Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राजेश चुकच होता, काय
राजेश चुकच होता, काय सिनिऑरीटी वगैरे, फालतू. आऊ पण त्याचं ऐकून कसं काय सांगायला गेल्या. रेशम नाही झाली बरं झालं. ती तर पहीली बाहेर पडायला हवी आता.
खरं तर जुई पडली तेव्हा
खरं तर जुई पडली तेव्हा स्टुडिओ ची मेडिकल टीम वगैरे आली नाही तेव्हा दुसर्या टीम ला शंका कशी आली नाही की ज्याअर्थी मेडिकल हेल्प पाठवण्यात आली नाहीये त्याअर्थी ती चक्कर खोटी असावी म्हणून.>> अगं मेधा (कि मेघा) म्हणत होती ना कि खरतर चक्कर आली तर सर्वच्या सर्व लोकांनी तिच्या जवळ असायला हवं होत तर दोघजण तिच्याजवळ बसुन बाकी सारे टोमणे मारायला इथे आले म्हणजेच कळतय..
आणि हे लोक किती घाण वागताय इतरांशी आणि वर कसले फाल्तु विचार आहे..
सार काही स्क्रिप्टेड नसेल तर या रेशम टिमचे विचार एकदम चीप वाटले मला.. घाणेरडी लोकं बाप्पा..
आणि दक्षे तुझी माफी मागुन
आणि दक्षे तुझी माफी मागुन म्हणते..आस्ताद फारच्च घाण आहे..
आऊंच्या भाषेत बोलायचं झाल तर 'पोरींशी वागण्याबोलण्याची ढब नसेल तर थोबाड काय चाटायचं आहे का?'
टीना, रेशम टीममधले स्मिता,
टीना, रेशम टीममधले स्मिता, जुई, भुषण तसे चांगले आहेत. पण स्वतःची विशेष मतं नाही मांडत. नुसते रेशमताई वगैरे करत रहातात.
आस्ताद, राजेश मलाही आवडायचे
आस्ताद, राजेश मलाही आवडायचे पण उतरले मनातून अशा वागण्याने.
सध्या स्मिता, पुष्कर आवडतायेत. विनित बिचारा वाटतो.
मला चेहेरे आणि नावं काही
मला चेहेरे आणि नावं काही झेपतच न्हवतं काल. एकाला पुष्कर म्हण्त होते तो त्या हायचेअर वर बसलेला तर थोड्यावेळाने एकदम आत दिसला. काय झेपलं नाही, मग जाणवलं हा पुष्कर नाही तर त्याचा डमी वाटतोय. वेगळाच माणूस निघाला.
त्याचं नाव काय?
आस्ताद खुप घाण आहे.. श्या अला
आस्ताद खुप घाण आहे.. श्या अला रागराग येतोय त्याचा..
काहिही असलं तरी असं ओरडून जातात का मेघा वर..मलातर वाटल याने हात उगारायला हवा आता आणि याला बाहेर फेकुन द्यावा बिगबॉसने..
रेशमपन चीप.. अन जोडीला तो श्रुंगारपुरे अन शेलार..बेक्कार लेकाचे..
भुषणला काही मत नाही..विनीत खुपच ओव्हर आहे..
आत्तापर्यंत स्मिता आवडते..
मेघा कि मेधा एक नंबर आहे..
सईपन कालच्या (दिवस १०वा) पासुन आवडतेय..
पुष्क्याचे हाल होताय बिचारे..
शो स्क्रिप्टेड असेल..गेम वेम पण जर या लोकांच बोलण एकमेकांमधल स्क्रिप्टेड नसेल तर एक उना आणि चक्क थत्ते सोडले तर जर्राशी मेघा, ऋतुजा, पुष्कर, सई, स्मिता आणि किंचीत जुई हे त्यातल्यात्यात बरे...
Contestants can fake their
Contestants can fake their behaviour but show isn't scripted for sure , editing team selects more spicy and provoking conversations.
