Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेघा-सै ग्रुप मोठा होतोय.
मेघा-सै ग्रुप मोठा होतोय. तशात ऋतुजा माघारी आली तर ती नक्कीच रेशमचा ग्रुप जॉइन करेल. तीच म्हटलेली ना की जर दोन ग्रुप असतील तर त्यातला कमी शक्तिशाली ग्रुप मी निवडेन. मजा येईल तसे झाले तर.
बादवे, आज ऋतुजा ट्विटरवर लाईव्ह येणार आहे.
मला Bollywood theme ठेवलेलं
मला Bollywood theme ठेवलेलं आवडलं नाही. बीबी मराठी बोलण्याचा इतका आग्रह धरतात तर मग मराठी थीम ठेवावी...
>> बरोबर.
पण मला वाटतं ते वॉलिवुडच्या टॅगलाईनवर आधारीत होतं. वॉलिवुड मध्ये तुम्ही बॉलिवुड स्टार सारखे रहा अशी काहिशी टॅगलाईन आहे त्यांची.
कालचा कार्यक्रमाच ओके होता.
कालचा कार्यक्रम ओके होता. भुषणच बेअरिन्ग चुकल बाबुराव आपटे साकारताना. परेश रावल ने हाच रोल कम्बरेत वाकून केला होता.
रेशमचा डान्स छान होता. इतका वाईट नव्हता. सुन्दर दिसत होती काल.
पुष्कर तर सरप्राईज package होता. सई काय येस boss ची जुही चावला बनली होती?
सुशान्त कुलीचा अभिताभ बच्चन! धन्य!
स्मिता सुद्दा चान्गली नाचली. आउ तर नेहमीप्रमाणे एन्टरटेनिन्ग.
त्यारा च rap song मस्त होत. सुशान्तला इतक्या फुल्या मारल्या की तो रडण्याच्या बेतात होता.
शर्मिष्ठाला फुली कुणी मारली? भुषणला सुद्दा कुणीतरी फुली मारली होती, ते सुद्दा दाखवले नाही.
मला Bollywood theme ठेवलेलं
मला Bollywood theme ठेवलेलं आवडलं नाही. बीबी मराठी बोलण्याचा इतका आग्रह धरतात तर मग मराठी थीम ठेवावी...>>>हो. 'व्यक्ती आणि वल्ली' अशी थीम ठेवली असती तर जास्त मजा आली असती.
दिलेल्या कार्यात कोणत्याही सदस्याने कधीही कोणत्या व्यक्तिरेखेचे बेअरिंग घेतेलेले दिसले नाही.
जसे चोर-पोलीस कार्यात भुरट्याचोराचे, रुबाबदार पोलिसाचे, सांगकाम्या शिपायाचे. मर्डर मिस्ट्री मधे गुप्तहेराचे.
खेळ मांडिला मधे लहान मुलाचे. तिथे भांडणे सुरु झाली तरी बेअरिंग सोडले नसते तर भांडणे पण मजेशीर वाटली असती.
हखाचा अनसीन-अनदेखा मधे कुकरी शो पाहिला. त्याप्रकारचे मनोरंजन मटेरियल भरपूर देता येईल पण हे लोक बेडवर पडून एक तर कुचाळक्या तरी करत असतात किंवा डोळे उघडे ठेऊन झोपत तरी असतात.
सई काय येस boss ची जुही चावला
सई काय येस boss ची जुही चावला बनली होती? >> ती कुछ कुछ मधली काजोल झालेली.
बाकी, अशा परफॉर्मन्स मध्ये
बाकी, अशा परफॉर्मन्स मध्ये बायका फक्त नाच का करतात? आउसारखं वेगळं काहीतरी का करून दाखवत नाहीत? सुंदर आणि सेक्सी नाच केले की ती चांगली नटी म्हणून गणली जाते ही मानसिकता बदलायला हवी. मी अजून व्हूटवर बाकीच्यांनी काय काय केलं ते पाहिलं नाहीये. >>> ++११११ येस्स. मेघा घाडेला शोलेची बसन्ती परफेक्ट बसत होती. ( यू कि मुझे बेफिजूल बाते करनी की आदत तो है नही.
