बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघाला लिहीलेलं पत्र वाचून झाल्यावर पुष्करनं जे भाषण केलं त्यात एकदाही दोघींपैकी एकीच्याही डोळ्याला डोळा दिला नाही. हा पुष्कर शो नंतर सईकडे ढुंकूनही बघणार नाहीये. त्याची बायकोही त्याला असं करू देणार नाही. सईचा राॅयल हार्टब्रेक होणार आहे.

सईही अ‍ॅरोगंट असली तरी मला आवडायची पण तिच्या आंधळ्या पुष्की प्रेमामुळे डोक्यात जायला लागली >> +११
ओमप्रकाश की कोण होता त्याचा अ‍ॅटिट्युड आवडला. Happy चांगली तंतरली होती स्टाफ ची. पुष्कीला झापल्याने मला फार हसू आले. बाकी एकूण हॉटेल टास्क महा बोअर होता. स्मिता कस्टमर सर्व्हिस मधे सगळ्यात प्रोफेशनल वाटत होती , बाकीचे उगीच थॅन्क्यू सॉरी म्हणत मागे मागे करत होते.

काहीतरी अतरंगी टास्क देऊन आधीच फार जास्त नसलेल्या बक्षिसाच्या रकमेतून अर्धी रक्कम कापून उरलेली बक्षिस देणे ही बिबाॅची चिंधीचोरगिरी आहे.

मै, स्मिताला सवय आहे, क्रुझवर होती ती US based, हॉटेल management केलंय तिने. अनसीन अनकट व्हिडीओ बघितला voot वर, त्यात मराठी पण चांगलं बोलत होती, तिचं काम आवडलं म्हणून तिला लवकर प्रमोशन पण मिळालं होतं.

मामी रोज बरीच अमाऊंट खर्च होते bb ची म्हणून प्राईझ एवढंच असेल. कोणाला 40 हजार, कोणाला 60 हजार रोज द्यावे लागतात, आऊ ला तर लाखभर मिळत होते म्हणे.

रेशम मेघाशी वाद घालत असताना मेघा तिला सांगायला बघत होती की सगळे सदस्य एकत्र नाॅमिनेट होणे हे कसं कमी रिस्क होतं. पण जर तीन जण सेफ होऊन केवळ तीन जण नाॅमिनेट होणार असतील तर उतरलेलंच बरं. >>> अगदी, अगदी. एकदम लॉजिकल पॉईंट होता तो.
आधी तिला आणि शरालाही किती बोलले जास्त रकमेची बोली लावली म्हणून. तिथेही बारगेन होईलच नंतर हा तिचा विचार लॉजिकल होता. ती नेहेमीच हिरिरीने स्वतःला पहिल्या क्रमांकासाठी ढकलते कारण जिंकायचंच हा विचार ठेवून आलेली आहे पण बहुमत मान्य करते आणि बरेचदा इतरांपेक्षा कितीतरी खिलाडूपणे. तिचं फेक एलिमिनेशन झालं तेव्हा तर ही खिलाडू वृत्ती खूपच उठून दिसली होती.

रेशम आणि आस्ताद गाडीतून न उतरण्याबाबत इतके ठाम कसे काय होते बुवा ? शेवटच्या आठवड्यात अशी बेपर्वाई नॉमिनेशन टास्क बद्दल ( रेशम तर दर वेळीच शस्त्र टाकून देण्यात पहिली असते ) दाखवत असतील तर त्याच्या शक्यता दोनच असू शकतात.
१. त्यांना इंटरेस्टच नाहीये खेळण्यात. नॉमिनेट होऊन मग बाहेर गेले तरी त्यांना चालणार आहे. अशा स्पर्धकांना कुणी मत का द्यावं मग ?

२. चॅनलकडून त्यांची पक्की खात्री करुन दिलेली आहे की ते दोघं फिनालेला असणार ( आणि जिंकणार सुद्धा ) कारण रेशम नॉमिनेट होण्यापेक्षा विजेत्याची रक्कम कमी होईल हाच मुद्दा उगाळत होती सतत.

