आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सिरीअसली कसला कडक खेळला!
आता राणाही तसाच खेळू दे!

पण selection फारच विचित्र झालय!
या आत्ताच्या फॉर्मवर मनीष पांडेच्या आधी बऱ्याच जणांचा नंबर लागतो!

आयपीएल च्या परफॉर्मन्स वर टीम सिलेक्शन होणार नाही असं बीसीसीआय ने मागे सांगितलं होतं ना? अर्थात काही काही खेळाडूंच्या कमबॅक साठी आयपीएल चा निकष वापरलाय (रायडू, नेहरा), पण कमबॅक वेगळा आणी पहिलं सिलेक्शन वेगळं.

कुठल्याही कारणासाठी का होईना, किशननी तुफान धुतला काल.. तो थोडा टिकला असता तर 250 झाले असते कदाचित,
केकेआर वाल्यांनी दोन सीमारेषेवरचे कॅच जबरी घेतले पण, एकदम रेषे लगत उभे राहून बाहेर जाणार बॉल पकडला

भाऊ, तुमचे व्यंचि हवे कालच्या सामन्यावरून!

इशान किशन ने कुलदीपला मारलेले सलग ४ षटकार अफलातून होते..
पण शेवटचे षटक पिचा ला का दिले डीके ने?

डीडी आणि आर्सीबी वरील सर्वांना एका रांगेत आणून बसवू शकतात!

हार्दिक पांड्या फार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी टाकतोय. स्पेशली त्याचा चेंज ऑफ पेस फलंदाजांना समजत नाहीये आणि हवेत कॅच उडवत आहेत. कदाचित त्याला अंडरएस्टीमेट करत असावेत. पण त्यामुळे बघता बघता सर्वाधिक विकेट झाल्या..

<< पण शेवटचे षटक पिचा ला का दिले डीके ने? >> ' विनाशकाले विपरित बुद्धी ' यापलिकडेही जावून त्या षटकाबद्दल मला कांहीं म्हणायचंय; मुंबैला रनरेटचा कमाल लाभ उठवणं आत्यंतिक महत्वाचं होतं व त्यामुळे त्या षटकात हाणामारी फलंदाजांकडून अपेक्षितच होती. अनुभवी फिरकी गोलंदाजाला तें षटक देण्यामागे एकच उद्देश असूं शकतो - 'फ्लाईट, स्पीन व बाऊन्स 'यांतील विविधतेने कुठेतरी फसून फलंदाजांच्या हाणामारीला आळा बसूं शकतो , बळीही मिळूं शकतो. पण चावलाने तें पूर्ण षटक फक्त 'फास्ट व फ्लॅट ' चेंडूच टाकून त्या उद्देशालाच सुरूंग लावला ! मला तरी हें अक्षम्यच नाहीं तर अगम्यही वाटलं . उलटपक्षीं, मार्कंडेयसारख्या नवोदित गोलंदाजाला नंतर प्रसंगोचित अतिशय खुबीने फिरकी गोलंदाजी करताना पाहून चावलाची किंवही वाटली.
<< भाऊ, तुमचे व्यंचि हवे कालच्या सामन्यावरून!>> याला म्हणतात ' आ बैल मुझे मार !' तरी पण -

ganga.jpg

भाऊ, तुम्ही आता मुंबई च्या विजयी पताकेची चित्रं काढायला घ्यायला हरकत नाही. मुंबई ने आता कर्जत स्लो मधून डोंबिवलीला उतरून व्हीटी फास्ट पकडलीये. आता चेन्नई ला हारवून, आयपीएल जिंकून, 'सुरेश-रमेश' ट्वीट ला प्रत्युत्तर देऊनच नीता-भाभींना मुलीच्या लग्नाचं गिफ्ट देणार मुंबई इंडियन्स.

