बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग लक्ष देऊन नाही बघत, तो त्या रूम मध्ये गेला की नेहेमी टीव्ही वरून पाटी जाते की धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक अशी मिन्स ह्या टाईप मग लक्षात आलं की तो खास smoking zone आहे बहुतेक आणि तिथे मला आस्तादच दिसलाय Lol

उस्ताद Rofl

आज मी १०वा एपिसोड पाहिला..
अशक्य हसले.. काय मुर्ख लोक आहेत एक एक..
मेधा धाडे आवडत नव्हती पहिले पण आता आवडायला लागली.. सॉल्लिड्ड पक्का खेळाडू आहे ती..
रेशम बरी वाटायची पण ती आणि तो शेलार अधिक बर्‍यापैकी आवडणारा शृंगारपुरे इतके पागल असतील असं वाट्ल नव्हत.. रडताय काय मुर्खासारखे अरे.. आणि खरतर मला त्या लोकांनी जे केल त्यात काही एवढ वावग वाटल नाही..जुई आणि स्मितापन ठिक होत्या पण बाकिच्यांचीच जास्त जळाली..पण ते बोलायला लागल्यावर लगेच बापरे आम्ही किती सहन करतोय मोड मधे..हाहाहा..

बिगबॉसचे पाळण्यातले नाव काडीमास्टर असावे. त्याने काडी करावी आणि सगळे मुर्खासारखे एकमेकांवर तुटून पडावेत. अर्थात सर्व नाही. अपवाद आहेतच. आणि या अपवादाला टिकून राहतील तेच जिंकतील.
टॉप 4-5 मध्ये आस्ताद असेल. कारण तो वस्ताद दिसतोय. कॅप्टन असो वा नसो, बोलायला लागला की चार लोकं त्याच्या तोंडाकडे बघतात.
ती खुर्चीवर बसलेली सई का? ती दिसायला छान आहे. ती टॉप 4-5 मध्ये राहील.
तिच्यासारखीच ती पाळण्यावर बसून भांडणारी मेघा का? या दोघी जिंकायलाच आल्या आहेत. आणि जी काही कांड घडतील त्या घरात त्यात आपण लाईमलाईटमध्येच असू हे बघणारया आहेत.

ती सई रडी आहे एक नं. लाड करून घ्यायला हवे असतात. ह्याने भरवावे त्याने भरवावे त्यात फक्त गुड लुकिंग males नी भरवावे असं. जास्त करून पुष्करच्या मागे असते.

टीना गुड पोस्ट.

धाडेबाई जिंकण्यासाठी काहीही करणे ह्या कॅटेगरीत. कुठल्याही थराला जाणारी. अर्थात बिग बॉस ला अपेक्षित असंच असेल.

तोच तर गेम आहे ना!
आता प्रत्येक टास्क मध्ये हे लोक एकमेकांची अक्कल, मैत्री, मानुसकी, मेंटॅलिटी, स्टेटस्, वय काढणार.
कचाकचा भांडणार, ढसाढसा किंवा मुळूमुळू रडणार, गुलुगुलु बोलणार, डोळे वटारणार किंवा फिरवणार Uhoh

आस्ताद फारच वाईट खेळला. काल मुद्दाम कामा/स्पर्धे मधून बाहेर पडला. आज जुई नाटक करते हे कळले तरी गप्प बसला. त्याला त्याच्या कंपूला सोडून काही करायचे नाही. आता प्रत्येक स्पर्धेच्यावेळी त्याच्या कंपूतले लोक वेगवेगळ्या कंपूत असायला हवे. मग किती वेळा त्यांच्या बाजूने लढतोय ते बघायला मजा येईल.

मेधा धाडेच्या बोलण्याहून ती अत्यंत जहाल आहे असे वाटतं. घरात प्रवेश घेतांना मेधाला मांजरेकरांनी काहीतरी विचारले होते, तेव्हा ती सांगत होती: एकदा तिचा नवरा मोबाईल फोनवर कुणाशीतरी महत्वाचे बोलत होता. इकडे बाईसाहेब त्याला कशासाठी तरी हाका मारत होत्या आणि कामासंबंधी बोलत असल्याने त्याने साहाजिकच दुर्लक्ष केले. मेधाबाई इतक्या चिडल्या की तिने मोबाईल हिसकला नि त्याला (मोबईल) चक्क खलबत्त्यात कुटला, पार चेंदामेंदा केला. तेव्हापासून तिचा नवरा वचकून असतो म्हणे. कुणी दुर्लक्ष केल्यास राग येणारच, पण इतका? खरं खोट देवच जाणे! पण बिग बॉस मराठीचा 15 एप्रीलचा उद्घाटनाचा भाग पहा, विश्वास बसेल.

