बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>हायेस्ट नॉमिनेशन्स त्यांनाच गेली पाहिजेत अशी बिग बॉस ची सोय आहे ती
पण थत्ते जाणार नाहीत असेही संगनमताने ठरवले असावे असे वाटते... ते एक्दम पहुचे हुए निघाले.. म्हणजे एकीकडे काड्या घालायच्या आणि दुसरीकडे कॅमेरा समोर वाक् चातुर्याने लोकांची सहानुभूती व मते मिळवायची. बाकी सगळी मंडळी बच्चे कं भासू लागली आहे त्यांच्यापुढे.
राजा भाऊंचा चार्म शून्य आहे मात्र टिपीकल मध्यमवर्गीय लाईन मारण्यात पटाईत आहे. Wink असो.

आस्ताद याही वेळी गद्दारीच करतोय. उनांच्या वेळेला मुलांच्या रूममध्ये बसून विरुद्ध टीमच्या बाजूने उनांवर आवाज चढवत होता. बिबॉ तरी प्रत्येक वेळी हा गद्दार दुसऱ्या टीमच्या गळ्यात का मारत आहेत?

बिबॉ तरी प्रत्येक वेळी हा गद्दार दुसऱ्या टीमच्या गळ्यात का मारत आहेत? >> तिथेच तर खरा टिआर पी आहे ना. डिव्हाईड अ‍ॅन्ड रूल. अस्ताद पडला आपला गृप भक्त. जिथला जाऊ तिथला व्हायचं सोडून हा लॉयल्टि दाखवत बसलाय त्यामुळे आपोआप स्वतःच्या टिमशी गद्दारी होत्ये ते कळत नाही त्याला. पण त्यामुळे तो चर्चेत सुद्धा राहतोय. आणि चर्चेतले लोक नेहमी सेफ असतात.
आता जुई जाईल, मग भूषण, मग उना पण जातील.. मग पुष्कर
बाकी रेशम, राजेश, अस्ताद, मेघा सई ट्फ खेळतायत. पुढचे ४ आठवडे तरी यातलं कुणी बेघर होइल अस मला नाही वाटत.

चैत्राली चीप कमेंटस नाही केल्या उ ना यांनी. फक्त की ते डायरेक्ट मेघाला सांगू शकल्या असत्या, पुष्करजवळ उगाच बोलल्या.

थत्तेला सिक्रेट टास्क 'कुणाला सान्गू नका' बजावून दिला होता बिबॉने, तरीही हयान्नी तो टास्क सान्गितला आस्तादला बिबॉ लेटर दाखवून. आता बिबॉने त्यान्ना शिक्षा केली पाहिजे.

रे रा ला सान्गत होती कि काही जण आपल्याबद्दल Gossiping करतायत, पण आपण काय चुकीच वागतोय, आपण तर Normal च वागतोय ना. रे रा ला जाऊन कुणी सान्गा रे की मान्जर जरी डोळे मिटून दुध पित असेल तरीही सगळ जग तिला पाहत असत.

विनीत बद्दल त्यांनी जे काही सारांशात म्हटले ते बरोबरच आहे. >>>> पटल नाही. तो बिचारा तिथे एका दिवसासाठी आला होता, ंमहाराष्ट्र दिन साजरा करायला, त्याचा असा अपमान करायला नको होता थत्तेनी.

काल ते पुष्कर बायकान्सारखा नाचतो असेही म्हणाले. Sad

सई म्हणत होती काल मेधाला की, राजेशची बायको यायला हवी big boss मध्ये , मजा येईल. Lol

सुलू एक्झाक्टली, सिक्रेट टास्क सांगू नका असं मलाही ऐकल्यासारखं वाटतंय. मी काल तोच विचार करत होते. आपण नीट ऐकलं का, कारण हल्ली एका जागी बसून बघत नाही ही नाटकं.

सुलू एक्झाक्टली, सिक्रेट टास्क सांगू नका असं मलाही ऐकल्यासारखं वाटतंय. मी काल तोच विचार करत होते. आपण नीट ऐकलं का, कारण हल्ली एका जागी बसून बघत नाही ही नाटकं. >>> नैतर काय, मला तो चोरीचा टास्क ही नाटक वाटत होत. कन्टाळा येत होता बघायला.

विनितच्या जन्माबद्दल केलेली कमेंट थत्ते यांची अतिशय खालच्या पातळीची होती. खार खाऊन आहेत त्याच्यावर, त्याने उलट मस्त फाईट दिली होती त्यांना. मला बिबॉ चा पण राग आलाय, विनितने नॉमिनेट करुन ते सेफ झाले. फॉरमॅट चुकीचा होता.

