Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल चहयेदया बघताना एक प्रोमो
काल चहयेदया बघताना एक प्रोमो बघितला सिरियलचा. शनाया kidnap झाली म्हणे.
सौमित्र आणि धारकका चे लग्न
सौमित्र आणि धारकका चे लग्न लावून द्या. पीडा टळेल गुरूच्या मागची.
काल विनोदाची गोष्ट म्हणजे
काल विनोदाची गोष्ट म्हणजे बनी बाय म्हणून जातो ती बिल्डिंग एअर्पोर्ट नाही टर्मिन ल टू. कसलीतरी बिल्डिंग आहे. काचेच्या खिडक्या वाली.
मागच्या दाराने गेला असेल
मागच्या दाराने गेला असेल
कालचा भाग सहज बघितला गेला!
कालचा भाग सहज बघितला गेला! ह्या उत्पादन करणार्या कंपन्या ना? मग जाहिरात कंपन्यांच्या पोटावर का पाय देतात म्हणे? जाहिरात काय असावी ह्यावर प्रेझेन्टेशन.. आणि त्यासाठी ही मिटींग!! काहीही फालतुपणा... त्या मिटींग मध्ये व्यक्तीगत वाद विवाद!! एखाद्या अध्यक्षाने दोघांना बाहेरची वाट दाखविली असती!
शनाया आणि रेवती छान दिसतात
शनाया आणि रेवती छान दिसतात आणि राहतात पण. शनायाचे कपडे लांब झाले का ?
मग जाहिरात कंपन्यांच्या
मग जाहिरात कंपन्यांच्या पोटावर का पाय देतात म्हणे? जाहिरात काय असावी ह्यावर प्रेझेन्टेशन.. आणि त्यासाठी ही मिटींग! >>> असा प्रकार प्रिटी झिन्टाच्या दिल है तुम्हारा मध्ये बघितला होता.
कालचा भाग सहज बघितला गेला!
कालचा भाग सहज बघितला गेला! ह्या मसाले उत्पादन करणार्या कंपन्या ना? मग जाहिरात कंपन्यांच्या पोटावर का पाय देतात म्हणे? जाहिरात काय असावी ह्यावर प्रेझेन्टेशन.. आणि त्यासाठी ही मिटींग!! काहीही फालतुपणा... त्या मिटींग मध्ये व्यक्तीगत वाद विवाद!! एखाद्या अध्यक्षाने दोघांना बाहेरची वाट दाखविली असती!>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
या असल्या बावळटपणाच्या प्रसंगाने आणि लेखकाच्या कल्पना दारिद्रया मुळे या सीरिअल मध्ये काही दिवसांनी राधिका मसाले ला नासा ने contract दिले अवकाशात अंतराळयान पाठवायचे असे दाखवले तरी आश्चर्य वाटायला नको .... .....

काय पण दाखवले तरी चालते कोण बघायला येते .... चालतंय सगळं असा अप्रोच

नाय तरी हे इंटरनाशनल मसाले बनवतायत कुठे फॅक्टरी दाखवायला लागलीय त्यांना ऑफिस घेतलंय ते कॅन्टीनच जास्त वाटतंय दिवसभर चरत असतात सगळे .... ................
हा हा ......सर्वात मोठ्या
हा हा ......सर्वात मोठ्या ऑर्डरस सुद्धा त्या बिचार्या चाळीतल्या बायकाच घरच्या घरी पूर्ण करतात.
आजचा भाग पाहिला ही लाईक्स ची
आजचा भाग पाहिला ही लाईक्स ची काय भानगड आहे?
कालचा भाग चुकला आहे.
आजचा भाग पाहिला ही लाईक्स ची
आजचा भाग पाहिला ही लाईक्स ची काय भानगड आहे? >> मी कै पूर्ण भाग बघितले नाहीयेत पण येता जाता बघितलेत त्यावरून सांगते.