मेघा सर्वगुणसंपन्न नाही हे इथे अनेकांनी लिहून झालेलंच आहे. पण सिन्सियरली प्रत्येक वेळी जिंकण्याची ईर्षा ठेवून खेळणे, खेळाबाबत फोकस्ड असणे, संधी मिळेल तेव्हा ठामपणे मुद्दे मांडणे आणि समोरच्याचे मुद्दे खोडून काढणे( त्या पिंजर्‍यात बसून प्रभावी स्पष्टीकरण देणं दुसर्‍या कुणालाच तिच्याइतकं चांगलं जमलेलं नाही ), विरुद्ध टीममध्ये स्वतःच्या मित्रांबाबत कधीही न बोलणे, गोष्टी चिवटपणे लावून धरणे पण आपलं चालत नाहीये हे लक्षात आल्यावर ते खिलाडूपणा दाखवून मान्य करणे, बडबडेपणावरुन आणि इतर काही गोष्टींवरुन तिच्या मित्रमंडळींसकट सतत उघड चेष्टा होत असताना ९० टक्के वेळा त्याकडे दुर्लक्ष करणे वा हसून घेणे, उगीच उठसूठ रुसवेफुगवे वा इगो इश्शूज न करणे ह्यामुळे खरोखरच जिंकण्यासाठी दुसरा योग्य उमेदवार नाही घरात. ह्यातले जवळजवळ सगळेच गुण स्मितामध्येही आहेत फक्त मैत्रेयीने म्हटल्याप्रमाणे लीडरशिप क्वालिटी आणि ठाम मुद्दे मांडणे मिसिंग आहे तिच्यात. श रा उत्तम खेळत होती आणि व्यवस्थित दखल घेतली जात होती तिची पण तिच्या बहिणीने येऊन तिला कन्फ्यूज केलं आणि नंतर बि बॉ ने तो मुद्दा उचलूनच धरला ( हा डाव मुळात बि बॉ नेच टाकला असेल आणि श रा ची बहीण त्यात फसली असं मला वाटलं खरं तर. तिला चुकीचे लीड्स दिले टीमने जे ती आंधळेपणाने येऊन श रा शी डेस्परेटली बोलली. )

रच्याकने, खालच्या लिंक प्रमाणे पुष्कर ने लावणी सादर केली होती, क्लिप पण दिसतीये.. हे सगळं दाखवलंच नाही. की ते फक्त वूट वरच !! Uhoh
https://www.loksatta.com/manoranjan-news/bigg-boss-marathi-pushkar-jog-w...

फिनाले तिकीट काय भानगड आहे, आज आहे का ते. काही कमेंट्स वाचल्या fb वर, रेशमला डायरेक्ट फिनालेला पाठवणार, अशी काही योजना आहे.

स्मिताला पाठवा की फिनालेला Lol

राज आणि योग तुमच्या पोस्टस आवडल्या.
मै, स्मिताबद्दल काही अंशी सहमत. पण तरी मला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच. Happy

आता खरंतर सुपर कंटाळवाणे झालेय बिबॉ आणि फक्त पुढे काय न कसे होणार म्हणून बघितले जातेय असे झालेय का कुणाचे?

आधीच्या पानावर कुणीतरी एक नवीन टास्क मांडला होता. आयडी बघितला नाही पण सिरीयसली बिबॉने तुम्हाला क्रिएटिव्ह टीममधे घ्यायला हवे.

आता खरंतर सुपर कंटाळवाणे झालेय बिबॉ आणि फक्त पुढे काय न कसे होणार म्हणून बघितले जातेय असे झालेय का कुणाचे?>>>> माझं झालंय. खरंतर केव्हापासूनच झालंय. बिग बॉस ऐवजी काय बघावे त्या वेळेत ते सापडत नव्हतं म्हणून कंटाळा आला तरी बघत होतो. पण आता ऑप्शन सापड्लाय, दोन दिवसांचं आता बघितलंच नाही.

माझ्याकडे टिव्ही नाहीये. मी व्हूटवर बघत असते. तरी पुढे काय पायी बघत राहते.
जौद्या आपलीच चिपथ्रील्स आपणंच काय बोलायचं! Proud

