बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुईचं प्रत्येक टास्कमध्ये एकच पालुपद असतं ..'शनिवारी आपल्यालाच बोलणी खायला लागतात.. ह्यांना कोणी काही बोलत नाही.. हे कसेही वागणार'
अत्यंत रडी खेळणारी, आतल्या गाठीची मुलगी आहे जुई.. जनरली अशा मुलींना आम्ही कटाप करायचो लहानपणी.

आतल्या गाठीची मुलगी आहे जुई.. >>> फक्त जुई नाहि. पुर्ण रे गृपच तसा आहे. आस्ताद ला तर असच वाटत कि त्याचे बोलणे हेच प्रमाणवाक्य आहे.... आगावू ...... आआ (आगावू आस्ताद)

एपिसोड सुरु झाल्या झाल्या मेघा रुसली, आणि सम्पताना सई रुसली. Lol नक्की चाललय काय त्यान्च? Uhoh

बाकी सई छान खेळली. मेघासुद्दा. रे ग्रुप अपोझिट ग्रुपला फिजिकल खेळू नका म्हणून बजावत होते आणि हयान्नी मात्र अख्खा फ्रेमच पाडला! चान्गली अद्दल घडली त्यान्ना. Proud

शरा बरी वाटली काल. पुढे बघूया कशी खेळते ते.

त्यागराजला आल्या आल्याच टास्क खेळायला लावत होते big boss . बाकी तो कुठल्या ग्रुपमध्ये जातो ते बघायला हवे. आस्ताद त्याला बघून जळत होता हे त्याच्या चेहर्यावर स्पष्ट लिहिलेले होते. सुमीत राघवन छान गातो असे तो जळक्या वृतीनेच म्हणत होता.

दक्षे, त्यागराजच नाव add कर ग लिस्टमध्ये.

मग माफी मागत बसला सई ची. >>> हे बरय सुशान्तच, आधी कळ काढायची आणि नन्तर Sorry म्हणायच. तो स्मिताला सुद्दा काल Sorry म्हणाला.

सुशान्तला खरच कानउघाडणीची गरज आहे काहीही बोलतो >>>> +++१११११ ती हखा सईला शब्द जपून वापर म्हणत होती तिला सुशान्तची 'अमृताची फळे' ऐकू आली नव्हती वाटत.

रेशम सांगत होती कि मी सु ला सपोर्ट करते कारण मला मे ला इम्युनीटी द्यायची नाही. बाकी पर्सनल लेव्हल वर काही वाकडे नाही. माझी मनापासून ईच्छा आहे कि तिने सगळं फेस करावं.
अनदेखा मधे पुष्कर जुईबद्दल बोलत होता...हिला एव्हढे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की आहेत का? त्याचा आव आणते ही? हिचे रडणे खूप फेक वाटते. रडताना पण हसल्यासारखी दिसते. तिचा चेहराच हसरा आहे. ... त्यापुढे भुषन आणि मेघा म्हणाले आता हसरा म्हणून सारवासारव करु नकोस Happy

खरंच फार किरकिरी आहे जुई. इतकं रडून कशाला खेळायला पाहिजे. आणि स्वतःचा शब्द प्रमाण असल्यागत वागायचं कारण नसताना. मांजरेकरांशी बोलतानाही उद्धटपणे मध्येच बोलणार वगैरे. मांजरेकरांनी म्हटलं पाहिजे तिला काहीतरी.

स्मिता पण मदत करत होती मेघाला बराच वेळ, पुष्कर एकटा पडत होता म्हणून थोडा वेळ त्याला मदत करायला गेली आणि आस्तादला शहाणपणा सुचला, जो शेवटी त्याच्यावर उलटला. ऋतुजा हवी होती काल.

मेघाच्या स्पिरीटला आणि give up न करणे, ह्या वृत्तीला सलाम. पडली पण पाय चौकटीवरचे सोडले नाहीत.

आस्ताद स्मिता आणि सईबद्दल सुशांतला सांगत होता की यांना उठता लाथ, बसता बुक्की करायला पाहिजे. अतिशय घाणेरडी मानसिकता पण वरुन बुरखा सुसंस्कारी असल्याचा. तडफदार, हुशार स्त्रिया पाहुन जळफळाट होतो यांचा.

