Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येड्यांचा बाजार भरलाय
येड्यांचा बाजार भरलाय
हा एक गेम आहे हेच सगळे
हा एक गेम आहे हेच सगळे विसरलेत की काय देव जाणे.सारखं आपलं इंडस्ट्री इंडस्ट्री करत बसतात... तो सुशांत जरा जास्तच.. खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकंच घ्यायला हवी होती... हिंदी मध्ये अगदी कॉमनर पण सेलिब्रिटींना किती टफ फाईट देतात.. इथे सगळे रडकेच भरले आहेत...
त्यातही ते सिनियर ज्युनियर
त्यातही ते सिनियर ज्युनियर असा भेदभाव करतच आहेत.
रेशमने मध्ये कधीतरी सुसल्या खुपच जुनियर असल्याने तिच्याऐवजी इतर कोणीतरी यायला पाहिजे होते.
हे लोक बिगबाॅसच्या घरात आहेत की इंडस्ट्रीच्या टीम आऊटिंग टाइप इव्हेंटला आलेत. :
एकीकडे कचरा टाकला म्हणून झोपडपट्टीवाले बोलायचे पण मी बनवलेले जेवण कचर्यात टाकेन पण तुम्हाला देणार नाही. अन्न कचर्यात टाकणे हे काय सभ्यपणाचे लक्षण आहे?
तो राजेश डिव्होसी आहे का?
तो राजेश डिव्होसी आहे का? नसेल तर उगाच का रेशम बरोबर फ्लर्ट करतोय.
या सगळ्या लोकानी खर तर बीबॉ
या सगळ्या लोकानी खर तर बीबॉ हाउस मधुन बाहेर पडायच्या लाय्कीचे आहेत. त्याना गेम कळतच नाही. ती रेश्म तर लायकी दाखवतेय स्वताची
सुजा, पर्फेक्ट अनॅलिसीस... +१
सुजा, पर्फेक्ट अनॅलिसीस... +१
रच्याकने, कोणीतरी सांगा राजेश, शृंगार पुरे !!!
कोणीतरी सांगा राजेश, शृंगार
कोणीतरी सांगा राजेश, शृंगार पुरे>>>

" कॅमेरे चालु आहेत म्हणुन फक्त हात , बोट धरत आहेत.,,नाहीतर काय काय केल असत " ????
मी कालचा भाग पाहिला.उगीच्च लई रडारडी करत होते.मला अजुनही कळाल नाही, का एवढे रडत होते.ते पण एकएकट्याने नाहीतर जोडीजोडीने
उ.ना ची कमेंट
जुई, स्मिता, आनि सुसल्या शांतीत क्रांती आहे.ह्या तिघीना गटबाजी करुनच बाहेर काढतील, टास्क मधे हरणार नाही लवकर त्या.
मेघाने खिलाडूवृत्ती नाही
मेघाने खिलाडूवृत्ती नाही दाखवली, गेमसाठी ती कुठल्याही थराला जाणारी आहे. कचरा आहे त्यात तिखट पण होतं ते टाकणे अयोग्य होतं तसच mauthwash टाकणे चूक होतं. सर्वांनी तिला अति धारेवर धरली मात्र पण ती सगळ्यांना पुरून उरली. आस्ताद काल अपयशी ठरला परिस्थिती हाताळण्यात आणि उ ना पण मेघा ला मी तुझ्या पाया पडते वगैरे काय बोलत राहिल्या, तिला दम द्यायला हवा होता.
मेघा गेम खेळण्यात smart आहे. फार खालच्या पातळीला जाऊन खेळेल ती. भांडणात, स्वतः चीच री ओढण्यात एक्स्पर्ट, तिला काल फक्त थत्ते यांनी पाठींबा दिला मीन्स ते आस्ताद आणि सर्वांना म्हणाले एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर. राजेश रेशम अति बोलले मात्र. दोघेही डोक्यात जातात. सुशांत तिला ओळखतो म्हणून बोलला ते ठीक. झोपडपट्टी झोपडपट्टी करून त्या लोकांचा अपमान का करतात. फक्त झोपडपट्टीत लोक असे वागतात का आणि वरचे सगळे संस्कारी असतात का.
