा पूर्णपणे मराठी अक्षरं, काना , मात्रा, उकार, रफार वगैरें सकट दिसतो. इकडे माबो वर इंग्रजी किबोर्ड वापरुन मराठी अक्षरे उमटवायची जशी सवय झाली तशीच सवयीने फोनवर पूर्ण मराठी किबोर्ड वर टायपिंग करायला त्रास होत नाही हा स्वानुभव Happy

नोच नकोच.
युएसबी सी पोर्ट देऊन ओटीजीच्या नावाने शंख नको.
------

नोकिया ३.१ प्लसची किंमत दीड हजाराने उतरवली आहे. ( साडेअकरा > दहा हजार).

माझ्या सेलफोनवरून,मी कोणाला फोन केला किंवा दुसर्‍याने मला फोन केला तर समोरच्यालाच त्याच्या आवाजाचा ऐकू येतो.प्रथम वाटले की काही नेटवर्क प्रॉब्लेम असेल.नंतर एक कॉम्प.इंजिनीयर म्हणाली की तुमच्या फोनचा स्पीकर बिघडला असेल.बाकी कोणाच्या काही तक्रारी नसल्यामुळे तो विषय सोडून दिला.गेल्या १५ दिवसांत बरेचजणांची परत तीच तक्रार आहे. फोनच्या स्पीकरमुळे असेल का?रिपेयरला टाकण्यापूर्वी इथे विचारत आहे.
आगाऊ धन्यवाद!

चालू सिम दुसऱ्या मोबाईल मध्ये घालून चेक केले का ?
वरील स्पीकर संबधी प्रश्नाचे शास्त्रीय / तार्किक उत्तर नाही समजले तरी प्रैक्टिकली उत्तर नक्कीच मिळेल नं !

प्रैक्टिकली -
१) बिएसएनेल कार्ड?
२) हेडफोन वायरने कॅाल करून फरक होतो का?
३) सिमचा स्लॅाट बदलून पाहणे
४) कॅाल रेकॉर्ड फीचर असल्यास त्यात काही सेटिंग्ज पाहा.
५) दुसरेच कोणते सिम टाकणे
७) दुसऱ्या भागात/ गावात जाऊन कॅाल करणे
यातून कळेल फॅाल्ट कुठे आहे.
-
सिम कार्ड काढून पुसून ( टिवी स्क्रीन क्लीनर लिक्विड, मोबाइल स्क्रीन गार्ड लावण्याअगोदर वापरतात ते) पुन्हा टाका.

बिएसएनेल कार्ड?>>> व्होडाफोन
सिमचा स्लॅाट >>>> बदलून पाहिले.
दुसऱ्या भागात/ गावात जाऊन कॅाल >>> तेही झाले
टिवी स्क्रीन क्लीनर लिक्विड, >>> ते नाही वापरले.

महिन्या दीड महिन्यांपूर्वी मोबाईल आपोआप बंद झाला होता,त्यावेळी रिपेयर करताना बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितले.त्यानंतर थोड्या दिवसांनी वरील प्रॉब्लेम सुरु झाले.काल परत त्याच रिपेयरवाल्याकडे दिलेय.त्याने कॉल लावून पाहिले तर एको ऐकू येत नव्हता म्हणे.आज मिळेल्,तेव्हा काय ते कळेल.धन्यवाद!

Pages