बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथलं वाचलं नाही अजून. बिग बॉस च्या पेजवर जाऊन कमेंट्स टाकून आले. राजेश रेशम फेक लवस्टोरी अतिबोर. स्मिता आवडते. मेघा च्या नवऱ्याला, मुलीला हे बघायला कसे वाटत असेल याची चर्चा करताना रेशम राजेश ची मुलं यांची लवस्टोरी बघत असतील त्याचं काही नाही का, झोपडपट्टी झोपडपट्टी काय करत होते, रेशम मेघा अतिभांडखोर, सई रडी, लाडावलेली. असं काय काय बरंच लिहून आले, हुश्श.

पहिल्याच मराठी bb मध्ये स्मोकिंग अलाऊड करायला नको होतं. ती पण एक टेस्ट आहे ना खरं म्हणजे. हिंदी मध्ये पहिली दोन वर्ष नव्हतं व्यसन अलाऊड. तिसऱ्यापासून केलं.

>>>सईने काल स्मिताचा बाप काढला ही फार मोठी चूक होती, स्मिताने त्यावर दिलेलं उत्तर काही चूक नव्हतं.>>
हो अगदी अगदी.. मूहतोड जवाब... ते वरती आहेत तिथे जाऊन घे अस म्हणाली बहुतेक..

मेघा अती बोलते पण. तिला तिच्याकडे पैसा आहे याचा खूप माज आहे. खरंतर एक व्यक्ती म्हणून स्मिता कितीतरी छान आहे पण ती स्वतःचे गोडवे गात नाही. वागण्यावरून मृदू वाटते आणि.
सई म्हणजे धबडगा आहे नुसता.

सई मला अजिबात आवडली नाही आतापर्यंत.पुढे कदाचित ती गेम अ‍ॅटीट्युड बाजुला ठेवुन खेळेल.मी भारी आनि बाकी सगळे भिकारी हे बाजुला ठेवायला हव तिने.
स्मिता, जुई,आनि ऋतुजा सिरीयसली गेम खेळत आहे.विनित ला लवकर बाहेर काढा.
काल मेघाने त्याला शिवी दिली, तर त्याने ही प्रत्युतर शिवी दिली हे पाहुन आश्चर्य आनि बरं वाटल.
आस्ताद आनि पुष्कर दोघे ही मला गोंधळलेले वाटतात.कुठल्याच पार्टीकडुन आपल्याला जास्त नॉमिनेशन मिळु नये अस बॅलन्स्ड वागण्याच्या प्रयत्नात आधी हेच बाहेर जातील.

सईने काल स्मिताचा बाप काढला ही फार मोठी चूक होती, स्मिताने त्यावर दिलेलं उत्तर काही चूक नव्हतं.>>
>>>>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र हे मिसल मी.काय झाल होत नक्की ??? डिटेल मधे लिहा ना रे.

ते स्मिता स्वतःचेच cosmatics फेकत होती स्विमिंगपूलमध्ये तेव्हा सईला वाटलं तिचे फेकतेय. त्यामुळे सई म्हणाली तुझ्या बापाकडून घेईन का वसूल करेन असं काहीतरी. स्मिताचे वडील या जगात नाहीत बहुतेक म्हणून स्मिताने उत्तर दिलं जा वर जाऊन घे माझ्या बापाकडून. मला नाही वाटत स्मिता चुकली. बाप वगैरे काढून सई फार खालच्या पातळीला उतरली होती.

हो ना.. एखादी दुसरी असती तर तिने राईचा पर्वत केला असता...रडून सिपंथी मिळवली असती... किंवा शिव्या शाप वेगेरे दिल्या असत्या किंवा बिग बॉस मला आता ताबडतोब कनफेशन रूम मध्ये बोलवा किंवा मी चालले बिग बॉस सोडून वेगेरे काहीही होऊ शकत होत.. पण स्मिता खरंच संयमित वाटते.. तिने ती गोष्ट तिथे च सोडून दिली आणि नंतर त्या बद्दल अवाक्षर ही नाही काढलं किंवा रडली वगैरे पण नाही...

