Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशोक सराफ
अशोक सराफ
श्रीरंग गोडबोले चांगलं करू
श्रीरंग गोडबोले चांगलं करू शकतील बिग बॉसचं anchoring.. शालजोडीतले बेस्ट मारतात ते.. पण पॉप्युलर फेस नाहीये..
अशोक सराफ (मला) बुजरा आणि
अशोक सराफ (मला) बुजरा आणि थोडा लेचापेचा वाटतो. लेव्हल हेडेड, स्मार्ट आणि बेरकी वाटत नाही. मराठी अॅक्टर अस्से आणि तस्से असल्या टुकार भावूक बडबडीला तोच बळी पडेल वाटतं. कितीही स्क्रिप्ट लिहून दिलं तरी अंगभूत कॉन्फीडन्स (म्हणजे अॅरोगन्स नाही) पाहिजे व्यक्तिमत्त्वात.
अरे विनितच्या मताला किंमत
अरे विनितच्या मताला किंमत द्यायची नव्हती तर त्याला नॉमिनेशन चा अधिकार का दिला, मला नाही आवडलं हे. थत्ते होते म्हणून मी म्हणत नाही, कोणीही असतं तरी लिहीलं असतं.
परवा अस्तादने विषय काढल्यावर
परवा अस्तादने विषय काढल्यावर नानाच आला डोक्यात पण त्याला स्वतःलाच अँगर मॅनजेम्न्ट्चही गरज आहे, नेक्स्ट सिझन स्पर्धक म्हणून आणा नानाला , राडाच राडा
स्मिता सई छान खेळल्या. सईने
स्मिता सई छान खेळल्या. सईने नाणी काढण्याच्या गेममध्ये छान जोश दाखवला.
रेशम जायला हवी, रे रा too much बोअर करतात.
सईचे ते आधीचं hoty hoty फार
सईचे ते आधीचं hoty hoty फार बोअर झालं.
आता टीआरपी वाढवण्याकरता चॅनल
आता टीआरपी वाढवण्याकरता चॅनल पुरस्कृत राजेश - रेशम चे प्रेमचाळे बंद करा म्हणावं . बोअर झालं . यापुढे आस्ताद आणि जुई ला मैदानात उतरवा आणि सई आणि पुष्कर च मध्ये जे काही चाललं होत ते थोडंफार निवळलेलं दिसतंय . का बर ?
मे बी जुई किंवा भूषण जातील.
मे बी जुई किंवा भूषण जातील. रे रा ला bb ने डोक्यावर चढवून ठेवलंय.
अरे विनितच्या मताला किंमत
अरे विनितच्या मताला किंमत द्यायची नव्हती तर त्याला नॉमिनेशन चा अधिकार का दिला, मला नाही आवडलं हे. थत्ते होते म्हणून मी म्हणत नाही, कोणीही असतं तरी लिहीलं असतं. >> म्हणजे?समजलं नाही. त्यानी काल थत्तेना डेंजर झोन मध्ये टाकलं ना? म्हणजे किंमत दिली ना मताला?
विनीतला कसली पॉवर दिली ते मला बहुतेक नीट समजलं नाहीये.
जो कोण एलिमिनेट होतो त्याला
जो कोण एलिमिनेट होतो त्याला वन टाइम स्पेशल पॉवर देतात. मागच्या वेळी आरती गेली तेव्हा तिला कोणाला तरी एकाला सेफ करण्याची पावर दिली. आता विनित ला कोणाला तरी एलिमिनेशन साठी नॉमिनेट करायची पॉवर दिली.
तरी या आठ्वड्याच्या झलक मधे दिसत होती सई त्याला सेक्सी वगैरे म्हणताना. वरवरचे ते पण.
सईने (प्लॅन्ड) फ्लर्टिंग सुरु केलेही होते पुष्कर बरोबर पण पुष्कर पडला भाऊ कॅटेगरी, त्यामुळे काही स्पार्क्स नाही उडाले
आस्ताद - जुईच्या पण बस की बात नाही वाटत अजिबात.
जुईला बहुदा रिअल लाइफ बॉ.फ्रे
जुईला बहुदा रिअल लाइफ बॉ.फ्रे आहे, त्यामुळे नाही करणार बहुदा फ्लर्ट .
