बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल saila मेघाच्या तिच्यावरच्या प्रेमाची परत एकदा अनुभूती झाली असेल... या आधी मेघा ch fake elimination केल होतं तेव्हा तिला कळल होत की how much megha loves her... पण मग सगळी गणितं बदलली... पुष्कर मुळे आगीचा वणवा पेटला.. आता पुन्हा मेघा साई एकत्र येतील या भीतीनेच बिचारा पुष्कर सैरभैर झालाय.. त्याने इतके दिवस टाकलेले रॉकेल फुकट जाईल की काय अशी भिती वाटतेय त्याला... 2 दिवसापूर्वी पुष्कर fixed winner असल्याचे जे videos viral झाले तेव्हा थोडी भीती वाटली कारण bigg boss काहीही करू शकतात अगदी मनात येईल तस याचा इतिहास साक्षीदार आहे.. पण कालचा episode पाहून मेघा la कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी तिचं प्रत्येक पाउल ट्रॉफी कडेच पडतंय हे जाणवलं... शिवाय पुष्करने ५०,००० वेळा (सईच्या भाषेत ) fake, fake म्हटल्यावर finale मध्ये मेघा त्याला उचलून नक्की फेकून देईल Lol

त्या मेघाच्या फेक म्हणण्या बाबतीत.. तेव्हा स्मिता किती नाटकी आहे ते कळते..<<< आऊला हि तिने सारखं सॉरी म्हणुन त्रास दिला होता.. आऊ बरोबर बोलायच्या तिच्या बाबतीत.. पोच नाहि तिला म्हणुन.. मेघाच्या सगळे ठरवुन अंगावर आले तेव्हा तिकडे येण्याचे तिनेच आमंत्रण दिले होते पुष्कीला हो? तु असं बोलला? अस म्हणुन.. येडं बनुन खाल्ले कि पेढे.. तिच्याच वाक्यात.

पुष्करने ५०,००० वेळा (सईच्या भाषेत ) fake, fake म्हटल्यावर finale मध्ये मेघा त्याला उचलून नक्की फेकून देईल Lol >> बरोबर Lol

आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
टाकुन बोलत होता का ?>>कोणी ऐकलं का कि आस्ताद finalist६ झाल्यावर ग्रुप ह्ग नंतर बोलला कि हा बिग बॉस हैप्पी मोमेन्ट ..पाठवा आता काहीतरी ..that काहीतरी means असेल कदाचित......ड्रिंक ..

आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
टाकुन बोलत होता का ? >>> स्मिताला सॉरी म्हणायला आला तेव्हा मला पिऊन आलाय की काय, असं वाटलं. नंतर जाताना अडखळत होता.
>>>>.> दोघींना +१

काल ज्याप्रकारे मेघा ने पु ला गप्प केलं ..... यांना हसायच आहे बोलुन... मजा आली..
पुष्की आता जे वागतोय तेच जर पहिल्या पासुन मेघा विरुध्द वागला असता तर खचितच तो इथपर्यंत पोहोचला असता.
कारण एक मेघा विरूध्द धड त्याला बोलता येत नाही (ती फेक आहे अन् खोटी आहे या व्यतिरिक्त)
आणि मेघा सर्वांनाच नडली तसं पुष्की ला जमतच नाही फाफे होते त्याची.

मेघाचं गिल्ट आणि तिने आस्तादला मत देणं...हा प्रकार मेघानी समजून उमजून केला का ? तसं असेल तर good move. त्यामुळे पु आणि स कशी गरळ ओकताहेत हे दिसलं सगळ्यांना
फिनालेला तुम्ही तुमच्याबरोबर कोणाला बघता यात शर्मिष्ठा चं नाव मेघानी घेणं अगदी साहजिक आहे. कारण तिने मेघाला साथ दिली आहेच
आम्ही सांगून करतो तू न सांगता केलंस हा युक्तिवाद बिनबुडाचा आहे. यात कांगावखोर सई अजूनच उघडी पडली.
पुष्कर आता अगदीच केविलवाणा वाटतोय.तेच तेच आरोप किती टिकाव धरणार. आस्तादला सच्चा मित्र म्हणून धरायला जातोय कारण मेघाची मानहानी करण्यात तो साथ देतोय.
सगळ्या गुणदोषांसकट मेघाला पर्याय नाही
माझे बहुमूल्य मत धाडे बाईंना !!!

आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
टाकुन बोलत होता का ? >>>> आपण कसं काय फायनल ला पोहचलो याचा शाँक लागला असेल.

