बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग्बॉस मेघाला फेवर करत आहेत बहुदा, मेघाला मिक्स्मध्ये आणुन आस्तादला न जमणार्‍या खूनांचा क्रायटेरिया अगदि सोप्पा केला. तिचा वाढदिवस अस्ल्याने घास देणं/घेणं अगदिच सोप्प होतं. फोटो लपवणं आणि तोंडावर पाणी उडवणं म्हणजे खून करणं, हे बघुन धन्य झालो. स्मिताने केलेली आस्ताद आणि मेघाची उलटतपासणी (नाइव या अर्थाने) मजेशीर होती. दोन्हि गुप्तहेर फोटो काढताना विशेष दिसले नाहित. सुशांत डीप थिकिंग करत असल्याचा आव आणत होता. आजच्या एपिसोडमध्ये दोन्हि गुप्तहेर काय्/कसे तारे तोडतात हे बघणं मनोरंजक ठरेल...

मला हा task खूप आवडला. मारामारी नाही, आरडाओरडा नाही, दादागिरी नाही. छान होता.>> +१ गेल्यावेळेच्या हाकलपट्टी भागानंतर २-३ आनंदी भाग बघायला छान वाटतील. अश्या प्रकारचे कार्य वरचे वर द्यायला हवे. नेहमीच मारामारी, दादागिरी बघायला नको वाटते.

आता शरा आली कि करेल ती आरडाओरडा Happy तिचा स्वर पण भांडायला बरोबर लागतो.

मला हा task खूप आवडला. मारामारी नाही, आरडाओरडा नाही, दादागिरी नाही. छान होता.
Submitted by अन्जू
>>>>>>
हे बरोबर आहे.. पण नाही म्हंटल तरी सुशान्त ने थोडिफार केलीच स्मितावर.
कोणाचही खुन झाला की खुन झालेला त्याचा आवडता गुप्तहेर कोण हे सांगायच्या अगोदरच हा जाऊन सुरु व्हायचा...

जुई च्या वेळी स्मिता जाम भडकली होती त्याच्या अश्या वागण्याने..

बिग्बॉस मेघाला फेवर करत आहेत बहुदा...
Submitted by राज

>>>>>>>

अहो इथे फेवर तर रा रे टिम वर होताना दिसतोय ... मेघा ही तिच्या स्किल वर पुढे जातेय...

कोणाचही खुन झाला की खुन झालेला त्याचा आवडता गुप्तहेर कोण हे सांगायच्या अगोदरच हा जाऊन सुरु व्हायचा..>>>> नायतर काय Angry
स्मिता खूप क्युट वाटते , सध्यातरी मला फक्त ती , पुष्की अन अस्तादच आवडतायेत.
आता पुढचा नंबर त्या रड्याचा असायला हवा बाहेर पडायचा, जुई च्या पण आधी

शरा पण आवडते मला, ओव्हर वाटते कधी कधी, पण तरी छान वाटते, इथे बघू काय करते

हो मलाही ते खटकले पण मेल्या मुडद्यांपैकी कोणीही बोलले नाही कि तू नको, मला स्मिताला सांगायचे आहे. त्यांनाही त्यांच्या लाडक्या गुप्तहेराला सांगायचे स्वातंत्र्य होते.

मला वाटत मेघा आणि सई साठी हि उत्तम संधी आहे स्मिताला आपल्या टिम मध्ये आणायची.
स्मिता ने या अगोदर बर्‍याच वेळी हिंट्स दिल्या आहेत ... यांच्या ग्रुप मध्ये येण्यासाठी.

मला वाटत आऊ पुर्ण पणे दोन्ही बाजुने खेळतीय... बर्‍याच वेळी ती सई व मेघाला, काही निर्णय घेताना, डिसकरेज करताना वाटते...