तो अस्ताद बायकांच्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा धाऊन काय जातो, ती रेशम सईकडे मारक्या म्हशीसारखी काय पाहते, सगळेच बावळट लोकं भरलेत, ते जाऊ दे मित्रानो ती मेघा विनितला बटल्या बोलली तो भाग पाहिलात का Lol

कालचा भाग नाही पाहिला.
परवाच्या भागात दंगा करायचा हे राजेश आणि सुशांत ने आधीच ठरवलं होतं ! कारण दुसर्‍या टीम ने जेव्हा जुई-स्मिता ला टार्गेट करुन शँपू वगैरे टाकायला सुरु केली, तेव्हा राजेश ने सुशांतला 'सुरु करायचं' का असं विचारलं चक्क! त्यावर सुशांत म्हणाला 'देखते है आधा घंटा और..'
मेघा ने माउथवॉश टाकताच दोघांना (किंवा तिघे म्हणू ..रेशम सकट) किल्ली बसली आणि पुढचा दंगा झाला.
एक मात्र नक्की जाणवलं.. की मेघा ला हा गेम पक्का समजला आहे.. लंबी रेस की घोडी है वो!

स्मोकिन्ग रूम? Uhoh अशी जागा पण आहे त्या घरात? Uhoh >>>>> दक्षे, त्यावेळी वॉर्निंग पण येते की स्क्रीनवर , धुम्रपान आरोग्यास हानीकारक वै.... काय पाहतेस मग तु Wink

मेघा सॉल्लिड प्लेयर आहे पुन्हा पुन्हा सिद्ध होतय,गेम ऑन ठेवलाच शिवाय थत्ते काकांना ऑलमोस्ट उषा नाडकर्णींशी समझौता करण्यापर्यंत पटवलय. ॓
सई आवडत नाही पण तिच्या ऑपोनन्ट टिमची काही माणसं त्याहून नावडती त्यामुळे आज तो लुझर भित्रीभागुबाई रडका सुशान्त जिंकला नाही बरं वाटलं, राजेशही नुसता कागदी वाघ.
टिप्पिकल MCP वर्तन चालु आहे सुशान्त- राजेशचं , सई आणि मेघा या २ बाय्कांचा स्ट्रॉग आणि भक्कम अ‍ॅटीट्युड पाहून हादरले होते ,काहीच दम नाही त्यांच्यात .
स्मिता मात्रं आवडते त्या गृपमधली.
पुष्करने ट्र्क्निकली अतिशय करेक्ट वागणं कंटीन्यु ठेवलय, बिग बॉसच्या आणि लोकांच्या नजरेत एकदम परफेक्ट !
विनित सगळ्यात माथेफिरु आणि अनॉयिंग, हाकलायला हवं त्याला.
अस्ताद स्मोकिंग रुममधे फार रमतो !

जुई ने चक्कर येवुन पडण्याचं नाटक केलं होतं? पुष्कर डॉक्टर आहे ना झटकन उठला.. तो सगळ्यांना संभाळुन घेण्याच्या नादात स्वत:चा गेम विसरतो. सई छान खेळली.. मेधाने उठता नये होतं..त्या रेशम मुळे उठली.. आस्ताद जरा अतिशहाणा.. बायकांवर कसला ओरडतो.. त्या रेशमवर ओरड बघु ओरडता येत का... मेधा, जुई, सई, स्मि या शिवाय कुणाला गेम खेळताच येत नाहिये. मेधा विनितला काहि बोलली तेव्हा आवाज म्युट दाखवला.. त्यामुळे कळलं नाहि काय बोलली ते..

का... मेधा, जुई, सई, स्मि या शिवाय कुणाला गेम खेळताच येत नाहिये.
<<<
+१
बाकीचे काही स्पर्धक फार वयस्कं आणि ओल्ड स्कुल वाटतात, या चौघींच्या एनर्जीपुढे.
राजेश सुशान्त तर फार वय झालेली आजोबा लोकं कशी उगीच चिडचिड करतात , राग आवरताना ढसळून वयोमानाप्रमाणे तोल जातो तसे वाटतात Proud

<त्याला त्याच्या कंपूला सोडून काही करायचे नाही. आता प्रत्येक स्पर्धेच्यावेळी त्याच्या कंपूतले लोक वेगवेगळ्या कंपूत असायला हवे. मग किती वेळा त्यांच्या बाजूने लढतोय ते बघायला मजा येईल.>
अगदी अगदी. कधी तरी त्याला त्याच्या कंपूच्या विरूद्ध जावंच लागेल. बिबॉवाले ग्रूप तोडण्यात एक्स्पर्ट आहेत. जुईने अ‍ॅक्टिंग भारी केली खरं तर. पण लोकांना हे आवडणार नाही असं वाटतं. ममां शाळा घेणार दोन्हीही कंपूंची.

