बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज शेवटी किंवा उद्या येईल राजेश बाहेर.

म मां आज मस्त बोलतायेत, सर्वच स्वतः ला बिग बॉस समजतात, tasks नीट करत नाहीत म्हणून. मुली छान खेळतात मुलांपेक्षा हे सर्व बोलत होते.

बापरे म्हातारी वचनमुक्त झाली, आता रेशमचं काय खरं नाय, रड्याच्या समोर पाण्याची बाटली ठेवा नायतर डीहायड्रेशन होईल.

एग्झॅक्ट्ली अगदी हेच लिहायला आले होते, मेघाला कप्ल्नाच नाहीये पब्लिक केवढं सपोर्ट करतय तिला, इतकं कि जे सई पुष्कर फॅनहोते ते परवा मेघाशी असं वागल्यानी त्यांना शिव्या घालतयएत, अनेक नॉन मराठी युट्युबर्स्ब तिचे फॅन बनलेत आणि वेड्यासारखा सपोर्ट देतायेत्त तिला.
मुळात कॅप्टन व्हावसं वाटणे, जिंकावसं वाटणे, त्या साठी ऑब्सेस्ड असणे यात काय चूक आहे ? मला तरी अशा मुली आवडतात.
उलट इतर कसे नाहीयेत फोकस्ड , पिकनिकला आल्यासारखे का वागतायेत याचं मला आश्चर्य वाटतं .
Btw, ती शिल्पा शिन्दे कोण आहे ? हिंदी बिग बॉसची विनर आहे का ?
ती बरीच पॉपुलर दिसते, मेघाच्या सपोर्ट साठी पोस्ट्स टाकते ती सोशल मिडीय्॑अवर आता तिचेही युट्युब इंट्रव्ह्युज येतायत,जिथे ती मेघाला सपोर्ट करतेय !
नुसतीच मेघाला सपोर्ट करत नाहीये तर तिने मागे अस्ताद-राजेशना असभ्य बुलीज वर्तनाचा निषेध करून व्होट फॉर मेघा पोस्ट टाकली होती.
तिने हे ही म्हंटलय कि मलाही एग्झॅक्ट मेघासारखं क्रिटीसिझम मिळाल होतं हाउसमेट्स कडून अगदी सेम कारणांसाठी Happy

Btw, ती शिल्पा शिन्दे कोण आहे ? हिंदी बिग बॉसची विनर आहे का ?>>>> हो हिंदी बिग बॉसची विनर आहे, खूप प्रसिद्ध झाली होती बिग बॉसच्या वेळी, ट्विटरवर रेकॉर्डब्रेक पोस्ट आल्या होत्या तिला

शिल्पा शिंदे ला मी आधी चिडीयाघर मध्ये बघितलं होतं, मस्त कॉमेडी सिरीयल होती, मग मी सोडली बघायची ती सिरीयल मग शिल्पाने पण सोडली Wink . मग ती भाभीजी घरपे है मध्ये होती, ती सिरीयल मी एखाद दुसरा सीन बघितला असेन मग पेपर मध्ये गाजली शिल्पा आणि निर्माते यांची भांडणे. मग एकदम bb हिंदी मध्ये आली. मी नव्हते बघत पण news channel वर शॉट्स दाखवायचे आणि मग ती जिंकली हे कळलं. मग मुलाखत वगैरे बघितली.

शिल्पा जर सपोर्ट मेघाला करत असेल, तर मोस्टली जिंकेल ती कारण शिल्पाचे सपोर्टर खूप आहेत.

तसंही मेघाला असेही खुपजण सपोर्ट करतायेत. अर्थात शेवटी नशीब हाही एक factor असतो.

