माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा प्लस वन. हयात वाइट काय आहे एक प्लेझंट सरप्राइज आहे खरेतर. तो थापाड्या आहे हे आधीपासूनच सर्व म्हणत असतात राधाक्का पण. तो ही वेडसरच आहे. शनाया एकदम स्वार्थि व मॉरल्स नसलेली म्हणे. पण मग हा ही तिला फसवतोच की एक प्रकारे. गुरू पण हे घरीच सांगू शकला असता. बरे पार्कात इतर कोणीही नव्हते, बेइज्जती व्हायला.

राधाक्काचे केस कापले पाहिजेत घामट व बुज्बुजाट दिसतात.

मी सौमित्र असते आणि राधिका मला असं विश्वासघात वगैरे ऐकवत बसली असती तर मी तिला हाड म्हणलं असतं. आणि एकदाच तिला कॉन्ट्रॅक्ट का दिलं ते सांगितलं असतं. त्या उप्पर माज करून तिने ते चालू ठेवलं असतं तर
चल कॅन्सल करू म्हटलं असतं. (आईची कटकट नुसती Angry )
हे सौमित्र चं दळण आता निदान २ दिवस चालेल.

पण मला सर्वात उत्सुकता लागली आहे की शनायाचं काय होईल?

मी सौमित्र असते आणि राधिका मला असं विश्वासघात वगैरे ऐकवत बसली असती तर मी तिला हाड म्हणलं असतं. आणि एकदाच तिला कॉन्ट्रॅक्ट का दिलं ते सांगितलं असतं. त्या उप्पर माज करून तिने ते चालू ठेवलं असतं तर
चल कॅन्सल करू म्हटलं असतं. (आईची कटकट नुसती Angry )>>>>> दक्षिणा +११११११

गुरुची एक मजा पाहिली का? जर त्याला त्याचे दुर्गुण सांगीतले की तर तो तोंडं वेडीवाकडी करुन रागाने तोंड फिरवुन उभा रहातो. कालचाच प्रसंग, जेव्हा सौमित्र म्हणतो की शनया पैशासाठी त्याला सोडुन माझ्या बरोबर अमेरीकेला यायला तयार होती तेव्हा गुरु तोंड फिरवतो.

गुरु आणी राधाक्कांचा इगो दिवसेंदिवस वाढत चाललाय. राधांक्कांचा मी पणा त्यांचा हात सोडत नाहीये. बाई आता तरी जरा ते ब्लेझर वगैरे घालणे सोड, जरा चांगले ऑफिस वेअर, कुर्तीज + प्लाजो घाल, समिधा सारखे चुडीदार घाल. नुसती ढब्बाडी कबाडी दिसते. उलट साडीत बरी दिसत होती.

शनाया एकदम स्वार्थि व मॉरल्स नसलेली म्हणे. पण मग हा ही तिला फसवतोच की एक प्रकारे. >>> स्वत: त्या दिवशी रिशेपनिस्टशी जे वागला ते काय होत मग?

स्वत: त्या दिवशी रिशेपनिस्टशी जे वागला ते काय होत मग? >> मला वाटते थोडी गल्लत होतेय. फ्लर्टी वागणं वेगळं, त्यात काही नुकसान नाही. ते फक्त शाब्दिक, आणि एखाद्याचा पैशासाठी उपयोग करून घेणं निराळं.
शनाया गुरूचा सरळ सरळ उपयोग करून घेत होती, मग बनी अमेरिकेला नेतो म्हणाल तर त्याचं गाणं गाऊ लागली होती, आता त्याने तसं सांगितल्यावर परत गुरूकडे वळली... हे नक्कीच मोरल व्हॅल्यु नसल्याचं लक्षण आहे.

