बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तो भूषण पण स्ट्रॅटेजी म्हणण्याऐवजी खूप आत्मविश्वासाने स्टॅटर्जी.. म्हणत होता <<
त्यावेळेस त्याच्या विचारशृंखलेत जाणवलेली सुवाच्यता वाखाणण्याजोगी असल्याने तो चूकिचा उच्चार माफ.

घरात रोल रिव्हर्सल झालाय थोडा. भूषण्/ऋतुजा जे पहिल्या दोन आठवड्यात गोंधळल्यासारखे वाटत होते ते आता आपलं बस्तान बसवायला लागले आहेत याउलट सई/मेघा यांनी पहिल्या दोन आठवड्यात धमाल उडवलेली ते आता बावळ्ट दिसायला लागले आहेत... Happy

मेघा नक्कीच दोन्ही बाजूनी बोलते. एकीकडे म्हणते माझ्याकडे खूप पैसा आहे, आणि आज उनाला सांगत होती गेली ४ वर्षं मी काहीही काम केलं नाहीये मला नॉमिनेट करू नका. Uhoh म्हणजे पैशांची गरज आहे ना? Uhoh
>>> नाही दक्षिणताई.. तिला असे वाटत आहे तिला फॅन फॉलोविंग नाहीय. तिला जिंकायचे आहे..

इथेही २ ग्रुप व्हायला लागलेत सई- मेधा हेटर्स आणि सई- मेधा बॅकर्स , आस्ताद -जुई डोक्यात जातात यावर मात्र एक्मत व्हाव!

एखादा शब्द चुकिचा बोलला तर त्यात काय एव्हढे!!!
आपल्याकडे हे जरा जास्तच सिरियस्ली घेतात....अशुद्ध किंवा चुकिचे विंग्रजी बोलले तर विदेशी लोक समजून घेतात काय म्हणायचे आहे ते, पण देशी लोक तर किती अज्ञानी म्हणून टर उडवतात असे बरेच वेळा पाहिले आहे.

काल राजेशचे जे काही चालू होते ते बघून रेशम जरा बिचकली पण ती सुद्धा वहावत चालली आहे. खेळावरचा फोकस जाणार आणि फक्त वाद घालणे-राडा करणे हे काम करणार.
बाकी ते काहीही करोत, त्याच्या बायकोला चालत असेल तर तिच्यासमोर हिला घे मांडीवर आणि घे पप्प्या. तुमच्या खाजगी गोष्टी तुम्ही खाजगी ठेवल्या तर त्याबद्दल काही म्हणणे नाही पण आमच्या पुढे प्रदर्शन मांडले तर आम्ही टिकाटिप्पणी करणार.

काल राजेशचे जे काही चालू होते ते बघून रेशम जरा बिचकली
>>> +1.
राजेश 1 वीक एकाच रूम मध्ये कोंडून आला आहे.. त्यामुळे त्याच्या भावना वाहत चालल्या आहेत.

आजचा टास्कच इतका braindead आहे. पाणी वाचवा संदेशासाठी पाणी वाया जातंय. नुसता दांडगेपणाचा टास्क बघायला अजिबात मजा आली नाही. जरा डोकं वापरण्याचे टास्क द्या नाहीतर तो माजलेला अस्वल्या राजेश असलेली टीम दरवेळी जिंकेल.

राजेश 1 वीक एकाच रूम मध्ये कोंडून आला आहे.. त्यामुळे त्याच्या भावना वाहत चालल्या आहेत.>> जरा जास्तच. रेशमचे झाल्यावर बाकी सगळ्यांच्या कपाळावर चुंबन घेतले Lol सकाळी उना म्हणतात... काय करायचे बाहेर येऊन मला काय पप्पी घ्यायचीये याची? Lol

अरे काय , उलट मेघाने मुलीला मी कशी दिसतेय असं विचारणे वॉज सो क्युट, अगदीच awwww moment !!
बिग बॉस मधे अनएडीटेड कॅमेरा फुटेज आहे, नो स्पेशल इफेक्ट्स, सई सुध्दा प्रियदर्शनला नव्हती का विचारत आम्ही स्क्रीन वर आहे त्या पेक्षा फार लठ्ठ दिसतो का, हे अगदी ऑब्व्हियस नॉर्मल मुलीचे प्रश्नं आहेत, नॉर्मल लोकांना रिलेट करता येण्यासारखं बोललेल फॅन्सना भारी आवडत Happy
ऋतुजा बाकी सुपर्ब !
मेघा सुध्दा अतिशय प्रामाणिक, माझ्याकडे काम आणि फॅन्स नाहीयेत म्हणून मला वाचवा, परफेक्ट (जरी तिला माहित नाहीये तिला किती फॅन्स आहेत ते )
पैसा वगैरे प्रकारा ती बोलली होती, तिच्या कामाशी काही संबंध नाही. तिचा नवरा खूप पैसेवाला आहे उ.ना म्हणत होत्या.
आज डिल करायच्या बाबतीत फक्त मेघा आणि ऋतुजा आवडल्या.
पुष्की आणि सई जोडी कधीही तुटु शकते असही वाटायला लागलय आता.
सईला आता समजतय रेशम कशी आहे.
राजेशला स्पर्धक म्हणून स्ट्राँग वगैरे जे म्हणतात ते खरच का म्हणतात माहित नाही, पण मला तरी सगळ्यात मठ्ठ, डंब आळशी , काउच पोटॅटो (सॉरी पलंगतोड)धुड कॅटॅगरी मधे तोच टॉप वाटतो, स्मिताला उगीच हे टायटल दिलं जातय.
मेघा, ऋतुजा, भूषण हे हुषारीने खेळत आहेत, बाकी सगळे डंब मोड मधे आळीपाळीने जाततच.
थत्ते एक होते हुषार, बिचारे उगीच एलिमिनेट झाले.
आज कुठला तरी व्हिडीओ पाहिला, बिग बॉस स्पर्धकांचं एज्युकेशन, त्यात मेघा (एलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग )आणि भूषण सिव्हिल इंजिनिअर आहेत नवीनच समजलं.