पण त्यामुळे बघता बघता सर्वाधिक विकेट झाल्या. >> हो मी पण ते पाहिले तेंव्हा परत जाऊन चेक करून बघितले.

पण शेवटचे षटक पिचा ला का दिले डीके ने? >> personally मला त्याने खूप मोठा फरक पडला असे वाटले नाही. १८० वगैरे पण कठीणच होते चेस करायला तसेही KKR ची बॅटींग पूर्ण गीअर मधे पडत नसताना. कुपदीपच्या over चा impact जास्त होता. एकदन हतवीर्य झालेले वाटले KKR तिथे. इशान चा बॅलन्स काय अफलातून होता त्या शॉट्स मधे, जबरदस्तच !

अर्थात काही काही खेळाडूंच्या कमबॅक साठी आयपीएल चा निकष वापरलाय (रायडू, नेहरा), पण कमबॅक वेगळा आणी पहिलं सिलेक्शन वेगळं.>> मला हे लॉजिक फारसे झेपले नाहिये खर तर. किशन ला घ्या असे मी सुचवत नव्हतोपण त्या लिस्ट मधे बरेच जण असे आहेत ज्यांची domestic कामगिरी त्याच्या पेक्षा उजवी नाहिये त्यामूळे फक्त नंबर्स हा एकमेव निकष नसावा तर overall balance वगैरे लक्षात घेतला असेल. पंत, सॅमसन, कार्थिक असताना अजून एक कीपर नको असा विचार असू शकतो.

भाऊ टॅटू वाले एकदम सहीच होते.

<< personally मला त्याने खूप मोठा फरक पडला असे वाटले नाही. >> असामीजी, चावलाच्या त्या षटकात धांवा दिल्या गेल्या हा मुद्दा माझ्यासाठीही अगदींच दुय्यम होता; [ काल तर भुवीसारख्या गोलंदाजानेही चांगली गोलंदाजी करूनही एका षटकात २६ धांवा दिल्या !] चावलासारख्या एका अनुभवी फिरकी गोलंदाजाकडून अपेक्षित प्रयत्नांची किमान झलकही दिसली नाही , हें त्रासदायक होतं !
<< तुम्ही आता मुंबई च्या विजयी पताकेची चित्रं काढायला घ्यायला हरकत नाही >> --

train.jpg

काल तर भुवीसारख्या गोलंदाजानेही चांगली गोलंदाजी करूनही एका षटकात २६ धांवा दिल्या >> भाऊ दिल्या म्हटल्यापेक्षा पंत ने घेतल्या हिसकावून असे म्हटलत तर अधिक योग्य ठरेल. Happy काय ते शॉट्स होते ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉल्स वर मारलेले. अगदी दिल्ली चे मैदान्लहान आहे नि पिच बॅटींगला धार्जिणे हे धरूनही, मला नाही वाटत भुवीला अजून काही फार वेगळे करता आले असते. One just has to appreciate sheer brilliance of those strokes.

>>आता आर आर अजुन एखादी मॅच खतरनाक वगैरे जिंकतील.... आपल्याला आशेला लावतील आणि मग नेहमीसारखे गचाळ खेळून मिड टेबल येउन बसतील!

यातला पूर्वार्ध खरा ठरला.... उत्तरार्ध ठरु नये ही अपेक्षा!

असामी टोटली अग्रीड... पण नंतर हैद्राबाद वाल्यानी फार कॅल्क्युलेटेड मारला आणि मॅच जिंकली..

आजची मॅच मस्त झाली, चेन्नई सुरुवातीला चांगले खेळत होते, पण मधल्या ओव्हर्स मध्ये राजस्थानी बॉलर्स चमकले आणि 176 धावाच झाल्या, सुरुवाती वरून 200 पर्यंत जातील असे वाटत होते,
राहणे आज पण फेल, बटलर चांगला खेळला, आणि गौतम नी 4 बॉल मध्ये 13 मारून मॅच फिरवली..

