Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आज सकाळी पाहिला तो भाग.
मी आज सकाळी पाहिला तो भाग. गुरू निब्बर निलाजरा व शनाया दात पुढे असलेली बाई दिसत होती. ड्रेस छान दोघांचे. व्हेन्यू ठाण्यातलाच आहे कुठेतरी . ती मागची कमान मी पाहिली आहे. पण आठवत नाही नक्की कुठे ती. टीव्हीला अशी आग लागणे शक्य नाही. ते आपले क्रिएटिव्ह फ्रीड म घेतले आहे दिग्दर्शकाने. तो किती अपमानास्प द बोलला सर्वांना. व आई तर मला वा टले चक्कर येउन पडेल.
राधिकाने आधीच सेपरेशन डिवोर्स घेतला अस्ता तर ही मानहानीची वेळ आली नसती. उगीच चिकटली आहे . हाच चान्स आहे नवी सुरुवात करायचा. मग त्यांचे काही का होईना.
अरे परवा विवीआना मॉल मधून घरी येत होते तर ब्रिज वरून जाताना एकदम राधिकाचे ऑफिस आहे ती बिल्डिंग दिसली. एकदम टीव्हीतल्या सारखी दिसते. मुलीला उत्साहाने दाखवले तर तिला काहीच माहीत नाही. सो इट फेल फ्लॅट.
गुरुला शनाया पासून वेगळं
गुरुला शनाया पासून वेगळं करायच आहे ते तो तिच्याकडे यावा म्हणून नाही , तिने तिच्या सासूला वचन दिलयं म्हणे , " ह्याना आणि शनाया वेगळं करेन " म्हणून .
मागच्या कमानीवर सौ. सीमाताई
मागच्या कमानीवर सौ. सीमाताई ठाकरे की कायसंसं लिहीलेलं......अगदीच प्रायमरी लेव्हल चा बोट क्लब होता बहुतेक.......मंदिर टाईप.
आणि शूट कोण करत होतं म्हणे? केड्या..? अगदी परफेक्ट टाईमलाच कसा काय सुरु झाला प्रोग्राम?
इथे तर प्रोजेक्टर, पीसी वगैरे सगळं अगदी जवळ जवळ असूनही सतरा वांधे येतात प्रेझेंटेशन सुरळीत सुरु व्हायला..... !!!
यांचं रिमोटलि असूनहि अगदी आवाजही क्लिअर ...!!!!!
हो हो thank u सर्वांना. इथे
हो हो thank u सर्वांना. इथे वाचून एक शॉट बघितला, सगळे होते.
आता सज्जड पुरावा मिळाला होता की, कायद्याने केस टाकू शकली असती आणि गुरु आत गेला असता. गुन्हाच आहे हा, जे पूर्वी करायला हवं होतं ते किमान आत्तातरी. दोन दिवस आत टाकून डिव्होर्स देणे. सगळा माज उतरेल गुरुचा.
छे....इतक्यात डिवोर्स देईल ती
छे....इतक्यात डिवोर्स देईल ती राधिका कसली.
पण गुरु त्या शॉट मध्ये
पण गुरु त्या शॉट मध्ये शनायापेक्षा पण छान दिसत होता, शनाया दात अतिचं दाखवत होती, एरवी राधिका दाखवते तसे. पुढे काही बघितलं नाही. कोण ऐकणार ते डायलॉग आणि बघणार तो ड्रामा.
कोण ऐकणार ते डायलॉग आणि बघणार
कोण ऐकणार ते डायलॉग आणि बघणार तो ड्रामा.>> अगं नाही तो खरेच खूपच अपमानास्पद बोलत होता. तुझ्यापासून मोकळे झाल्यानंएकदम फ्रेश वाट्ते आहे छान वाट्ते आहे. नाहीतर घुसमट होत होती. तुला धुळीस मिळवीन नाव पण राहु देणार नाही कंपनीचे वगैरे. ह्याच्या पेक्षा ०.०००१% रिजेक्षन पण मी ऐकोन घेतले नसते. इनु है कौन बोलके कानफटात मारून निघून गेले असते पोरासकट.