थत्तेंच्या स्वभावाला औषध नाहि. आज बाहेर गेले असतील तर आउ सुस्कारा सोडेल...>> तस बघायला गेलं तर आऊंच्या हि स्वभावाला औषध नाहीये . पहिल्यापासून त्या फटकळ / तोंडाळ म्हणूनच इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत . बर आता तर इतक्या सिनियर आहेत कि इंडस्ट्रीतले कोणी त्यांच्या वाट्यालाच जात नसतील /नाहीत त्यामुळे कोणीच विरोध करायला नाही म्हटल्यावर मस्त बेलगाम सुटलेल्या आहेत " मी थोबडावून काढीन" अशी भाषा थत्तेंना वापरतात . अरे ? तुमच्या एवढाच वयाने मनुष्य आहे तो . इतक्या ज्युनियर्स समोर हि भाषा ? असा अपमान ?

आऊंनी सुस्कारा सोडला असेल पण बाकीच्यांच्या पोटात गोळा आला असेल . इतके दिवस नाव ठेवायला /गॉसिप करायला थत्ते होते आता त्या आपल्या कडे मोर्चा वळवतात कि काय ? अशी भीती वाटत असेल सगळ्यांना . तसही सईने कालपासून आऊंच्या विरोधात बोलायला सुरवात केलीच आहे . त्या भसकन अंगावर येतात / सगळं त्यांच्याच मनासारखा झालं पाहिजे वगैरे वगैरे

राजेश ला आणल्यावर परत पाढे पंचावन्न होणार. वातावरण सेम, रे रा बोअर करणार.

आस्ताद, राजेश आतातरी सुधारणार का, अति समजतात स्वतः ला.

रेशमची मुलगी आईला भांडू नको कोणाशी सांगत होती आणि मेघाची मुलगी एकटी पडलीस तरी काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर सांगत होती.

सो स्वीट ऑफ देम.

सलमान पण म्हणाला ना बहुतेक म मां ना की इथे सगळेच स्वतः ला bb समजतात, मला नक्की शब्द आठवत नाहीये पण असंच काहीतरी म्हणून झापलं वाटतं म मां नी सर्वांना.

आणा आणा दाजींना, तसही असं कॅरॅक्टर असल्याशिवाय मसाला नाही घरात Proud
गेल्या आठवड्यात पजिल्यांदाच थत्तेंपेक्षा उ.ना चांगल्या खेळल्या होत्या टॉय्हाउस टास्क, त्या राहिल्या यात नवल नाही, पब्लिक सपोर्टही आहेच.

आता थत्ते गेलेत आणि राजेश येईल तर या पुढच्या आठवड्यात टास्क मध्ये राजेश आणि ऊना ची जोडी लावून टाका Happy

रा परत आला म्हणजे रे परत शिंग मारायला मोकळी.. एकटी होती तेव्हा जरा नॉर्मल ला आली होती,आवाजात दम नव्ह्ता. एकटिच्या जिवावर काहीही करू शकत नाही ती.आता परत ह्यांचे चाळे पहा.
मेघानी आस्ताद-रेचा डाव लगेच ओळखला सईला मॅनीप्युलेट करण्याचा.मेघा हुषार आणि चलाख आहे.
काल थत्ते चांगले दिसत होते ते टिकलया वगैरे न लावता.

उद्या राजेश आला Uhoh बाहेरच्या बाहेरच जा म्हणायला हवे होते.>> होना .
आत परत रे रा नाटक चालू . Angry

मदर्स डे च्या इमोशनल ड्रामा संवादांमुळे शाळा फार झालीच नाही.
म.मांची शाळा फक्त ‘खेळ मांडला ‘टास्क फसला बाबतीत बरी झाली .
ऋतुजा आवडायला लागली आहे, हुषार आणि शार्प वाटते बोलताना, उगीच नॉन सेन्स डंब बडबड नाही करत !
सुशान्तला हाकलायला हवे होते थत्तें ऐवजी, त्याला घरचे वेध लागलेत आणि मी इथ फिट नाही हे मान्य करून टाकलय रड्याने.
मांजरेकर म्हंटले सुशान्तला तुला लगोरी, लंगडी खेळायची असेल तर खेळ Biggrin
सगळ्या फिमेल काँटेस्टन्ट्स जास्त स्ट्रॉंग आहेत हे एक बरं झाल सांगितलं, आस्तादचा ओव्हरकॉन्फिडन्स्न चेहर्यावरून वहात असतो नुसता, बरं झालं बॉटम २ मधे आला.
भूषणला बाकी फार फुटेज द्यायला लागलेत मांजरेकर आणि बिग बॉस, कारण त्या टिममधे तो एकटाच टेक्निकली करेक्ट खेळतोय.
राजेश आता काय गोंधळ घालणार बघुया !
त्याच्या येण्याचे आनंदान्द वेडे झालेले दाखवले लोक , पुष्करही Uhoh
सई मेघा फक्त शॉक्ड दिसल्या.