राधिकाने नि गुरवाने कंपनीच्या मिटींगमध्ये परस्परविरोधी मुद्दे मांडलेयत. राधिका म्हणे की, अॅडचं टारगेट फक्त स्त्रियाच नाही तर फॅमिली असायला पाहिजे. कारण आता पुरूष पण स्वयंपाक करतात. आणि अॅडमध्ये साधं कुटुंब दाखवायचं सेलिब्रेटी स्त्री दाखवायची गरज नाही नि गुरवाला मात्र अॅडमध्ये सेलिब्रेटी स्त्री हवीय कारण त्याच्यामते टारगेट फक्त स्त्रिया आहेत कारण त्या रोज स्वयंपाक करतात.
मग तो कोण मेन असतो तो सामान्य माणसाचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी दोघांनाही आपापली मते सोशल मिडियावर टाकून काय प्रतिसाद मिळतो ते बघायला सांगतात. आता ज्याला लाईक्स जास्त त्याची आयडीया वापरली जाणार कारण ते सामान्य माणसाचं मत असणार.
अर्र्र्र्र्र्र्र~! काहिहि
अर्र्र्र्र्र्र्र~! काहिहि बालिश
अरेरे.
अरेरे.
सौमित्र गेला का? राधाक्काला
सौमित्र गेला का? राधाक्काला का नाही नेलं त्याने?
ह्या दोघांचं वाजवायला पाहिजे होतं. पण झी ला कुठली तेवढी प्रगल्भता असं काही दाखवायला.
तिकडे त्या रडुबाई मीराचं पण त्या बॉसशी वाजवायला पाहिजे. तर आहेच समीर समीर करत.
आता झाला ना ब्रेअकप डीवोर्स मग वाटा वेगळ्या करा ना. का त्याच फाटक्यात पाय घातलेला दाखवतात हे लोक.
तिने बॉसशी लग्न करुन मूव्हॉन झाली किंवा मग राधाक्का सौमित्राशी लग्न करुन मुव्हॉन झाली किंवा
लग्न करायचं राहुदेत निदान राधाक्का ने गुरुला डीवोर्सचे पेपर्स तोंडावर मारलेत, मोठी बिझनेस वूमन असल्याच्या अॅटीट्युडमधे
ब्लेझर कोट घालुन हसत उभी आहे ह्या सीनवर सिरीयल संपलेली मला खुपच आवडेल. पण हे कदापी शक्य नाहीये.
एकाही मालिकेत असं काहीही दाखवु शकणार नाही झी.
सस्मित..बाकी ठिके.... पण
सस्मित..बाकी ठिके.... पण प्लीज ते ब्लेझर-कोटाचं स्वप्न नको ना बघूस....... चुकून खरं झालं तर आम्हाला बघवणार नाही!!
ती ते गुंता झालेले केस, टाईट टाईट ब्लेझर- पँट, पांढरा भक्क चेहेरा, आवं आवं करुन भयताड बोलणं...याने डोक्यात जाते!!!!
अगं शेवट्च्या सीनमधे बघुन
अगं शेवट्च्या सीनमधे बघुन घ्यायचं एकदा
ती ते गुंता झालेले केस, टाईट
ती ते गुंता झालेले केस, टाईट टाईट ब्लेझर- पँट, पांढरा भक्क चेहेरा, आवं आवं करुन भयताड बोलणं...याने डोक्यात जाते!!!!>>
अरे पण मी परवा मिटींगचा सीन बघितला त्यात राधिका खूप छान दिसत होती. आणि एकदम प्रमाण मराठीच बोलत होती की. मध्येच एक दोन इंग्रजी वाक्य पण छान बोलली.
अर्थात मी खूप महिन्यांनी परवा ही सिरियल बघितली. तुम्हा नेहमी बघणाऱ्यांना जास्त माहित असणार.
मला एक कळत नाही, जीवन फुडस
मला एक कळत नाही, जीवन फुडस च्या मिटिंगला जिथे गुरू बडबड सुरू करतो तिथे राधिका त्याला उत्तर का देते?
घरी आल्यावर पण तो लाईक्स मोजत असतो तेव्हा पण राधिकाला पाहून काहितरी टोमणेवजा बोलतो तर तिथे ही ती पर्सनल घेऊन प्रतिउत्तर देते. काय गरज आहे? इग्नोर मारायचं ना सरळ? हे काय लहान मुलासारखं?