)
तिने ते करायला हव होत.
मेघा फुल्ली मारण्यासाठी जागेवरून उठल्याबरोब्बर रेशमची रिअॅक्शन जी होती त्यावरून ती मेघाच्या बाबतीत किती इनसेक्युअर आहे >>>> +++ ११११ रेशमने नाही मारली फुली मेघाला? का?
आऊने सुशांतची बाजू घेणं निव्वळ लाजिरवाणं होतं. करारी, खऱ्याच्या बाजूने उभं वगैरे राहण्याच्या वल्गना करतात तर जिथं खरंच चुकीचं घडतंय तिथं बोलून दाखवायला हवं होतं. स्मिताला समजत नाही वगैरे किती वाईट समर्थन केलं सुशांतचं! >>> अगदी अगदी सुशान्त त्याच्याच्या अन्गावर ओरडला होता हे विसरल्या का त्या? स्मिताच्या बाबतीत जे झाल हेच जर त्यान्च्या बाबतीत कुणी केल असत तर थोबडवल (त्यान्च्याच भाषेत) असत आउन्नी त्याला.
सई मेघा च वाजणार का? आज पण मेघा काहीतरी डिमिनींग बोलली सईला! >>> हे आज दाखवणार का?
सई काय येस boss ची जुही चावला
सई काय येस boss ची जुही चावला बनली होती? >> ती कुछ कुछ मधली काजोल झालेली. >>> क्काय? कुछ कुछ मधली काजोल अशी होती? मला ती इश्कची काजोल वाटत होती.
आज पूल पार्टी असणारे big boss मध्ये.
https://www.youtube.com/watch?v=7jNDFbu07-0
मला Bollywood theme ठेवलेलं
मला Bollywood theme ठेवलेलं आवडलं नाही. बीबी मराठी बोलण्याचा इतका आग्रह धरतात तर मग मराठी थीम ठेवावी... >>> झाली ना मराठी थीम 'महाराष्ट्र दिना' च्या वेळी. एक दिवस ठेवली Bollywood theme तर बिघडल नाही. हा, performances मात्र सो सो होते
किती सारे दिग्गज कलाकार मराठी मध्ये होते. >>>> +++११११११
परेष रावल पेक्षा निळू फुले खूप भारी साकारता आला असता. आणि दादा कोंडके तर एक नंबर झाला असता.
आणि रेषमची एखादी ठसकेबाज लावणी झाली असती ती श्रीदेवी च्या गाण्यापेक्षा भारीच वाटली असती... >>>> का हो वैजन्ती, तुम्हाला हिन्दी कलाकार आवडत नाहीत का? ते सुद्दा मराठी कलाकारान सारखेच Talented असतात की.
काजोल अशी होती? मला ती इश्कची
काजोल अशी होती? मला ती इश्कची काजोल वाटत होती. >> हा हा.. मग तीच असेल. मी तो भाग पळवत पाहिला.
१०००
१०००
सोती पोरगी......
https://www.youtube.com/watch?v=FY25O-EbsTU
हा हा.. मग तीच असेल. मी तो
हा हा.. मग तीच असेल. मी तो भाग पळवत पाहिला. >>>>
>> रेशमने नाही मारली फुली
>> रेशमने नाही मारली फुली मेघाला? का?<<
अहो, मेघा रेशमच्या खिजगणतीतच नाहि असं तिने वारंवार सांगितलेलं आहे. मग ती फुली कशी मारेल? रेशम हळुहळु "गेम" खेळायला लागलेली आहे...
रेशम हळुहळु "गेम" खेळायला
रेशम हळुहळु "गेम" खेळायला लागलेली आहे...
मागच्या वेळेस उना ने त्यांच्या गटाकडे पूर्णपणे दुर्लक्श केले होते. गुलाब पु ला तर निवडुंग मे ला दिले होते. ते बघून शिकली वाटते.