माझी लाडली स्मिता कोणालाच नको होती, डंब समजतात ना सगळे, त्यात मराठीचा फार प्रॉब्लेम. सांकेतिक खुनातले संकेत कळत नाहीयेत तिला, असो कशीही Wink , मला आवडते.

सुशांत खरेच हलकट माणुस आहे की काय असे वाटायला लागले आहे. मागे त्याने सई ला चुकीच्या पद्धतीने टच केले होते. आणि अता स्मिता बरोबर पण अशाच काहीतरी चुकीचे वागलेला आहे. दर वेळी याच्याच हातून कशा काय अशा चुका होतात ? बरे चुक होऊनही वर तो स्मिताला सॉरी तर म्हणालाच नाही तर 'लक्षात ठेवेन' म्हणुन तिलाच धमकावत होता. ममा समोर स्मिताने सांगितले पाहिजे आणि ममा नी झाडले पाहिजे त्याला. रुतुजा बरोबर असे वागला असता तर तिने चांगलाच धडा शिकवला असता त्याला

कधी झाले हे?
'लक्षात ठेवेन'? सईच्या वेळेस तर रडत बसलेला. आता कुठून आला हा माज?

सुशांतने असे मुलिंना हात लावणे हे रेराच्या वागण्यापेक्षा कितीतरी पटीने चीप आहे. त्याला दिली पाहिजे कुणीतरी एक ठेवुन.

हो ना,
तो सुशांत कसला उद्धट न मजोरडा आहे, त्याला साधी माफी नाही मागता आली स्मिताची,
शरा पण कसली ओव्हर ऍकटिंग करतीये, काय तर म्हणे मी सगळे सिजन फॉलो केलेत, कदाचित सगळे एपी म्हणायचे असेल तिला

शरा हि कोण ?

हि तिच आहे का जीला बोलताना वा हसताना.. हाताची २ ते ३ बोटे अशी दातांना उभी लावायची सवय आहे ?

हखा गेली!
पण चॅनलला खरंच काही झेपत नाहीयेचं पालुपद परत म्हणतो.
गेली ते बरं झालं पण. कटकटी होती ती.

म्हणजे तिला उगीच फक्त राजेश चा गेम करायला पाठवलं होतं तर! Uhoh चॅनल ने अगदीच पॅनिक झाल्यासारखी काहीतरी डेस्परेट अ‍ॅक्शन घेतली असंच म्हणावे लागेल.

गुप्तहेर पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरल्याने खुनी विजयी ठरले.

हखा गेली, शरा आली. तिची एस ए अशी इनिशियल्स असलेली टॉवेल-टूथपेस्टची बास्केट बघून सगळेजण विविध तर्क लावत होते. भूषणच्या मते पुढे के देखिल लिहिला असता तर शाहरुख खानच आला असता. रड्या आणि यड्या सुशांत म्हणे श्रुंगारपुरे राजेश येत असेल (किती तो कळकटपणा!). मग सर्वज्ञानी अस्ताद यांनी कॉन्फिडन्टली सुमीत राघवनच येत आहे अशी गर्जना केली आणि आपण कित्ती भारी या विचारानं त्याच्या मनात पुन्हा एक लोळणफुगडी घेतली. त्यानंतर तो स्वतःच्या त्या फुगलेल्या छातीत धूर भरून घ्यायला गेला असणार.

शरा आल्यावर तिनं तिच्या आवडत्या खेळाडूंसाठी भेटी आणल्या आहेत असं मेघा आणि सईला गपचूप सांगितलं आणि त्यांना कानातले भेट म्हणून दिले. शरानं तिच्या त्या दोघी आवडत्या आहेत हे सांगितल्या मुळे आणि ती आता त्यांच्याबरोबरच असेल असं सुचित केल्यामु़ळे आणि आपल्या बाजूनं अजून निदान १-२ लोकं वळवून घेण्याची गरज आहे हे मेघाच्या लक्षात आल्यामुळे त्या शराशी बोलत होत्या.