रेशम किती नालायक बाई आहे, ती
रेशम किती नालायक बाई आहे, ती कॅप्टनसीची रिंग सोडल्यावर एव्हडं काय ऐकवायची गरज होती त्या दोघींना, एव्हडी महत्वाची न्हवती ती रिंग तर एक-दोन तास तरी पकडून का बसलीस तू, सोडायची होती लगेच. मुळात रेशमला यांनी कॅप्टन पदासाठी उभीच का केली, स्मिता नाहीतर जुई या दोघींपैकी कोणीतरी असायला हवी होती, त्या बिचाऱ्या दोघींपैकी कोणालातरी उभं करायचं टाकून या बेअक्कल बाईला उभं केलं, आयत्या बिळावर नागोबा आहे रेशम फक्त फणा काढायचा कर्तृत्व शून्य, राजेश काय फालतू लॉजिक पटवून देत होता रेशम का कॅप्टन बनायला पाहिजे त्याचं, नालायक माणूस, पण मेघाने आऊला या लॉजिक बद्दल चांगलंच ऐकवलं, परत कोणी या लॉजिकची री नाही ओढली, मेघा खरोखरच मस्त खेळते, बाकी सगळे रडे आहेत, ती रेशम राजेश सुशांत अस्ताद हे नालायक माणसं आहेत त्या घरात
वरच्या कल्पतरुच्या पोस्टला
वरच्या कल्पतरुच्या पोस्टला अनुमोदन, राजेश हा अत्यंत फालतु फुसका मुळीच स्पोर्टींग स्पिरिट नसलेला माणुस वाटतो आणि त्या खालोखाल सुशान्त -रेशम -अस्ताद .
रेशमचा नवह्ताच लागणार या दोघींपुढे काही निभाव, जाताजाता नेहमी प्रमाणे रडी!
सई आणि मेघा मस्तं खेळल्या करेक्ट स्पोर्टींग स्पिरिटनी, किती मजा केली रात्रं भर त्यांनी, थत्ते काकांनी उत्तम साथ दिली.
कालच्या भागात पुष्कर बरोबर
कालच्या भागात पुष्कर बरोबर बसली असतांना सईने काय मस्त डोळ्यांची बुब्बुळ फिरवली... छान मोठ्ठे डोळे आहेत तिचे. रेशम खरच डोक्यात जाते. सई म्हणाली तशी लुझरच आहे ती.. अन काय ते राजेश, सुशांत घर घर करायला आलेत... अरे इथे एकत्र घर बांधुन ठेवायला तुंम्ही तुमच्या घरी आहात काय? बिग बॉस मध्ये आलात ना?
या आठवड्यात जो काही तमाशा
या आठवड्यात जो काही तमाशा घरात झालाय त्यामुळे एलिमिनेशनचा जो फोकस थत्तेंवर होता तो हलून बाकी बर्याच जणांवर गेलाय हे मात्र जाणवलं.
बाकी रेशम, राजेश, आस्ताद, सुशांत एकदम डोक्यात जाणारेच आहेत.
अरे अभीतो पार्टी शुरु हुई है
अरे अभीतो पार्टी शुरु हुई है
रेशम, राजेश, सुशांत, आस्ताद वगैरे मंडळी सध्या एका ग्रूपमध्ये आहेत..... थोड्क्यात कंफर्ट झोनमध्ये आहेत.... हा ग्रूप जेंव्हा फुटेल आणि एकेकटे खेळायची जेंव्हा वेळ येईल तेंव्हा हे लोक काय ॲटीट्यूड दाखवतील त्यावर ते किती टिकतील हे अवलंबून आहे!
मेधा आणि सईचे बॉंडींग चांगले जमतेय आणि त्या फेअर खेळतायत..... हळूहळू त्या आपल्या भोवती ग्रूप जमवतील.... आस्ताद आणि स्मिता त्यांना कधी ना कधी जॉईन होण्याची शक्यता वाटतेय!
घरात एखादा मोस्ट इलिजिबल बॅचलर आला तर मजा येईल!
