माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनायाला दिवसेंदिवस अजून डंब दाखवतायेत, राधिकाला smart. संपवणार असतील तर बरं. मला फक्त गुरूने टेबल पुसणे सीन बघायचा आहे Wink

तो झाला की लिहा रे. अजून वेळ असेल.

राज्वाडेनी अल्तिमेतम दिला ना गुरूला पर्वा. तुम्ह्च कामत ल्क्श नाही म्हनून. अता जैल बाराच्या भावात.
त्याकेद्याला कोल्हपोरी चप्ल भिज्वून त्यान झोदल्म पाहिजे.

काल राजवाडे राधिकाला फोन करून कौतुक करताना दिसले, आणि तिला underestimate केल्याबद्दल माफी मागितली.>>>>> इसका दी एंड ऐसा होगा के राजवाडे, राधाक्का को उनकी कंपनीमें मॅनेजिंग डायरेक्टर बना देंगे और गुरुको डिमोट कर देंगे या फिर राधाक्का ALF को टेकओव्हर करके गुरु और शनयाको टेबल पुसनेके लिए रखेंगी. लेकीन मेरेकू ये समज नही आ रहेला है, के शनाया को गुरु अब हकाल चूक्या है, वो ALF में काम नही करती, तो वो टेबल कैसे पुसेगी?Maid

रश्मे किती गोड स्मायली.. Happy
आणि इशा ने गुरूचे ३ लाख लंपास केले असं तु लिहिलं आहेस मागच्या पानावर.
त्याचं काय आहे नक्की, मी कसंकाय मिस केलं? सांग की किस्सा
या शिरेलि त च्यायला काय काय घडतं, लक्षात तरी किती आणि काय काय ठेवणार?

सौमित्र गेला का? राधाक्काला का नाही नेलं त्याने?
ह्या दोघांचं वाजवायला पाहिजे होतं. पण झी ला कुठली तेवढी प्रगल्भता असं काही दाखवायला.
तिकडे त्या रडुबाई मीराचं पण त्या बॉसशी वाजवायला पाहिजे. तर आहेच समीर समीर करत.
आता झाला ना ब्रेअकप डीवोर्स मग वाटा वेगळ्या करा ना. का त्याच फाटक्यात पाय घातलेला दाखवतात हे लोक.
तिने बॉसशी लग्न करुन मूव्हॉन झाली किंवा मग राधाक्का सौमित्राशी लग्न करुन मुव्हॉन झाली किंवा
लग्न करायचं राहुदेत निदान राधाक्का ने गुरुला डीवोर्सचे पेपर्स तोंडावर मारलेत, मोठी बिझनेस वूमन असल्याच्या अ‍ॅटीट्युडमधे
ब्लेझर कोट घालुन हसत उभी आहे ह्या सीनवर सिरीयल संपलेली मला खुपच आवडेल. पण हे कदापी शक्य नाहीये.
एकाही मालिकेत असं काहीही दाखवु शकणार नाही झी. >>>> अगदी अगदी. त्यापेक्षा हिन्दी सिरियल्स तरी बर्या. तिथे नायिकेला नायक बदलण्याचा पर्याय तरी असतो.

अगं दक्षिणा हे अगदी सुरुवातीला दाखवलेय. ही शन्या राधाक्काचे पाहुन नवीन बुटीक उघडायचे ठरवते आणी त्यातुन गुरु कडुन ३ लाख उकळते. ही आणी ती चोंबडी इशी दोघीजणी कुठलीही चौकशी वा लिखापढी न करता एक दुकानाचा गाळा विकत घेऊन बुटीक उघडतात. ( या दोघी एका हॉटेल मध्ये मोठमोठ्याने पैशा विषयी बोलत असतांना मागुन एक जण ऐकतो आणी तो यांना तो गाळा विकत देऊन फसवतो) उद्घाटनाच्या दिवशीच एक माणुस येऊन गुरु समोरच सांगतो की हे दुकान / गाळा त्याच्या मालकीचे आहे, आणी तो ते सिद्ध पण करतो. हा मुर्ख गुरु, शनया वा इशाला ते पैसे परत मागत नाही, त्या आधी ती इशी पण शनयाला ते पैसे परत करु देत नाही. दोघी जणी ते पैसे हडप करतात आणी ही भिकारी शनया तिचे एकदा वापरलेले कपडे पण त्या बुटीक मध्ये विकायला ठेवते.

