Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योग थॅन्क्स अपडेट्स
योग थॅन्क्स अपडेट्स दिल्याबद्दल. आजचा पण एपिसोड चुकेलच बहुधा.
पण व्हूट वर पाहिन.
मेघा नक्की विश्वासघात करू शकते कुणाचा पण.
ती जाम डोक्यात जाते माझ्या. तिचं अॅटिट्युडच प्रॉब्लेमॅटिक आहे.
मी सुष्याला वोट केले होते,
मी सुष्याला वोट केले होते, असत्या बाहेर जावा म्हणून.
प्रोमो पाहिला आताच, छपरी दाजी
प्रोमो पाहिला आताच, छपरी दाजी अवतीर्ण झाले. सगळीकडे हर्षोल्हासाचं वातावरण, आनंदाने एकमेकाला मिठ्या काय मारताहेत, गळ्यात पडून काय रडताहेत. त्या रड्या सुशांतला निमित्तच मिळालं, भोकांड पसरायला. आज रात्री जत्रा भरेल वाटतं बिग बॉसच्या घरी.
आता रेशमची दादागिरी वाढणार.
आता रेशमची दादागिरी वाढणार.
स्मिता कॅप्टन आहेस, डोकं चालव. रेरा सूत्र हलवतील नाहीतर आणि तू परत गाढव, कठपुतली म्हणून राहशील.
थत्ते जाणार वाटले होतेच. तेही
थत्ते जाणार वाटले होतेच. तेही अगदी आनंदाने गेले. आतले पब्लिक मात्र रडत होते निरोप देताना . पुष्कर पण! आधी म्हणत होता मी शांत रहायचा प्रयत्न करतोय, थत्त्यांचा राग आलाय, त्यांनी अमूक म्हटलेले आवडलं नाही वगैरे, पण नंतर मात्र म्हणे ते माझे गाइड होते वगैरे! आउ पण अगदी गहिवरुन निरोप द्यायला आल्या. मजाच सगळी.
मदर्स डे ड्रामा बोर झाला पण.
रेशम ची लेक तिला तू मस्त खेळतियेस असे म्हणाली.
ममां तिथे लोकांना झापताना इथलेच शब्द वापरत होता त्याची गंमत वाटली. खेळण्यांना व्यायाम काय करायला लावला, किंवा खेळणी कधी अर्ग्यू करतात का, वगैरे.
दाजी आल्यावर काय काय इक्वेशन्स बदलणार याची उत्सुकता आहे.
मला ही अस वाटल, ममा इथला धागा
मला ही अस वाटल, ममा इथला धागा डीटेल वाचुन प्र्शन विचारतात की काय ???
इथे कित्येक पोस्टी स्मिता कडे टॅंलेट आहे पण ती दुसर्याच्या डोक्याने चालते,स्वत: च काही मत नसत अश्या अर्थाच्या आहेत.नेमके ममा ने तिला खर खोट करताना हेच २ प्र्शन विचारले.
सुशान्तला फोन नाही आला? तोही
सुशान्तला फोन नाही आला? तोही Nominated होता. मेबी Big boss ला घरात महापूर येईल अशी भीती वाटली असावी म्हणून टाळल असेल हे.
जुई आईला 'लिमये कसे आहेत/ कसा आहे विचारत होती. हाउ स्वीट!
थत्ते आता Big boss च्या २८ दिवसान्च्या अनुभवान्वर २८० पानान्च पुस्तक लिहिणार आहे म्हणे.
आज Big Boss च्या घरात
आज Big Boss च्या घरात हर्षवायू होणारे रे रा टिमला.
सई घाबरुन बाहेर धावत सुटली, तिला वाटल की, बाहेर Bomb-blast झाला आहे की काय, हे एवढे सगळे किन्चाळतायत. 