मला वाटतं स्मिताला स्पोर्टची पार्श्वभुमी आहे. त्यामुळे ती नेहमी बॅलन्स्ड असते. इव्हन कचरा फेकल्यावरसुद्धा ती कूलच होती. राजेश- सुशाम्तने नाटकं सुरू केली. मुलींवर कचरा फेकतेस वगैरे टिपिकल रडगाणं गाऊन गोंधळ घातला. राजेश जेवढं स्वतःबद्दल सांगत होता तेव्हढा तो भारी वाटला नव्हता.
सई उत्तम खेळली पण थत्तेंना दुखावणं तीला महागात पडेल.

स्मिता मलापन आवडते..पण ती ज्या टिममधे आहे ती टिम मात्र आवडत नाही..
आस्ताद फार्च लेचापेचा निघाला..श्या..

सई उत्तम खेळली पण थत्तेंना दुखावणं तीला महागात पडेल. >> सईने नव्याने काही केलं का थत्ते बुवांना? Uhoh
कारण पहिल्यापासून मी पाहिलं आहे की ते आले, बोलायला लागले की ही दुसरच काही बोलून खिखि खू खू करायला लागायची. इन अ वे इट इज अ डिसरिस्पेक्ट टू यल्डरली पिपल.

अस्ताद पार्शियल वागला तरिही :माझ्या डोळ्यात बदामच: Proud

विकेंडला घरच्या सदस्यांना फटके देण्यासाठी मांजरेकरांना काहि पॉइंटर्सः

१. आस्ताद - कॅप्टन असुनहि स्वतःच्याच टिमशी गद्दारी. जुईचं नाटंक त्याला समजल्यावरहि स्वतःच्या टिम मेंबर्सना कळु दिलं नाहि कि बाबांनो ती नाटकं करतेय, तुम्ही खुर्च्या सोडु नका. ब्लडि होपलेस...
२. मेधा - हिला गेम समजलाय पण बहोत नौटंकि है; इवन डबल ढोलकी अ‍ॅट टाइम्स. आपण अजुन वाईट दिसु नये म्हणुनच तिने जुईच्या नाटका नंतर खुर्ची सोडली. काहिहि गरज न्हवती. त्या आधी ती सईला स्वतःच म्हणाली होती कि तिथे सगळे जण आहेत्, आपण जाऊन काहि विशेष फरक पडणार नाहि. तरीहि ब्राउनी पॉइंट्स मिळवायला खुर्ची सोडुन गेली...
३. विनीत, सुशांत, राजेश, रेशम - ओवरअ‍ॅक्टिंग कमी करा. तुम्ही बाहेर कोण आहात, किती महान आहात - नो बडि गिव्ज रॅट्स ##. नाटकं करायची असतील तर व्यवस्थित, पटतील अशी करा. बिग्बॉसच्या घरात खोटा मुखवटा जास्त वेळ टिकुन रहात नाहि; टराटरा फाडला जातो...
४. पुष्कर, सई, स्मिता, जुई - चांगले खेळले/वागले. यापुढे स्वतःच्या अंतर्मनाचं ऐकुन स्टँड घ्या. तो चूक कि बरोबर ते प्रेक्षक ठरवतील...
५. भूषण, ऋतुजा - असुन नसल्यागत...
६. आउ, थत्ते - ब्लड प्रेशरच्या गोळ्या वेळेवर घ्या...

एका आठवड्यातच दोन चुली मांडल्या गेल्या, तेहि सगळे मेंबर्स एकाच फ्रॅटर्निटीचे असुनहि. टिम रायवलरी टास्क पर्यंत मर्यादित ठेवा, टास्क संपल्यावरहि अ‍ॅनिमासिटी राहते हे चांगलं नाहि...

चांगले मुद्दे आहेत. मागच्या वेळेस ममांनी टाईमपास जास्त केला(मला कटवाकटवीचा भाग बघायला मिळाला नाही). यावेळेस चांगली शाळा घ्यायला पाहिजे.

आणि तो राजेश भंजाळला आहे का?? मधूनच राजकीय नेत्या सारखी भाषणं काय सुरू करतो???टास्क च्या पहिल्या दिवशी पण जोरात ओरडून काहीतरी 1 /2 वाक्य बोलला आणि पुढे काय बोलावं कळलं नाही म्हणून एकदम पौझ घेऊन गप्प पडला..अरे 'झेंडा'तुन बाहेर ये म्हणावं आता...