हॉटेल टास्क अगदीच फसला, ओमप्रकाशने बरोब्बर फीडबॅक दिला.
नेक्स्ट सिझनला आणा त्याला हाउसमेट म्हणून Happy
आजकी ताजा खबर, मेघाsss तू खोटारडी आहेस ओरडणार्या पुष्किलाही खोटारडा टायटल मिळालं Biggrin
बिबॉ हाउसमेट्सना बाकी प्रो होटेल स्टाफ सारखे वागणे नाही जमले, स्मिता सोडून !
मेघा शरा किचन नीट सांभाळत होत्या पण त्याच शेफ आणि त्याच वेटर का ?
पाहुण्यांनी एक काम दिलं कि सगळे जमा होत होते गर्दी करून !
खरं तर पाहुण्यांकडे लक्षच कुठे होतं कोणाचं, मेघा किचनमधे काय करतेय यात सगळं लक्षं Wink
अस्ताद उनाडक्या करणारा कामचुकार नोकर, पुष्कि पुढे पुढे करणारा थापाडा लो बजेट ट्रॅव्हल एजंट, सई मॅनेजरचे कपडे घालून फिरणारी बिनपगारी खादाड बाई आणि रेशम अर्थातच ठप्प पुतळा जो काहीही करत नाही कधीच.
एक वेळ अशी आली कि सगळे किचनमधे गप्पा ठोकतायेत आणि गेस्ट बाहेर !
ओमने मस्तं टोमणा मारला स्नॅक ब्रेकवर आहेत का सगळे Proud
आस्तादबाबू गातो चांगला पण गझल मधले उच्चार त्याच्याच भाषेत अगदीच धन्यवाद !
मेघा काही सिंगर नाही, तरी तिला गायला लागले त्यामानाने चांगलीच गायली कि , हसत काय होती ती राधा !
सगळ्यात हसु आलं पुष्कि थापा मारून गेला कि २-३ मिमिक्री अर्टीस्ट आहेत घरात , तो विसरूनच गेला भूषण गेल्याचे, मग कोणाला पकडून आणाव चर्चा सुरु !
मला मुन्नाभाई मधला , ए सर्किट आपुनको बॉडी चाहिए सीन आठवला !
सई म्हणे मला नाही येत पुष्किलाच येते, पाहुणा म्हणे हाच रिसेप्शनिस्ट, हाच मसाज थेरपिस्ट आणि हाच मिमिम्री करणार का Rofl
अशा रितीने शर्मिष्ठाला पकडून आणले,तिनी मिमिक्री कोणाची केली तर खात्याची, जो कोण आहे हेच पाहुण्यांना माहित नसेल !

स्मिता तूच जिंकायला हवी. तू एक उत्तम माणूस आहे. निर्णय घेण्याची क्षमता नाही, लीडरशिप क्वालिटी नाही म्हणतात लोक्स, असू दे तुला काही देश चालवायचा नाही, बिग बॉस जिंकायच आहे फक्त.
शून्य टॅलेंट असलेल्या लोकांना एवढा सपोर्ट करतात लोकं मग तुला का नाही ?
आस्ताद तु काही खूप चुकत नाहीस.. तू टॅलेंटेड आहे त्यामुळे ज्यांच्या कडे ते नाही त्या लोकांना पोटात दुखतच..
फक्त विनम्र हो प्रगतीच करशील
हो आणि तुज्यासोबत नॉमिनेशनला जिगरवाले लोक घाबरतात हे बैलगाडीच्या टास्क वरून कळलं Happy

>>@स्वरूप - तुमच्या posts फार आवडतात मला...
धन्यवाद मोक्षू

>>स्वरुप, मस्त पोस्ट.
धन्यवाद मामी!

>>स्मिता च्या फॅन्स ची क्षमा मागून
मैत्रेयी +१

>>पुष्कर अजिबात नको. एक नंबरचा संधीसाधू, बोलात बोल नसलेला कंटेस्टंट
येस्स अगो.... तो नाहीच्च आवडत काही केल्या सध्या!

>>मुगलांना जसे पाण्यात संताजीधनाजी दिसायचे तशी त्यांना मेघा दिसते.
बुल्स आय मामी!

>>मेघा सर्वगुणसंपन्न नाही हे इथे अनेकांनी लिहून झालेलंच आहे..... उगीच उठसूठ रुसवेफुगवे वा इगो इश्शूज न करणे 
करेक्ट अगो!..... पण डोळ्यावर पट्टी बांधलेल्या लोकांना कसे दिसावे ते!..... तेंव्हा असोच!

>>श रा उत्तम खेळत होती आणि व्यवस्थित दखल घेतली जात होती तिची
हो अगो.... पण भरपूर ट्रॅप लावले तरी अजुन ती त्यात पूर्णत फसलेली नाही.... नवीन आलेल्या लोकांना जो एक disadvantage असतो की कोअर ग्रूप आधीच बनलेला असतो आणि त्यात शिरणे जवळजवळ अशक्य असते..... तिने ते accept केलेले दिसतेय........ तिचा चांगुलपणा आवडतो मला!

आता खरंतर सुपर कंटाळवाणे झालेय बिबॉ आणि फक्त पुढे काय न कसे होणार म्हणून बघितले जातेय असे झालेय का कुणाचे? >>>> माझे झालेय

गेले दोन दिवस नाही बघितले, बरेच झाले. मुद्दाम माझा तास- दिड तास वाया घालवायची ईच्छा नाहीये. सो वूट वर बघणे बंद केले. घरी असताना घरी लावले असेल तर बघेन नाहीतर जावु दे

हा पण जोवर स्मिता आहे तोवर तिला वोट नक्कीच करेन.