झालं! पोरांच्या खोलीत त्यामुळे अस्ताद आणि रेशमला प्रॉब्लेम आला. त्या तिला दुसर्‍या गटातील लोकांबद्दल वाईटसाईट सांगून आपल्याकडे ओढतायत बघ असं अस्ताद रेशमला सांगत होता. पण सुशांत आणि अस्ताद या दोघांबद्दल त्या काही शराला सांगूच शकत नाहीत असं अस्ताद 'च' वर भर देऊन बोलला आणि आपण भारी आहोत या खुशीत हिरव्या वाटीतील पांढरा पातळ पदार्थ भुरकत राहिला. रेशम तिच्या नेहमीच्या अ‍ॅटिट्युडनं 'त्या माझ्याबद्दल तिच्या मनात नक्कीच विष कालवणार' असं म्हणाली आणि वर पुढे ' मला काहीच फरक पडत नाही' असं म्हणत दुसर्‍या खोलीत त्या तिघी गप्पा मारत होत्या तिथे खुनशीपणे बघत राहिली.

आज सई भूषणच्या मागे लागली होती आणि तिनं त्याला सळो की पळो करून सोडलं. तिच्या पासून सुटका मिळवण्यासाठी भूषण म्हणे तू जवळ येऊ नको नाहीतर मी पादेन. आणि हे त्यानं निदान २० वेळा बोलून दाखवलं. हाउ मॅच्युअर!

आज स्मितानं शॉर्टस घातल्या होत्या आणि बेंचवर गप्पा मारायला बसली असता तिनं पाय झाकायला एप्रन घेतला होता, तो सुशांतनं खस्सकन ओढून घेतला. या शॉटच्या आधी काय बोलणं सुरू होतं ते माहित नाही आणि सुशांतनं इतकी चीप गोष्ट का केली ते ही माहित नाही पण स्मितानं त्यावर आपला निषेध नोंदवताच तो चिडला. भोंदू कुठला!

कॅप्टन सध्या शर्मिष्ठा असली तरी उद्या पुढच्या कॅप्टन्सीकरता काहीतरी कार्य होणार आहे.

पुन्हा पाणी वाचवा हे एक सकारात्मक कार्य दिलं आहे आणि रिनची जाहिरात केली जात आहे.

या आठवड्यात एलिमिनेशन नाही हे अजून कोणाला माहित नसल्याने मेघा आणि सई काळजीत आहेत. त्यांना वाटतंय की इतर जे नॉमिनेट झाले आहेत त्यांच्या तुलनेत त्या अगदीच मागे आहेत.

दुसर्‍या टीममधली निदान दोघंजण आपल्याकडे वळवायला हवीत असं मेघा सईला सांगत होती पण सईला काही ते पटत नव्हतं. आता खरी वेळ आहे की स्मिताला घ्या तुमच्यात. तिकडे तो पुष्की या दोघींबद्दल दुसर्‍या टीममध्ये जाऊन बोलायला लागलाय हल्ली. जर त्यानं असा विश्वासघात केला तर पब्लिक त्याला माफ करणार नाही.

... मामी .... आपण तर फॅ न झालोय तुमच्या मांडणीचे...

मग सर्वज्ञानी अस्ताद यांनी कॉन्फिडन्टली सुमीत राघवनच येत आहे अशी गर्जना केली आणि आपण कित्ती भारी या विचारानं त्याच्या मनात पुन्हा एक लोळणफुगडी घेतली. त्यानंतर तो स्वतःच्या त्या फुगलेल्या छातीत धूर भरून घ्यायला गेला असणार.
नवीन Submitted by मामी
>>>>>>>

हे वाचुन तर आता खुर्चीतुन खाली पडतोय अस झाल...