मला वाटते थोडी गल्लत होतेय. फ्लर्टी वागणं वेगळं, त्यात काही नुकसान नाही. ते फक्त शाब्दिक, आणि एखाद्याचा पैशासाठी उपयोग करून घेणं निराळं.
शनाया गुरूचा सरळ सरळ उपयोग करून घेत होती, मग बनी अमेरिकेला नेतो म्हणाल तर त्याचं गाणं गाऊ लागली होती, आता त्याने तसं सांगितल्यावर परत गुरूकडे वळली... हे नक्कीच मोरल व्हॅल्यु नसल्याचं लक्षण आहे. >>>> +++ ११११

राधक्का काय फुगुन बसली आहे!! जेव्हा गुरवाने खरे काय ते सांगितले तेव्हा आनंदाने उड्या मारायला हव्या होत्या आणि गुरुच्या नाकावर टिच्चून पुढच्या सगळ्या ऑर्डर्स मलाच दे - A1 Quality food/मसाले देईन मी... असे म्हणाली असती तर ते जास्त खरे वाटले असते. पण या बयाला गुरुला काय वाटते याचेच पडले आहे.

यांचे संबंध बरे होत येतात, तेव्हड्यात मालिकेला एक्सटेन्शन मिळते, मग हे परत भांडतात आणि त्याच ट्रॅक वर मालिका चालू राहते

जरा अतीच इश्यू केला गुरु आणि राधिकाने, बाकीचे तसे कुल होते सौमित्रबद्दल ऐकून.

सौमित्रने शेवटी फक्त इतकं करायला हवं होतं की शनाया ठरव ह्याच्याबरोबर राहायचं आहे की, माझ्याबरोबर येतेस. ती लगेच गेली असती मग थोडं पुढे गेल्यावर मागे येऊन बघ गुरु म्हणायचं आणि सांगायचं शनायाला की मला अजिबात इंटरेस्ट नाही तुझ्यात.

गुरु आता अजून खालच्या पातळीवर उतरेल, अफेअर सुरूच राहील आणि मग फायनान्शियली बरबाद होईल, कामाकडे लक्ष नाही etc. मग शनाया सोडून जाईल आणि राधिका आणि family पण राहणार नाही त्याच्याबरोबर. किंवा करतील राधिकाताई मदत. करू नये.

ही राधाक्का मारे मला खोटेपणा आवडत नाही वगैरे बाता करते. मग शनाया जेव्हा घरी येऊन राहते तेव्हा ती ही घटना आणि घरात काय तमाशे चालू आहेत ते साबा-साबूंना फोनवर कधीच सांगत नाही. वेळ प्रसंग बघून खोटं बोलावं लागतं . सौमित्रनी तेच केलं की!

सौमित्रने शेवटी फक्त इतकं करायला हवं होतं की शनाया ठरव ह्याच्याबरोबर राहायचं आहे की, माझ्याबरोबर येतेस. ती लगेच गेली असती मग थोडं पुढे गेल्यावर मागे येऊन बघ गुरु म्हणायचं आणि सांगायचं शनायाला की मला अजिबात इंटरेस्ट नाही तुझ्यात.>>>> अंजू सही +११११ तो प्रसंग अजून रंगवता आला असता.

वेळ प्रसंग बघून खोटं बोलावं लागतं . सौमित्रनी तेच केलं की!>>>>>> शुगोल, पण राधाक्का पडल्या सत्यवचनी. त्यांची तत्वे खरी बाकीच्यांची खोटी.

अरे तो ब्लेझर सुट ओएलेक्स वर विकायला काढा रे Angry
काल मधेच राधाक्का गुलाबी प्रिंटेड साडी नेसुन अथर्वला थोपटत होती तेव्हा ह्या बिजनेस वूमन गेटप पेक्षा हजार पटीने चांगली दिसत होती.
साडी नेसुनही बिजनेस होतो हे सांगा बाई कुणीतरी त्यांना.

क्का काय फुगुन बसली आहे!! जेव्हा गुरवाने खरे काय ते सांगितले तेव्हा आनंदाने उड्या मारायला हव्या होत्या आणि गुरुच्या नाकावर टिच्चून पुढच्या सगळ्या ऑर्डर्स मलाच दे - A1 Quality food/मसाले देईन मी... असे म्हणाली असती तर ते जास्त खरे वाटले असते. >>>>>>>>>> एवढं कुठलं सुचायला त्यांना.

हो ना..केड्याची फिलॉसॉफी मुळात चुकीची आहे.
तिचा ब्लेझर लुक भयाण आहे. अतिशय जाड व निबर दिसते!