रेशम आणि राजेशचे वागणे पाहून
रेशम आणि राजेशचे वागणे पाहून दोघे खरोखर प्रेमात आहे असे वाटले. किती कडकडून मिठी मारली दोघांनी. कामविव्हल नाग-नागिणीचे चाळे पाहून बाकीचे लाजलाजल्यासारखे झाले. भूषण- सुशाम्तने नेहमीसारखं भोकाड पसरलं. राजाबाबू चिल्लर खेळाडू आहे. एकदम शेंदाडशिपाई, बोलण्यात जोर नुसता. पोरी कचाकचा खातात त्याला कुठल्याही टास्कमध्ये. त्याच्या येण्याने रेच्या कंपूला कसलाही फायदा होणार नाही. उलट सै-मेघा- ऋतुजा -उना-पुष्कर आणखी जोराने तडाखे लगावणार रेराच्या पित्त्यांना. जुई-स्मिता-भूषण-सुशांत आता राजाबाबूच्या बडदास्तीस लागतील, त्याचा फायदा घेऊन मेघा-सैने आपले पत्ते उघडे करावेत.
आस्ताद सईला फोडतोय तिच्या
आस्ताद सईला फोडतोय तिच्या ग्रुपमधून आणि बिग बॉस आस्तादला. आत्ताच voot sneak peek पाहिलं त्यानुसार प्रत्येकाला दुसऱ्या एका स्पर्धकाचा फोटो गळ्यात लटकवून फिरायचं आहे आणि जर फोटोतल्या व्यक्तीला नॉमीनेट करावंसं वाटलं तर तो फोटो नष्ट करायचा.. आस्तादच्या गळ्यात सुशांतचा फोटो दिसला..
आणि मेघाचा फोटो आऊच्या गळ्यात. मेघाला safe ठेवायचं बिग बॉसने भलतंच मनावर घेतलंय
हो, ममांनी खरच इथली किंवा
हो, ममांनी खरच इथली किंवा कलर्स पेज वर टाकलेल्या कॉमेंट्स वाचल्या असाव्या, तेंव्हा आपापल्या आवडत्या आणि नावडत्यांबद्दल लिहित रहा
'दिवार' मोडः भगवान करे जब तू बंदूक चलाये तेरे हात ना कापे!

<<<<
पण ममा च्या गाण्यांवर आपण फिदा.. he could have been good playback singer.
<<
गायलाय म.मां , कांटे मधलं जाने क्या होगा रामा रे, अर्थात एकट्याने नाही, संजय दत्तनेही गायलय त्याच्याबरोबर.
दुनियादारीच्या गाण्याचा तुकडाही गायलाय बहुदा.
>>आणि मेघाचा फोटो आऊच्या
>>आणि मेघाचा फोटो आऊच्या गळ्यात. मेघाला safe ठेवायचं बिग बॉसने भलतंच मनावर घेतलंय
ह्ह्म्म्म... बहुतेक पुढील आठवड्यात सगळ्या मुली नॉमिनेट होतील्/डेंजर झोन मध्ये असतील असं वाटतय.. सेटींग केलय बहुतेक.. पुन्हा कुणी भाई लोग केला तर बॅलंस बिघडेल.
>>त्याच्या येण्याने रेच्या कंपूला कसलाही फायदा होणार नाही.
ऊलट राजा बाबू आता फक्त आणि फक्त मेघालाच टारगेट करणार असे दिसते.. दिनकरराव टोपी संभालो हवा बहुत तेज चलता है! हाई..
>>गायलाय म.मां , कांटे मधलं जाने क्या होगा रामा रे, अर्थात एकट्याने नाही, संजय दत्तनेही गायलय त्याच्याबरोबर.
हो. पण संजू ने वाट लावली त्या गाण्याची..
पण राजेश कुटूंबीयांचं कौतूक वाटतं.. रेशम- राजेश खरं खोटं काहिही असेना.. झेलायची ताकद दिसते आहे. अजून तरी काही राडा कानावर आला नाही. सौ. थत्ते प्रमाणे सौ. राजेश एखाद दिवस स्टुडीयो मध्ये येणार काय? आणि येऊन 'मस्त खेळताय.. लगे रहो'... असे काही म्हणली तर आऊ आणि कं. बेशुध्द पडेल तिथेच..