(and dhoni Wink )>> उद्याचे एक पोस्ट क्लीयर झाले Wink

गौतम ने बटलरला वाचवले असे म्हणायचे का ? CSK ला चहरची कमी जाणवतेय.

पण नंतर हैद्राबाद वाल्यानी फार कॅल्क्युलेटेड मारला आणि मॅच जिंकली.. >> हो खरय पण दिल्लीची बॉलींग ठिकठाकच आहे नि दिल्लीच्या पिचवर खेळलेत हेही लक्षात असू दे.

रॉयल्स मस्त खेळले. बटलर बरोबर स्टोक्स ला ओपनिंग ला पाठवायची मूव्ह जबरदस्त होती. धोनी ची कॅल्क्युलेशन्स पार बिघडली त्यामुळे. पॉवरप्ले मधे त्याला स्पिनर्स च्या ४ ओव्हर्स संपवाव्या लागल्या.

रॉयल्स ना अजुन एका सॉलिड इंडीयन बॅट्समन ची गरज आहे. संजू सालाबादप्रमाणे सुरूवातीला १-२ इनिंग्ज खेळून आता थंडावलाय. रहाणे त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं १२५/१३० च्या स्ट्राईक रेट ने ३०-३५ ची सॉलिड इनिंग खेळत नाहीये. त्रिपाठी यंदा चालला नाहीये. त्यातल्या त्यात संजू फॉर्म मधे आला तर मजा येईल. किमान गेला बाजार रहाणे तरी त्याच्या एलेमेंट मधे यावा.

<< भाऊ दिल्या म्हटल्यापेक्षा पंत ने घेतल्या हिसकावून असे म्हटलत तर अधिक योग्य ठरेल. >> असामीजी, मान्य. चावलाच्या संदर्भात म्हणून मीं तसं म्हटलं होतं; खरं तर पंतची ती खेळी exquisitely explosive and highly creative अशीच होती. लागोपाठ दोन चेंडूंवर पॉईंट व थर्ड्मॅन यामधे भुवीला मारलेले ते 'फ्लिक्स' कल्पक व अप्रचलीत तर होतेच पण ते इतक्या सफाईने मारले होते कीं भुवीही अवाक झाला होता. आजच सौरवने पंतबद्दल 'his time will come', ' असं म्हटलंय; मला वाटतं, it's high time that he is seriously considered ! '

अरे बर्‍याच दिवसांनी आलो आणि भाउंची चित्रे मिस झाल्याचे दिसले. पाहतो आता आधीची पाने.

केकेआर वि च्या मॅच मधे गेल ची फिल्डिंग इतकी आरामशीर का चालू होती? जुने भारतीय फील्डर्स त्याच्यापुढे जॉण्टी र्‍होड्स वाटतील असा संथ आणि निर्विकार दिसला तो. जखमी वगैरे आहे का?

दिल्लीवाले दर २-३ मॅच नंतर एक नवा खेळाडू काढतात राव >>>>
ते खेळतात देखील चांगले!

यंदा बहुदा शेवटून पहिल्या संघातील फलंदाज भगव्या टोपीवाला असेल असं दिसतंय!

Kkr ने दोन मॅच मधला स्कोर एकदम बनवला तुटून पडलेले.. बहूदा मुंबई विरूद्धचा पराभव जिव्हाळी बसला.. हाच अॅटिट्युट शेवट पर्यंत राहीला तर कोलकता सगळ्यांची शिकार करेल.

पृथ्वी, अभिषेक, पंत, श्रेयस, इशान, यांच्यासारखे शुभमला अधिक संधी द्यायला हवी..

काल चेन्नई ने हैद्राबाद चा सहज कचरा केला. मला सीएसके बद्दल प्रेम नसलं (रैना वगैरे विषयी जरा सॉफ्ट कॉर्नर आहे) तरी हैद्राबाद च्या बॉलिंग बद्दल माझी थियरी - ते काही आऊट ऑफ धिस वर्ल्ड वगैरे नाहीयेत - ह्याला दुजोरा मिळाला.