मला वाटले होते उना येउन कचाकचा भांडतील. तसे काही झाले नाही. कदाचित व्हूट वर दाखवतील.

अरे काय , उलट मेघाने मुलीला मी कशी दिसतेय असं विचारणे वॉज सो क्युट, अगदीच awwww moment !!
नवीन Submitted by दीपांजली

>>>>>>

अगदी सहमत.... +१११११

रे-रा ला एकमेकांच्या विरुद्ध का नाही टाकत बिग बॉस.. सई-मेघा होत्या opposite teams मध्ये मागच्या वेळी.. पण टास्क पण सोबर होतं त्या मानाने. आज रा बरोबर जुई-मेघा-ऋतुजा- पुष्कर आणि उरलेले सगळे विरुद्ध टीम मध्ये असं असतं तर एक नंबर मज्जा आली असती.

आस्तादने कसं काय nominate केलं सुशांतला?

पाण्याचा गेम अगदी फालतू होता. मला बोर झालं पहायला. खेळण्याचा एपिसोड जसा बोर झाला तसाच.
मला नक्की काहीच कळलं नाही की करायचं काय होतं? पाणी वाचावा अस लिहून तर ठेवलं आहे. पण एकमेकांना पाणी न भरू देण्याच्या नादात बादल्या ड्रम्स तर फोडलेच, पण भरलेले पाणी सुद्धा ओतून दिले. हा अपव्यय नाही आहे का पाण्याचा? Sad थोडे नाविन्यपुर्ण किम्वा एकमेकांबरोबर शारिरिक लठ्ठालठ्ठी होणार नाही असे गेम द्यायचे ना. तिकडे त्या दिवशी मेघा ढेपाळली होती आज सई. त्यात पाण्याचा गेम, म्हणजे घसरणे वगैरे साहजिक होते.

योग्य उच्चारांवर माझा भर नक्की आहेच. भूषण चे मी एकवेळ माफ करीन की इंग्रजी आपली मातृभाषा नाही. पण मेघाला स्तोत्र/ सोत्र ला माफी नाही. मराठी आपली मातृभाषा आहे आणि ती आपण शुद्ध बोलली पाहिजे असे वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे समहाऊ, छापलेली भाषा, टेलिव्हिजन किंवा रेडिओ अर ऐकली जाणारी भाषा, अथवा इंटरनेट वर ची भाषा किंवा कोणतीही माहिती ही खरी मानण्याकडे जनतेचा कल असतो (मग ती भाषा किंवा माहिती खोटी असली तरी)

आता इतकी शाळा घेतल्यावर तरी आस्ताद त्याच्या टास्कवाल्या टीमकडून (आणि खऱ्या कंपूविरुद्ध) खेळतोय का नाही हे बघायचे असेल बिग बॉसला!

उच्च मराठी ऐकायला आस्ताद आहेना, उच्च स्पर्धक बघायची असेल तर मेघा Wink
अगदी इतरांना मराठीचे धडे देणार्या उ.ना सुध्दा व्याकरण चुकीचं बोलतात, मी आली मी गेली.
थोडक्यात सगळं पॅकेज नाही मिळत Happy

बिग बॉस अतिशय अनफेअर टीम पाडण्यात. एकीकडे जास्त तगडे.

टास्क कोणी नीट करत नव्हते, कित्ती पाणी उगाच वाया घालवले. पाणी वाया न घालवता साठवणे जास्त यावर भर द्यायला हवा होता, कित्ती मारामाऱ्या. लागलं पुष्कर, सईला. सई उगाच उद्दामपणा करत होती. इतकं पाणी वाया जात होतं आणि bb मजा बघत होते. अजिबात आवडलं नाही आणि पटले नाही.

पुष्कर फार उदास असतो हल्ली, आऊना नॉमिनेट केलं नाही, good boy होऊन स्वत:चा बळी दिला.

रे रा ला task पुरते पण वेगळे करायचं नाहीये bb ला.

मेघा पाण्याच्या स्त्रोत ला स्तोत्र म्हणाली ते मलाही जाम खटकले ऐकताना.

भूषणचा उच्चार पण खटकत होता आणि तो सतत ठासून तेच बोलत होता पण तो बाकी जे बोलत होता, ते मात्र चांगलं होतं.

पण काहीही म्हणा. रे रा आणि मेघा हेच bb ला शेवटपर्यंत हवेत. मेघा ला नॉमिनेशन पासून वाचवतात आणि रे रा बाहेर पडले तरी परत येतात. मीन्स रा पडून आलाय. मेघा कायम घाबरते नॉमिनेशनला, तिला आरामात votes मिळतील तरी मुलगी पण फोनवर सांगत होती. मम्मा घाबरू नको.

पर्सनली मला पुष्कर स्मिता हेच अजूनही आवडतात.

आस्त्या अजूनपण पूर्ण ताकदीने मे-सैच्या टीमच्या बाजूने उतरत नाहीये.
भूषण, ऋतुजा, मेघा आज बावचळले होते. सांडोबा राजेश फॉर्मात होते.

सै नॉमिनेशनच्या वेळेला काय बावळटपणे बोलली कळत नाहीये. तिने रेशमला जे पटवून द्यायचा प्रयत्न केला ते फेअर डील होतं. तिला प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती. रेशमने प्रयत्न पण नाही केला. लूझर्स कंपू आहे संपूर्ण.

Pages