आणि चॅनल चा टीआरपी एकदम चंद्रावर!
रारे चाळे पुन्हा भरात....
रारे चाळे पुन्हा भरात....
ऊनांचा मुलगा छान बोलला पण वचन
ऊनांचा मुलगा छान बोलला पण वचन कुणी कुणाला दिले होते आणि तो बोलत होता ऊलटंच. मुलाने वचनमुक्त केलं की वचन तोडलं. मेघाला पाताळयंत्रीचा अर्थ माहित नाही
आणि ती मुलीला असं का विचारत होती की मी कशी दिसते, हिरवीण आहे ना ती. आदल्या दिवशी थेरडा, म्हातारा आणि जायले निघाले तर वील मीस यू, ईति मेघा.
राजा बाबू ऐन भरात.
राजा बाबू ऐन भरात.
रेशम ला सांगतोय, माझी बायको मॅच्युर आहे, शी विल अंडरस्टँड....
आणि पुन्हा रोमान्स चालू.
इट्स डीसगस्टिंग.
मेघा टॉप 3 मध्ये आहे 100%,
मेघा टॉप 3 मध्ये आहे 100%, रेरा कधी एकदाचे नॉमीनेशन्स मध्ये येताहेत याची पब्लिक वाट पाहते, मला तरी वाटतय चालबाझ टीमचे मेम्बर एक एक करून बाहेर जाणार.
चांगलय, करु दे मेघाला टारगेट
चांगलय, करु दे मेघाला टारगेट ,सगळ्यात जास्त पब्लिक सपोर्ट आहेच तिला जो अजुन वाढतो राजेशच्या वागण्याने, कचरा टास्कमुळे रातोरात स्टार झाली मेघा, आधी तिचं नावही ऐकलं नव्हतं मी तरी

पण मांजरेकरांनी आता सांगितल्यामुळे रेशम तिच्या पायांना टार्गेट करेल, डोकं वापरून मेघाला हरवण तसही जमत नाही तिला
इतर स्पर्धकांनी सुध्दा जुईचा स्पॉडिलायटीस, अॅलर्जीस टार्गेट केल्या पाहिजेत, रेशमलाही आहेना काहीतरी लोअर बॅक प्रॉब्लेम ?
उ.ना सुध्दा होपफुली त्यांच्या वयाने येत असणार्या लिमिटेशन्सना मुळे होतील टार्गेट.
टॉप ३ अत्ता सांगणं मुष्किल आहे पण ऑपोझिट टिमचा भुषण सॉलिड प्लेयर आहे, डोकं वापरून आणि स्वतः कोणाच्याच नजरेत फार वाइट न होता सरकतोय कासवासारखा शर्यतीत पुढे.. त्या टिमचा एक आणायचा असेल तर तो एकटाच.. बाकी सगळे नुसतेच कागदी वाघ, रडोबे ,नाहीतर मठ्ठोबे !
त्या दाजीला आणलं परत ते छानच
त्या दाजीला आणलं परत ते छानच केलं. आता मेघा पुन्हा ओरिजिनल फॉर्ममध्ये येईल.
मी सोशल मिडियावर नाही फॉलो
मी सोशल मिडियावर नाही फॉलो केले बिबॉ. त्या स्मिताला कितपत सपोर्ट आहे? तिला इतर रिअॅलिटी शोज चा अनुभव आहे, अॅथलेटिक पण आहे टास्क च्या दृष्टीने. तिचे चान्सेस पण चांगले वाटतात. भूषण सध्यातरी साइड अॅक्टरच आहे. पण तो इतरांसारखा बुली नसल्याने त्याला सपोर्ट मिळेलही.
आता नेक्स्ट कुणाचा नंबर ? सुशांत ? की जुई ? पण मराठी सोप्स बघणार्या काकवा, मावश्या अॅक्टिवली वोट करत असतील तर जुईला सपोर्ट मिळणार त्यांचा. गुड गर्ल कॅटेगरी. होपफुली ऋतुजा राहील . इतक्यात तरी नको जायला.