भूषण खरेच असून नसल्या सारखा आहे... मुळात तिथल्या ईतर 'पर्सनॅलिटीज' मध्ये हा अगदीच निष्प्रभ आह! आरती मागोमाग क्रमांक लागेल बहुतेक.
विनीत मला तरी विदूषक वाटतो.. नियम मोडणे, रडणे, मध्येच ओरडणे. लवकरच जावा..
स्मिता (जबरी संतुलन!), मेघा (भयंकर आत्मविश्वास!), थत्ते (महा वस्ताद) आणि राजेश (कुणाच्याही हिट लिस्ट वर नसल्याने) टॉप ३ कंटेंडर्स वाटतात. थोडक्यात those with better self and people managament (manipulation) skills over others, will go all the way.
सुसल्या सर्वांच्यात मिसळू पहात आहे पण एरवी अनुभव कमी असल्याने आणि नवखी असल्याने फार काळ तग धरू शकणार नाही.
राजेश व रेशम ला शेवटपर्यंत टिकवतील.. त्या साठी त्यांचे स्क्रिप्टेड गुटर गू सुरू केले आहे. आणि ते नेमकेच आऊं च्या डोळ्यात भरल्याने आता प्रकरण रंगणार नक्की.
बाकी आऊ च्या शब्दकोषात थोबाड, लबाड, असे वादग्रस्त शब्द अधिक आहेत... आणि काहिही झाले की आधी डोळे वटारायचे आणि दुसर्‍यांवर डाफरायचे.. ! थत्ते बरोबर म्हणले होते पहिल्या दिवशी. पण त्यांची सिनीयारिटी, तब्येत, वय ई. सर्व बघून पब्लिक गप बसतं बहुतेक.

मांजा ने मात्र सर्वांची शाळा घेतलेली बघायला आवडेल... विशेषतः आऊ, मेघा आणि अस्ताद ची...! Wink

राज मस्त लिहिलं आहेस . दोन चुलींबद्दल आणि टास्क संपल्यानंतर एकत्र यावं हे हि नक्कीच Happy

मेधा सगळ्यांकरता नाष्टा बाउल मध्ये काढून देत होती तेव्हा थत्तेंनी सई ला विचारलं त्या तुझ्या शेजारच्या पातेल्यात काय आहे ? तर ती म्हणाली "नाही ते आमच्यासाठी आहे ". मग मेधा ने तिला चांगलं समजावलं कि माझ्यासाठी /तुझ्यासाठी असं करायचं नाही . इथे आपण सगळे फ़ॅमिली मेम्बर्स सारखे राहणार आहोत तेव्हा असं वागायचं नाही . सई अति लाडावलेली आणि एक नंबरची रडू बाई आहे . अजिबात पटत नाही . मेधा मोट्ठी खिलाडी आहे . पाहिजे तिथे आवाज चढवायचा आणि नंतर सॉरी म्हणायचं हे तीच तंत्र आहे. थत्ते च्या बाबतीतही तेच विनीतच्या बाबतीत पण तेच आणि स्मिता आवडायला लागलेय Happy

थत्ते हुषार आहेत, असल्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या सो कॉल्ड सेलिब्रिटीज पेक्षा पॉलिटिक्स नक्कीच कोळून प्यायलेत.
राजेश का हिट्लिस्ट वर नसेल ? ऑपोनन्ट टिमला पकवलय त्यानी भरपूर !
या घरात व्यक्ती म्हणून राजेश हा सगळ्यात फालतु, करायची काही हिंमत तर नाही उगीच फुका बडबड करणारा चीप माणुस वाटतो.
त्याची लफडी तरी काय टिपिकल बावळट्ट वरण भात छाप, आधी सांगून मग करणार Biggrin
सैराटच्या भाषेत बड्याबड्या बाता अन .........
शेव्ह करायला लागु नये म्हणून अशी फकाफका धाढी वाढवलीये, कसला अवतार आहे.
अर्थात बिग बॉसला असे विचित्रं लोक लागतात, तेंव्हा टिकेलच.