थत्ते मला नाहीच आवडत, डोक्यात जातात, रंग लगेच बदलतात आतूनही. जिंकणार ते शेवटी. अशीच माणसं जिंकतात.

नाही सिक्रेट टास्क चोरांना सांगण्याची परवानगी आहे. केवल आस्तादला सांगणं चुकीचे आहे. आधी टीम कॅप्टनलाच सांगायला हवे होते. पण थत्ते सटकलेला म्हातारा आहे. पुष्करने त्याचं केलेलं वर्णन अगदी योग्य आहे.
या वेळी भुषण किंवा जुई जाणार. उना, सुशांत नंतर.
ऋतुजाने आता हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीत/टास्कमध्ये. चर्चेत राहण्याचा तेवढा एकच मार्ग तिला उपलब्ध आहे. रे सारखा कुणी रा तिला पटणार नाहीसे दिसतेय तिथे.

सिक्रेट टास्क फक्त पोलीस टीमला (ज्यांच्याशी ते गद्दारी करणारेत बिबॉ च्या सांगण्यावरून) सांगायला मनाई आहे. चोर टीमला सांगू शकतात थत्ते.

चोरांना सिक्रेट टास्क सांगायला परवानगी आहे पण फक्त आस्तादलाच सांगीतला त्यांनी आणि ते पण ठिक आहे पण आस्ताद म्हणतोय की मी पण सुशांतला सांगून ठेवतो...अरे पण सई चं काय? कप्तान आहे ना ती तुमची? ह्यो आस्त्या आस्तीन का साप हाय.. Wink
आऊंना चालू झालेलं पाहून भारी वाटलं पण थत्तेंना सलाम...एवढं आऊंनी उकसवून पण चिल्ल आहेत..भारीच...लंबी रेस का घोडा आहेत.

थत्ते, थत्ते, थत्ते; यांचं काय करायचं हा प्रश्न बिग्बॉसला पुढे पडणार आहे. बिग्बॉस थत्त्यांना चावी देऊन शो एस्टॅब्लिश करण्याच्या प्रय्त्नात आहेत पण या प्रोसेस मध्ये "आय क्रिएटेड ए मांस्टर" असं त्यांच होऊ नये. काहि वर्षांपुर्वि हिंदि बिग्बॉस मध्ये स्वामी ओम नावाचं एक कॅरेक्टर होतं; थत्ते त्याच मार्गावर चाललेले आहेत असं दिसुन येतंय...

काल पुष्करने थत्त्यांनी त्याच्याबाबत केलेली कामेंट उघड केली. अत्यंत डिज्गस्टिंग. एक वयस्कर माणुस असा विचारच कसा करु शकतो हे अनाकलनिय आहे. थत्त्ते जास्त दिवस टिकणार नाहित. त्यांच्या मते ते करत असतील मनोरंजन, पण प्रत्यक्षात ते जे काय करतायत ते घृणास्पद आहे हे प्रेक्षक लवकरच वोटिंगच्या माध्यमातुन दाखवतील अशी आशा करुया...

मला नाही वाटत ते जिंकतील असं.
*मेघा सकाळी डान्स नन्तर जे "गुड मॉर्निन्ग बिग बॉस म्हणते ते माझ्या डोक्यात जातं. एकूणात ती मला आवडतच नाही. Sad
* रेशम राजेश बद्दल माझी काही मतंच नाहित, ते मला आवडतात की नाही तेच नाही कळत. राजेश दिसायला बरा आहे. रेशम पण बरी आहे. मला परवा तिची साडी आणि डान्स दोन्ही आवडले. बाकी तिच्या आणि राजेशच्या रोमान्स बद्दल मला काही बोलायचा अधिकार नाही.

* सई सारखं स्मिताला डम्ब म्हणते ते मला आवडत नाही.
* आऊ खूपच हार्ष आहे.
* पुष्कर अगदी टिपिकल 'अ' वर्गातला मूलगा वाटतो.
* भूषण बाकी काही करत नाही पण कधी मधी स्टुपिड बोलतो ते आणि ढिन्चॅक चॅक करत जो नाचतो ते दोन्ही आवडत नाही. उना पण तेव्हा वाकडं चालते काय भानगड आहे? Uhoh ति काय सिग्नेचर स्टेप वगैरे आहे का?
* रेशम सहनिय आहे.
* टास्क्स बरे करते त्यामुळे सई पण आता सहनीय झाली आहे.
* थत्ते वाईट आहेत की चांगले तेच क्ळत नाहिये Uhoh

मला तर सगळ्यात फक्त स्मिता बॅलन्स्ड वाटते. बाकी अस्ताद कितीही प्रिय असला तरिही तो बॅलन्स्ड खेळत नाहिये.
इतर सगळे तर सरकलेलेच आहेत.
ऋतुजा आणि जुई तर आहेत असं लक्षात पण येत नाही.