आणि अॅड कँपेनच्या सजेशन साठी कसली स्पर्धा? त्याने यांना काय मिळणार आहे नक्की? पैसे मिळण्याचा उल्लेख तर मला दिसला नाही कुठे. किती वरवरच्या असतात या सिरियलमधल्या मिटिंग्स ना?
. काय गरज आहे? इग्नोर मारायचं
. काय गरज आहे? इग्नोर मारायचं ना सरळ? हे काय लहान मुलासारखं?>>>
लेखकाकडे ह्या शिवाय दुसरे काही लिहायलाच नसेल तो तरी बिच्चारा काय करेल!
किती वरवरच्या असतात या सिरियलमधल्या मिटिंग्स ना?>>>
ह्या सिरेलवाल्यांनी कार्पोरेट वातावरण दिग्दर्शक नेमायला हवा.
तिथे ही ती पर्सनल घेऊन
तिथे ही ती पर्सनल घेऊन प्रतिउत्तर देते. काय गरज आहे? इग्नोर मारायचं ना सरळ? हे काय लहान मुलासारखं?>> खरं आहे हा राधिका चा प्रोब्लेम पहिल्या पासून राहिला आहे. गुरू म्हणतो ते खरे आहे खरेतर. ती खूप्च सर्व पर्सनल घेते.
कधीही मॅचुअरली वागत नाही. प्रत्येक ठिकाणी तोंड उघडून काहीतरी चिल्लर बोलते. गप्प बसून फक्त आपल्या कामावर लक्ष दिले सुरेख ग्रूम्ड दिसले. आराम केला तर खरे तर बरोबर होईल. टू मच मचमच यार.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/videos/vivalaunj/1693888/audience-likes-to-watc...
कालचा भाग मधेच थोडासा बघितला
कालचा भाग मधेच थोडासा बघितला तर राधिकाने गुरूला एक फोटो दाखवला शचा आणि म्हणे ती सकाळी राच्या आॅफिसच्या परिसरात फिरत होती आणि तीचे अपहरण झालेच नव्हते. हे ती एका फोटोवरून कसे सिद्ध करू शकते, फोटोवर तारीख आणि वेळ येते का. मोबाईलवरून काढला असेल तर नाही येत ना. कोणीतरी अपडेट द्या प्लीज.
मोबाईलवर काढला असेल तर सगळे
मोबाईलवर काढला असेल तर सगळे डिटेल्स येतात. तारिख, फोटोचे पिक्सेल, इ
शनायाने सिद्ध केले ना स्वतःच,
पण शनायाने सिद्ध केले ना स्वतःच, की तिने तो अपहरणाचा डाव पॅच अप करता व पैशाकरता केला होता म्हणून. मग राधाक्काने मागचे फोटो दाखवले असते तरी शेवटी सत्य बाहेर आलेच. पण त्या लांब नाकी इशाला पण अद्दल घडायला हवीय. शनया मुर्ख आहे, पण ती इशी महाचालू आहे.
अरे इथे वाचून मी बघितला
अरे इथे वाचून मी बघितला एपिसोड. राधिकाचं एवढं चुकीचं वाटलं नाही, इझिली कळतं की मोबाईलवर फोटो वेळ वगैरे.
ह्याउलट शनाया किडनॅपिंग सीन फार बाळबोध आणि बोगस होता. तो मुर्ख गुरु त्याला जरा गुंडाबद्दल संशय आला पण त्याने फार काही लक्ष दिलं नाही त्यामुळे राधिकाने मस्त घोळात घेतलं दोघांनाही. तिने मात केली त्या सीनमधे तरी दोघांवर पुर्णपणे.
ते येडं ध्यान गुरु, त्या
ते येडं ध्यान गुरु, त्या इशीला म्हणतं की टेन्शन घेऊ नको. अरे काय घेऊ नकोस? जरा तिच्या तोंडाकडे बघ की निरखुन, पैशाचा विषय निघतो त्या वेळी ती दात विचकुन हसत असते. या बावळटाच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने आधी त्या इशीवरच लक्ष ठेवले असते, मागे त्या इशीनेच याचे तीन लाख रुपये हडप केलेले होते.
Pages