बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता च्या फॅन्स ची क्षमा मागून - तिच्याकडे टास्क मधे लागणारा फिजिकल फिटनेस आणि 'वर्कर कॅटेगरी' सिन्सिअरिटी आहे पण लीडरशिप क्वालिटीज, स्वतः निर्णय घेऊन स्ट्रॅटेजी करून लढण्याची कुवत हे नाही. इतरांसारखी हलकट वाटत नाही हे खरे पण कितीही बेनेफिट ऑफ डाउट दिला तरी तिचे पॉलिटिक्स न करणे यात चांगुलपणापेक्षा ती तेवढी हुषार अन त्यासाठी केपेबल नाही असेच वाटते. अ‍ॅज अ रिजल्ट व्हिलन गँग इतकं तिला हेट करावेसे वाटले नाही कधी पण विनर म्हणून तिला सपोर्ट करावा असेही नाही वाटले मला.

मै +१
स्मिता नो हेट्रेड कॅटॅगरी, कुशल /उपयुक्त कामगार आहे, पण बॉस होण्यासाठी लागणारा एकही गुण नाही.
असा बॉस असेल तर एंप्लॉयीज राज्य करतील रिमोट कंट्रोल स्वतःच्या हतात ठेऊन Happy

मैत्रेयी + 1.

माझा क्रम : 1. मेघा, 2. स्मिता, 3. शरा

4. सै आली तर आली कारण तीही चांगली खेळली पण तिच्यात मॅच्युरिटी कमी आहे. आणि आताआताचं तिचं वागणं आवडलं नव्हतं. पण पूर्ण सिझन बघता तिला चौथ्या नंबरवर टाकत आहे.

शरा नक्की जाणार या वीक मध्ये. बाकी सगळे जबरी स्पर्धक आहेत त्यामुळे शेवटचा आठवडा ट्फ असणार.
माझ्याकडे टाटा स्काय झोपलं आहे त्यामुळे मला आजचा एपिसोड उद्या हापिसात पहावा लागणार Proud

कालचा एपिसोड मी आज पाहिला, मेघा सरकल्यासारखी का वागते देव जाणे. ११ लाख स्वतःची किंमत ?
स्मिता नॉमिनेट झाल्याने थोडी अपसेट वाटली पण तिला लोक नक्की वाचवतील.

शरा नक्की जाणार या वीक मध्ये>> कशी? ती तर नॉमिनेटेड नाहीये. ऑल्रेडी गेली ना फायनल ला काल.
(अनलेस काहीतरी खुसपट काढले तरच. ) बायदवे फिनाले ला असणार म्हणून मेघाने पुष्की आणि सई बरोबर सेलिब्रेशन केले पण शरा बरोबर काही केलेले दाखवले नाही. आजारी असली म्हणून काय झालं! Happy

मैत्रेयी ... अगदी योग्य शब्दा मध्ये मांडलस..
किती तरी वेळा तिच्यावर अन्याय झाल्यावर तिने त्या विरूध्द आवाज उठवुन ठामपणे प्रतीकार नाही केला वा ठाम नाही राहिली.. थोडासा प्रतीकार करते पण अचानक बोटचेपे पणा दिसलाय...
तिच्या बद्दल सहानभुती म्हणुन नक्कीच आहे..पण विजेता म्हणुन तिला मत नक्कीच नाही.

आजच्या टास्क मध्ये सई आणि पुष्कर ने नेहमीप्रमाणे माती खाल्ली आहे त्यांच्यामुळे 2 स्टार म्हणजेच विजयी रक्कम 4 लाखनी कमी झाली . आजच्या टास्कमध्ये रेशम आजींचे सहभाग नेहमीप्रमाणे बिग झिरो पण या लाडक्या बाईनाच finale तिकीट मिळणार

पण बहुदा सई ची सेटींग झालेली आहे आधीच. >>> नक्कीच म्हणून तर चौगुले पण जाता जाता कॅप्टन करून गेला तिला, आधी नावं ठेऊन.

एका आयडीने कितीही votes दिली तरी पहीले दिलेलं ग्राह्य धरणार फक्त.