कोणाला बाहेर काढायचं हे बिग बॉस ने च पहिल्यापासून ठरवलेलं असत. त्यांनी त्यांच्या अखत्यारीतून पहिल्यांदा थत्तेंनाच नॉमिनेट केलं होत . दरवेळी ते थत्ते यांनाच नॉमिनेट करत गेले . राजेश आणि उना कापून काढेन / थोबडावून काढेन / झोडपून काढेन म्हणून धमक्या देतात तरी त्यांना बिग बोस सेफ करत . आऊ प्रचंड डॉमिनेटिंग आणि थत्ते गुळमुळीत त्या आऊ किती खोट्याखोट्या रडल्या थत्ते जाणार म्हणून . भयंकर खोटारड्या आहेत त्या

Bhooshan.

>>मांजरेकर म्हंटले सुशान्तला तुला लगोरी, लंगडी खेळायची असेल तर खेळ Biggrin
Proud
त्याच लायकीचा आहे तो.. ऊचला त्याला बस झालं आता. सुशांत चं आजपासून नामकरण लुझर नं १.

राजा बाबू ईज बॅक..! आता खरी मजा येईल.. बिथरलेली मेघा, गोंधळलेली सई, कॅप्टन स्मिता, नविन जोमाची रेशम आणि कं..
आणि वचनमुक्त आऊ! 'दिवार' मोडः भगवान करे जब तू बंदूक चलाये तेरे हात ना कापे! Happy
शिवाय ममा नी सांगितलय टास्क मध्ये जिंकण्यासाठी खेळावच लागेल अन्यथा... x x x
थत्ते आज एलिमीनेशन मध्ये आधीच्या सर्व एपिसोड्स पेक्षा जास्ती 'भाव' खाऊन गेले. माणूस पोहोचलेला आहे एकदम! कधी कधी थत्त्यांची ऊच्च मराठी, ममा ने झेपते का हे कळत नाही... Wink
पण ममा च्या गाण्यांवर आपण फिदा.. he could have been good playback singer.

भूषण ची सर्वच स्पष्टिकरणे आवडली.

पुष्कर आता काय स्ट्रॅटेज़ी करतो यावर पुढील बरेच काही ठरेल असे दिसते.. या घरातील तराजूच्या दोन पारड्यांमधला काटा आहे तो.

Rutuja has emerged as dark horsre.. keep an eye.. she was ignored by all for her age and in experience. But all of sudden they find her too strong. If she gets in 'Sushalya' mode she can really crack few nuts.. Wink