रा रे ला किती एक्स्ट्रा पैसे
रा रे ला किती एक्स्ट्रा पैसे मिळत आहेत हे चाळे करायचे?
आज news चॅनेल सर्फिंग करतेय.
आज news चॅनेल सर्फिंग करतेय. अति बोअर आणि चीप bb.
सोशल मिडीयावर तुफान सपोर्ट
सोशल मिडीयावर तुफान सपोर्ट आहे मेघाला, इतका कि मेघा वि. इतर सगळे असल्यासारखा.
किती तरी नॉन मराठी युट्युबर्स सुद्धा तिला सपोर्ट करातायेत,ती म्हणे काहींना गौतम गुलाटी तर काहींना शिल्पा शिन्देची आठवण करून देते ( हे लोक कोण माहित नवह्त वाचल्यावर कळलं , हिन्दीचे विनर्स ) , गम्मत म्हणजे तिला कल्पनाच नाहीये इतका सपोर्ट आहे तिला ते म्हणून ती नॉमिनेशन्स मधे यायला घाबरते, इतरां इतकी ती काही कलाकार म्हणून लोकप्रिय नव्हती त्यामुळे व्होट्स मिळायची चिन्ता असेल
तिची मुलगी म्हंटली तिला इनडायरेक्ट्ली कि मम्मा, नॉमिनेशन्स मधे यायची अजिबात चिन्ता करु नकोस.
स्मिता मस्तं आहे पण स्वतःच्या डोक्याने नाही खेळते , तिला स्वतःला भरपूर फॉलोअर्स आहेत खरं तर पण आता ते सुध्दा ही रेशमच्या टिम मधे आहे म्हणून तिला शिव्या देतायेत.
स्मितानी जरा रे.रा. ला सुध्दा अॅटीट्युड द्यायला हवाय, सई मेघा पेक्षा ती फिजिकली स्ट्राँग आहे, सगळ्या मुलींमधे फिजिकली सर्वात टफ खरं तर.
स्मिता कॅप्टन आहे म्हणजे तिला
स्मिता कॅप्टन आहे म्हणजे तिला एकाला सेव्ह करायचा ऑपशन मिळेल, मारकी म्हैस सेव्ह होणार, छपरी दाजीला नॉमीनेट करून सई ने गेम फिरवायला पाहिजे
स्मिताने रेशमला सेव्ह केलं ना
स्मिताने रेशमला सेव्ह केलं ना तर मला असा राग येईल तिचा की बास रे बास.
Bb चं निरोप देऊन ठेवतोय दोघांना घरात असा संशय येईल मला.
अर्थात स्मिता आहे रे च्या प्रभावाखाली म्हणा त्यामुळे bb ला सांगायची गरज नाहीये.
स्मिताबद्दल वाईट वाटतं..
स्मिताबद्दल वाईट वाटतं..
इतकी चांगली स्पर्धक फालतू लोकांबरोबर राहिल्याने सडत आहे. तिची डंब अशी प्रतिमा ममांनी पण करून घेतली आहे.
एक निरिक्षण: जुई, ऋतुजा आणि आस्ताद या तिघांच्याही आया किती वेगळ्या प्रकारे बोलल्या त्यांच्याशी, अगदी मस्त मैत्री असल्यासारखं. त्यातही ऋतुजाच्या आईची मराठवाड्यातली मराठी फार गोड वाटली.
[टॉप ३ अत्ता सांगणं मुष्किल आहे पण ऑपोझिट टिमचा भुषण सॉलिड प्लेयर आहे, डोकं वापरून आणि स्वतः कोणाच्याच नजरेत फार वाइट न होता सरकतोय कासवासारखा शर्यतीत पुढे.. त्या टिमचा एक आणायचा असेल तर तो एकटाच.. बाकी सगळे नुसतेच कागदी वाघ, रडोबे ,नाहीतर मठ्ठोबे !]
+११
त्याची इमेज चांगली आहे अजून तरी. रेराच्या प्रभावातून बाहेर निघाला तर कुणाला ऐकत नै तो..