तो ओमप्रकाश त्याच्या मालिकांमध्ये अगदीच तोंड उघडत नाही, त्याची कसर काल भरून काढली त्याने, मस्त कुचकटपणा करत होता, त्याच्यामुळेच जरा मजा आली टास्कमध्ये.
आस्ताद नालायक काल टास्क चालू असतानादेखील मेघा आणि स्मिताला टोमणे मारत होता. खत्रुड आहे. नम्रपणाचा तर लवलेश नाही त्याच्यात, सर्व्हिस इन्डस्ट्रीत एकही दिवस टिकू शकणार नाही. पुष्कीला पाहुणे तोंडावर बोलले ते एक बरं झालं. मेघा-शराने राधा-प्रेमकरता केलेला चहा/पोहे त्यांना आवडले नाहीत तर चक्क हास्याची उकळी फुटली त्याला... अरे तुझ्या टीममेट्स आहेत त्या... त्यांचं काही आवडलं नाही तर तुला बरं वाटतं ह्यातूनच तुझी मेंटॅलिटी दिसते! रेशम तर किती कॅज्युअल असावी! आस्ताद किंवा रेशम किंवा डबल एलिमिनेशन होऊन दोघेही बाहेर पडले एकदमच तर काय धमाल येईल!

आस्ताद चा कुचकटपण स्क्रीप्टेड असला तर ठीक... . तसं नसेल तर माणुस म्हणून खुपच वाईट वागतोय तो..
किती ते मेघा ला टोमणे...
तिला सांग स्टार्स चोरु नकोस...
तिला सांग जेवण तिखट बनवु नकोस...
तिने ट्रे टेबल वरच का ठेवला...
तिने गाणं म्हणायच्या वेळेस पण एफ एम रेडिओ वरुन काहितरी उच्च मराठीत बेकार टोमणे...
...अरे बास..तु स्वतः च बघ ना...तिला का टार्गेट..ति निदान किचन मद्धे काही काम तर करत होती...तु काय केलस पूर्ण वेळ ?
आणि रे ने तर काहीही केलं नाही काल...
मेघा कित्ती हायपर होतेय म्हणुन बाहेर येउन बडबड..आणि ही निवांत..स्वत: आळशी आहे..तिला करुदेत ना काय करायच ते..तुला काय त्रास होतोय...
मेघा ला सॉटे वेजीज येतात का याची रे ला काळजी...ईतकं होतं तर जायचं होतं किचन टीम मद्धे...
आणि काल शमा ला पण सांगत होती की कशी मी चांगली म्हणुन बैलगाडीतुन नाही उतरले...तुला न स्मिता ला सेफ करायचं होतं वगैरे वगैरे...
मेघा ला पण सुनवत होती की एक्सपेक्ट द अनएक्स्पेक्टेड म्हणुन...तिला पक्की खात्री दिसते फिनाले ची..
आ आणि रे ना खरच कित्ती कित्ती माज आहे यार सिनिअर असल्याचा...
काल पुष्की च्या खोटे बोलण्यामुळे स्टार्स गेले तरी आ आणि रे शांत....हेच जर मेघा ने केले असते तर लोकांनी तिला फाडुन खाल्लं असतं ...

बाकी आता बिबॉ बोअर झालाय खरच....उगीच शेवट काय होतोय बघायचाय म्हणून पाहिलं जातय..
आ आणी रे चा कुचकट्पणा डोक्यात जातोय...

रविवार कधी येणार?? आणि कधी तो एकदाचा निकाल लागणार??
आस्तादला Goodbye म्हणायला खूप आवडेल. तो बहुतेक एकमेव दिवस असेल जेव्हा सगळे सदस्य त्याला आनंदाने आणि मनापासून hug करतील.

हसत काय होती ती राधा !>> शरा च पपि लाफ्टर चालु झाल मधेच!
अस्ताद मेघाला किती टोमणे मारत होता, हा कधी जेलस होत नाही मेघावर?
त्या राधाने बेड निट करायला सान्गितले तर सईच करत बसली , हेल्लो! तु मॅनेजर आहेस ना? हाउसकिपर रेशम होती ना?

आस्ताद असा किती सिनियर आहे?रे ईतका तर नक्कीच नाही. सगळे का त्याला सिनियर actor म्हणतायत?
तो स्वतः ही मराठी इंडस्ट्री कोळुन प्यायलासारखा गुर्मित असतो.

आस्ताद असा किती सिनियर आहे?रे ईतका तर नक्कीच नाही. सगळे का त्याला सिनियर actor म्हणतायत?
तो स्वतः ही मराठी इंडस्ट्री कोळुन प्यायलासारखा गुर्मित असतो. >>
तिथे असलेल्या बाकी लोकांपेक्षा सिनिअर आहे ना...
आणि गुर्मी त्याला स्वतः च्या उच्च भाषेची, अतिउच्च अभिरुची ची ई ई ई ची आहे बहुतेक...

Pages