>>मी कालचा भाग मिस केला Sad
वूट वर बघशीलच पण काही क्षणचित्रे:
१. ममां नी सर्वांची शाळा घेतली- वाटेल ते नियम करता पण जिंकायला कुणीच खेळत नाही वगैरे.. (खेळण्यांवरील कॉमेंट्स वरून असे वाटले ममा ईथले वाचतात- किंवा त्यांचे हेर मायबोली पे चारो और फैले हुवे है!) पुढील आठवड्यापासून खेळा नाहीतर घरी जा..
२. मदर्स डे निमित्त सर्व आया व मुलिंनी भरपूर फुटेज व मते खाल्ली. फोना फोनी झालई आया व मुलींची ऑन कॅमेरा.. मेघाने ईतर आया व मुलींची मते पटकवायची एकही संधी सोडली नाही. (कसे झेलते तीची फॅमिली तीला देव जाणे! तीन महिने ती घरी नाही म्हणून मज्जा करत असतील खरे तर...) Happy ममां नी त्यांच्या खास आऊं ना पुन्हा एक्दा भरपूर फुलटॉस दिले आणि आऊं नी मौके पे चौके मारले...
३. स्मिता ला मात्र कुणाचाही फोन नाही आला. का मी मिसले? ब्रेव गर्ल!
४. फोन कुणालाही असला तरी लुझर सुशांत भोकांडे पसरत होता सारखे.. एव्ह्डे तर आमची पिल्ले पण कधी रडल्याचे आठवत नाही. Happy
५. कंफेशन् रूम सेशन झाले, त्यात मेघा, रेशम, आऊ ना ममा ने प्रश्ण विचारून खरे का खोटे ऊत्तर मागितले. आणि मग बाहेर स्पर्धकांना परत त्याच प्रशाण्वर खरे का खोटे असे त्यांचे ऊत्तर मागितले. एकच हायलाईटः मेघा वेळ आली तर कुणाचाही विश्वासघात करू शकते - खरे का खोटे? मेघा म्हणली खोटे. रूतूजा वगळता (स्मार्ट गर्ल!) सर्वच स्पर्धक म्हणले 'खरे'. Happy आणि मेघा जास्तच बिथरली.. थोडक्यात मेघा वि. सगळे घर .. पण ममा नी सावरून घेतले. म्हणले ती तर जिंकायलाच आलीये पण ईतर कुणि तसे खेळत नाहीत. Happy थोडक्यात हे खरे खोटे सेशन म्हणजे निव्वळ अजून काड्या घालणे व एकमेकात अविश्वास निर्माण करणे सेशन होते..
६. आता ममा नी डोळे ऊघडले आहेत.. सगळे गेले भोxxx मी आता फूल टशन खेळणार असे खुद्द बाळ भूषण ने जाहिर केल्याने पुढील सर्व आठवडे अधिक तडकेबाज होतील असे वाटते.
७. राजा बाबू बाहेर होते तेव्हा रेशम मध्ये सकारात्मक बदल होता या प्रश्णावर सर्वांचे एकमत झाले.. तीचा सर्व वेळ 'तिथेच' जायचा.. इती आऊ. Proud त्यामूळे आता राजा बाबू आत येणार म्हणजे दिवाळीच्या पहाटे एकदम छान साखर झोपेत असताना अचानक कुणितरी कानात सुतळी बाँब फोडल्या सारखे होणार आहे काही स्पर्धकांसाठी. Proud
८. आरोपी- पिंजरा सेशन झाले. त्यात आस्ताद ची विशेष शाळा घेतली ममां नी. आणि आता हे मांडवली गिरी बस झाली, ज्यासाठी पैसे घेताय ते काम करा असे थोडक्यात बजावले. त्यावर आस्ताद ची दांडी गुल झाली.
९. आस्ताद सुशांत व थत्ते अनसेफ झाले आणि शेवटी सर्व स्पर्धक व प्रेक्षकांमते थत्ते बाहेर पडले. जाताना आऊ नी अगदी साश्रू नयनांनी व जोडलेल्या हातांनी त्यांना थेट दारापर्यंत निरोप दिला आणि बॅगही दिली.. याला म्हणतात कटे मुर्गे पे डकार! Happy
१०. असो. अजून तरी कुणि नविन स्पर्धक येईल अशी हिंट दिलेली नाही..

तेव्हा आता पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार महाभारत..
'मै समय हू... '.. Proud

मेघा मला फार आवडत नसली तरी टक्कर देण्याची आणि टिकून रहाण्याची क्षमता तिच्यात जास्त आहे त्यामुळे तिला वाघिण किताब जास्त शोभतो. कोणी किती विरुद्ध गेलं, एकटी पडली तरी ती तिचा लढा देणार. काही स्वभावात त्रुटी आहे पण overall ती सॉलिड आहे.

Pages