अरे हो हे आठवतं आहे मला.. शी$$$ किती काय काय फालतू गोष्टी घडल्यात या सिरेलित
आणि परवाचा एक एपिसोड ज्यात शनाया त्या लहान मुलाकडे पैसे मागते तो देत नाही मग त्याने मागे ठेवलेला शिरा खाते, देवळात बाईला प्रसाद म्हणून पास्ता ठेवा म्हणते हे प्रसंग अत्यंत किळसवाणे होते. Sad शनायाला करताना काहिच कसं नसेल वाटलं? Uhoh

ह्यात समिधा परत negative होईल बहुतेक. आत्ता कालचा एपिसोड बघितला. राधिका समिधा काम स्लो करते म्हणून बोलते तिला आणि मिटिंगला नेत नाही. जेनीला नेते, तिचे कौतुक करते. समिधा pregnant आहे म्हणून स्लो करत असेल तर तिला समजून घ्यावं, राधिकाचं पटले नाही मला आज.

जेनीला नेते, तिचे कौतुक करते>>> आणि प्रमोशन पण देणार आहे. स्पेअर लॅपटॉप होता जेनी कडे म्हणून presentation देता आल या मूळे ती खुप हुषार आहे अस सगळ्यांच मत आहे.

काही पण ....

राधाक्कांनी, काल त्या परत एकदा डोक्यावर पडल्या आहेत हे सप्रमाण सिद्ध केले. समिधाच्या बाबतीत मला तिचे कालचे वागणे नाही पटले. तिच्या कामावर टीका करणे ठीक, पण हे म्हणजे लेकी बोले सुने लागे या टाईपचे होते.

आणी गुरु घराबाहेर गेल्यावर , शनयाला ती जेव्हा बोलायला जाते, तेव्हा तो लेमन+ पिस्ता अशा कलरचा शर्ट, ब्ल्यु कलरच्या पँट मध्ये इन केला होता, आणी पुढुन कुठलासा ब्ल्यु प्रिंटेड स्कार्फ घातला होता. तेव्हा मागुन प्रचंड ढब्बी दिसली. मुळात ब्लेझर घातलेला नसतांना स्त्रीया असे शर्ट इन करत नाहीत, ते फार बेढब व बेडौल दिसते. एकवेळ शनयाने तसे केले असते तर ते ठीक होते कारण ती देखणी व स्लिम आहे.

आता अनिता दाते म्हणते की ती कामावर लक्ष केंद्रीत करते, टीकांकडे लक्ष देत नाही. अग्ग बाई, इथेच तू चूकतेस की. निंदकाचे घर असावे शेजारी. जरा वाच की लोक काय म्हणतात ते. तुला काय शोभते ते बघ की, तो दाढी केड्या काहीही लिहीतो आणी ही ते डोळे झाकुन करते. धन्य आहे ही बाई!

तू चुडीदारच घाल बाई, आणी चांगल्या साड्या नेस. तेच तुला जेन्युईनली शोभते. उगा त्या शनयाची बरोबरी नको.

किती बाष्कळ आहे सिरियल Sad
गुरूला टोमणे मारत होते वडिल. तेव्हा राधाक्का बरी चांगलं असण्याचा आव आणत होती. Sad
एरव्ही ती पण मारतेच की टोमणे गुरूला.

राधिका सर्वात चांगली त्या दिवशी ड्रेसमध्ये वाटली सौमित्र बरोबर गेलेली, आणि दुसऱ्या ड्रेसमध्ये, तेच घाल की ऑफिसमध्ये पण.

का उगा आता समिधाच्या पाठी लागली आहेस.

