माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे ही आणि तिकडे घाडग्यांची अम्रुता.>>>>> येस्स! दोन्ही पकाव झाल्यात. पण राधाक्का त्यातल्या त्यात सुसह्य आहे, ती अमृता नेहेमी दात काढत, डोळे विस्फारत सगळ्या अंशात मान फिरवत बोलत असते, आणी सतत उपदेशाचे डोस. ती हसली तरी दुसर्‍या क्षणाला धाय मोकलुन रडेल असे वाटते.

बरं, राधाक्का गुरोबाला घटस्फोट का देत नाहीयेत? नाहीतर ते शन्याबाळ गुरुशी लग्न करणारच नाहीये. मग फसेल तो गुरोबा, न घरका न घाट का. आणी असल्या नटनिवडुंगाकरता ( शन्या नटमोगरी आणी हा नटनिवडुंग ) वट पौर्णिमा कशाला?

रश्मे Lol
अस्सं कस्सं बै, भार्तीय सौंस्क्रुती आहे ही. ती मोडून कस चलेल? पाप लगेल ना बै

रश्मी, दक्षिणा Lol

चिंचे, शन्याला निवडून दिवाळं काढून घ्यायचं काय?? Wink

बरं, राधाक्का गुरोबाला घटस्फोट का देत नाहीयेत? नाहीतर ते शन्याबाळ गुरुशी लग्न करणारच नाहीये. मग फसेल तो गुरोबा, न घरका न घाट का. >>>>> कारण गुरुवाला जर कळल की शन्याने आपल्याला फसवलय, ती आपल्याशी लग्नच करणार नाहिये. मग त्याला पश्ताचाप होईल. मग झक मारत तो राधाक्काकडे येईल. आणि आपली राधाक्का काय, ती तर बसलीच आहे म्हणा वाट बघत की कधी आपला नवरा आपल्याकडे परत येतोय आणि आपण त्याला माफ करतोय. करेल त्याला माफ.

बादवे, समिधाने केली का वटपोर्णिमा? आता ती सुधारलीय ना.

नटनिवडून्ग >>>> Rofl

किती गोलगोल फिरत आहेत.... गनायाचे कधी एकत्र राहणे-कधी वेगळे राहणे, कधी त्यांच्यावर संशय घेणे, कधी त्यांच्यावर पाळत ठेवणे, ते ऑरेंजेस अधूनमधून येतात अन गुरवावर डाफरतात, गुरुची आई तर महावस्ताद बाई आहे...पोराचे प्रताप बघूनही सुनेला बरोबर घोळात घेतले आहे, शनाया अधूनमधून भिकारी होते, अधून्मधून हे दोगे फाल्तु प्लन करतात आणि बाकिचे त्यांना पकदुन रदारद कर्तात....कंटाला आलाय. मी त्र आता बगनेच सोदून दिले.

दक्षिणा, निधी Proud

सूलु, सध्या समिधा प्रेग्नंट असल्याने तिला सगळे सणवार माफ आहेत. Proud

शनाया अधूनमधून भिकारी होते, >>>>> Rofl

अधून्मधून हे दोगे फाल्तु प्लन करतात आणि बाकिचे त्यांना पकदुन रदारद कर्तात....कंटाला आलाय. मी त्र आता बगनेच सोदून दिले.>>>> सोनालीच्या कीबोर्ड मध्ये दक्षु शिरली. Biggrin

सोनालीच्या कीबोर्ड मध्ये दक्षु शिरली. Biggrin>>> Lol
ते लिहिताना पण इतका वैताग येत होता ना कि नीट टंकायचेपण कष्ट घ्यावेसे वाटेना.

Cid team ला टशन द्यायला धाराक्का आणि बाकीचे मावळे हॉल वर रेड टाकतात पण डोक्ययावर पडलेला गुरु शेण्या त्यांना तुरी देऊन पळतात। धारक्कचं तोंड बघा या सीन ला

सध्या समिधा प्रेग्नंट असल्याने तिला सगळे सणवार माफ आहेत. >>> बर झाल. पण मी प्रोमोमध्ये रेवतीच्या हातात ताट पाहिल. राधाक्काने तिला वटप्रोर्णिमेची पुजा करायला लावली की काय? Uhoh

राधाक्काने तिला वटप्रोर्णिमेची पुजा करायला लावली की काय? >>> नाही, गुप्तेभाऊंनी तिला सांगितलं की मला पुढचे ७ जन्म तूच बायको हवीस म्हणून तू ही पूजा करायचीच. Lol

रेवती नव-याशी नीट व्यवस्थित, त्याचा अपमान न करता बोलली तरी खूप झालं, तेच सांगायला हवं होतं गुप्तेने तिला. केडी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे Uhoh सापु झाला का, काल बघितलं नाही.