हो ना आणि सुशांत पण म्हणाला सॉरी उगाच बोललो स्मिताला. माज, माज आणि फक्त माज आहे रेशम, आस्ताद आणि सुशांत यांच्यात.

ह्यांच्यात राहून तो भुषण कडू आणि कीरकीरी पण माज करतात. होप की स्मिता सुधारेल.

हा सुशांत रड्या आहे नुसता, कसलीही खिलाडू वृत्ती आजिबात नाही. समोरच्याने कितीही उचकवलं तरी पण न डगमगता, स्थीर वृत्तीने उभं राहणं तिथे अपेक्षित होतं. आणि हा पठ्ठ्या बघून घेईन अन लक्षात ठेवेन वगैरे क्रॅप मारत बसलाय.
जन्मजात लूझर असावा हा.

मेघाला तिच्या चाहत्यांनी किंवा नातेवाईकांनी निरोप पाठवायला हवा कि -
१. बाई गं, इतकं उद्विग्न होऊ नकोस. दर वेळेला तुच कॅप्टन होणं गरजेचं नाहि. शिवाय तसं झाल्याने तु ऑट्मेटिक बिग्बॉस जिंकणार नाहिस. एक्दाहि कॅप्टन न झालेले लोक, निव्वळ सच्चाई आणि प्रामाणिकपणावर बिग्बॉस जिंकुन गेलेले आहेत.
२. रेशमचा तु एकदातरी नॉमिनेट होण्याचा सल्ला मनावर घे. कारण त्याशिवाय तुला स्वतःला आणि तुझ्या चाहत्यांनाहि कळणार नाहि कि तुला किती मतं पडतात ते. सध्या चाहते या भ्रमात आहेत बाकिच्यांपेक्षा तुला भरपुर मतं पडतील तर तुला स्वतःला वाटतं कि बाहेर लोकांना तु कोण आहेस हेच माहित नसल्याने मतं कमी पडतील. हा लोचा (भ्रम) असाच पुढे चालु राहिला, तर तुझ्याच एखाद्या चूकिच्या खेळीने तु नॉमिनेट होऊन त्याच वेळेस एलिमिनेट होऊ शकतेस. बिग्बॉसचा हा इतिहास आहे.
३. तुझ्या सततच्या नौटंकिमुळे सहसा मत न देणारे हि तुझ्या विरोधी सदस्यांना मतं देउन तुझा पत्ता कट करु शकतात. टास्क्स जिंकुन कॅप्टन होतेस, पण स्वतःच्याच समर्थकांवरंच अविश्वास आत्तापासुन दाखवुन, पिर्पिर करत राहिल्याने तुझी इमेज बिघडत आहे. जे पुढिल प्रवासाकरता हानिकारक ठरु शकेल याचा विचार कर...

आज रेशम ने खरच आग लावली..
काटे नही कटते ये दिन ये रात....
O h M y G o d...!!
खल्लास! !
Unbelievably as close to Sri Devi..
Gr8 performer.
(राजा बाबू काही आज झोपत नाहीत ) Wink

टास्क दरम्यान आस्ताद स्मिताला तिच्या मराठी वरून ( उच्चारण) कंमेंट्स करत होता . स्वतःचं मराठी स्वच्छ आणि छान असणं हि चान्गली च गोष्ट आहे पण त्यामुळे समोरच्या मराठी कमकूवत असणाऱ्या व्यक्तीला कमी लेखणं हे योग्य नाही. समोरची व्यक्ती माणूस म्हणून किती तरी मोठी असू शकते .

मराठी चांगलं आहे पण बोलायची अक्कल कुठे आस्तादला.

पुष्कर आज छान बोलला. स्मिता hurt झालेली दिसून येत होती. पण तिने सुशांतच्या कपाळावर का फुली मारली नाही. फक्त आस्तादला मारली.

गिरे तो भी टांग उपर ह्या हिशोबाने सुशांतने तिच्या कपाळावर फुली मारली.

आज मामीची डिटेल आढावा पोस्ट मिस करतेय मी.

स्मिताला रंग आणि कॅमेरा यावर चिडवलं महेशसरांनी तेव्हा कित्ती गोड उत्तर दिलं तिने, तुम्ही हसलात ना सर मग बास झालं तर, so sweet मला आवडलं ते उत्तर.