<शरा एक स्पर्धक म्हणून नाही पण एक माणूस म्हणून खुपखुप आवडलेली आहे!
तिला पक्के माहित होते की मेघा आणि सई-पुष्कीमध्ये जितके वितुष्ट येईल तितके तिचे स्वतःचे महत्त्व वाढणार आहे.... तिला हेही माहित होते की मेघासाठी सई नेहमीच प्रायोरिटी राहिली आहे
पण ती कधीही या संधीचा फायदा घेताना दिसली नाही..... रादर शक्य होईल तिथे तिने या ट्रायोमध्ये समेट घडवून आणायचाच प्रयत्न केला!
दुर्मिळ असतात अशी माणसे...... शो नाही पण मन नक्कीच जिंकून जातात असे लोक!>
अगदी खरंय स्वरूप. खूप चांगली आहे ती मनाने. शिवाय तिला अंडरकरंट्स खुप छान कळतात अनेकदा गोष्टींंमधले. ती मेघाला जसा सपोर्ट करतेय त्याला म्हणतात मैत्री निभावणे. नाही तर सैने नुसताच गैरफायदा घेतला मेघाचा आणी सोडून दिलं. आस्ताद नेहमीच स्मिता, मेघा आणी शरा यांच्यावर कॉमेंट करत असतो. आता त्याला पु-सै अ‍ॅड झालेत.
बादवे, काल पत्रकार परिषदेत मेघाने ज्या तडफेनं उत्तरं दिलीयेत ते बघून मजा आली. अशीच रहा दोन दिवस म्हणावं.
आणखी एक, व्हूटवर स्मिताज मदर्ली अ‍ॅडव्हाईस असा एक व्हिडिओ आहे तो नक्की बघा, स्मिता किती क्लॅरिटीने आणि किती सुंदरपणे पुष्कीला आईबरोबरच्या सहवासाचे महत्व समजावून सांगतेय ते कळेल.

हो, खुप विचाराअंती कालचे आणि आजचे मत अनुक्रमे स्मिता व मेघा यांना दिले. मेघा जिंकावी आणि स्मिता दुसर्‍या अनंबरवर असावी असा अंदाज सध्या तरी वाटतो.

काल पुष्कर एवढा घामाघूम झाला होता, आस्तादकडून त्याच jacket मागवून घ्याव लागल, इतका तो थरथरत होता. Lol

सई जमिनीवर आली वाटत पत्रकार परिषदेनन्तर, नो हगाहगी विथ पुष्की..

बादवे काल रात्री मेघा काय म्हणत होती स पु ला की कसले कसले नमूने आले होते. हे पत्रकारान्ना उद्देशून होत का? Uhoh का मी चुकीच ऐकल असेल?

जे मेघाहेटर्स रे रा आणि पु स च्या फेक रोमान्सचे समर्थन करत होते ते अचानक big boss कडून सामाजिक सन्देशाची, आदर्शान्ची अपेक्षा करतायत. LOL

ईथली चर्चा वाचुन वाटले की परत एकदा पहावे. आवडेलही कदाचीत.
रात्री झोपताना डोक्याला बाम लावता लावता बायको म्हणत होती “पहाशील परत बिगबॉस, पहाशील?

बाकी तुमचे चालुद्या. असा धागा, अश्या चर्चा होणार असतील येथे तर २०० दिवसांचा बिगबॉस देखील सहन करेन. Happy

मी पण काल स्मिता, आज मेघाला मत दिलं. मलापण मेघा पहिली आणि स्मिता दुसरी यावी असं वाटतं, पुंबा. अंदाज नाही पण इच्छा आहे, मेघा पहिली येणार हे नक्की वाटतंय.

मी तो स्मिता व्हीडीओ बघितला, छान सांगितलं स्मिताने पुष्करला. तो एक क्रूझवर स्मिताने काय काय केलं job करत होती, तोही व्हिडीओ मस्त आहे, चांगलं मराठी बोलतेय तिथे.

पुष्कर आता सईला इमोशनल ब्लॅकमेल करणार. सईला अचानक मेघाशी बोलावसं वाट्टंय?? Uhoh
Insecure morons. Angry

मेघाचं गिल्ट आणि तिने आस्तादला मत देणं...हा प्रकार मेघानी समजून उमजून केला का ? तसं असेल तर good move.>>>> त्यावेळी मला ती बारामतीकरांची शिष्या वाटली.म्हंजे स्वपक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही आपणच चालवायचं आणि स्वकिय विरोधकांना पण धडा शिकवायचा. Wink

Submitted by manil
>>>>>>>>>>>>

हा हा... मस्तच Lol

कालचा एपिसोड पाहुन पुन्हा एकदा मेघाच निर्विवाद विनर आहे, हे सिद्ध झाले. Happy
>>>पुष्करने ५०,००० वेळा (सईच्या भाषेत ) fake, fake म्हटल्यावर finale मध्ये मेघा त्याला उचलून नक्की फेकून देईल >>>> Lol

बोर आहे आजचा एपिसोड. Uhoh
सगळ्यांचा प्रवास काय पहायचा? आता डायरेक्ट फिनाले पहावं झालं.

अगदी अगदी दक्षिणा. सोमवारपासून चढत्या भाजणीने पकाऊ एपिसोड्स चालू आहेत.

वोटिंग लाइन बंद होण्याच्या आधी स पु किती चांगले आहेत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न... !

किती ते फुटेज स पु ला!

मी स पु चं आणि श रा चं पण mute करून ठेवलं. स पु चं मनापासून बघायचं नव्हतं. श रा च्या वेळेला पण काम करत होते काहीतरी, ते सोडून बघावसे वाटलं नाही. स्मिता येणार कळल्यावर अर्थात आवर्जुन mute काढून tv जवळ बसून बघितलं. आज मेघाचे बघण्यात interest आहे फक्त.

मला स पु कौतुकसोहळा बघायचाच नव्हता.

काल दाखवलेले voting मध्ये कमी आहेत की काय आणि मेघा नंतर आ आहे की काय म्हणून त्यांचं नंतर दाखवणार.

Pages