बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता अशी आहे, तिला confidence नाहीये, confused असते. ते तिने आधी भोगलेल्या आयुष्याची दहशत असावी. तिच्या नवऱ्याने तिला प्रचंड त्रास वगैरे दिलाय. मागे ती सांगत होती सर्व. तिचा एक निर्णय चुकला लग्नाचा, जे तिने ठरवलं. जातो काही जणांचा confidence, सगळेच काही परत लढायला उभे राहू शकत नाहीत.+11111 मलाही नेहमी हेच कारण वाटते तिच्या confused असण्याचे.

काल मेघासाठी रेशमच्या डोळ्यात पाणी आलं असताना जुई तिच्याकडे कंफ्युज्ड होऊन बघत होती.. रेशमताई रडतीये चक्क.. >>>हो हो. रेशम तरी अधून मधून हसत, रागवत मेघाशी बोलत होती पण जुई चिडलेली 'कधी जातेय ही' या विचारातच दिसत होती.

मेघाचे उत्तर मस्त होते कि मी ४-५ तास काम करते ते दिड तासाच्या भागात नाही दाखवणार, या घरात माझ्या समोर मला बोलायला मटेरियल दिले तर मी बोलणार Lol

पुष्करने आता मेघाबद्दल दुसर्‍या गटात जाऊन बडबड करणे बंद करावे. दोघींच्या नॉमीनेशन्साठी तो जबाबदार होता. आता ती चूक करु नये.

इथे काय किंवा इतरही माध्यमामांमध्ये काय, केवळ जुई अशी व्यक्ती आहे जिचे कुणीच समर्थन करत नाही. अतिशय चिडकी, रडकी मुलगी आहे ती.

काल मेघा नॉमिनेशनच्या कठड्यात असताना राजेशच्या पुनरागमनाबद्दल बोलताना धडधडित खोटं बोलली. राजेश परत आल्यामुळे तिला खुप बरं वाटलं वगैरे. प्रत्य्क्षात राजेश परत आल्यावर, रा-रेच्या पाठीमागे सईबरोबर ती त्यांच्या विरोधात बिचिंग करत होती. कोणाला आठवतंय? एक्नंबर नौटंकि. आणि तिचा "घरातुन गैरसमज एलिमिनेट झाला" हा ओढुन-ताणुन मारलेला डायलॉग तर अतिशय हास्यास्पद. मांजरेकरांसकट घरच्या सगळ्या सदस्यांनी एलिगंटली वेल लेफ्ट केला... Proud

कॉलर ऑफ द वीकने रेशमला मस्त चावी दिली. आता बघुया तिची तलवार म्यानातुन बाहेर येते का... Happy

काल मेघा नॉमिनेशनच्या कठड्यात असताना राजेशच्या पुनरागमनाबद्दल बोलताना धडधडित खोटं बोलली. राजेश परत आल्यामुळे तिला खुप बरं वाटलं वगैरे. >>>असं कुठे म्हणाली ती? उलट तिने सांगितलं की राजेश परत आल्यावर तिला खरंतर अजिबात आनंद वगैरे झाला नव्हता पण रेशमला खुश बघून तिला बरं वाटलं.

सुशांतला उगाच वाचवत गेली स्मिता, झाली असती nominate तर काय झालं असतं, किमान थोडा बदला घेतला असता.

ह्याला इमेज सुधारायची संधी दिली, स्वतः nominate होऊन स्मिताला वाचवलं असा त्याग बिग दाखवला सुशांतने.

तो सुशांत नालायक आज स्वतः च्या कृतीचं समर्थन करत होता. वर हे पण बोलला की स्मिताला लाज असेल तर असे कपडे नाही घालणार परत, आणि ती मारकी म्हैस किती घाणेरडी आहे, छपरी दाजी गेला तर आस्ताद, भूषणला स्वतः बरोबर रोमान्स करायला सांगत होती वाटतं, शेवटी तो आस्ताद लाजून बोलला आम्ही तुला ताई बोलतो तेव्हा ती घाणेरडी बाई सुशांतकडे गेली.

असं कुठे म्हणाली ती? उलट तिने सांगितलं की राजेश परत आल्यावर तिला खरंतर अजिबात आनंद वगैरे झाला नव्हता पण रेशमला खुश बघून तिला बरं वाटलं.>>>>+१ १११

रेशम डोक्यावर पडलीये. काल मेघा कंटेंट देते वगैरे स्वतःच बोलल्यावर आपण पण कंटेन्ट द्यायला पाहिजे हे तिला पुन्हा एकदा आठवलं पण तिची सुई जुन्याच तबकडीवर फिरत राहिल्यानं, अजून एक अफेअर करायची कल्पनाच तिच्या डोक्यात आली. आधीच्या अफेअरचं काय कडबोळं झालं ते अजून तिच्या गुडघ्यात घुसलं नाहीये बहुतेक. नशिबानं अस्तादनं ती कल्पना उडवून लावली नाहीतर त्याचाही भंगारपुरे पार्ट २ झाला असता.