मै आणि डीजे तुमचे बरेचसे मुद्दे पटले. मी ही आधी लिहिलं आहे की जिंकण्यासाठी योग्य मेघा आहे. मला मेघा, स्मिता दोघी आवडतात. स्मिताच्यातलं काय खटकतं हेही लिहिलं मी बरेचदा. पुष्करपण खूप आवडायचा पण हल्ली नाही आवडत.

पण स्मिता फायनलला जायला हवी कारण आ रे पेक्षा नक्कीच योग्य आहे ती.

हो ग वाटते. आता तर आ रे फेमस आहेत ना तिच्यापेक्षा. मला आवडत नसले म्हणून काय झालं पण fans आहेत त्यांना खूप.
>>>
स्मिताचे फॅन्स खुप आहेत्च, मेघा - सई- पुष्कर आणि शराचे फॅन्स पण स्मितालाच वोट करणार

चॅमलच अबाकी काही फंडा असु देत, एवढे वोट्स स्मिताला मिळतायेत म्हणजे ते तिला ठेवणारच त्यात त्यांचा फायदा आहे.

अस्ताद जाईल आता यावेळेला, स्मिताचं फॅन सर्कल मोठं आहे आणि त्यामुळे ती फायनल ला हवीच आहे चॅनलला (असं मला वाटतं)

आस्ताद गेला तर जाताना काहीतरी भंपक आणि खोटे भाषण करून निघणार - प्रवास खडतर होता पण कसा मी जिंकण्यासाठी काहीही प्रयत्न न करता इतका राहिलो याचा आनंद आहे. ट्रॉफी नकोच होती नाहीतरी. पण जिवाभावाची रेशम तै मिळाली. वगैरे. Lol

मै.. तो जाताना खात्रीने भाषणात म्हणणार की मी इथल्या "काही" लोकांप्रमाणे अमुक केले नाही, ढमूक केले नाही, खोटे बोललो वागलो नाही, आपल्या टीमला दगा दिला नाही, कोणाला असह्य होईल इतकी बडबड केली नाही, अहोरात्र स्ट्रॅटेजी आणि गेम प्लॅनिंग न करता एक माणूस म्हणून जगायचा प्रयत्न केला, जसा आहे तसाच दिसेल असा प्रयत्न केला इत्यादी इत्यादी... आणि इंडायरेक्टली सगळा रोख आणि टोमणे मेघासाठी असतील. जळी स्थळी काष्ठी पाषाणी मेघा दिसते त्याला. सो वर कोणीतरी तो म्हटल्याप्रमाणे तिचे शक्य तितके डॅमेज करून जाणार.

तो म्हटल्याप्रमाणे तिचे शक्य तितके डॅमेज करून जाणार

>>>>हॅ! तो काय डॅमेज करतोय. चिरकूट माणूस आहे तो. स्वतःच स्वतःला शहाणा समजतो येडा.

शक्यता कमी आहे रेशम जायची पण दगड का विट कंपेअर करताना अस्ताद ऐवजी रेशम गेलेली बघायला आवडेल, अस्त्यापेक्षाही जास्त इनॅक्टिव्ह , सर्वात आळशी ती आहे म्हणून.
हा माणुस निदान धडपडलेल्या बायकांना उचलून नेण्याचं आणि ज्याला त्याला हग्स द्ययाचं काम तरी करतोय Proud
अस्तादच्या इन्स्टा वर पूर्ण सिझनची हगिंग मिक्स लिंक आहे Wink
https://www.instagram.com/p/BlAe5G9FmIm/?utm_source=ig_share_sheet&igshi...

