माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याने तिला खुणेने पाणी मागीतले तर हिने ते त्याच्या तोंडावर मारले., आणी त्याच्या छातीवर पण दणादणा हाणले. काय तर म्हणे CPR देत होती.>>>>> तेच पाणी गुरूने नंतर पियले.

काय एकेक.

असो विनाशकाले विपरीत बुद्धी. अरे टेबल पुसण्याकडे वाटचाल आहे त्या दोघांची Wink .

रश्मी गुरु झोका लय भारी Lol

हि सिरियल म्हणजे सिरियल कशी नसावी याचं उत्तम उदाहरण आहे. Sad
काहीही वास्तवाला धरून नाही.
गुरू सारखा माणूस इतक्या मोठ्या कंपनीचा सी ई ओ असेल तर त्याला साधा बेसिक सेन्स नाही हे दाखवताना चॅनल वाले स्वतःचं हसं करून घेतायत असं वाटत नसावं का? पण त्या सिरियलचा टि आर पी खूप आहे म्हणे, अहो पण तो सिरियलचा महिमा नसून रात्रीचे ८ ह्या वेळेचा महिमा आहे. ती वेळ काही घरात बरोब्बर जेवणाची, किंवा जेवणाच्या अगोदरच्या विरंगुळ्याची असल्याने त्या स्लॉट मध्ये कोणतीही भंगारातली भंगार सिरियल जरी लावली तरी त्याचा टिआरपी वर जाईल.
टि आर पी म्हणजे जी सिरियल सर्वात जास्त "पाहिली" जाते ती, जी खूप पाहिली जाते ती "आवडली" जाते असे नाही.

कामातुराणां
>>> प्लेटोनिक रिलेशन चा आदर्श घालून देतायत लोकांना.

त्या सिरियलचा टि आर पी खूप आहे म्हणे, अहो पण तो सिरियलचा महिमा नसून रात्रीचे ८ ह्या वेळेचा महिमा आहे. ती वेळ काही घरात बरोब्बर जेवणाची, किंवा जेवणाच्या अगोदरच्या विरंगुळ्याची असल्याने त्या स्लॉट मध्ये कोणतीही भंगारातली भंगार सिरियल जरी लावली तरी त्याचा टिआरपी वर जाईल.
टि आर पी म्हणजे जी सिरियल सर्वात जास्त "पाहिली" जाते ती, जी खूप पाहिली जाते ती "आवडली" जाते असे नाही.
>>
+११

दक्षिणा, सिरीयल साठी टि आर पी म्हणजे नुसती ८ ची वेळ ही नसुन, राधिकाच्या नवर्‍याची भानगड ही एक सिरीयल च्या लोकप्रियतेचे कारण आहे. आणी हे वास्तव आहे. माझ्याच लहानपणी माझ्या मामाच्या घरासमोर एक माणुस २ बायकांसमवेत नांदत होता. दोघींमध्ये भांडण होते की नाही ते कधी कळले नाही, कारण लहान असल्याने त्या वेळी घरात काही असले विषय परत निघाले नाहीत.

आमच्या ओळखीच्या एका केटरर ला २ आया होत्या. एक सख्खी आणी दुसरी सावत्र. बर्‍याच ठिकाणी स्त्रियांसाठी हा असा तोंड दाबुन बुक्क्यांचा मार असतो. काही स्त्रीया घटस्फोट देऊन मोकळ्या होतात, तर काही धुसफुसत मुलांसाठी संसार चालवतात, जे राधिका करतांना दाखवलीय. म्हणून राधिका या पात्राला सामान्य गृहिणींची टोटल सहानुभूती आहे. जोपर्यंत राधिका गुरु व शनयाला धडा शिकवत नाही, तोपर्यंत ही सिरीयल चालेल. आणी सिरीयल लवकर संपणे हे केड्यासकट तिन्ही दाढ्यांना परवडणार नाही.

भई, अखीर पापी पेट का सवाल है ना !!

खरंच......काल नाही दाखविलं..पण आज बहुतेक आक्कांची वटपौर्णिमा दाखविणार आहेत.... तेच ते पुन्हा....नऊवारी, नथ घालून वडाभोवती फिरायचं व गुरवासारखा नवरा सात जन्मं मिळू दे असं मागायचं......अरे राम...!! मागच्या वर्षी शनायाने वडाला फेरे घातलेले ....................
शनाया काल खूपच उंच दिसत होती..कुणी नोटीस केलं का ? गुरु त्या शनाया समोरही आजकाल बच्चा दिसतो...... आणि नेहमी साडी नेसणारी राधिका काल कशी काय ड्रेस घालून गेली तेही...देवळात ?

मान्यवर ची जाहिरात करून झाली. कालचा भाग मिस केला. उपवन मधला. तो मिशी किती इरिटेटिंग आहे. भोचक प्राणी. शनायाचे दात पुढे फणी आहेत. साइड ने बघितले की दिसते पण ओव्हर ऑल छान दिसत होती. आज वट पोर्णिमा आहे काय.