मग महाराष्ट्राचे लाडके नेते, लोअरपरेल वैभव असे ते गुलाबी नॅपकीनयुक्त उमद्या व्यक्तीमत्त्वाचे श्रीयुत शेलार यांनी आपल्या सुपीक डोक्यातून नविन कल्पना काढली. काय की तर म्हणे रेशम बोले, दळ हाले असं वागायचं म्हणजे मग त्याबद्दल मेघा बोलत राहिल. अग्गबाई, अच्चं का. म्हणजे गेले ४०+ दिवस हा रोलप्ले होतच नाहीये असं म्हणायचं का तुम्हाला, शेलारभाऊ?

मेघा त्यांची पूर्ण टारगेट आहे हे स्पष्ट होत चाललंय त्यांनाच त्यामुळे तिच्याबद्दलच बोलत राहतायत. अस्ताद आज टास्कच्या दरम्यान मेघाचा उल्लेख ब्लॅक वेल्वेट करत होता - मेघानं आज ब्लॅक वेल्वेट ड्रेस घातला होता त्यावरून.

जुईचा कुचकेपणा आज सई पोळ्या करत असताना पुन्हा एकदा दिसला. जुई सईवर जळते हे तर माहितच आहे पण तरीही किती घाणेरड्या मनाची आहे ते दिसून आलं. सईचे हात फ्लफी आहेत असं पुष्की म्हणाला. फ्लफीला मराठीत काय म्हणावे हे त्याला आठवेना, तो म्हणे लुसलुशीत. तर जुई म्हणे सईचे हात थुलथुलीत आहेत.

खरंतर सईचे हात अजिबात थुलथुलीत नाहीयेत. सई ची शरीरयष्टीच मोठी आहे - बिग फ्रेम, बिग बिल्ट. पण आपल्याकडे स्त्री ही नाजूक साजूकच असली पाहिजे हे इतकं डोक्यात भरलेलं असतं की अ‍ॅमेझॉन स्त्रीया असू शकतात हे कोणाच्या लक्षात येत नाही. तिला सरसकट जाडी म्हटलं जातं. तसंही आपल्याकडे बॉडी शेमिंग इतकं सहजगत्या केलं जातं की करणार्‍याला आपण खूपच खेळकर मस्करी करतोय असंच वाटतं. इतकंच नव्हे तर ज्या व्यक्तीची मस्करी केली जाते तिनं निषेध न नोंदवता ते विनोद म्हणूनच घ्यावं अशी अपेक्षा केली जाते. ही सिक मानसिकता कधी बदलणार?

दोनदा पाण्याचा टास्क आणि आजचा दुसर्‍यांदाचा बाळाचा टास्क.... हम्म. बघतांव हा आम्ही बिग बॉस. तुम्हाला सुचत नसतील तर आम्ही सुचवू का कल्पना?

बाबागाडी पार्किंगच्या टास्क मध्ये रेशमच्या हाती सई बाळ देऊन सईचं नॉमिनेशन नक्की करून टाकलं बिग बॉसनं. रेशमचा तर डब्बल फायदा. पहिल्याच फटक्यात तिनं बाहेर उभं राहणं पसंत केलं. सई नॉमिनेट झालीच वर शिवाय पुढे टास्क करायची भानगड नाही. डबक्यातून बाहेर आलेल्या बेडकाप्रमाणे गाल फुगवून आणि डोळे गरागरा फिरवत आता दुसर्‍यांवर नजर ठेऊन बेंचावर बसायला मोकळी.

सईनं अस्तादबाळाला गोष्ट सांगून धमाल आणली. शरा मध्येच रिळसुईचं इंजेक्शन घेऊन आली तो प्रसंगही मजेशीर होता. शरानं म्हटलं काय होतंय बाळाला? तर सई म्हणाली की त्याला गुंडपणाचा त्रास होतोय. मोठेपणी तो गुंड दिसू नये आणि तसा वागू नये म्हणून इंजक्शन द्या. मेघा म्हणाली की अँटी अँगर लस द्या अस्ताद बाळाला.

स्मितानं खूप सुमडीमध्ये सुशांतला नॉमिनेट केला असं मला वाटतं. तिनं धावाधाव केली आधी पण शेवटी मुद्दाम मागे राहिली.