गुरूने शनायाला प्रपोज केले आणि अंगठी घातली. आता मग परत साखरपुडा कसला. शनायाचे पितळ गुरूसमोर एवढ्या वेळा उघडे पडले तरी गुरू परत परत शनायावर कसा विश्वास ठेवतो. आता परत राधिका जासूसी करणार आणि सापुच्या दिवशी राडा घालणार. हेच चक्र किती दिवस चालू राहणार. आज राधिकाच्या साबांचा वाढदिवस साजरा झाला आणि नेहेमीप्रमाणे राधिकाने भरपूर लोकांसाठी भरपूर स्वयंपाक केला, तिकडे गुरू आणि शनाया दोन वेळा हाॅटेलात चायनिज हादडताना दिसले. ईशा किती हलकट आहे, शनायापेक्षा ती जास्त स्वार्थी आहे. शनाया उघडपणे डल्ला मारते आणि वाईट होते पण ही तर सगळं करून नामानिराळी.
चहयेद्यामध्ये राधिका, शनाया, अंजलीबाई आणि नंदिता आल्या होत्या. शनाया सगळ्यात गोड वाटली चौघींमध्ये. सेटवरही गुरू अनिताशी कमी आणि रसिकाशी जास्त बोलतो Happy

हो हो... झी युवा वरे! मलाही आधी अत्यानंद झालेला की ही संपत्येय!
आता शनाया एकदम खुश आहे..डेस्टिनेशन एंगेज्मेंट, कपडे, खरेदी....नुसता धुमाकूळ....गॅरीला मनःपूत लुटणे चालू आहे...आणि तो येडा.....उधळतो आहे हिच्या वर!

परवा शनायाने गुरुच्या आईची अ‍ॅक्टिंग मस्त केली आईबै काय ग बै नको ग बाइ म्हणून. क्यूट.
बाकी आईचे काम मस्त. काहीच चिडत् नाही गुरूवर त्याला सल्ला देते वगैरे. मला एखादा माणूस उगीच एखाद्या मुलीवर पैसे खर्च करेल हेच झेपत नाही.

मध्यंतरी , तो समिधाला डावलते तो एपिसोड बघितला.
राधाक्का , सगळ्यांसमोर सांगते , माझ्या मनात एक विचार आहे , म्हणजे बघा हां , तुमच्या सगळ्याना काय वाटतं , आपण जेनीला प्रमोशन देउया का?
कैच्याकै

आंबट गोड >> तुमच्या कमेंटवरुन काही दिवसांपुर्वि नजरेला दिसलेला एपी आठवला, त्यात तो गरी, शनायाच्या मागे मागे करत होता सापुसाठी, अस्से डोके फिरले न माझे Angry

तो केड्या, दिग्दर्शक सगळ्या प्रेक्षकांना काय येड्या समजतात का Uhoh थोडातरी सेन्स ठेवावा की नाही या लोकांनी. ह्या असल्या संबधात एखादी स्त्री अन पुरुष कितीही निर्लज्ज नालायक असले तरी आधीचे लग्न न मोडता असे कुणी वागते का????? अन समजा चुकुन असेल कुणी खरेच असे तरी हे असले काही नॅशनल टेलीविजनवर दाखवायचे म्हणजे टू मच आहे. अन शनाया, ही कितीही पैश्यांसाठी हपापलेली असेल तरी, काय ते माकडचाळे . अन वर तीची मैत्रीण ईशी बोलते की तु बन्यासोबत गेली असतीस तर मी गरीला पटविले असते. खरेच असते का कोणी ईतके चिप. काहिही म्हणजे अगदी काहिही दाखवित आहेत हे लोक अन तेही अजुन किती वर्ष दाखविणार आहेत देव जाणो. मुर्खांचा अन निर्लज्जांचा बाजार नुसता.

रच्याकने, कालपासुन स्टार प्रवाहवर छत्रीवाली नावाची नविन शिरेल सुरु झालीये, तर किमान आमच्या घरी तरी आता हे प्रकरण बंद असे मम्माने कालच सांगीतले... म्हटले चला थोडे बरे झाले आता वेगळी नविन लफडी-भानगडी बघा पण किमान थोडा बदल तरी.