मेघा आणि सईचं कौतुक, ग्रेट स्पिरीट.

रेशमने task सोडल्यावर, जे काय लेक्चर दिलं ते फार चुकीचं होतं.

मेघा बरोबर म्हणाली सिनिओरीटी का म्हणून, मिळवली तिने captonship कर्तृत्वाने.

विनीतला अति शिक्षा दिली.

त्याला पूर्ण जेऊही दिलं नाही, त्याने पण हात न धुता किंवा पुसता तशीच पाटी उचलली.

>>>त्याला पूर्ण जेऊही दिलं नाही, त्याने पण हात न धुता किंवा पुसता तशीच पाटी उचलली>>
हो ना... पटापटा तोंडात कोंबायच तरी आणि मग तिथे बसून गवतावर हात धुतला तरी चाललं असतं... फार वाईट वाटलं त्याचा रडवेला चेहरा बघून...

इथली चर्चा वाचून काल आपली मराठी वर बघितला.
आस्ताद आणि मला वाटतं सुशांत (दुसरा कॅप्टन) अगदीच बावळट आहेत. अरे गेम काय आहे! आणि तुम्ही बोलताय काय? जिंकणं महत्त्वाचं का फालतू उसूल की कचारा टाकायचा नाही, कपडे फाडायचे नाहीत ना चिकटून बसायचं. शाहीदच्या पोकळ उसूलची आठवण आली.
ती कपडे फाडणारी आणि पूल मध्ये मेकप फेकणारी (कोण आठवत नाही) ड्रामा करत होती तरी ठीक वाटली.
सई, मेधा आणि पुष्कर चांगले वाटले. सई तर सगळ्यात बेस्ट. दिसते पण चांगली आणि ठाम होती. आता बाकीचे १०० लोक त्या चक्कर आलेल्या मुलीला बघयला गेले ना! आणखी एकाने जाउन काय फरक पडणार होता?
लोकांना काय वाटेल ते बघून का खेळतात? मानेवर असलेल्या गोल भागाचा उपयोग करायचाच नाही असा नियम आहे का?
आस्ताद ओरडत काय होता? त्याने सांगितलेलं कोणी ऐकलं नाही तर काय अंगावर धावून जातात काय!!! कसला चीपपणा आहे! वर कोणी तरी MSP म्हणालं त्याला +१

सई आज अजुनच आवडली!
मस्त पूर्ण केले त्या दोघींनीही टास्क..... थत्ते बिचारे जागले त्या टास्कच्या नादात!
रेशमच त्या राजेशचे ऐकून टास्क सोडणे आणि त्यानंतरचे कारण फारच फालतू!

तो राजेश पण काय त्या आउंना पुढे करुन बाकीच्या दोघींना टास्क सोडायल सांगत होता.... सिनिओरिटी म्हणे!

काहीही!

कोणी ऐकलं नाही तर काय अंगावर धावून जातात काय!!! >>>> एक तर शो चा फॉर्मॅट तसाच लाउड आहे. तसे वेडे विद्रे काही करत नसलेल्या तर त्या भूषण, ऋजुताकडे कोणी बघत पण नाही. त्यात हे धावून जाणे, इतके जोरात ओरडणे फुल स्टेज्ड वाटत होते कारण तेवढे अपसेट होण्यासारखे काहीच नव्हते. वर सारखं "आपण अ‍ॅक्टर्स आहोत अ‍ॅक्टर्स !!" असे म्हटल्याने तो फेक पणा , "अ‍ॅक्टिंग" पार्ट जास्तच हायलाइट होत होता Happy
खरं तर जुई पडली तेव्हा स्टुडिओ ची मेडिकल टीम वगैरे आली नाही तेव्हा दुसर्‍या टीम ला शंका कशी आली नाही की ज्याअर्थी मेडिकल हेल्प पाठवण्यात आली नाहीये त्याअर्थी ती चक्कर खोटी असावी म्हणून.

मी एकच पार्ट बघितलाय, सो फार माहित नाही, पण त्यात तरी ते थत्ते आणि उषा नाडकर्णी एकदम जेन्युअन आणि डोकं ठिकाणावर असलेले वाटले.

Pages