झालं शेलार मामानं नॉमिनेट झाल्यावर आलेला राग कसाबसा आवरला पण तो भूषण वर काढला. भूषणनं मागे राहून आऊला नॉमिनेट करायला हवं होतं असं सुशांतचं म्हणणं होतं.

मध्येच सई जुईला "तू खूप व्हाईनिंग करतेस. महेशसर म्हणूनच बोलले तुला." असं बोलताच जुईचा पापड मोडला आणि व्हाईनिंग म्हणजे काय ते तिनं लगेच दाखवून दिलं.

आजच्या टास्कमुळे नॉमिनेट झालेले सदस्य आहेत : सई, जुई, पुष्कर, सुशांत, रेशम आणि अस्ताद

अशातर्‍हेने मागिल अंकावरून पुढे सुरू आहे.

आजच्या टास्कमुळे नॉमिनेट झालेले सदस्य आहेत : सई, जुई, पुष्कर, सुशांत, रेशम आणि अस्ताद
<<
रिअली होप , या बुल्लीज पैकी कोणीतरी जाईल , जुई किंवा रड्या बैलाचा नंबर लागु देत.

जुईचा कुचकेपणा आज सई पोळ्या करत असताना पुन्हा एकदा दिसला. जुई सईवर जळते हे तर माहितच आहे पण तरीही किती घाणेरड्या मनाची आहे ते दिसून आलं. सईचे हात फ्लफी आहेत असं पुष्की म्हणाला. फ्लफीला मराठीत काय म्हणावे हे त्याला आठवेना, तो म्हणे लुसलुशीत. तर जुई म्हणे सईचे हात थुलथुलीत आहेत.
खरंतर सईचे हात अजिबात थुलथुलीत नाहीयेत. सई ची शरीरयष्टीच मोठी आहे - बिग फ्रेम, बिग बिल्ट. पण आपल्याकडे स्त्री ही नाजूक साजूकच असली पाहिजे हे इतकं डोक्यात भरलेलं असतं की अ‍ॅमेझॉन स्त्रीया असू शकतात हे कोणाच्या लक्षात येत नाही. तिला सरसकट जाडी म्हटलं जातं. तसंही आपल्याकडे बॉडी शेमिंग इतकं सहजगत्या केलं जातं की करणार्‍याला आपण खूपच खेळकर मस्करी करतोय असंच वाटतं. इतकंच नव्हे तर ज्या व्यक्तीची मस्करी केली जाते तिनं निषेध न नोंदवता ते विनोद म्हणूनच घ्यावं अशी अपेक्षा केली जाते. ही सिक मानसिकता कधी बदलणार?
<
अगदी !
सई खरच आहे तशी मस्तं आहे, अनफिट असल्याचा/नाजुकपणा करून रडत बसत नाही, पाठ इतक्या वाईटपणे मोडली तरी फार इश्यु नाही केला.
तिची बॉडी फ्रेमच ब्रॉड आहे, सुट होते तिला, स्ट्रॉग अपिअरन्स आवडतो मला तिचा !
सिनेमात आर्मीतली मुलगी म्हणून शोभेल !
ती रडी जुई सईची लाथ खाल्ल्यापासून भयंकर जळतेय, तेंव्हाही बोलत होती कि हत्तीच्या पायाखाली मरण काय असत ते आज कळलं !

स्मिता परत त्यांच्यात का जाऊन बसतेय. आज ती म्हणत होती की मेघाच्या बाजुने उभी राहीली टास्कसाठी तेव्हा मनापासून आनंद झाला.

स्मिताला मेघाला सपोर्ट करताना task मध्ये जास्त आनंद मिळाला असं ती म्हणाली तर तिने आता ठाम राहावं. सुशांतने तिला nominate केलं नाही म्हणून त्याची हाजी हाजी करू नये किंवा त्या सर्वाच्या दहशतीखाली राहू नये, स्वतःच्या मनाचे ऐकावं. एकवेळ मेघा टीम ला नसेल जॉईन करायचं तर एकटे राहावं पण त्या अतिशहाण्या, आगाऊ, किरकिऱ्या लोकांत जाऊ नये. My personal opinion.

ते नवीन आलेले कसे काय आहेत...? त्याखा, शरा?
मी नाही पाहीला परवाचा, कालचा आणि आजचा भाग...

दक्षे, वरची हेड्रातली लिस्ट अपडेट कर की!

ते दोघं बाहेर बघून आलेत म्हणून सध्यातरी मेघाला सपोर्ट करतायेत.

