Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला चोर पोलीस मध्ये काय
मला चोर पोलीस मध्ये काय करतायेत हे कळतंच नाहीये. फार बोअर करतायेत तरी मी tv लावून अधूनमधून बघतेय. आस्ताद बद्दल सई बरोबर बोलली.
दक्षिणा,
दक्षिणा,
बाहेर गाठण्या आधी सोशल मिडीयावर गाठु शकतेस, वर्ल्ड इज टु स्मॉल देअर , यु नेव्हर नो हु इज वॉचिंग युअर पोस्ट्स , अनरिचेबल असं कोणीच नसतं Happy
- स्वानुभव >> सो ट्रु दिपान्जली. जरा जपूनच लिहिलं पाहिजे खरं. पण मी वाईट साईट काहीच लिहित नाही त्याच्याबद्दल म्हणा. कौतुकाचा वर्षावच केलाय आत्तापर्यंत
दक्षि दिसण्यात ह्या सर्व मुलींची दांडी गुल करेल गेली तर. त्या आस्तादचं व्यसन सोडवेल, मस्त म्हणीत संवाद साधेल तर समोरचा गारद. >> अन्जू तुला किती माझ्याबद्दल आत्मविश्वास. छे गं इथे बसून बोलायला काय जातंय.
तिथे आयुष्य नक्कीच अवघड असणार.
हो ग बरोबर आहे पण दिसण्यात तू
हो ग बरोबर आहे पण दिसण्यात तू भारी आहेस हा त्यांच्यापेक्षा, हे माझं पर्सनल पण ठाम मत.
त्या बिचार्याचा प्रोटीनचा डबा
त्या बिचार्याचा प्रोटीनचा डबा नका रे चोरू
अस्ताद उना ला सांगत होता की
अस्ताद उना ला सांगत होता की (थत्तेंना) अनुल्लेखाने मारा... हायला हा तर माबोची भाषा बोलतो.
ही सई स्वत:ला काय समजते सतत
ही सई स्वत:ला काय समजते सतत स्मिताला ड्म्ब डम्ब
उना आणि अनुल्लेख
उना आणि अनुल्लेख
दक्षिणा आज जरा जास्तच
दक्षिणा आज जरा जास्तच पेटल्यात.. चलने दो. आज "बदाम" फार कमी दिसला स्क्रीन वर म्हणून का?
आणि
घ्या.
उना एकदा अनिलच्या विशिष्ट
उना एकदा अनिलच्या विशिष्ट जागी लावलेल्या टिकल्यांबद्दल बोलतात अन् मग लगेच म्हणे मी बघत पण नाही तुमच्याकडे. मला हसूच आलं एकदम.
मी नाही त्यातली अन कडी लाव
मी नाही त्यातली अन कडी लाव आतली.
अहो पाफा मी रिपिट पाहतेय.
अहो पाफा मी रिपिट पाहतेय.
पहिलं मिळत नाही मला पहायला.
स्मिता पोलिसाच्या ड्रेस मधे
स्मिता पोलिसाच्या ड्रेस मधे अप्रतिम दिसते
रविवार चा आती बोअर भाग बघितला
रविवार चा आती बोअर भाग बघितला. काही स्वाभाविक प्रश्न :
1 - सर्व कलाकारांनी गुण दर्शन केले त्याची प्रॅक्टीस केवा केली? बिग बॉस मधे यायच्या आधीच त्यांच्याकडून स्कीट, नाच बसवून घेतला होता का?
2 - गुण दर्शन कार्यक्रम चांगला 6 वाजल्या पासून 11 पर्यंत चालला होते. त्याधी सर्व नट्टा फट्टा करण्यात गुंतले असणार, मग जेवण कधी बनवले आणि खाल्ले कधी? का बिग बॉस हाउस मधे केटर जेवण होते?
दक्षे मम, स्मिता फार क्युट
दक्षे मम, स्मिता फार क्युट दिसत होती.
१) प्रॅक्टिस आधीच करत होते .
१) प्रॅक्टिस आधीच करत होते . पुष्कर त्या धांगडघिंगा सईला डान्स शिकवत होता .
व्हुट वरचे छोटे क्लिप्स ( ऑल शॉर्ट्स ) आहेत त्यात दाखवत आहेत
२ ) जेवण दुपारी बनवून जेऊन झालं मग नट्टा फट्टा ला लागले असणार
मोसा अगदी हेच प्रश्न पडले. हा
मोसा अगदी हेच प्रश्न पडले. हा ५ तास चाललेला कार्यक्रम आपल्याला २० मिनिटात दाखवला. किती रीटेक्स झाले असतील कोण जाणे.
त्यातही क्लोजप आणि झूम इतकं बरोबर आणि फ्लॉलेस करतात की लाईव्ह कॅमेरा पर्सन तिकडे आहे की काय शंका येते. कॅमेरा गोल फिरला हे पण झूम करुन दुसर्या ऑटोमेटेड कॅमेरातून दाखवतात.