अस्तादने फक्त अॅटीट्युड द्यावा आणि बोलत रहावे, काल टिझरमधे बि.बॉ. च्या टास्कच फ्लायर वाचतना दिसला, आहाहा ऐकत रहावं , काहीतरी टास्क आला पाहिजे त्याला जिथे त्याच्या संगीत नाटकातला सीन अॅक्टींग +संगीत ऐकायला मिळेल, त्याच्या महाकौटुंबिक सिरियल्स मात्र चुकुनही बघायची शक्यता नाही.
आत्तापर्यंत कुठल्याही
आत्तापर्यंत कुठल्याही बिगबॉसचा एकही एपिसोड पाहिलेला नाही. कॉन्सेप्ट सुद्धा माहित नाही. पण तरिही गेल्या आठवड्यात हे बघायचा प्रयत्न केला.
ह्यात नक्की काय बघायचं असतं? म्हणजे मी बघितलं तेव्हा सकाळी ६ वाजता, सकाळी ८ वाजता, सकाळी ११ वाजता.. अश्या पाट्या दाखवून तीन चार जण कंपू करून गप्पा / गॉसिप करत होती. ते नक्की काय बोलतायत काहीच कळत नव्हतं. शिवाय जर आपलं बोलणं रेकॉर्ड होतं आहे हे माहित असेल तर ते खरच 'त्यांच्या खर्या स्वभावानुसार' वगैरे बोलत असतील का?
थोड्यावेळाने कंटाळून बंद केलं. तासाभराच्या भागात नक्की काय बघायचं आणि काय चांगलं काय वाईट हे कोणीतरी समजावून सांगा.
जुईला बहुदा रिअल लाइफ बॉ.फ्रे
जुईला बहुदा रिअल लाइफ बॉ.फ्रे आहे, त्यामुळे नाही करणार बहुदा फ्लर्ट .
>>>>>
जुई मँरिड आहे
ओह मॅरीड आहे ती ?
ओह मॅरीड आहे ती ?
अस्ताद कसा पण असला/ दिसला की
अस्ताद कसा पण असला/ दिसला की माझ्या डोळ्यात बदाम च बदाम येतात
त्या फाल्तू जुई ची किंवा सई ची जोडी नका लावू हं त्याच्या बरोबर
* जुई च्या भुवया अचानक उडल्या कशा काय ?

बहुधा तिच्या दातांच्या ठेवणीमूळे काही उच्चार सदोष येतात. आणि हवा पण जाते.
* उना वर वर काहिहि बोलत असल्या तरी त्यांना आणि अनिल थत्तेंना घरात रहायची जाम हौस आहे.
* उना ला सुहिता थत्ते बद्दल बोलाय्ची काहीही गरज नव्हती.
* वर कुणितरी सुहिता अनिल थत्तेंची बहिण आणि यदुनाथ थत्ते काका कशावरून हा प्रश्न विचारलाय. पर्सनली मी तर सुहिता त्यांची बहिण आहे हे खुद्द त्यांनी सांगितलं ते पाहिलंय आणि ऐकलं आहे.
* राजेश आणि रेशम बिल्ट लव्हस्टोरी सादर करतायत ते लग्गेच कळतंय. नथिन्ग नॅचरल अबाऊट इट.
(उपेन पटेल आणि करिष्मा तन्ना ची जोडी खरोखरी प्रेमात पडल्यागत दिसत होती टिव्हिवर)
* जुई खेळताना त्या बॉल्स च्या डब्यावर आपटली. मठ्ठ कुठली. जराही चुणचुणित नाही वाटत मला ती. अनिल थत्ते सुद्धा पडले, ते नाही आवडलं पण त्यांचं वय पाहता त्यांना माफ
* सुसल्या किती अशुद्ध बोलते
* टास्क चे नियम वगैरे वाचताना अनिल थत्ते म्हणाले की मेघा कॅप्टन असल्याने ती या कार्याचे 'संचलन' करेल. "संचलन"? रियली? की संचालन?
संचालन हवं होतं.
अवांतर - बिग बॉस च्या निमित्ताने कलर्स मराठी पाहणे होते. त्यात राधा प्रेम रंगी रंगली आणि घाडगे आणि सून चे प्रोमो, आणि गाणी दिसतात. कसली आहे ती राधा
काही तेजच नाही तोंडावर. 