आजच्या एपिसोड मध्ये सुशांतची बाजू घेत आऊंनी म्हटलं स्मिता ला काही कळत नाही ( तिच्या ऍप्रॉन खेचण्या च्या टॉपिक च्या संदर्भात ) , असा काहीसं बोलून आपली सुशांतला सावरणारी comment केली . असं कसं ! स्मिता ग्रोन उप म्हणून सहभागी झाली आहे BB मध्ये. तिला काही कळत नाही ती काहीशी dumb आहे असं समजून तिच्या बद्दल कोणीही काही करायचं का !
"बरोबर" ची बाजू घ्या ऐवजी , specially सुशांत ची मुलींबद्दलची उद्गामी च्या against बाजू घेण्याऐवजी , आऊ उगीचच त्याच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करत होत्या.

हो आऊनी असं म्हणणे नाही आवडलं मलाही. स्मिता करेक्ट होती, तिने आपल्या परीने सांगितलं पण. तरी सुशांतच्या बाजूने बरेच जण बोलत होते. ती जुई पण, म मां नी तुझ्या बाबतीत असं झालं असते तर असं दोनदा सुनावलं तेव्हा कुठे गप्प बसली की नसतं चालले मला.

मला तर वाटतं शेवटी म मां नी विषय stop केला त्याऐवजी सर्वांसमोर माफी मागायला लावायला हवी होती स्मिताची सुशांतला.

त्यागराज बरोबर बोलला ह्या मस्करीबद्दल पण स्मिताने सुशांतच्या कपाळावर फुली मारून परत एकदा सुनवायला हवं होतं.

Performances नीट काही बघितले नाहीत, पुष्करचा बरा वाटला थोडा बघितला. रेशमचा बघावासा पण वाटला नाही, स्मिताचा पण अगदी थोडा बघितला पण तीन जणांत पुष्कर हवा होता असं कुठेतरी वाटलं. काही बक्षीस दिलं का. हातात काहीतरी दिसलं तिघांच्या.

काल आढावा देऊ शकले नाही याबद्दल माफ करा. कृपया मला नोकरीवरून काढून टाकू नका.

काल घरातल्या सदस्यांनी बॉलीवुडच्या काही कॅरॅक्टर्सचं आपल्या प्रकृतीशी साधारण मेळ खाणारं सोंग वठवलं होतं. वॉलीवुड पुरस्कृत हा कार्यक्रम ठीकठाक झाला. सगळ्या सदस्यांची नाचगाणी न दाखवल्याबद्दल बिग बॉसचे आभार. ज्यांनी चांगलं केलं त्यांचेच अविष्कार दाखवले असं म्हणावं तर अस्तादचा पण दाखवला की! अति बोअर केलं अस्तादनं. नुसतीच पकपक. त्यापेक्षा पुष्कीनं मस्त बेअरिंग घेतलं होतं. पुष्कीच्या वेळी खाडिलकर पेंगत होते की काय? रेशम मस्त नाचली नो डाउट. पण तिच्या नाचण्यात समहाऊ ती स्वतः आनंद न घेता मी दुसर्‍यांना पुरेसं इम्प्रेस करतेय ना या विचारानं नाचत होती असं वाटलं. चुकीचं काही नाही त्यात अर्थात पण जस्ट एक नोंद. स्मिता मस्त नाचली आणि फार फार गोड दिसत होती. आउचं पचकन थुंकणं मस्त होतं. पण वयामुळे गब्बरचे संवाद काही तितक्या आवेशानं म्हणू शकत नव्हत्या. गब्बर आता " तुमने मेरा नमक बिमक खाया है वो सब ठीक है, पण अब अगर मई तुमको गोली खाने को दुंगी तो मेरा क्या चुक्या? " असं विचारेल असं वाटत होतं. खाडिलकरांनी अस्तादच्या ऐवजी पुष्कीची निवड करायला हवी होती.

बाकी, अशा परफॉर्मन्स मध्ये बायका फक्त नाच का करतात? आउसारखं वेगळं काहीतरी का करून दाखवत नाहीत? सुंदर आणि सेक्सी नाच केले की ती चांगली नटी म्हणून गणली जाते ही मानसिकता बदलायला हवी. मी अजून व्हूटवर बाकीच्यांनी काय काय केलं ते पाहिलं नाहीये.