स्मिता, सुशांत, आस्ताद फुकाडे आहेत, रेशमदेखिल असावी, काल सई म्हणत होती की मला बोलली पण परत आस्तादबरोबर फुकत बसली.

कालतरी मला सई योग्यच वाटली.... मान्य आहे जुई चक्कर येउन पडली पण घरात इतके लोक असताना आणि आस्ताद आणि पुष्कर ऑलरेडी उठलेले असताना त्या दोघी-तिघी उठुन परिस्थितीत काय फरक पडणार होता.... उलट आस्तादने त्यांच्यावर चिडण्यापेक्षा "तुम कुर्सी (टास्क) संभालो, हम जुईको संभालते है" असा पवित्रा घेतला असता तर ते जास्त योग्य वाटल असत!

सईने उगाच रडत बसण्यापेक्षा जे केले त्याचे योग्य स्पष्टीकरण (फक्त) जुईलाच देणे योग्य ठरले असते (जे की तिने केलेही)

मला आवडली सई कालच्या एपिसोडमध्ये (आणि बहुदा म मां पण उगाच अति भावनिक न होता टास्क पूर्ण केल्याबद्दल तिचे कौतुकच करतील)

सई कालपासुन आवडायला लागली आहे...
आस्ताद चीटर कॅप्टन आहे...स्वतः च्या टीम च्या लोकांना मदत करायची सोडुन दुसर्या टीम ला जाउन मिळतो....नॉट फेअर....हा गेम आहे...नीट खेळा ना...
मेधा ने स्वतः च्या डोक्यावर कचरा टाकुन उगीच ड्रामा केला...काही गरज नव्हती खरतर त्याची...सई खंबीर होती गेम जिंकण्यासाठी..तिचं मनोधैर्य वाढवत सई जवळ नुसतं बसली असती मेधा तरी खुप होतं...पण मेधा ला माहिती आहे स्वतः वर कसा फोकस आणायचा ते..पक्की खेळाडु आहे ती....जुई ने नाटक केलं चक्कर येण्याचं याची मेधा ला कुणकुण लागली असं वाटलं काल...ती थत्ते ला सांगत होती....
पुश्कर चं काही कळतच नाही...कधी सेन्सिबल वाटतो...कधी गंडलेला वाटतो....
विनीत जावा आता या वेळी...वेडा आहे तो. कधीपण कसंपण वागतो...त्याला नक्की काय करायचं कळत नाहिये..काल तो कसा आउट झाला ते पण नाही कळलं मला नीट...

एक गोष्ट मला कालच्या एपिसोडमध्ये जबरदस्त खटकली ती म्हणजे रेशम जेव्हा मेघाला म्हणाली होती (आधिच्या एपिसोड मध्ये) की तु इतरांच्या डोक्यावर कचरा टाकतेयस ते तुझी मुलगी पहात असेल तर तिला काय वाटेल की आपली आई असा घाणेरडेपणा करून गेम खेळते आहे. हे वाक्य खरोखरी फेअर आहे. पण काल मेघा म्हणते की रेशम किती लफडेबाज आहे हे तिच्या मुलांना कळलं तर त्यांना काय बरं वाटेल का? मेघाला इतकं वैयक्तिक बोलायची काहीही गरज नव्हती.