बरं तो टीव्ही आहे तर आहे पण अंधार का होता? बाकी लोक रिकामटेकडॅ असून उगीच ह्या भानग डीत लक्ष देताआहेत हा शानायाचा पॉइंट बरोबर आहे बाकी. सर्व प्रकरण उघडकीस आल्या दिवशी बेड्रूम मध्ये अर्ध्या तासात खतम करता आले असते.
मग फक्त लॉयर थ्रू बोलणे!!!! व सेटल मेंट. खतम किस्सा.
अगं नाही तो खरेच खूपच
अगं नाही तो खरेच खूपच अपमानास्पद बोलत होता. तुझ्यापासून मोकळे झाल्यानंएकदम फ्रेश वाट्ते आहे छान वाट्ते आहे. नाहीतर घुसमट होत होती. तुला धुळीस मिळवीन नाव पण राहु देणार नाही कंपनीचे वगैरे. >>> बापरे एवढं, अतिचं त्याचं. मध्ये तर त्याचे सर पण त्याला खूप बोलले होते ना, इथे स्वतः ची नोकरी टिकेल का नाही शाश्वती नाहीये आणि इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलला.
अमा .....:-) इनु है कौन...
अमा .....:-) इनु है कौन.................!!!
ही आपली रडत बसली.......हेल्प लेस असल्या सारखी... गुरुच्या शब्दाशब्दात हिच्या बद्दल विखार, राग भरलेला..... आणि ही कोणत्या जमान्यात राहत्येय...... माहा नवरा माहा नवरा करत.....शन्याच्या नावाने खडे फोडत....
सगळी चूक जणू शन्याचीच...हिचा नवरा धुतल्या तांदळासारखा निष्पाप ! तो गुरु तरी किती निलाजरा........!!
गॅनाया जीम मध्ये गेले होते
गॅनाया जीम मध्ये गेले होते तेव्हा ते कदम तिथे आले होते, त्यांना गुरुच्या सह्या हव्या होत्या. तर या मठ्ठोबा शन्याने जबरदस्तीने सह्या केल्या, कदम पण म्हणाले की अहो वाचा तरी निदान पण शन्याने ते केले नाही. आता गुरुच्या जागी हिच्या सह्या पाहील्यावर त्या राजवाडेंनी काय केले असेल देव जाणे. हा गुरु त्या राधिकेला खड्ड्यात पाडायला निघालाय, आता स्वतःच पडेल.
(No subject)
पुढील भागात राधाक्का
पुढील भागात राधाक्का म्हणतांना दाखवलीय ( बहुतेक आजचाच ) की सतत बोलण्यापेक्षा एकदाच काय ती कृती केलेली बरी.
( म्हणजे ती बहुतेक गॅनायाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा विचार करतीय ). अगं मग बये इतके दिवस का थांबलीस ? मग काल अशी रडारड केली नसती ना दोघीजणींनी? येडपट कुठली !
का त्या गॅनायाला मिरवायचे होते म्हणून हे सीन कथेत घुसडले देव जाणे !
आणि गुरू शनायाला जर गुपचूप
आणि गुरू शनायाला जर गुपचूप साखरपुडा करायचा होता तर त्यांनी हॉल का बूक केला होता?
येऊन येऊन कोण येणार होतं? तर तो फालतू केड्या आणि इशा, त्यांच्यासाठी हॉल?
दोक्यवर पद्लेत हे सिर्यिल व्ले
आणि गुरू शनायाला जर गुपचूप
द्ब्ल पद्ली पोस्त सोर्र्य माफ्करा मला.
सिर्य्ल बह्गुन मला खुप फ्र्स्त्रेशन आल्यामुले अस झाल असेल
अम्हला का असा एख्दा मुर्ख गुरू भेतत नाहि? किन्व सासु किती छाने.. सगल कस गोद गोद. शेजरी पन भन्दत नैत.
काय मजा
हो हाॅल का बुक केला होता, कोण
हो हाॅल का बुक केला होता, कोण येणार होतं. शनायाने घातले होते तसे कानातले मीरा घालते नेहेमी, चार पाच रंग आहेत तिच्याकडे. काल चहयेद्यामध्ये रेवती आणि तिचा मुलगा आले होते.