नाही, गुप्तेभाऊंनी तिला सांगितलं की मला पुढचे ७ जन्म तूच बायको हवीस म्हणून तू ही पूजा करायचीच. >>>> त्यासाठी पूजा सुद्दा तिनेच करायची!? Uhoh

राधिका त्या प्रोजेक्टरलाच आग लावताना दाखविली आहे..बिचारा तो मंगलम हॉल वाला...त्याची स्क्रीन नाहक जळली की!
आणि गुरु काय एकदम क्रूज वर असल्यागत शन्यचे उडणारे कपडे सावरत स्टाईल मधे दाखविलाय त्या बोटीवर....!!
Happy

यमाला आणि ब्रह्मदेवाला बायकांनी सांगितलेलंच कळतं, असं नारदपुराणात लिहून ठेवलंय, असं आमचे दादा सांगायचे.

चंपा, तुमको भिडे बाई मालुम नही ? बाई मालुम नही? नही? नही ?

भिडेबाई म्हणजे तारक मेहेता का उल्टा चष्मा मधली आत्माराम भिडेची बायको. ती पण घरात लोणचे पापड मसाले करते, पण तिचा नवरा भैताड नाहीये.

ते येडं गुरु आणी ती शन्या दोघे ठाण्याच्या किंवा दुसर्या गढुळलेल्या तलावात एका फाटक्या टीनपाट बोटीत उभे राहुन क्रुझ वर असल्यागत वावरत होते. Biggrin

ते येडं गुरु आणी ती शन्या दोघे ठाण्याच्या किंवा दुसर्या गढुळलेल्या तलावात एका फाटक्या टीनपाट बोटीत उभे राहुन क्रुझ वर असल्यागत वावरत होते. Biggrin >>>> अशक्य हसले मी पाहुन...

काय मुर्खपणा सुरूये Uhoh राधाक्का आणि रेवती इशाला पोलिसांची धमकी देतायत, त्यापेक्षा त्या गुरूला द्या ना म्हणावं. काहिहि म्हणजे काहिहिच Sad
डोकं उठतं ही सिरियल पाहिली तर Proud

नवरा हे असले धंदे करत बाहेर फिरत असेल तर कायद्याने त्याला काही उपचार देता येत नाही का? जसं त्या शनायाने खोटे गुंड दाखवून किडनॅपिंगचा शो केला तसा राधिकाने पण पैसे देऊन गुंड आणावेत आणि एकदातरी मस्त खरपूस समाचार घ्यावा गुरूचा. पण काय करणार...नवरा is परमेश्वर ना...

राधिका त्या प्रोजेक्टरलाच आग लावताना दाखविली आहे..बिचारा तो मंगलम हॉल वाला...त्याची स्क्रीन नाहक जळली की! >>>> Rofl

साखरपुडा झाला तर एवढ काय रडायची गरज होती हिला. त्यापेक्षा असा विचार करावा ना राधाक्काने, साखरपुडा कर किव्वा लग्न कर काहीही कर . मरेना का, मला काय त्याचे. शनायाच्या पाठीमागे लागून तोन्डावर पडणार आहेच तू, तेव्हा येशील माझ्याकडे नाक घासत.

धन्स रश्मी. तारक मेहता कधी बघितली नाही फक्त त्यातलं ते मराठी जोडपं गेली आठदहा वर्ष तीच मालिका करत आहेत हे वाचलं होतं.

सापु hall मध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखवला का, मग जाळण्यापेक्षा गुरुच्या मातोश्रींना दाखवायचं ना.

अग्गं अंजू....... Biggrin

सापु चे मोठ्या स्क्रीन वर लाईव्ह टेलिकास्ट होते...आणि यच्चायावत सगळी मंडळी हजर होती. म्हणजे रेवती- गुप्ते, महाजनी, ऑरेंजेस, नाना नानी, आनंद, राधिका....

आणि गुरु साखरपुड्या पेक्षा यांना चिडविण्यातच जास्त एंजॉय करत होता.....

Pages