रच्याकने, हे असे प्रोग्रॅम्स आधीच ठरलेले असतील ना? ड्रेसेस तयार कसे असतात या लोकांचे? शिवाय प्रॅक्टिस करायलाही वेळ हवा.

काल ममांनी जुईला झापलं किरकिर करते म्हणून, सतत नुसत्याच कंप्लेंट्स करते म्हणून . स्मिता प्रकरणी देखिल तिला जाब विचारला " तुला चाललं असतं का ?" असा प्रश्न विचारून. उत्तम!

स्मिताप्रकरणी रेशमची भुमिका काय होती ते कळलं नाही. कळायला हवी होती.

सुशांत आता फारच डोक्यात जायला लागलाय. प्रेशरमुळे, इमेज टिकवायला तो सॉरी वगैरे बोलतो पण मूळ स्वभाव अतिशयच एमसीपी आहे.

कपाळावर सात फुल्ल्या घेऊन अस्ताद खलनायक ठरला. जरा आत्मपरिक्षण करणार का भाऊ? मेघा फुल्ली मारण्यासाठी जागेवरून उठल्याबरोब्बर रेशमची रिअ‍ॅक्शन जी होती त्यावरून ती मेघाच्या बाबतीत किती इनसेक्युअर आहे आणि तरीही ' मी तुला घाबरत नाही' चा खोटा आव आणते हे बघून पुन्हा एकदा हसू आलं.

शर्मिष्ठा राऊत आवडतेय. खाडिलकरांबद्दल अजून काही मत नाही. पण काल त्यानं ते एक रॅपसाँग उत्स्फुर्तपणे आणि छान गायलं आणि आपसूक बाकीच्यांची पावलं त्यावर थिरकायला लागली. मजा आली. पण रेशम खडूस पणे नुसती वर खाली त्यागराज कडे बघत होती. रेशम सतत दुसर्‍याला जज करत असते असं दिसतं.

बाकी, बिग बॉस मराठी हा कार्यक्रम स्पॉन्सर्सच्या जाहीराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत परिणामकारक रित्या पोहोचाव्यात यासाठी रचलेला प्रॉग्रॅम वाटतोय. रिन काय, वॉलीवुड काय. असो, चालायचंच. द होल थिंग इज दॅट के भैय्या सबसे बडा रुपैय्या!

एखाद्या विकेंडच्या वाराला ममांनी क्लिपा दाखवून सदस्यांचे पितळ उघडे करून दाखवण्याचा खेळ केला पाहिजे.
उदा. आम्ही तुमच्याबद्दल बोलतच नाही आम्ही आपापसात दुसरंच काही बोलत असतो म्हणणारी रेशम, रेशम राजेशबद्दल हखाकडे बोलणारी आणि शिवाय सतत किरकिर करणारी जुई, इकडचं तिकडे करणारी आउ आणि आपल्या जिवलग मैत्रीणींबद्दल रेशम टीममध्ये बोलणारा पुष्की ... सॉल्लिड मजा येईल.

मला तर वाटतं शेवटी म मां नी विषय stop केला त्याऐवजी सर्वांसमोर माफी मागायला लावायला हवी होती स्मिताची सुशांतला. >> हो ना !

स्मिताने स्वतःचा स्टॅन्ड घ्यावा असं वाटतं, खरंच वाईट वाटतं तिच्याबद्दल, चान्गली प्लेअर आहे ती .

माझी fav मेघा आहे. सई , ऋतुजा पण आवडतात . पण सई चा फोकस नाही आहे . ती बालिशपणे वागते , missing ऋतुजा!!
का कुणास ठाऊक मला असा वाटतंय कि ऋतुजा गेली नाही आहे , २-३ आठवड्यांनी ती ठीक होऊन परत आणतील तिला . तिच्या नावाची पाटी अजुनही आहे तिथे. Would love to see her in top ४-५.

धन्यवाद मामी.. आजच्या भागाचेही विश्लेषण नक्की टाका ही विनंती.. आज आयपील मुळे बिग बॉस ला ब्रेक माझ्यातर्फे.