सिनियॉरिटी, आपण अॅक्टर्स
सिनियॉरिटी, आपण अॅक्टर्स आहोत म्हणून चांगलं वागायचं एकमेकांशी हे कसलं थर्ड क्लास आहे! तो राजेश एवढा आर्मी वगैरेचं ट्रेनिंग घेतल्याचे सांगतो त्या मानाने अगदीच रड्या आहे. वर म्हटल्याप्रमाणे पिकनिकला आल्या प्रमाणे वागतात. खिलाडू वृत्ती तर आजिबातच नाही. सई, पुष्कर, मेघा मस्त खेळत आहेत. ऋतुजाने आणखी अॅक्टिव्हली सपोर्ट करायला पाहिजे मेघा, सईला. कालच्या भागात थत्ते पण आवडले. ४- ४.५ पर्यंत जागले टास्कसाठी. हे राजेश, रेशम वगैरे भुरटे असते तर आधीच मांडवली करून लोळायला गेले असते. मेघा- सई व्यवस्थित स्वतःच्या लिमिटेशन्स टेस्ट करत खेळल्या. वेल डन!
मेधा आणि सईचे बॉंडींग चांगले
मेधा आणि सईचे बॉंडींग चांगले जमतेय आणि त्या फेअर खेळतायत > +११११
हळूहळू त्या आपल्या भोवती ग्रूप जमवतील >> बरोबर....सई ने जुई ला सॉरी म्हणुन मैत्रीचा हात पुढे केला होताच....स्मिता बरीच शहाणी आहे.आणि तिच्यात खुप स्पोर्टिंग स्पिरीट पण आहे.....त्यामुळे तीने रेशम्,राजेश्,सुशांत आणि आस्ताद या रड्या लोकाना सोडुन मेधा आणि सई ला जॉईन म्हायला हवं...
काल मधा चं म्हणणं एकदम पटलं...सिनिऑरीटी प्रमाणे खेळायचं असेल तर डायरेक्ट उना ना बिग बॉस विनर करुन टाका ना....राजेश काय आणि आउं च्या खांद्यावर बंदुक ठेवुन बोलतोय....मूर्ख कुठचा....नुसताच बॉडी बिलडर.....बाकी डोक्याने मठ्ठ....जरा विचार करुन स्पोर्टींग स्पिरीट ने खेळायचं ना...
एक तर रेशम ला सर्वोत्तम खेळाडु म्हणून कॅप्ट्न साठी उमेदवारी देणं हाच मूर्खपणा होता...स्मिता किंवा जुई ला द्यायला हवं होतं...त्याच खेळल्या होत्या जे काही थोडफार ती टीम खेळली त्यात...स्मिता,मेधा आणि सई मधे फाईट पाहायला जास्त मज्जा आली असती....
रेशम ने "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" टाईप भाषण देउन स्वत:चं च हसं करुन घेतलं काल
मला पण वाटलेल की स्मिताच उभी
मला पण वाटलेल की स्मिताच उभी राहील. कारण रेशम ने काहीच केल नाही. मला उलट तीच झोपडप्ट्टी तुन आल्या सारखी वाटली टास्क करताना. हे लोक इतक इन्डस्ट्री इन्डस्ट्री करत आहेत, पण मला तरी यान्चा एकही चित्रपट आठवत नाहीये.....
चांगला माणूस आहे थत्ते
चांगला माणूस आहे थत्ते
आणि प्रगल्भ सुद्धा आहे..
पण मला तरी यान्चा एकही
पण मला तरी यान्चा एकही चित्रपट आठवत नाहीये.....
>>>>
त्या लेवलचे लोकं ईथे येतच नाहीत.
एकाने हे प्रामाणिकपणे म्हटले तर झोंबले कित्येकांना
थत्तेंची भाषा सुरेख आहे. ते
थत्तेंची भाषा सुरेख आहे. ते जाणीवपुर्वक मराठी शब्द योजतात बोलताना. बाकीचे धेडगुजरी बोलतात त्यामुळे त्यांचे बोलणे वेगळे वाटते.
वेल प्लेड सई अॅन्ड मेघा!!