सर्वात कौतुक स्मिता जुई चं त्यांनी हु का चू नाही केलं. शेवटपर्यंत त्या टिकल्या असत्या.
राजेश शृंगारपुरे डिव्होर्सी
राजेश शृंगारपुरे डिव्होर्सी नाहीये. तो प्रेमाचा अभिनय करतोय . मला वाटत मराठी बिग बॉस ची पडद्यामागची टीम मॅरीड लोकांच्या जोडीदाराची शाळा घेत असावेत कि तुमचा जोडीदार आमच्या शो मध्ये फक्त प्रेमाच नाटक करणार आहे. जसा कि तो सिनेमात/ मालिकेत / नाटकात प्रेमाचा अभिनय करतो तस . पण जे काही तुम्हाला पडद्यावर दिसेल ते खर नसेल .
फक्त टीआरपी करता असेल
राजेश divorsy नाहीये.
राजेश divorcy नाहीये. त्यादिवशी राजेशने रेशम आस्ताद सुशांत समोर सांगितले की आपण फेक लवस्टोरी निर्माण करूया, लोकांना बघायला आवडतं. खरं म्हणजे बरेच जण बोअर होतायेत ते बघून.
कितीही झालं तरी मेघा आपला
कितीही झालं तरी मेघा आपला पाईण सोडत नाय अन हटत पण नाय त्यापासून.
शेवटी हा खेळ/टास्क आहे दिलेला- जो जीता वोही सिकंदर.
आजच्या भागात टीम्स व्हाईस-व्हर्सा झाल्यात आणि पुन्हा कालच्यासारखे आवाज चढलेले दाखवलेत प्रोमोत. पाहू, कोण खूर्ची सोडतं ती कोण बेशुद्ध पडलेली पाहिल्यावर (प्रोमोतला लास्ट सीन - आऊ कळवळून बाकी लोकांना हाका मारताना दाखवल्यात)... आय अॅम प्रिटी श्योर की ते काही नाटकच असेल... जे लोक्स पाहातात रात्री ९ ला त्यांनी अपडेट्स टाका आज नक्की
बिचारा विनीत, मनाने चांगला
बिचारा विनीत, मनाने चांगला आहे. गेमसाठी अयोग्य. ह्यावेळी तो जाईल बाहेर.
आस्ताद चा grp सर्व विरुद्ध टीम मध्ये होता म्हणून तो असं वागला का.
इथे बिग बॉस च्या डोक्यावर
इथे बिग बॉस च्या डोक्यावर बसायला बघतायेत बरेच जण आणि शाळा घेत नाही bb त्याची. एकदम म मां ना च तो अधिकार दिलाय का.
पुष्करला कसं वागायचं ते कळत नाहीये. तो जाईल लवकर.
खरं म्हणजे रेशम पहिली बाहेर
खरं म्हणजे रेशम पहिली बाहेर पडायला हवीय, अति भांडखोर आहे त्या मेघासारखी. पण नाही पडणार.
जे लोक डोक्यात जातात ते हवेयत
जे लोक डोक्यात जातात ते हवेयत खरंतर बिग बॉस मध्ये रहायला
ते गेले तर पहायला मज्जा येणार नाही.
हे लोक बिगबाॅसच्या घरात आहेत
हे लोक बिगबाॅसच्या घरात आहेत की इंडस्ट्रीच्या टीम आऊटिंग टाइप इव्हेंटला आलेत. :-खरंच...