मामी च्या पोस्ट्ला +१
सगळ्यांचे पर्फॉमन्स ओके होते. फार ग्रेट काही वाट्लं नाही.
एक दिवस टिपी मधे घालवला एवढच.. रोज टास्क,भांडणातुन वेगळं काहीतरी.

पुष्करनी मस्त केलेलं. आस्ताद चं तर अलमोस्ट बोर झालेलं. डान्स छान झाले.मेघा, सई, जुई, सुशांत यांचं काहीच काम बघितलेलं नाही सो त्यांचे अभिनय बघायची उत्सुकता होती. दाखवले नाही म्हणजे फार चांगले नसावेत.
त्याखा च रॅप मस्त होतं.
मांजरेकर जुई आणि सु ला बोलले ते बरं झालं. आणखी बोला आणि हाकलवा. शरा अजून तरी अजिबातच डोक्यात गेली नाहीये. सई मेघा च वाजणार का? आज पण मेघा काहीतरी डिमिनींग बोलली सईला!

मला Bollywood theme ठेवलेलं आवडलं नाही. बीबी मराठी बोलण्याचा इतका आग्रह धरतात तर मग मराठी थीम ठेवावी...
किती सारे दिग्गज कलाकार मराठी मध्ये होते. परेष रावल पेक्षा निळू फुले खूप भारी साकारता आला असता. आणि दादा कोंडके तर एक नंबर झाला असता.
आणि रेषमची एखादी ठसकेबाज लावणी झाली असती ती श्रीदेवी च्या गाण्यापेक्षा भारीच​ वाटली असती...
आणि असंही wollywood असे नाव होते Bollywood नाही.

काय तो हौशी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, एक पुष्की सोडून कोणीच नाही आवडल !
हे स्पॉन्सर्ड टास्क बोअरच असतात !
बक्षिसं कै च्या कै दिली खात्याने, पण सुशान्तला फुल्ली मारून जे अगदी नेमक्या शब्दात कारण दिलं त्या बद्दल त्याला चुकीची बक्षिसं माफ Happy
मेघा आणि सईने सुध्दा बरोब्बर योग्य शब्दात सुनावून फुल्या मारल्या , आज प्रथमच दादागिरी गँगचे डिफरन्सेसही दिसले अस्ताद , सुशान्त वर त्यांच्याच गृपने मारलेल्या फुल्या पाहून !
हे फुल्ल्या टास्क बिग बॉसला बाकी हर्षदाने राजेशच्या तोंडावर व्हर्चुअल फुल्ली मारली त्यावरून सुचले का ? Proud
मेघा सई किती रुसोत किंवा कितीही वाजो एकमेकींशी , त्या एकत्र येत रहाणार , पालथा घडा गृपमधे रमणारे विचार दोघींचेही नाहीत हा कॉमन पॉईंट आहे तोवर !
बाकी शर्मिष्ठाच्या कपाळावर कोणी मारली फुली दाखवल नाही ? आल्या आल्या लगेच व्हिलन ? सही जा रही है थोडक्यात Wink
आऊ आता जायला हव्यात, काहीच करत नाहीयेत आणि टास्कही नाही , सुशान्तची कशाला बाजु घेत होत्या, म्हणे स्मिताला भाषेचा प्रॉब्लेम आहे Uhoh
गुड टच बॅड टच, वाइट नजर समजायला भाषा लागत नाही, जन्मतः समजतं मुलींना हे आउंना माहित नाही ?
म.मां ची शाळा बाकी फार म्हणजे फारच सौम्य पण सईच्या सिगारेट आयडीयाला दाद दिली आणि ओव्हरऑल सई मेघा पुष्की टिम डोकं लाऊन खेळते तुमच्यापेक्षा हे असताद सुशान्तला सांगितल ते फार बरं झालं !

आऊने सुशांतची बाजू घेणं निव्वळ लाजिरवाणं होतं. करारी, खऱ्याच्या बाजूने उभं वगैरे राहण्याच्या वल्गना करतात तर जिथं खरंच चुकीचं घडतंय तिथं बोलून दाखवायला हवं होतं. स्मिताला समजत नाही वगैरे किती वाईट समर्थन केलं सुशांतचं! या एका गोष्टीमुळे आऊ जायला पाहिजे असे वाटतं.

Pages