चला आज खोट्या एलिमिनेशनचा
चला आज खोट्या एलिमिनेशनचा ड्रामा व्यवस्थित पार पडला. त्यानिमित्तानं जुई, रेशम आणि भूषणचे खोटारडे चेहरे पुन्हा दिसले. भूषण हा सगळ्यात डेंजरस माणूस वाटायला लागलाय. तो फारच आतल्या गाठीचा आहे आणि अत्यंत हुशार आहे. जुई आणि रेशम कोणत्याही परिस्थितीत माजोरडेपणा सोडत नाहीत. महा हरामखोर आहेत ते तिघं.
मेघा, सई आणि पुष्की मधले मैत्रीचे बंध फार सुरेखपणे दिसले. सई डेंजरझोनमधे आहे हे कळल्यावरच पुष्कीचा चेहरा एकदम उतरला होता. विशेषत: तो स्वतः या करता कारणीभूत होता त्यामुळे त्याची परिस्थिती फारच वाईट होती.
मध्येच आपल्या ऋतुजाचा व्हिडिओ मेसेज होता. तिला बरं वाटलं तर ती परत येईल असं तिनं सांगितलंय. तिचा हात लवकर बरा होऊ दे.
स्मितावर ममा उगाच रागावले. ती जर जेन्युईनली पटकन कन्फ्युज होत असेल तर ती तरी काय करणार? काही जणांना नाही होत आकलन पटकन. त्यात रागावण्याचं काहीच कारण नव्हतं. अतिशयच वाईट रित्या ओरडले ते. मला अजिबात आवडलं नाहीये. ममांचा निषेध. आणि हा निषेध त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा. ती बिचारी काही बोलत नाही म्हणून तिच्यावर ओरडणार? अशानं ती आणखीनच कॉन्शस होऊन अजून कफ्युज नाही का होणार? या कारणास्तव तिच्यावर ओरडण्याचा ममांना काय अधिकार? जुई अथवा रेशमवर का नाही ओरडत असे? त्या तर किती उद्धटपणा करून बोलत असतात, खोटं बोलत असतात. निषेध! निषेध!! निषेध!!!
मेघानं आज आरोपीच्या पिंजर्यात स्वतःची बाजू ज्या आत्मविश्वासानं आणि अतिशय प्रभावी भाषेत मांडली त्याबद्दल तिचं कौतुक!
मेघानं आज ती एलिमिनेट झाली नाहीये हे कळल्यावर ममांच्या प्रश्नावर एक मास्टरस्ट्रोक मारला. ममांनी एक प्रश्न विचारला की ' आज या घरातून कोण एलिमिनेट झालं ते सांगा' . स्मिता म्हणाली की कोणीच नाही. पण मेघानं या संधीचा फायदा घेऊन सांगितलं की ' मला आतापर्यंत वाटत होतं की हे बाकीचे (पक्षी दुसर्या टीममधील) लोकं माझ्यावर प्रेम करत नाहीत पण आज त्यांच्या डोळयातील अश्रु बघता ते माझ्यावरही प्रेम करतात हे कळलं आणि माझ्या मनातील गैरसमजाचं एलिमिनेशन झालं.' मस्त खेळी मेघा!
आता याचे उद्या काय परिणाम होतायत, जळवा किती जळतायत ते उद्या कळेलच.
जुई महाहलकट आहे.
जुई महाहलकट आहे.
रेशम पेक्ष्या जास्त
फायनल अनाउन्समेंट नंतर जुईला
फायनल अनाउन्समेंट नंतर जुईला आनंद झाला नाही हे स्पष्ट दिसल . आपलं खरं रूप ती लपवू शकली नाही .
मामी मस्त मस्त.
मामी मस्त मस्त.
मेघाने खूप sportingly घेतलं elimination. मस्त ड्रामा होता कळल्यावर तिची reaction ग्रेट.