मला असं वाटतयं की राधक्काची ब्लेझर वगैरे घालायची हौस कधी पुरी झाली नसेल म्हणून तिने सौमित्र व केड्या दोघांना गळ घातली असेल तशी वेशभुषा स्क्रीप्ट मध्ये अ‍ॅड करा. Proud

कामाकडेच पूर्ण लक्ष

"सुरुवातीला मी भाषेवर खूप फोकस केला होता. जशी मालिकेला सुरुवात झाली तशा खूप प्रतिकिया आल्या. नागपुरी बायका खूप स्ट्राँग असतात, ही नागपुरी भाषाच नाहीच अशा सगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. पण तेव्हा माझ्या टीममुळे मी सोशल मीडिया किंवा मला येणारी पत्र याकडे अजिबात लक्ष न देता कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. गेल्या दीड वर्षांपासून मी कोणत्याही सोशल मीडियावरच्या कमेंट्स वाचत नाही. जो काही तुमचा फीडबॅक आहे तो मला आमच्या टीमकडून चॅनेलकडून मिळतो. लोकांना अनेकदा अनेक गोष्टी आवडत नाहीत. कोणी सांगतं हा लूक छान नाही, तर कोणी सांगतं इंदूरी साडी राधिकाला छान दिसेल. आत्ताची साडी बरी आहे.. या सगळ्याचा अर्थ मी एवढाच घेते की मी छान काम करतेय आणि तुम्ही ते बघताय. वाईट आणि चांगल्या अशा दोन्ही प्रतिक्रिया आधीही येत होत्या आणि आताही येतात. त्यामुळे त्यांच्याकडे बघताना त्यातील सकारात्मकता घेऊनच पुढे जाण्यावर माझा भर आहे."
- अनिता दाते केळकर.

मी कोणत्याही सोशल मीडियावरच्या कमेंट्स वाचत नाही. >>> यातच आलं सगळं Lol

शुभांगी गोखले, शरद पोंक्षे, केतकी थत्ते मुख्य भूमिकांत असलेल्या ईटीव्ही मराठीवरच्या एका मालिकेत अनिता दातेची एक भूमिका होती. तिथला आणि अय्या, गंध मधला अभिनय आवडला होता.

पण या मालिकेतलं जेवढं काम पाहिलंय त्यावरून आणि विवा मंचावरच्या मुलाखतीतलं वाचून बरं मत झालं नाही.
अर्थात या मालिकेशी संबंधित कोणीही डोकं वापरत असल्याचं दिसत नाही (यात प्रेक्षकही आले ) त्यामुळे कधी नव्हे तो लीड रोल मिळालाय, तर नाव-पैसा कमवत असतील तर कमवोत .

राधिकापेक्षा शनायाचा मेकओवर छान वाटतो बघायला. कधी साडी, कधी सलवार कमीज, तर कधी लॉन्ग स्कर्ट. सगळ्या प्रकारात ती छान दिसत होती आणि ती ते कपडे carry सुद्धा छान करत होती.

मी आत्ता shopping episode बघितला, सौमित्र राधिकाचा. राधिका छान दिसत होती दोन्ही ड्रेसमध्ये, हा तोंडाला जास्त पावडर लावलीय असं वाटत होतं, एरवीही वाटतं. तो आरशातला सीन छान होता. सौमित्र राधिका जोडी छान दिसत होती. राधिकाला गॉगल पण सूट होत होता. असं ड्रेसिंग आणि गॉगल जास्त सूट होईल तिला.

काल पेईंग घोस्ट लागला होता, त्यात होती अनिता दाते. तिच्या मुलाखतीवरून हे स्पष्ट होतं की अनेक गोष्टी तिलाही पटत नाहीत पण वाहिनीची गणिते वेगळी असतात. तिने भूमिका नाकारली तरी दुसरं कोणीतरी करणारच, मग झीचा लीड रोल, पैसा आणि प्रसिद्धी का सोडा. अद्वैतनेही याआधी हौशी स्तरावर अनेक चांगली नाटकं दिली आहेत पण आता सगळेच प्रवाहपतित आहेत.

Pages