>>लीडरशिप क्वालिटीज, स्वतः निर्णय घेऊन स्ट्रॅटेजी करून लढण्याची कुवत हे नाही.<<
बिग्बॉस या गेमशो करता तरी हे ट्रेट्स "नाइस टु हॅव" कॅटगोरीत मोडतील. अ‍ॅप्रेंटिस गेमशो प्रमाणे विजेत्याला त्या कंपनीत नोकरी करायची नाहि, जिथे हे ट्रेट्स असणं गरजेचं असतं. बिग्बॉस हा गेमशो तुमच्यातला "माणुस" तपासतो, त्याची परिक्षा घेतो (इट्स नॉट ए डॉग इट डॉग वर्ल्ड). स्पर्धात्मक (क्रायसेस, केऑटिक) सिच्युएअशन्स मध्ये तुम्ही कसं वागता, कसं सामोरे जाता; इतरांशी कसे वागता. जिंकणं महत्वाचं आहेच, पण ते कशा पद्धतीने जिंकता हे जास्त महत्वाचं आहे. छल-कपट करुन जिंकण्यापेक्षा ग्रेसफुली हरण्याला जास्त किंमत आहे.

हे मुद्दे लक्षात घेतले तर स्मिता सगळ्या सदस्यांपेक्षा उजवी ठरते...

राज, छान आहे पोस्ट तुमची.

स्मिताचे फॅन्स खुप आहेत्च, मेघा - सई- पुष्कर आणि शराचे फॅन्स पण स्मितालाच वोट करणार >>> सांगता येत नाही. काही मेघा fans नी लिहिलंय की स्मिताला वोट करा, ह्यापैकी कोणाला घालवा पण काही मेघा fans नी लिहिलंय काही कोणाला voting करू नका, आपली मेघा नाही तर.

काहीजण चक्क लिहितायेत स्मिता मेघाला धोका ठरू शकते त्यामुळे नका करू voting. असो.

पुष्कर स श ला म्हणाला की मेघा nomination मध्ये यायला हवी होती, स्मिता वाचायला हवी होती कारण आता आ रे पुढे येतील धोका आहे, स्मिता विक आहे त्यामुळे ती चालली असती.

अरे मग तू का उतरलास आणि स्वतःला सेफ केलंस. ठरलं होतं ना श रा आणि स्मिता उतरुदेत पाठोपाठ. स्वतः सेफ होणार मग मेघा डळमळीत झाली तिने निर्णय बदलला nominate करून घ्यायचं स्वतः ला तो Lol

ही सर्व बडबड मेघा आल्यावर बंद, तिच्यासमोर एकही शब्द नाही.

Submitted by maitreyee on 10 July, 2018 - 22:07>> +११११११

सगळ्यांचा मेघा जाप सुरु असतो का? रेशमचं अनाकलनीय स्पष्टीकरण त्यात मेघा, पुष्कर म्हणे मेघा सेफ नको होती, टास्कमध्ये सतत तिच्याविषयी बोलणं.
पाहुणे हुशार होते, कोणत्या हॉटेलमध्ये पुलातलं पाणी कमी करून द्या म्हणतात? पण पिडायला आयडिया भारीये. त्यांना किती स्टार्स द्यायचे हे सांगूनच पाठवलं होतं बहुतेक. बरं रेशम नुसती इकडे तिकडे सल्ले देत उंडारतच होती. मेघा excited होती कोण पाहुणे येतील वगैरे, तर रेशम आपल्या ओळखीचेच येतील,गप्पा मारतील, जरा शांत व्हा नि काय काय. टास्कमध्ये काडीचा इंटरेस्ट नसतो तिला.
श रा किती गोड आहे, कशी उड्या मारत गेली मिमिक्री करायला
आस्तादने गायलेली गझल one of my favorites आहे. मेघानेही छान म्हटलं गाणं. सगळे एवढे का हसत होते, ते नाही कळालं .
उद्या काय म्हणे तिकीट टू फिनाले आहे, रेशमसाठी कायपण..बिग बॉस म्हणे वाढदिवस साजरा करणार. वाढदिवस बिग बॉसचा , गिफ्ट रेशमला का?