फार झालं भरकटणं, आता ट्रैक वर
फार झालं भरकटणं, आता ट्रैक वर या, असं सांगितलं असेल निर्मात्यांनी, दाखवा गुरू चं घापा बोलणं, दाखवा रा चं ढसाढसा रडणं, दाखवा शेजारच्या लोकांचं गोळा होणं, मधलं सगळं बघितले ते खोटं वाटलं पाहिजे इतकं आधी सारखं दाखवा...
आज गुरूच्या ऐने रदून गोन्धल्
आज गुरूच्या ऐने रदून गोन्धल् घातला फदाफद मुस्कादात मार्ल्या तरी तो सुम्भ फक्त उलत बोलल्ल.
जो नवरा दुस्र्या मुलिच्या नादाला लगून य वर्श झाली, मद्ये तो तिच्यासोबत र्हात होता, आता फक्त एक अन्गथि घत्ल्यावर रधिकाला इतकी धोक्याची जानिव का व्हवी? जो मानुस मनानेच आप्ला नाही त्याला नुस्ता समाजासाथी का मिलव्न्याचा प्रयत्न करावा?
आनि माझा नव्रा म्ला मिलेल की नही म्हैत नाही पन तुम्ह्च्या मुल्गा मी तुम्हाला परत मिलवून देइन असे राध्दिका ससुला बोल्ली. नवर्याच्या भुमिकेतून तो चुक्लाय ना, मग हे क्स्ला अतर्कि क बोल्न?
राधिकाने धमकी दिलेय ना "आता
राधिकाने धमकी दिलेय ना "आता तुमची वाईट वेळ सुरू झालीये म्हणून".... मला बघायचंच आहे की असं काय करणार आहे ती जे इतक्या महिन्यांत जमलं नाही तिला. मुळात जमलं नाही की केलंच नाही? आणि ती गुरूची आई आता काय एवढा गोंधळ घालते? त्याने नवीन किंवा अचाट असं काय केलंय वेगळं? अगदी आताच गौप्यस्फोट झाल्यासारखे वागतायत सगळे.
ते पडदा जाळण्यापेक्षा सरळ
ते पडदा जाळण्यापेक्षा सरळ पोलिसात व्हिडीओ द्यायचा, गुरु गुन्हेगार ठरणार, लग्नात असून फसवणूक बायकोची. हे सर्व पेपरमध्ये छापून आणायचं, ते संपादक आहेत ना, सतत मागे मागे जाणारे गुरु शनायाच्या त्यांच्या ओळखीने. मग जेलवारी, नोकरी पण जाणे हे मस्त झालं असते पण नाही. हळूहळूहळू करणार, असलं टोकाचे एक घाव दोन तुकडे थोडी करायचे आहेत त्यांना.
शी... महामुर्ख आहे हा फुगलेला
शी... महामुर्ख आहे हा फुगलेला चणा.
शना ची काय चूक???
च्र्प्स फुगलेला चणा नका म्हणू
च्र्प्स फुगलेला चणा नका म्हणू हो.
मला तरी शनाया जेल मध्ये जावी, तिला शिक्षा मिळावी असं नाही वाटत, मी फक्त गुरूबद्दल लिहिते, त्याला शिक्षा मिळावी. पण शनायाचं charactor अति मूर्ख केलंय टीमने, नुसते पैसे उडवणे, अजिबात सेल्फ रिस्पेक्ट नसणे. मला राधिकाचंही पटत नाही केव्हाच शिक्षा देऊन div द्यायला हवा होता पण स्वस्तात सोडायला नको या माणसाला असं वाटतं.
हाय मला बघायचाय हा भाग पन
हाय मला बघायचाय हा भाग पन आ ता लावला तर शेजारी धरून मारतील सकाळी बघेन गुरूची आई रिअली लुकड स्ट्रिकन. तिला कल्पना नाही आहे का? किती डिल्युजनल.