कॅमेरा टेकनॉलॉजी बरोबर कॅप्चर करु शकण्याइतकी नक्की अॅडव्हान्स्ड असेल पण त्या कॅमेराच्या फोकस मध्ये कोणी नाही इ. नेहेमी बरोबर जमतं बघुन गम्मत वाटते.
लाईव्ह कोणी नसेल तर मग एडिटिंग करायला मजा येईल अशा शोज चं.
बेल्ट मधून मायक्रोफोन लाईव्ह स्ट्रीम करतोय आजुबाजूचे कॅमेरा चित्र स्ट्रीम करतायत. नंतर तो आवाज आणि चित्र सिंक करायचं आणि परत रीटेकची बिलकूल सोय नाही. सगळं घर जरी सगळ्या कॅमेरांनी मिळून कवर केलं तरी एका कॅमेराच्या फोकसला मर्यादा आहेत. त्याचा फोकसला ऑटोमेटेड समजणं शक्य नाही की कुठे मसालेदार काही घडतंय. परत त्याच्या फोकसच्या बाहेर कुणी उभा असला तर ... आणि अशा बर्याच शक्यता येतात.
गुड प्रॉब्लेम टू सॉल्व्ह.
आजच्या टास्कमधे काही कल्ला
आजच्या टास्कमधे काही कल्ला झाला की नाही? की अख्खा आठवडा बोर करणार?
मस्त घमासान वाजायला पहिजे राव
रीटेक्स वगैरे काही नसतील होत.
रीटेक्स वगैरे काही नसतील होत. जे दिसते ते एडिटिंगची कमाल असणार. (म्हणुनच बहुतेक जुई, राजेश चे वगैरे विविध गुणदर्शन दिसलेच नसावे का?) बाकी फिरत्या कॅमेर्र्याचे क्लोजप्स हे फाइल शॉट्स असतील की. तेच तेच पुन्हा वापरायचे. कार्यक्रम अनाउन्स केल्याच्या नंतर प्रॅक्टिस / तयारी साठी वेळ दिला असेल कदाचित. १५ मिनिटे ते अर्ध्या तासापेक्षा जास्त कोणी प्रॅक्टिस केली असेल असे त्या कार्यक्रमांच्या दर्जावरून वाटले नाही
गुणदर्शन थत्तेगिरी वगैरेला
गुणदर्शन थत्तेगिरी वगैरेला कदाचित अॅडीशनल कॅमेरा टिम येत असेल, घरातले फुटेज फक्तं गॉसिप साठी


अता अजुन थोड्या दुश्मन जोड्या देऊन टास्क्स दिली पाहिजेत, मागच्या वेळी बाथरुम ब्रेक्स डोक्यात ठेऊन बायका पुरुष मिक्स नाही केले.
आता मेड फॉर इच अदर सारखा गेम घ्यावा ज्यात एकमेकांवर खेकसणारे, धाऊन जाणारे, न आवडणारे पेअर करावेत.
आउ - थत्ते , राजेश -मेघा, सुशान्त -सई , अस्ताद ऋतुजा आणि पुष्कर बरोबर स्मिता केवळ सई जेलस व्हावी म्हणून
पुष्क्या स्वतः काही फार राडा खुन्नस कॅटॅगरी नाही, त्याला त्या छपरी राजेश बरोबर बांधला तरी गोड बोलत झोपळ्यावर झुलत होता त्याच्याबरोबर
पुष्कर स्मिता आवडेल मला पेअर,
पुष्कर स्मिता आवडेल मला पेअर, मला आवडतात दोघेही.
जोडी तुझी माझी टास्कमध्ये रा
जोडी तुझी माझी टास्कमध्ये रा-पु, रे आउ अशी जोडी होती.
त्यातही पु आणि आऊ अगदी बाजूला बसलेले असताना पण रे रा गुटुर गु करत होते. बिचारे आऊ आणि पु मान दुसरीकडे वळवून ते सहन करत होते.
रे रा अतिच आहेत
उ.ना पुन्हा कुरकुरायला
उ.ना पुन्हा कुरकुरायला लागल्या , थत्ते रागवतात, ब्रेकफास्ट हवा तो मिळत नाही , चोरी करायचा चान्स मिळत नाही वगैरे


तो चोर - पोलिस गेम अजुन फार रंगला नाहीये, एकदा जेल मधे टाकायचे आणि मग लगेच सोडूनही द्यायचे नियम समजले नाहीत.
सई बाकी सगळे टास्क्स सॉलिड करते, छपरी राजेश जाम इन्सिक्युअर्ड होतो ती दिसल्यावर
अस्ताद नही सुधरेगा, अजुन तरी गेम मधे गद्दारी केली नसली तरी पुन्हा राजेशबरोबर बसून सईला नावं ठेवत होता.