अरे ते थत्ते स्वतःला कळीचा नारद काय म्हणताय्त? यांनी हुषारीने दोन गटात भांडणे लावली असती तर वेगळे , पण उगीच लोकांना इन्सल्टिंग बोलून स्वतःलाच वाईटपणा आला तर कसला आलाय कळीचा नारद!
ते एलिमिनेट होतील असे वाटते - पण फक्त थोड्या काळासाठी. कारण वाइल्ड कार्ड मधे ज्याची पुन्हा एन्ट्री झाल्यावर खळबळ माजेल असे तेच आहेत Happy
मेघाचे प्लॅनिंग चुकले असे वाटते. चोर पोलिस चे टास्क सुरु व्हायच्या आधी जेवण -खाणे कोण बन्वणार केव्हा बनवणार हे ठरवून द्यायचे ना. उनांच्या जेवणाची आबाळ झाली त्यामुळे चिडचिड करत होत्या Happy विशेषतः ओल्डर लोकांना, ज्यांना डायबेटिस पण आहे, त्यांना खाणे वे़ळेच्या वेळेला लागते हे खरे आहे. पण त्या घरात साधे बिस्किटे, ब्रेड , बटर वगैरे असले आय्टेम्स नसतात का? नास्ता बनवला नाही म्हणून भांडायची वेळ कशाला? उना तरी स्वतःचे स्वतः काहीतरी बनवून घेईल एक वेळ पण थत्तेंना तर गॅस पण पेटवता येईल की नाही शंका आहे Happy

पुढचे कप्तान माझ्या मते तरी थत्ते होतील...कारण बिबॉच्या कालच्या म्हणण्यानुसार या सिक्रेट कार्याचा परीणाम तुमच्या घरातील पुढच्या वाटचालीवर होइल...आता ते तर यावेळी नॉमीनेट नाहीयेत त्यामुळे पुढची वाटचाल म्हणजे बहुतेक कॅप्टन्सीचे उमेदवार होतील ते..तब आयेगा मजा! आऊ Wink

>> पण थत्तेंना तर गॅस पण पेटवता येईल की नाही शंका आहे Happy
त्यांना जे पेटवणे अपेक्षित आहे ते व्यवस्थित करत आहेत.. Wink
मुळात असे डायबेटीस, दमा, वगैरे असलेल्यांना घ्याय्चे कशाला? आणि ते कागदावर लिहून देतच असतील.. काही कमी जास्त झाले तर जबाब्दार मीच. तेव्हा आपण फक्त मजा पहात रहावी हे बरे.

म्हातारी पहावं तेव्हा हा असाच तो तसाच, याने हेच केलं तिने तेच केलं करत असते, आणि कोणी काय याबद्दल तीला विचारलं की लगेच मी कधी बोलले, माझ्याकडे वेळच नाही अशी उत्तर देऊन मोकळी होते, रेशमसोबत जुंपणार आहे आज म्हातारीची.

पण सई चं काय? कप्तान आहे ना ती तुमची? ह्यो आस्त्या आस्तीन का साप हाय. >>>>
त्याने सांगितल की सई ला... अन वरून मेघाला सांगू नको अशी ताकीद पण दिली

सई मस्त दिसत होती काल Happy

त्या चित्रविचित्र टिकल्या लावण्यामागे फक्त लक्ष वेधून घेणे हा एकच हेतू आहे का? की त्यामागे काय स्टोरी आहे?
त्यांची बायको तरी नॉर्मल आहे नशीब... तुम्हाला खूप मिस करतो असं म्हणुन गेली.. Happy

उना अजिबात आवडत नाही.. फार लाऊड एकदम नळावरचे भांडण करणारी टाईप्स बाई आहे. थत्तेंना थोबडवीन म्हटली तेव्हा दोन मिनिट थत्तेंबद्दलच वाईट वाटलं. बाकी ते कसेही असले तरी त्या क्षणी कसंतरीच वाटलं. आणि तेव्हाही ते शांतच होते. बरं मी काळजी घेईन, तुम्हाला काही बोलणार नाही वगैरे वगैरे Uhoh

अन वरून मेघाला सांगू नको अशी ताकीद पण दिली>>> ओह..मग ठीक आहे..केलं त्याला माफ!
<<सई मस्त दिसत होती काल Happy>>> खरंच..!
<<रेशमसोबत जुंपणार आहे आज म्हातारीची.>> मज्जा आहे म्हंजे आज...राणीसांच्या बाजूने मग राजा व प्रजा उभी राहील. तरीच म्हण्लं आठवडा संपत आला तरी काही झालं कसं नै...ममांना शनि-रवी ला बोलबच्चन द्यायला काहीतरी कंटेंट हवाच की.

Pages