स्मिता confused असण्यावर म मां नी एवढा तमाशा करायची गरज काय होती. अशी कितीतरी लोकं असतात की उलट अशी असतात समाजात म्हणून हुशार लोकांची हुशारी उठून दिसते, सगळेच हुशार असतील तर कशी दिसणार हुशारी आणि स्मिता किरकिऱ्या जुईपेक्षा आणि अतिशहाणे, माज असलेले आहेत तिथे एकेक त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. निषेध खरंच.
स्मिता ! भाबडी वाटते खरच, मला
स्मिता ! भाबडी वाटते खरच, मला वाटत सतत कन्फ्युज उत्तर आले की होस्टला ही प्रोग्रॅम पुढे नेता येत नाही मग, तिथेच घोटाळत राहतो शो मग, ति खरच इतकी का कन्फ्युज असेल? जुई आणी भुषण सगळ्यात जास्त कन्निग आहेत.
मामी, नेहमीप्रमाणे मस्त आढावा
मामी, नेहमीप्रमाणे मस्त आढावा !
) एलिमिनेशन चा "टास्क" भारी ठेवला होता काल..
महेश ने (महेशच ! रेशम म्हणू शकते तर आम्ही का नाही
मेघाने सगळं स्पोर्टिंगली घेतलं की ११ सिझन फॉलो केलेल्या मेघाला काल एलिमिनेशन नसणार हे आधीच माहित होतं हे समजू शकलं नाही. मेघाला सगळं कळतं, येतं, माहित असतं वगैरे काही हिणवलं तरी ते बर्याचदा खरं असतं हे ती वारंवार सिद्ध करते. पुष्करच्या भाषेत बोलायचं तर या गेम साठी ती एकदम अॅप्ट आहे. मेघा एलिमिनेट झाली हे समजल्यावर जुई, रेशम, आस्ताद, सुशांत च्या चेहर्यावरचे सुप्त 'सुटलो' हे भाव, नंतर बदलताना पाहून मजा आली. पुष्कर-सई साठी फार वाईट वाटत होतं !
स्मिताला बळंच ओरडला महेश ! कदाचित शनिवारी कोणावर फारसं ओरडता आलं नाही, याची कसर भरुन काढत असेल .
आज माझ्या आवडत्या
आज माझ्या आवडत्या त्रिकुटासाठी , त्यांच्या मैत्रीसाठी किती Awwwww एपिसोड होता !
या तिघांच्या मैत्रीत गैरसमज, रुसवे फुगवे सगळं झालं तरी सई -मेघा -पुष्की मैत्री पुन्हा एकदा दिसून आली.
हे त्रिकुट शेवटपर्यंत टिकून राहु देत, फक्तं ग्रेट टिम/ ग्रेट फ्रेंड्स म्हणून नाहीत तर अत्ता पर्यंत खरोखरच हे तिघे सर्वात सिन्सिअर आहेत टास्क करण्यात , डिस्ट्र्क्टिव टास्क करत नाहीत म्हणून !
मेघा कसली स्ट्राँग आहे, सगळे रडले, ती नाही रडली, जाईपर्यन्त करेक्ट वागत राहिली एकदम , जाताना किचनच्या प्लॅटफॉर्मचा किस घेऊन एकदा फक्त रडली.
असा प्रँक करायचा तर बिग बॉस्स्ने अर्थात २ सर्वात स्ट्रॉंग आणि सर्वात पॉप्युलर स्पर्धक बॉटम २ मधे टाकले आणि मजा पाहिली.
बाकी कॅप्टन म्हणून मेघा पुन्हा सेफ, बोनस म्हणून सईलाही कॅप्टन रुम !
बघुया कोण होतय नॉमिनेट !
मला वाटतं खतरा जुई , त्यागराज किंवा आउ वर असेल !
म.मां बाकी खरच स्मितावर उगीच ओरडले
रच्याकने , ते स्पर्धकांना
रच्याकने , ते स्पर्धकांना प्रेक्षकांचे फोन येतात हल्ली, ते नक्की कुठल्या नंबरवर करायचे असतात म्हणे !