राजस्थान ने फिल्डिंग मधे गचाळपणा करत सुद्धा बटलर - रहाणे - संजू च्या बॅटींग वर मुंबई ला सहज हारवलं. अर्थात राजस्थान च्या कँपमधे जास्त मुंबईकर होते हा भाग अलाहिदा (२ खेळाडू, २ सपोर्ट स्टाफ). रहाणे ची कॅप्टन्सी खुप subtle aggressive आहे. तो काल जे खेळला, तसाच खेळला (१०० - १२५ च्या स्ट्राईक रेट ने ३०-४० रन्स) तर रॉयल्स च्या बॅटींग ला आधार येतो. अर्थात दुसर्या बाजूने एखादा बटलर हवाच.

आज पंजाब जिंकले तर प्रिती झींटा, एक हाती अंबानी आणी मल्ल्या ला धक्का देऊ शकेल. Wink

पंजाब ज्या तर्‍हेने आज खेळतय ते बघून मूम्बईचे काही खरे नाही. पेटून खेळतील पुढची मॅच बहुधा.

मुंबईच्या बॉलिंगला काहीच धार नाही. मुस्तफाजीर चालला नाही, कमिन्स आला नाही नि मिल्ने वर विश्वास नाही. JP नि कटींग दोघांनाही खेळवावे लागते म्हणजे बॅटीम्ग ऑर्डरवर विश्वास नाही. यादव नि लूईस दोघेही भयंकर डॉट बॉल्स घेतात. एकाने घेणे परवडू शकते, दोन्ही बाजूने तोच प्रकार सुरू झाला कि सरासरी आठच्या पुढे सुरूवात होत नाही नि मग फिल्डींगrestrictions संपल्या कि उडवाउडवी करण्यात विकेट्स ही जातात. CSK नि SRH मुंबई पहिल्या चौघांमधे (तिसरे किंवा चौथे) असावेच अशी इच्छा धरून असतील. हरवायला सोपे Happy

रायूडूला ICL चा मोह पडला नसता तर ... जर तरच्या गोष्टी ......

पंजाब ८८ मधे ऑल-आऊट!!

" JP नि कटींग दोघांनाही खेळवावे लागते म्हणजे बॅटीम्ग ऑर्डरवर विश्वास नाही" - ती मुंबई ची खासियत आहे. भरपूर कुशनिंग घेऊन खेळतात ते. त्यांच स्क्वाड सुद्धा असच भरपूर खेळाडूंचं - बॅकप्स नी भरलेलं असतं. एकदा त्यांनी मॅक्सवेल का १ मिलियन डॉलर्स ना घेऊन सीझनभर बसवून ठेवलं होतं. गुप्टिल, बटलर अशी कितीतरी उदाहरणं आहेत.

Tournament is wide open!
आता प्रत्येकी फक्त दोन दोन मॅचेस राहील्यात आणि दिल्ली सोडून सगळ्यांना निदान कागदावर तरी प्ले ऑफची संधी आहे!

मजा आ गया!

हो ना, यंदा फारच वाईड ओपन आहेत पहिल्या चार जागा, अर्थात पहिल्या दोन नक्की झाल्यात, पण उरलेल्या दोन साठी 5 टिम.. मोज्जा ही मोज्जा

नाका-तोंडात पाणी जाईपर्यंत हात-पाय हलवायचे नाहीत , ही मुंबै इंडीयन्सची आयपीएलमधील नेहमीची खासियतच आहे. यंदा मात्र पाणी डोक्यावरूनही गेलंय, इतकंच. बघूं सचिनची पुण्याई व माझ्यासारख्या अगणित खुळ्या व हट्टी पाठीराख्यांच्या शुभेच्छा त्याना तारतात का !

Pages