आणि घाडगे आणि सून मधली सून पण कसली आहे
ग्रूमिंग सेशन्स, वर्क-आऊट
ग्रूमिंग सेशन्स, वर्क-आऊट सेशन्स, लाँड्री सप्लाय हे बाहेरून होत असणारच. दुसरं म्हणजे इतके १५ लोक्स घरात दिवसभर राहाणार वावरणार तरीही संपूर्ण घर स्पॉटलेस क्लीन (काचा ही) + ईतक्या लोकांचं खाणं-पिणं (१०/१५ लोकांचा रोजचा दोन्हीवेळेसचा स्वयंपाक/बाकी खाणं बनवणं इ. नक्कीच हे लोक्स करत नसणार...) याकरता नक्कीच बाहेरून मदत (हाऊसकिपिंग) वगैरे असणारच.>>>>
नाही. ते स्वतःच सगळं करतात. यावेळीच्या हिंदी बिबाॕमध्ये सलमानने विकेंडला दाखविले होते स्पर्धकांना एकमेकांचे आयब्रो, वॕक्सिंग, हेअरकट वैगरे करताना. कारण तिथेही जनतेला हे वरील सर्व प्रश्न पडलेले .
Even tyana baherchya kontyahi
Even tyana baherchya kontyahi mansanshi sampark karta yet nahi joparyant bigg boss allow nahi karat.
Task chya setup sathi team jevha bigg boss house madhe jate tevha suddha contestant na room madhe rahave lagte ani je glass door ahet te curtains ne band kele jatat.
मला वाटतेय की गेम चा सेटप
मला वाटतेय की गेम चा सेटप रात्री केला जात असावा. पण दिवसा म्हणजे संध्याकाळी वगैरे जे होत असतील त्याला बहुधा वर निल्सन म्हणते तसंच करत असतील.
आस्ताद आणि रेशम कुणाबद्दल
आस्ताद आणि रेशम कुणाबद्दल बोलत होते, दोन वर्षापूर्वी घर घेतले, मला बावीस वर्ष झाली वगैरे. बोंडेने थत्तेंना नाॅमिनेट केलं होतं ना, मग ते कसे वाचले. रेशमला किती आत्मविश्वास आहे की मी बाहेर पडणार नाही, मला गटफिलींग आहे आणि नंतर म्हणत होती की उना काही बोलायलाच तयार नाहीत, त्यांची जर ईच्छा नाही बाहेर जाण्याची तर त्या का स्वत:ला नाॅमिनेट करतील. रा आज म्हणत होता की त्याने बीबाॅलाही गप्प बसवलं, बीबाॅने त्याला उलट प्रश्न विचारले नाहीत म्हणजे थोडक्यात बीबाॅ त्याला घाबरले अशा अर्थाचं काहीतरी. म मांने त्याची, रेशम आणि शेलारची चांगली खरडपट्टी काढली नाही त्याचे परिणाम म्हणून हे लोक वाट्टेल ते बरळताहेत. सईने चक्क एकोणेंशी काॅईन काढले, तीला सलाम.
उना वर वर काहिहि बोलत असल्या
उना वर वर काहिहि बोलत असल्या तरी त्यांना आणि अनिल थत्तेंना घरात रहायची जाम हौस आहे.>> कोणाला नाहीये ? ज्यांना अजून त्या घराचा कंटाळा नाही आलाय त्या सगळ्यांना हौस आहे
वर कुणितरी सुहिता अनिल थत्तेंची बहिण आणि यदुनाथ थत्ते काका कशावरून हा प्रश्न विचारलाय. पर्सनली मी तर सुहिता त्यांची बहिण आहे हे खुद्द त्यांनी सांगितलं ते पाहिलंय आणि ऐकलं आहे.>> मी विचारलाय उत्तर मिळाल मला
हॅथवे च्या कृपेमुळे आजचे एपिसोड उद्या बघावे लागतात त्यामुळे सोमवारी कोण कोण नॉमिनेट झाले ते कळलच नाही
चंपा आज दोन जणांच्या जोड्या
चंपा आज दोन जणांच्या जोड्या करून गेम्स खेळायला लावले त्यात स्मिता सई जोडी जिंकली म्हणून सेफ झाल्या दोघी. नंतर ज्या जोड्या होत्या त्यांना आत बोलावून एकाला नोमिनेट, एकाला सेफ असं सांगितलं. थत्ते म्हणाले मला सेफ व्हायचंय, भूषणला नोमिनेट केलं तर तो नक्की वाचेल, पब्लिक वाचवेल त्याला. त्याला मास पाठींबा आहे, मला क्लास पाठींबा आहे असं पण काय काय म्हणाले, अति बोलतात ते
. भूषणने मान्यता दिली त्यामुळे सहमतीने ते सेफ झाले, भूषण nominate झाला.