जेनी म्हणजे फार गुणी राधाक्का म्हणत होत्या ना आपण दोन ऑर्डर मध्ये किती प्रॉफिट कमवला तर जेनी २५% म्हणते मग अक्का ह्याचे काय करायचे? इन्वेस्ट करू या. मग जेनी म्हणते मी स्कीम्स बघते. मग अक्का म्हणतात आपण ते सर्वांना देउया की. वा वा वा तालिया. त्यापेक्षा भाड्याने घर घेउन तिथे शिफ्ट झाली तरी बासए. गुरूला रान मोकळे ऑरेंजेस घरी परत. तुकडा पडला असता.

गुरु नुसताच डोक्यावर पडलेला नाहीये, तर तो एकदा बच्च्या बरोबर बागेत गेला असतांना झोका खेळत होता. Parallel bars accident

Still Rings

झोका चूकुन खूपच उंच गेला, त्यामुळे गुरुचा घाबरुन तोल गेला, आणी तो वरुन तरंगत येत असतांना एका घसरगुंडीवरुन आपटत, घसरत येऊन खाली डोक्यावर आपटला, त्यामुळे त्याचा मेंदू बधीर झालाय, उग्गाच त्या शनयाला दोष देण्यात अर्थ नाहीये.

तर काल बच्चा बाळ हापिसात प्रकटलं. आणी तिचे ( बच्चा बाळीचे) बालिश हट्ट सुरु झाले. सापु करता तिला २५ लाखाचा लेहेंगा हवा होता आणी बाकी खर्च ब्ला ब्ला ब्ला...

हे ऐकुन गुरुचे बिपी हाय झाले. त्याने तिला खुणेने पाणी मागीतले तर हिने ते त्याच्या तोंडावर मारले., आणी त्याच्या छातीवर पण दणादणा हाणले. काय तर म्हणे CPR देत होती. त्या गुरुच्या जागी दुसरा शहाणा असता, जो सुधारला असता, त्याने तर तिला कानफडवुन हाकलली असती. पण हे येडं पुरतं भाळलं आहे ना. कामातुराणां.......

कामातुराणां>>>>>> छे छे. हे असं काही नसतंय हो त्यांच्यात.

त्याने तिला खुणेने पाणी मागीतले तर हिने ते त्याच्या तोंडावर मारले., आणी त्याच्या छातीवर पण दणादणा हाणले. काय तर म्हणे CPR देत होती.>>>>> Lol हे बाकी कैच्याकैच .

Biggrin अगदीच कैच्या कै चाललंय......!!
अमा... Happy २५% प्रॉफीट...? अन्बिलीव्हेबल! ... बरं झालाही असेल एक वेळ....पण मग फ्युचर प्लॅन्स, प्रोजेक्ट्स साठी काय सोय ? काय असा वाटून टाकायचा खाऊ म्हणून?
व्हीबी... Happy चिल! इतक्या सिरीयसली कशाला पहायची मालिका?
२५ लाखांचा लेहेंगा...... ? नक्की किती लिमीट आहे गुरवाने दिलेल्या कार्ड वर? काहीही.....
गुरु गुढघ्यांवर बसून म्हणे.. "माझ्याशी साखरपुडा करशील?" .. Lol
मी तर असं पहिल्यांदाच ऐकलं....!!!!!!!!!!

२५ लाखांचा लेहेंगा...... ? नक्की किती लिमीट आहे गुरवाने दिलेल्या कार्ड वर? काहीही.....>>>

मुळात त्याला पगार किती आहे? एवढे पैसे खर्चू शकतो तो!! आणि तेही क्रेडिटकार्डवर!!
आणि त्या मानाने त्याचा फ्लॅट काही एवढा पॉश वाटत नाही! कारण त्याच्या ऑफिसात हाताखाली काम करणारी बाई त्याच्याच शेजारी राहते! कामधंदा काहीही नसलेली शन्याची मैत्रीण पण तिथेच राहतेजी गुरुच्य क्रेडीट कार्डवर ऐश करते! आणि ती राधिका तर आता इन्टरनॅशनल कंपनीची मालकीन ती पण त्याच फ्लॅटात राहते!

२५ पासून नवी सुरु होतीय. जाहिरात बघीतली. >> कदाचित झी युवावर येतेय नविन मालिका, मराठे वर नाही >> मला वाटते आम्हि दोघी असे नाव आहे.

Pages