बिबाॅ हाॅटेल टास्क अकरश: वेळ काढण्यासाठी आणि ह्यांच्याच चॅनेलवरच्या दोन सिरियल्यची जाहिरात करण्यासाठी ठेवल्यासारखा होता. सचित पाटील आणि वीणा जगताप फारच साधे अतिथी वाटले. कमी त्रास दिला. इतर वेळी अजिबात न आवडणारा ओमप्रकाश शिंदे काल जाम आवडला. सगळ्यांनाच मस्त त्रास दिला. कुठलीच गोष्ट मात्र उगीचच ओढून ताणून केलेली नाही वाटली. सचित-वीणा ने वाटलेल्या ५ पैकी २ स्टार्स काढून घेतले Happy
मेघा फारच बडबड करुन इतरांना टोमणे मारायला संधी देत होती. तरी दोन्ही अतिथी जोडींसाठी तिने तयार केलेल्या एक्झाॅटिक वेज्टेबल्स आणि बर्फाचा गोळा याचं कौतुक झालं. रुम सर्विस वाल्या रेशम अक्का पाहुण्यांच्या बरोबरीने पाठीमागे हात बांधून शतपावली घातल्यासारख्या निवांत हिंडत होत्या Happy सचितला सवयीने अरे तुरे केलं तिने तेव्हा सईने समजवलं तिला. हे कॅमेराने ओझरतंच कव्हर केलं. नीट दिसलं नाही. साहजिकच आहे .... अक्कांचं फिनीलेचं तिकीट आधीच फाडलं गेलंय !

आता लक्षात आलं , पुढचा आठवडा शेवटचा आहे ना? मग त्यात फिनालेला गेलेले ४ जण आहेतच कि.. मग त्या तिकिटाचा उपयोग काय? जे नॉमिनेटेड आहेत त्यांनाच त्याचा उपयोग होणार ना.

माझा क्रम : 1. मेघा, 2. स्मिता, 3. शरा

4. सै आली तर आली कारण तीही चांगली खेळली पण तिच्यात मॅच्युरिटी कमी आहे. आणि आताआताचं तिचं वागणं आवडलं नव्हतं. पण पूर्ण सिझन बघता तिला चौथ्या नंबरवर टाकत आहे. >>> मामी + १, मैत्रेयी + १.

पुष्कर अजिबात नको. एक नंबरचा संधीसाधू, बोलात बोल नसलेला कंटेस्टंट. पुष्कर मेघाविषयी मागून बोलत नाही हे तर तुफान विनोदी स्टेटमेंट होतं ममांचं ! त्याच्यापुढे मला आस्ताद आणि रेशमही बरे वाटतात... निदान ठाम तरी आहेत स्वतःच्या मतांवर. सईही अ‍ॅरोगंट असली तरी मला आवडायची पण तिच्या आंधळ्या पुष्की प्रेमामुळे डोक्यात जायला लागली Proud

अगो, ममांचं काय घेऊन बसलीस? पुष्करनं मेघाला लिहीलेलं पत्रं वाचून झाल्यावर स्वतःदेखिल सांगितलं की "मी कधीही तुझ्यामागे बोलत नाही. "

अस्ताद आणि रेशम मेघामुळे पूर्ण साईक झाले आहेत. मुगलांना जसे पाण्यात संताजीधनाजी दिसायचे तशी त्यांना मेघा दिसते.

बैलगाडीचा टास्क मी आता पाहिला. रेशम आणि अस्ताद त्या बैलगाडीतही मुर्खांचं नंदनवन स्थापून लोळत पडले होते. त्यांना वाटलं की इतकावेळ उतरायचं नाही असं ठरवणारी मेघा केवळ पुष्कर उतरला म्हणून उतरली. किती बिनडोक आहेत. बिबाॅनं अॅडिशनल नियम सांगितल्यावर परिस्थिती पूर्ण बदलली हे त्यांना कळलंच नाही.

रेशम मेघाशी वाद घालत असताना मेघा तिला सांगायला बघत होती की सगळे सदस्य एकत्र नाॅमिनेट होणे हे कसं कमी रिस्क होतं. पण जर तीन जण सेफ होऊन केवळ तीन जण नाॅमिनेट होणार असतील तर उतरलेलंच बरं. पण रेशम मेघाला खोटं पाडण्याच्या विचारांनीच ऑब्सेस्ड होती.

Pages