नाही.. तो नंबर अजून तरी कधी स्क्रीन वर दिसला नाही
रच्याकने , ते स्पर्धकांना
रच्याकने , ते स्पर्धकांना प्रेक्षकांचे फोन येतात हल्ली, ते नक्की कुठल्या नंबरवर करायचे असतात म्हणे !
नाही.. तो नंबर अजून तरी कधी स्क्रीन वर दिसला नाही
<<
कलर्स मराठीच्या सोशल मिडीयावर येतात पोस्ट्स कॉलर ऑफ द विक कसं अप्लाय करायचं !
स्मिता कन्फ्युज असते.. पण
स्मिता कन्फ्युज असते.. पण बर्याचदा तिच्या टिम विरुद्ध काहीबोलायची वेळ आली.. की काही बाही बोलतं रहाते..
काल पण मेघाने संध्याकाळी स्वयंपाक केला हे आठवलं तरी टिम विरुद्ध बोलताना ती घाबरते..
तसच स्मिता स्टँड घ्यायला पण घाबरते..
म्हणजे निवडुंग.. गुलाब देताना.. कोणाशी दुश्मनी/ जास्त दोस्ती होउ नये याची काळजी..
फुली मारताना बिंधास्तपणे.. सुशांत ला का नाही मारली ??.. उलट बाकीनी तिच्या भांडणावरुन सुशांत्ला फुली मारल्या..
सो बर्याचदा ती सेफ रहात मतं स्पष्ट देण्याचं टाळते.. तेव्हा ती कन्फ्युज असतेच असं नाही..
आतल्या बघितला कालचा episode
आतल्या बघितला कालचा episode मेघाने सगळ्यांसोबत मला पण रडवलं... खूप strong आहे ती.... She only deserve bigg boss prize... अणि बोलली पण मस्त कटघर्यात असताना रे अन grp la मस्त सुनावलं तिने...पुष्कर ला आज मैत्रीचा अर्थ कळला असेल.... त्याच्याकडे बघून खूप वाईट वाटत होतं...मेघा ne सगळ्यांना जाम रडवलं..... अगदी आस्तादसुद्धा किती अश्रू आवरत होता...
Btw resham किती शांत झालीये..
Btw resham किती शांत झालीये.... तिने घरूनच आणलेल्या confidence चा साठा नको तिथे जास्त वापरल्याने संपला वाटतं.. उघडपणे नाही तरी मनातल्या मनात हार मानली बिचारीने... मेघा मान गये..तुस्सी छा गए....
फुली मारताना बिंधास्तपणे..
फुली मारताना बिंधास्तपणे.. सुशांत ला का नाही मारली ??.>>>> कशाला चिखलात दगड मारायचा, आपल्याच अंगावर उडेल असं समजून गप्प राहिली ती, आणि फुली मारायला जवळ गेली तर तो नालायक ओढणी खेचायची भीती मनात होती ती वेगळीच.
मेघा कॉन्फिडन्ट आहेच पण
मेघा कॉन्फिडन्ट आहेच पण अमर्याद कामसू अन धीट आहे. सई आणि पुष्कर तिचे आयुष्यभरासाठी झालेले मित्र आहेत असे वाटतेय. फायनलमध्ये ती १००% असणारच.
मेघा आणि पुष्कर असायलाच हवेत
मेघा आणि पुष्कर असायलाच हवेत फायनलमध्ये.
कल्पतरू
कल्पतरू
मलाही स्मिताने फुली मारायला हवी होती सुशांतवर हे वाटलं मात्र, मी इथे आणि bb पेजवर पण लिहिलं आहे.
स्मिता अशी आहे, तिला
स्मिता अशी आहे, तिला confidence नाहीये, confused असते. ते तिने आधी भोगलेल्या आयुष्याची दहशत असावी. तिच्या नवऱ्याने तिला प्रचंड त्रास वगैरे दिलाय. मागे ती सांगत होती सर्व. तिचा एक निर्णय चुकला लग्नाचा, जे तिने ठरवलं. जातो काही जणांचा confidence, सगळेच काही परत लढायला उभे राहू शकत नाहीत.
Pages