खरंय...गेले 2 दिवस फक्त मेधा,सई,स्मिता हेच गेम खेळयातेत...आधी सई आणि मेधा डोक्यात जायच्या पण टास्क केलं बाबा त्यांनीच...आणि बाकी रेशम,राजेश,सुशांत रडीचा डाव खेळतायेत.. ते टास्क करतच न्हवते... आणि सगळ्यात हाईट म्हणजे आधी बरा तडफदार वाटणारा आस्ताद च सगळ्यात फुसका बार निघाला.. नॉट एक्सपेकटेड फ्रॉम आस्ताद... तो चक्क ओप्पोसीट टीम कढून खेळत होता..सई बरोब्बर म्हणली की जिथे कॅप्टन च फितूर झालाय तिथे अजून काय होणार..आणि जेव्हा सई आणि मेधा खुर्चीवर बसले होते तेव्हा मला वाटत होते की आता तरी ओप्पोसीट टीम काहीतरी करेल,आता करेल ..पण नाही नुसते आम्ही बघा तुमच्या सारख काही केलं नाही..आम्ही बघा कसे तुमच्या सारख करत नाही..रेस्पेक्ट आणि काय काय..आणि मग जुई का कोण तिने बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं त्याच काय??? सई मेधा ने तर समोरून वार केला...आणि हे लोक हेल्थ
इस्शु वरून नाटक करत होते...एक वेळ ते पण मान्य केलं पण मग आस्ताद ने स्वरूप यांनी म्हटल्या सारख टीम ला म्हणायचं की कोणीतरी 1 च उठा बाकीनी टास्क कॉन्टिनु करा तर हा काय सगळ्यांना क्विट करायला सांगत होता (आणि त्या आधी पण मुद्दाम पाणी टाकून म्हणे मी आऊट म्हणजे कोणाचाच रोष ओढवून घ्यायला नको)...म्हणजे हाईटच.. आणि नंतर मेधा ने पण स्वतःवर कचरा टाकून अति केल पण आता ओप्पोसीट टीम काहीच करत नाही म्हटल्यावत काय बोलणार... तेव्हा पण हा नुस्ता बघत होता आणि नंतर तिलाच झापला म्हणे क्राइसेस वगैरे.. अरे एवढा क्राइसेस असता तर बिग बॉस ने तिला अर्जेन्ट मेडिकल हेल्प नसती का दिली... आणि आस्ताद ला नंतर कळलं की नाटक आहे तर मग तुझ्या टीम ला जाउन का नाही सांगितलं लगेच...उलट त्यांना म्हणतो वेल प्लेड.. सई ला का नाही म्हणाला वेल प्लेड??? स्मिता,जुई,मेधा ,साई यांनीच फक्त टास्क केले..बाकी लोकांनी काहीच केलं नाही...आणि यावर पण बिग बॉस काहीच बोलले नाही तर मग प्रेक्षकांनी शो बघावा तरी कशाला. कारण पुढे प्रत्येक टास्क मध्ये हे लोक असंच आपली मराठी इंडस्ट्री, फॅमिली,मुला बाळांना काय वाटेल,रेस्पेक्ट वगैरे,आमच्या बहिणी सारख्या आहेत आम्ही हे करणार नाही ते करणार नाही करून टास्क केलं नाही तर मग काय फक्त राजेश आणि रेशम कशे हातात हात घेयुन बसतात हेच बघायचं का काय फक्त..
या लोकांना झापायला सलमान खान सारखा होस्ट पाहिजे...(हे माझे वयक्तिक मत आहे
...सलमान फारसा आवडत नसला तरी बिग बॉस वीकएंड का वार मध्ये सॉलिड घेतो तो कंटेस्टंटची) बघू मांजरेकर सर काय करतात वीकएंडला..

इथं दिसतं ते खरंच असतं असं असेल तर काय लायकीची माणसं आहेत ही हे कळलं चांगलंच. खोटारडी, लफडेबाज आणि चाटूगिरीने वर आलेली.
पुष्कर, सई, ऋतुजा तिघेच जरा नॉर्मल वागले.

एक गोष्ट मला कालच्या एपिसोडमध्ये जबरदस्त खटकली ती म्हणजे रेशम जेव्हा मेघाला म्हणाली होती (आधिच्या एपिसोड मध्ये) की तु इतरांच्या डोक्यावर कचरा टाकतेयस ते तुझी मुलगी पहात असेल तर तिला काय वाटेल की आपली आई असा घाणेरडेपणा करून गेम खेळते आहे. हे वाक्य खरोखरी फेअर आहे. पण काल मेघा म्हणते की रेशम किती लफडेबाज आहे हे तिच्या मुलांना कळलं तर त्यांना काय बरं वाटेल का? मेघाला इतकं वैयक्तिक बोलायची काहीही गरज नव्हती.>>> कस आहे एकदा बिग बॉसच्या घरात गेले की ते गटारात लोळल्या सारखे आहे. त्यामुळे हे असले चालायचेच.

खरय.... सलमान कितीही नावडता असला तरी तो वीकेंडका वार मध्ये जी स्पर्धकांची उडवायचा त्याला तोड नाही!
झापतोय का कौतुक करतोय झेपायचच नाही त्या लोकांना...... चढव चढव चढवून फेकून द्यायचा!

आणि उगाच उडवायची म्हणून उडवायचा नाही..... बऱ्याचदा अगदी अचूक आणि योग्यच मापे काढायचा!
आणि स्पर्धक पण त्याला टरकून असायचे!

Pages