>>बाकी सगळे नुसतेच कागदी वाघ,
>>बाकी सगळे नुसतेच कागदी वाघ, रडोबे ,नाहीतर मठ्ठोबे !

>>स्मितानी जरा रे.रा. ला सुध्दा अॅटीट्युड द्यायला हवाय, सई मेघा पेक्षा ती फिजिकली स्ट्राँग आहे, सगळ्या मुलींमधे फिजिकली सर्वात टफ खरं तर.
+१००
>>रेशम ला सांगतोय, माझी बायको मॅच्युर आहे, शी विल अंडरस्टँड....आणि पुन्हा रोमान्स चालू. इट्स डीसगस्टिंग.
घ्या.. आता त्याच्या कुटूंबालाही 'चालतय की' तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? कमाल आहे बा.. या अख्ख्या खेळात मला डिसगसटींग व्यक्ती एकच वाटते- आऊ. दुसर्याच्या मागे व तोंडावरही अक्षरशः वाट्टेल ते बोलणे.. सगळीकडे नाक खुपसणे.. नैतीकतेच्या गप्पा करताना स्वतः मात्र रोज ईतरांच्याबद्दल चीप बोलणे. नाही का?
डिसगस्टींग वाटते जेव्हा पुष्कर ने थेट ईग्नोर मारले वा तोंडावर सांगितले तरी सई त्याच्याशी फेक फ्लर्टींग करायचा प्रयत्न करते? नाही का?
रेशम वा राजेश दोघांपैकी कुणालाही कधीच असे प्रकार करताना पाहिले नाही (निदान दिसले नाहीत..). दोन प्रौढ व्यक्ती तिथे एकमेकाजवळ येत आहेत याचा ईतका बाऊ का केला जातोय..? थोडक्यात काय तर सर्व मुलींना बिकीनी टास्क वगैरे दिला तर बघताना मस्त एंजॉय करणार पण जरा कुणी कुणाच्यात अडकलं की आपल्याला डिसगसटींग वाटणार.
असो.
nothing persona.l..we all have our opinions but interesting to see the contradictions ..
हे मा. वै. म.
स्मिताला का नाही आईचा फोन आला
स्मिताला का नाही आईचा फोन आला. यायला हवा होता, she missing आई.
अॅक्युचली इथे ममा सान्गत
अॅक्युचली इथे ममा सान्गत नाहियेत इथे पण सलमान काही एपिसोड गेले की सगळ्याना सान्गायचा कोण कितिने पाणि मे है, कोणाला टॉप वोट मिळतायत कुणाला कमी त्यावरुन आतल्या पब्लिकला पण कळायच की नक्किच काय चाललय बाहेर ते ,
शिल्पा शिन्देचा सिझन मी पाहिला नाही गौतम गुलाटी विनर झाला तो पाहिला होता मी, त्यातही असेच २ ग्रुप होते आणी यापेक्षा दुप्पट पॉलिटिक्स आणी राडा, गौतम तर विकला नॉमिनेटेट होता सतत कॉर्नर केल जायचा पण त्याने झाल उलटच पब्लिकने त्याला इतके भरभरुन वोट केले की फायनली तोच विनर झाला.
मी सगळे सिझन न बघितल्याने नक्कि नाही सान्गत पण मराठि बीबी इतका सिझन ८ सारखा चालु आहे की स्क्रिप्टेड शो वाटावा...
मराठि बीबी इतका सिझन ८ सारखा
मराठि बीबी इतका सिझन ८ सारखा चालु आहे >> हे इतके स्पेसिफिक सांगता येईल ? कारण तसे भांडणे , पॉलिटिक्स, ग्रुपिझम, लफडी इ. प्रत्येक च सीझन ला होत असेल ना?!
नळावरची भांडण बघायला मजा येईल
नळावरची भांडण बघायला मजा येईल उद्या, राजेश आल्याबरोबर रेशमचा बोलण्याचा टोन बिघडला, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.
Pages