राधिकाची सासू फारच इरिटेटिंग आहे.

गुरू राधिकाचे आधिचे घर बदलले आहे लक्षात आले का? सोफा, सोफ्या शेजारची हिरवी चपट केलेली बाटली, दरवाज्या जवळचे कपाट, डायनिंग टेबल इ. गोष्टी जुन्या आहेत. पण स्वयंपाकघर आधी बाहेरच्या दरवाज्यातून आत आल्यावर उजव्या बाजूला होते आता डाव्या आहे.

भंगारेस्ट सिरियल आहे ही. जराही लाज नाही वाटत झी मराठी ला करमणुकिच्या नावाखाली प्रेक्षकांच्या गळ्याखाली काहिहि उतरवायचा प्रयत्न करत आहेत.

हो गुरू काल छान दिसत होता आणि शन्या थोराड दिसत होती. महाजनी दुर्बिण लावलेली असताना एवढ्या जवळ जाऊन का बघतात. सरळ सरळ दाखवून देतात की ते पाठलाग करत आहेत, ही कसली जासूसी. मोहे मान्यवरचाच ब्रॅंड आहे का. राधिकाच्या हातातून ताट का बरे पडते जेव्हाकी हा सेम सिक्वेन्स कितीतरीवेळा रिपीट झालेला आहे.

तो तरी किती थांबेल, राधिका ह्याच काय पुढच्या सात जन्मात त्याला सोडणार नाही. परत त्याला हे माहित नाही की शनायाला लग्न करायचेच नाही. सापुचे फोटो हा भक्कम पुरावा असू शकतो गुरूवर फसवणुकीची केस करण्यासाठी पण कसचे काय.

त्या गुरूची आई एक नंबर टॉक्सिक बाई आहे. अजूनही देवदर्शन एकत्र केल्याने किंवा नवर्‍याने बायकोच्या डोक्यात फुलं माळल्याने पुढचा संसार सुखी होतो? Uhoh
किंवा नुसतं तोंडानं "माझ्या आयुष्यातून ही अमूक ढमूक बाई निघून गेली आहे असे सांगितल्यावर खरंच मनं साफ होतात? Uhoh
ती शनाया यांना ऑरेंजेस म्हणते त्यात नक्की तथ्य आहे Proud

इतके सर्व होउन आता परत संशय लेव्हललाच आहेत म्हणजे धन्य आहे. हे म्हणजे मल्हार मध्ये कायम हे संकेत असतात व ते त्यावेळेलाच समजतात टाइप वाक्य कसे दर दोन महिन्यांनी यायचे तसेच आहे. गुरू ची आई फारच पीळ मारते. सिरीअलचे प्रेक्षक वर्गानुसार भाग पाडलेले सहज कळते. म्हातार्‍या प्रेक्षकांसा ठी, नानाजी व मिशी बाबा ह्यांचा ए.क सीन. सुनांबद्दल खडे फोड णा र्‍या वयस्कर बायकांसाठी गुरूची आई व मिशीची बायको नानजीची बायको ह्यांचा सीन. आजच्या मुलींना कुठे वेळ असतो. आपल्या वेळी वगिअरे टॅ टॅ टे. मग ज्या पुरु षांना हे लफडेच्च बघायला आव्डते त्यांच्यासाठी गुरू शनाया सीन, व गुरू ची चर फड. जसे एकीकडे एंगेज मेंट एकीकडे वट पौर्णिमा
दोघींच्या त अडकलेला पति असे बघून काही लोक्स ख्या ख्या करत असतात

आता ताट पडले की सर्व सौभाग्यवती हा य करणार.

अमा... Biggrin .. खरे आहे.
दक्षिणा.. किती तो वैताग!
आणि किती ऑब्झर्व्हेशन! हिरवी बाटली वगैरे.....!!
आणि खरंच तो ताट पडण्याचा सीन आता अती बोअर झाला.......सो व्हेरी स्टिरीओटाईप ..आणि ही का म्हणून आली आधी मुळात वडाची पूजा करायला? सासूने काहीही म्हटलं तरी?
Angry
असे काय नवस सायास करुन शन्या दूर जाणारे का? इतकं गळेपडू वागायचंच कशाला म्हणते मी!
गुरवाला इतकंही इरीटेट का करावं? म्हणूनच तो सेट वरही हिच्याशी कमी आणि रसिकाशीच जास्त बोलतो म्हणे!

आणि गुरु तरी किती थिल्लर ..सापु काय, फोटो शूट काय ..अन काय काय! त्याला काय त्या बिनडोक शन्यात आवडतं कोण जाणे ! अर्थात राधिका की शन्या असा चॉईस असता तर मी सुद्धा शन्याच त्यातल्या त्यात निवडली असती बहुतेक!!!!
आणि घराजवळचाच काय हॉल घेताहेत मूर्ख! आधी तर ती म्हणे की डेस्टीनेशन एंगेजमेंट करु....आता का मग मंगलम हॉल ...? .. काहीही

Pages