पण मला म्हणायचं आहे, ही अशी strategy जर होती तर विनीत ला अधिकार द्यायचा का. म्हणजे कोणालाच देऊ नका जाणाऱ्या लोकांना सेफ किंवा nominate करायचा आणि दिलात तर मान ठेवा त्याचा. उलट गेम्स वरून किंवा इतर गोष्टीवरून nomination ठरवा. बाहेर पडणाऱ्या कोणाला अधिकार देऊच नका.
आस्ताद आणि रेशम उ ना बद्दल
आस्ताद आणि रेशम उ ना बद्दल बोलत होते, चंपा.
असं झालं होय . थत्त्यांचं
असं झालं होय . थत्त्यांचं बरोबर आहे . लागोपाठ तीन वेळा ते नॉमिनेट झाले आहेत .
अगदी पहिल्यांदी बिग बॉस कडूनच . त्यांना पण कधी तरी सेफ नको का
जुईचं लग्न झालंय हे नव्हतं
जुईचं लग्न झालंय हे नव्हतं माहिती. तिचा दीर दाखवलेला पु पा मध्ये थोडे दिवस प्रसाद लिमये, तो तिचा bf होता आणि त्याचे फोटो यायचे मीडियात पूर्वी ते माहिती होतं.
भूषण ला कोणाचा पाठिंबा आहे...
भूषण ला कोणाचा पाठिंबा आहे... जातोय भाईराता
तस ही बिग बॉस वाले विचित्र
तस ही बिग बॉस वाले विचित्र वागतातच जे पब्लिक कडून घराच्या बाहेर गेले आहेत त्यांना पण वाईल्ड कार्ड ने परत एंट्री देतात . का म्हणून ?
Trp साठी
Trp साठी
त्याला मास पाठींबा आहे, मला
त्याला मास पाठींबा आहे, मला क्लास पाठींबा आहे असं पण काय काय म्हणाले, अति बोलतात ते Lol
>>>
हो.. मलाही ते ऐकून हसायला आले.. कुठला क्लास.. फर्स्ट क्लास की सेकंडक्लास त्यांनाच ठाऊक. मजेशीर माणूस आहे पण..
रेशमचा राजेशसोबत शृंगार पुरेपूर चालतो बाकी. या दोघांपैकी एकाला बाहेर न काढल्यास हे बिगबॉसमध्ये एक मेंबर वाढवतील की काय अशी भिती आता वाटू लागलीय
आज काहीतरी टास्क होता म्हणून पहिल्यांदाच जवळपास पुर्ण एपिसोड पाहिला. सोमवारीच टास्क झाला. नॉमिनेशन झाले.
आता पुढचे चार दिवस करतात काय ??
थत्ते वाचले ह्या वेळी ते बरे
थत्ते वाचले ह्या वेळी ते बरे वाटले. (जरी ते विचित्र असले तरी...).
राजेश आणि रेशम चे चाळे (म्हणजे एकमेकांची पप्पी घेणे) फार विचित्र वाटले. काल हे दोघे उना विषयी बोलत होते. त्यांनी दोन वर्षापुर्वी घर घेतले, सर्वांना शिव्या घालतात, त्यांना सगळेचजण वाईट वाटतात. त्यांचा चेहरा कायम रागातच असतो वगैरे वगैरे. मध्येच सविता प्रभुणेचे नाव ही रेशम च्या तोंडातून निघाले. कदाचित उना सविता बद्दल काहीतरी बोलल्या असतील. पण ते प्रसारीत केले गेले नाही.
उना आता फार डोक्यात जातात. काल थत्ते विषयी हा माणूस हगायला गेला वगैरे असे काहीतरी बोलत होत्या. एकदम घ्रुणास्पद वाटले. थत्तेंचे जरी विचित्र वागणे असले तरी असा भाग दाखवायला नको होता. उगाच हगले, पादले विषयींची सगळी बडबड गोष्टी दाखवतात. उद्या आता टॉयलेट मध्येही कॅमेरा लावतील. मराठी बिग बॉस म्हणून काहीतरी दर्जा ठेवायला हवा. हिंदी बिग बॉस बघीतले नाही जास्त पण त्यात ह्या शरीरधर्माच्या गोष्टी किंवा त्यावर बोलणे दाखवलेले आठवत नाही.
Pages