शनायाने आता सेल्फ रिस्पेक्ट
शनायाने आता सेल्फ रिस्पेक्ट ठेऊन, स्वतः काहीतरी करायला पाहिजे. नुसती लुबाडणूक, दुसऱ्याच्या जीवावर मजा यामुळे गुरु रसातळाला गेला की ती पण जाणार किंवा त्याला सोडून पळून जाणार.
गुरु रसातळाला गेला की ती पण
गुरु रसातळाला गेला की ती पण जाणार किंवा त्याला सोडून पळून जाणार.>>>>>> शन्या , तळाला गेलेला रस्सा पण चाटुन पुसुन खाऊन मग गुरुला तळाला पाठवेल. आजच्या भागात गुरुला त्याच्या कंपनीच्या दुसर्या डायरेक्टरने शो कॉज नोटीस दिलीय. बिच्चारा गुरु ! साखरपुड्यानंतरचा पहिलाच दिवस असा असेल तर लग्नानंतर काय होईल?
गुरवाची का काळजी इतकी?
गुरवाची का काळजी इतकी?
तो निब्बर, निगरगट्ट, निलाजरा, मूर्ख, गेंड्याची कातडी पांघरलेला आहे. :रागः:
दक्षु....अगं किती राग.
पण खरंय तुझं.....या आधी हिला काहीच धोका नाही जाणवला जो आत्ता जाणवतोय?
कसला धोखा नी काय.
कसला धोखा नी काय.
गुरुने तिला आणि मुलाला घ राबाहेर काढुन शन्याबरोबर घरात रहात होता ते विसरली काय भयताई. आणि बाकी लोक.
अगदीच भयंकर धक्का बसलाय तो आता तिला.
अतिशय मुर्ख सिरीयल आहे. आणि शन्यापेक्षा राधाक्काचे कॅरेक्टर मुर्ख दाखवले आहे
गुरूचे बाबा म्हन्ले की पोलिस
गुरूचे बाबा म्हन्ले की पोलिस कम्प्लेन्त करून कै फैदा नै कारन गुरू शन्या समोर न्ह्व्ह्ते
अरे पन तुम्ही पोलिस कम्प्लेत करैची ना, त्याना कुथून कस पकदून आनय्च ते पोलिस पहतील,
तुम्ही तेव्हध तर धादस दख्वा काहिहि पुच्की कारन देतो ओरेन्ज
राधिका मसालेज् ALF ला
राधिका मसालेज् ALF ला टेकओव्हर करू शकतात??? एका वर्षात?
सासूबाई तर डोक्यातच जायला लागलेय. गुरूने विचार केलेला दिसत नाही पोलीस कंम्प्लेंटबद्दल. बाकीचे पण कुठे करतायत म्हणा.
आचरटपणाचा कळस आहेत झी च्या
आचरटपणाचा कळस आहेत झी च्या मालिका।। इथे ती मूर्ख राधिका सगळ्यांना हाताशी धरून कायतरी फालतू प्लॅन करते आणि तोंडावर आपटते दरवेळी। लोकांना कामधंदे नाहीत का तिच्यामागे पळायला। ती रेवती आज ढसाढसा रडत होती। अरे जरा नॉर्मल माणसांसारखं वागा ना। काहीही काय दाखवता। तिकडे त्या राणाच्या सिरीयल मध्ये पण अती लाड चाललेत त्या बारक्या पोराचे। इतकी आवड आहे तर स्वतःचं पोर का नाही प्लॅन करत। काहीही अतर्क्य दाखवतात।
अहो असे नका म्हणू. पाठक बाई,
अहो असे नका म्हणू. पाठक बाई, राधाक्का, शीतली या जाम प्रसिद्ध बायका आहेत झी मराठीच्या. ग्रामिण भागात सुद्धा एखाद्या बाईला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसेल पण या बायांचे लय कौतुक हाय बघा. झी मराठी वाले प्रत्येक अॅवार्ड शो च्या वेळी सुद्धा या बायकांना, त्या भारताच्या राष्ट्रपती वा पंतप्रधान असाव्यात असा दर्जा देतात .
Pages