रेशम आणि मेघा दोघीही चलाख,
रेशम आणि मेघा दोघीही चलाख, हुषार आहेत. चर्चेत राहण्यासाठी काय करायचं हे त्यांना बरोबर ठाऊक आहे. या आठवड्यात विनीत जाईलसे वाटते. स्मिता, जुई सुद्धा जाऊ शकतात मात्र थत्ते टिकून राहणार.
रेशम- राजेश- आस्ताद तिघांच्या कंपूची बिबॉने चांगली कानउघाडणी करायला पाहिजे.
विनीत खुप चांगला आहे मनाने
विनीत खुप चांगला आहे मनाने खरं तर पण या खेळात तो अतीशय कच्चा आहे बाकीच्यांपेक्षा. तो टिकणे अवघड वाटते.
आज voot वर uncut scene पाहिले
आज voot वर uncut scene पाहिले.. एका clip वरून असं कळलं की आस्ताद स्वप्नाली पाटील बरोबर relationship मध्ये आहे. फेसबुकवर बऱ्याच फोटोंमध्ये ती आणि मेघा एकत्र दिसल्या..
(असंच..उगाच.. Feeling Jobless)
आस्ताद स्वप्नाली पाटील बरोबर
आस्ताद स्वप्नाली पाटील बरोबर relationship मध्ये आहे. --> अरेरे! दिल टुट गया मेरा
स्वप्नाली म्हणजे संथ निरूबाबांची (सौ) मंगल..
स्वप्नाली पाटील आमच्या
स्वप्नाली पाटील आमच्या डोंबिवलीची.
ती स्मिता गोंदकर अॅथलीट आणि
ती स्मिता गोंदकर अॅथलीट आणि स्टंट बाइकर आहे म्हणे. कयाकीम्ग, वॉटर राफ्टिंग वगैरे स्टेट लेवल ला केले आहे. हे माहित नव्हते मला, तसे तिच्याबद्दल काहीच माहित नव्हते. गंमत म्हणजे काहीही कर्तृत्व नसलेली लाडावलेली सई तिला डंब म्हणते ?!
हो ना सई जेलस तिच्यावर,
हो ना सई जेलस तिच्यावर, स्मिता चांगली वाटते स्वभावाने पण.
अस्ताद पुण्याचा आहे का..
अस्ताद पुण्याचा आहे का.. अतिशहाणा आहे फार.
तो, पुष्कर, स्मिता पुण्याचे
तो, पुष्कर, स्मिता पुण्याचे आहेत.
सगळीकडे सगळ्या प्रकारची लोकं असतात. मी पुण्याची नाहीये आणि अभिमान वगैरे पण नाही पण इन जनरल लिहीलं
सई मुळे जिंकले.
सई मुळे जिंकले.
सई आणि स्मिता ची तुलनाच होऊ
सई आणि स्मिता ची तुलनाच होऊ शकत नाही.
अर्धो घटोपनयती नुनं... अशी काहीतरी संस्कृत उक्ती आहे. (पाण्याने अर्धा भरलेला घडा डुचमळत आवाज खूप करतो अशा अर्थी)
तुलना नाहीच होणार, स्मिता
तुलना नाहीच होणार, स्मिता चांगली आहे. स्मिता जुई खऱ्या जिंकल्या सर्व सहन करून, त्या टिकल्या असत्या पण उठायला लावलं त्यांना त्यांच्या लोकांनी.
तो आस्ताद खूप स्मोकिंग करतो
तो आस्ताद खूप स्मोकिंग करतो की काय, बरेचदा त्या स्मोकिंग रूम मध्ये हा एकटाच बघतेय मी जास्त.
तो आस्ताद खूप स्मोकिंग करतो
तो आस्ताद खूप स्मोकिंग करतो की काय, बरेचदा त्या स्मोकिंग रूम मध्ये हा एकटाच बघतेय मी जास्त. >> स्मोकिन्ग रूम?
अशी जागा पण आहे त्या घरात? 

अन्जू किती लक्ष देऊन पाहतेस गं?
Pages