आज सई भूषणच्या मागे लागली होती आणि तिनं त्याला सळो की पळो करून सोडलं. तिच्या पासून सुटका मिळवण्यासाठी भूषण म्हणे तू जवळ येऊ नको नाहीतर मी पादेन.
नवीन Submitted by मामी
>>>>>>>>>>>>>>>>

आर यु सिरीयस... Lol
कसल छपरी आहे हे अस करन....

तिकडे तो पुष्की या दोघींबद्दल दुसर्‍या टीममध्ये जाऊन बोलायला लागलाय हल्ली. जर त्यानं असा विश्वासघात केला तर पब्लिक त्याला माफ करणार नाही.
Submitted by मामी

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

तो पुष्की पण खुप आतल्या गाठीचा अहे.... गोड गोड बोलुन मस्त चुना लावतो या दोघीना...
तो नक्कीच वेळ आल्यावर या दोघीना दगा देनार.. सेमी फायनल च्या आसपास तो घरातुन बाहेर पडावा...वा त्याला काढावा...

आणि घाबरट तर केवढा आहे.. त्या रा रे टिमच्या गुडबुक मध्ये जायचा प्रयत्न असतो सारखा...
पंचायत टास्क मध्ये पण सारखा म्हणत होत तिक डे ७ जन आहेत आपण दोनच आहोत (आऊला त्याने गॄहित नाही धरल)
सईचा अ‍ॅटीट्यड आवडला, २ असु म्हणुन काय झाल आपन मेघाला नाही नॉमीनेट करायच अस तिच मत होत..

आणि मागे एकदा दोनदा तो मेघावर पण ओरडला होता..त्या रा रे टिमची लागण झाल्यावर...

फुलाच्या टास्क मधे म्हणाला मी एकटा आणि बाकी ११ जन आहेत मग आस्ताद व ऋतुजा काय माश्या मारत होते का?.
ऋतुजाला पण याच्या मुळेच लागल, शेवटी तो हरला असतान काही गरज नव्हती ऋतुजाला भारीस पाडुन ... घुस आत... घुस आत म्हणायची... ऋतुजा ठरली वाघीण, या मुर्खाला वाचवायला तिने जो काही सुर मारला त्या फुलांच्या बागेत... तेव्हाच तिला दुखापत झाली. तेव्हा पुष्की मुग गीळुन गप्प... तिला ना धन्यवाद ना सान्त्वन.

भरीस पाडलं कसलं डोंबलाच! तिला अक्कल नको? आणि हा जायबंदी झालेला तरी जीव तोडून खेळतोय! टास्क सोडून मेकप करत सईडी करत बसला न्हवता. Wink

सुशांत असेच वागत राहीला तर लवकरच त्यालाही राजेश सारखेच अपमानित होऊन गाशा गुंडाळायला लागेल हे नक्की!!

>>>मग सर्वज्ञानी अस्ताद यांनी कॉन्फिडन्टली सुमीत राघवनच येत आहे अशी गर्जना केली आणि आपण कित्ती भारी या विचारानं त्याच्या मनात पुन्हा एक लोळणफुगडी घेतली. त्यानंतर तो स्वतःच्या त्या फुगलेल्या छातीत धूर भरून घ्यायला गेला .>>
>>>अस्ताद 'च' वर भर देऊन बोलला आणि आपण भारी आहोत या खुशीत हिरव्या वाटीतील पांढरा पातळ पदार्थ भुरकत राहिला. रेशम तिच्या नेहमीच्या अ‍ॅटिट्युडनं 'त्या माझ्याबद्दल तिच्या मनात नक्कीच विष कालवणार' असं म्हणाली आणि वर पुढे ' मला काहीच फरक पडत नाही' असं म्हणत दुसर्‍या खोलीत त्या तिघी गप्पा मारत होत्या तिथे खुनशीपणे बघत राहिली.>>>>
आई ग... 1 नंबर लिहिलंय मामी तुम्ही..... एवढं परफेक्ट वर्णन आहे ना की बास.... हॅट्स ऑफ फॉर थिस डिटेल ऍनालीसिस...

Pages