त्या खा ने आल्या आल्या सुशांतशी पंगा घेतलाय. पण ह्या आठवड्यात मेघा आणि ते दोघं सेफ आहेत आणि आऊ, स्मिता सेफ झाल्या. बाकी nominated.

आज दक्षिणा एकदम खूष असेल. आस्तादनी "नीज माझ्या नंदलाला " छान म्हटलं.
हा टास्क खर्‍या अर्थानी दोनच जण खेळले.
आस्ताद अंगाईगीत गाऊन आणि सई बाळाला गोष्ट सांगून आणि अ‍ॅन्टायअँगर शॉट देऊन. बाकीचे बहुधा बेबी क्रायची वाट बघत बसले होते.
"बिग बॉस " च्या फॅन ना नमस्कार! मला आपली म्हणा! ( आजवर या धाग्यासाठी वाचनमात्र होते. )
मामीचे रिव्ह्यूज अफलातून आहेत.

डबक्यातून बाहेर आलेल्या बेडकाप्रमाणे गाल फुगवून आणि डोळे गरागरा फिरवत आता दुसर्‍यांवर नजर ठेऊन बेंचावर बसायला मोकळी.>>>> Lol

रेशमला घराबाहेर काढतील प्रेक्षक. जुई शुशांतपेक्षा कमी व्होट मिळतात तिला. आता दाजी दिवसरात्र तहानभूक विसरून तिलाच व्होट करत बसला तर चित्र पलटू शकतं पण रेशमचा बॉलीवूड थीम डान्स पाहून त्याची शक्यता कमी वाटते.

रेशम,सुशान्त, आस्ताद ला,आणी दुसर्‍या टिममधे सई, मेघा,पुश्कीला सध्या अजुन काही विक्स तरी बिग बॉस सेफ ठेवतिल कारण भान्डण होवु शकतिल अशा टिम आहेत या त्यामुळे मसाला जाउ देणार नाही इतक्यात बाहेर
जाउ शकतात त्यापैकी आउ,जुई,त्यागराज किवा फारच झाल तर भुषण
त्यागराजचा काही प्रभाव पडलाच नाहीये अजुनतरी !
मामि तुमच अ‍ॅनेलिसिस भारि असत एपिसोडसवर , आज सुशान्तची चिडचिड झाली नुसती त्याचा गेम उलटला ना शेवटी, जुईच्या स्ट्रोलर मधे कोण होत कारण तो जुईला जाउ द्या म्हणात होता सारखा.

आता दाजी दिवसरात्र तहानभूक विसरून तिलाच व्होट करत बसला तर चित्र पलटू शकतं पण रेशमचा बॉलीवूड थीम डान्स पाहून त्याची शक्यता कमी वाटते. >>> Biggrin

रेशम म्हणजे ' रेशम की डोरी?' झालीये. तिला डोरी प्रमाणे शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय. राजेश प्रकरण इतकं अंगावर शेकलं, त्यावरून ममा किती बोलले पण याबद्दल लाज बाळगणे, आत्मपरिक्षण करणे, धडा शिकणे, बाहेरून आलेल्या लोकांकडून जे पॉइंटर्स मिळाले त्यावरून अंदाज बांधणे वगैरे काही तिनं केलेलं दिसत नाही. अजूनही ती 'मी ग्रेट' या बबलमध्येच राहतेय.

बाकी,

रड्या आणि रडकरी
जा घरी झडकरी

पाठ इतक्या वाईटपणे मोडली तरी फार इश्यु नाही केला.>>> काल आस्ताद (बहुतेक) रेशमशी बोलताना सईला पाठ मोडकी बोलला, हा सो कॉल्ड सिनियर ग्रुप किती टरकून आहेत सई-मेघाला याचं हे ज्वलंत उदाहरण. आस्ताद मागच्या भागात विलन म्हणून उघडपणे समोर आला आहेच..आता एक स्ट्रॅटर्जी (!) म्हणून प्रत्येक एपिसोड मधे एखादं प्रसंगानुरुप गाणं सादर करुन प्रेक्षकांची मतं आपल्याकडे वळवण्याचा त्याने प्रयत्न करावा.
बाकी सगळं मामींनी कव्हर केलंय नेहमीप्रमाणे Happy
सई-मेघा-शरा तिघींनी धमाल केली आस्ताद बाळाबरोबर ! सईला पहिल्याच राउंडला आउट केल्याने तिचा रेशमवर भडका उडणं अपेक्षित होतं.. पण डायन वगैरे जरा जास्त वाटलं !

Bhushan chya babagadit aau ani Sushant chya gadit Smita hoti, mag Bhushan kasa safe zala kalale nahi

Pages