फेसबुकवर जाम म्हण्जे जामच विनोदी पोस्ट होती, अस्तादने मागच्या आठवड्यात गाण्याची शपथ घेऊन सांगितलं मी टिमशी गद्दारी केली नाही आणि लगेच काल महाराष्ट्र गीत गाताना बेसुर झाला
काल रेशम राजेश ला तिच्या
काल रेशम राजेश ला तिच्या शाळेतल्या लव्हस्टोरी बद्द्ल सांगत होती तेव्हा राजेश तिच्याकडे एकदम एम सी पी सारखा पहात होता. अत्यंत भितीदायक होतं ते त्याचं पाहणं. अचानक तो शिवाजी/संभाजी/ राज्य रक्षणकर्ते मोड मध्ये जातो.
अत्यंत भितीदायक होतं ते
अत्यंत भितीदायक होतं ते त्याचं पाहणं. अचानक तो शिवाजी/संभाजी/ राज्य रक्षणकर्ते मोड मध्ये जातो.
काल उ.ना. मेघाच्या
काल उ.ना. मेघाच्या कपड्यांवरुन चिप कमेंट्स करत होत्या पुष्करशी बोल्ताना ते चालतं. आणि थत्ते त्यांना आखाड्सासू म्हणाले, काव काव कर्तात म्हणाले तर अगदी डोळ्यातुन पाणी.
काल उ.ना. मेघाच्या
काल उ.ना. मेघाच्या कपड्यांवरुन चिप कमेंट्स करत होत्या >> ए चिप कुठे बोलल्या? फक्त बोलल्या की खूप छोटे कपडे घालते मेघा, स्मायलीचे बॉल घ्यायला वाकली तेव्हा मागून सगळं दिसत होतं म्हणून मी तिच्या आणि कॅमेर्याच्या मध्ये जाऊन उभी राहिले. चिप नाहि बोलल्या काही.
थत्ते महाशय कळलाव्या नारदाची
थत्ते महाशय कळलाव्या नारदाची भूमिका एकदम चोख पार पाडत आहेत..
गंमत म्हणजे ते जरा काही बोलले की कुणालाच अजीबात हलके घेता येत नाही... सर्वांना माबो कार्यशाळेत पाठवा. अपोआप शिकतील सगळे
मला तरी काही चीप वगैरे वाटत नाहीत त्यांच्या कमेंट्स.. विनीत बद्दल त्यांनी जे काही सारांशात म्हटले ते बरोबरच आहे. अगदीच फालतू आहे तो. ऊना ची खरडपट्टी काढणार बहुतेक बिग बॉस.. डायरेक्ट शारिरीक धमकी.
बाईला धाप लागते, टास्क जमत नाहीत, फॅशन बघवत नाही... आणि दुसर्यांना थोबडवण्याची किती ती हौस. जरा अतीच झालं. थत्ते म्हणतात ते एकदम फिट आहे: काऊ काऊ.. 
ए चिप कुठे बोलल्या? ..मग
ए चिप कुठे बोलल्या? ..मग कुठले शब्द वापरले की चिप समजायचं? मला ते चिपच वाट्लं . ह्यांना 'काव काव' ही सहन होत नाही पण ह्या इतरांना थोबडवणार, दुसर्यांच्या कपड्यांवरुन कमेंट्स मारणार. टास्क तर एकही खे़ळत नाहीत धाप लागायच कारण सांगुन.
मला तरी काही चीप वगैरे वाटत
मला तरी काही चीप वगैरे वाटत नाहीत त्यांच्या कमेंट्स.. विनीत बद्दल त्यांनी जे काही सारांशात म्हटले ते बरोबरच आहे. अगदीच फालतू आहे तो. ऊना ची खरडपट्टी काढणार बहुतेक बिग बॉस.. डायरेक्ट शारिरीक धमकी. बाईला धाप लागते, टास्क जमत नाहीत, फॅशन बघवत नाही... आणि दुसर्यांना थोबडवण्याची किती ती हौस. जरा अतीच झालं. थत्ते म्हणतात ते एकदम फिट आहे: काऊ काऊ.. >> +११११११
जरा म्हणून थत्तेंच बोलणं हलके घेत नाहीत कोणी आणि बिग बॉस पण बरोबर थत्तेंनाच उचकवतात. त्यांना काही स्वतः बसू देत नाहीत. संगळ्यांबद्दल मत सांगा म्हणे . म्हणजे परत पुढच्या आठवड्यात जास्तीत जास्त हायेस्ट नॉमिनेशन्स त्यांनाच गेली पाहिजेत अशी बिग बॉस ची सोय आहे ती
काय ती चर्चा.. डीजे आणि दक्षे
काय ती चर्चा.. डीजे आणि दक्षे तुमच्या कमेंटा हहपूवा आहे..
बोर व्हायला लागलं मला बिबॉ आता..
काहीतरी..
आज काहीतरी झगडे झाले वाटत मेघा आणि स्मिताचे..
आस्ताद अजुनही डबल ढोलकी वाजवतो कि काय असं वाटत..
रे सोबत रा फ्रि असल्यासारखे सतत काय आजुबाजू.. पांचट आहे एकदम..
Pages