वेल प्लेड सई अॅन्ड मेघा!!
अस्तादचं मराठीही मस्तं आहे पण
अस्तादचं मराठीही मस्तं आहे पण रडी खेळतोय .
आज तो लुझर राजेश रेशमला म्हणे माझेही कपडे धू , बेअक्कल रेशम त्यावर काहीच नाही म्हंटली , नुसतेच डोळ्यात डोळे.
उषा नाडकर्णींच्या भाषेत “ मुस्काड फोडीन “ म्हणायला हवं होतं, पण ती कसली म्हण्तय, लुझर दोघे !
आज तो लुझर राजेश रेशमला म्हणे
आज तो लुझर राजेश रेशमला म्हणे माझेही कपडे धू , बेअक्कल रेशम त्यावर काहीच नाही म्हंटली >>> हो ना.. वर तो माझ्या कुर्ता-पायजम्याला इस्त्री करून दे असं पण म्हणाला.. तेही ऐकून घेतलंन.. मुस्काड फोडायला पाहिजे होतं खरंच
रेशम नुसती वयाने वाढली आहे.
रेशम नुसती वयाने वाढली आहे. तसं पाहिलं तर हा कंपू (रेशम, राजेश, आस्ताद, सुशांत) स्वतःला प्रस्थापित समजतत. दुसरीकडे मेघा, सई तशा नविन आहेत, फार फेमस नाहित. खेळतात बर्या.
थत्ते मला आधी आवडले नव्हते पण ते खरंच खूप प्रगल्भ आहेत. बोलणं वागणं(जास्त) कधी कधी वेडं विद्र असतं पण मुळात तो माणूस अजिबात पार्शियल नाही, अतिशय प्रामाणिक आहे.
उनाची सध्या अवस्था वाईट आहे कारण तिचा शत्रू बिग बॉस नी तिच्या मित्रात कन्व्हर्ट करून टाकला ( थत्ते) आणि आरती पण गेली. शिवाय सगळी बाळं सांभाळायला दिलियेत. बसल्ये बिचारी बिट्ट्या खेळत
पुष्कर भूषण जुई असून नसल्यागत... गेले तरी जाणवणार नाही.
विनित चे चौथेच स्टेशन लागलेले असते.
स्मिता विदिन हरसेल्फ उत्तम खेळते, एकूणात तिची बॉडी लॅन्ग्वेज, अॅटिट्यूड, दिसणं, बोलणं, वागणं सगळं मापात आहे.
सईचे स्वतःला स्टाईल आयकॉन समजणे डोक्यात जाते.
मेघाचे सतत स्वतःला वरचढ समजणे आणि आगाऊ बोलणे.
टिना माझी माफी कशाला?
आस्ताद काही माझा बॉफ्रे नाहिये
शिवाय आपण बाहेरून हा गेम पाहतो आहे, तिथे त्या घरात परिस्थितीशी तोंडमिळवणी करताना कित्येकांना मनाविरूद्ध वागावे लागेल त्यात अस्ताद असू शकतो.
आणि तो कसापण असला तरी माझ्या डोळ्यात त्याच्यासाठी बदामच
थत्ते यांनी 'बलात्कार कसा
थत्ते यांनी 'बलात्कार कसा करावा' नावाचं पुस्तक लिहलेलं हे आ़ज कळलं..श्शी कित्ती बेक्कार..
क्क्क्काय्य!! डिस्गस्टिंग!!
क्क्क्काय्य!! डिस्गस्टिंग!!
हे कधी??
हो राजेशचे ते "माझेही कपडे धू
हो राजेशचे ते "माझेही कपडे धू ना" ऐकून भयंकर चीड आली. ते पण जसे काही तो रेशम ला कहीतरी सन्मान देत आहे अशा थाटात म्हणाला!! म्हणजे ही याची रोमान्स ची कल्पना? टिपिकल एमसीपी कुठला, पालथा घडा क्लब चे सदस्यत्व द्या त्याला. तिला चाललं ते यावरून तिच्या अकलेची कल्पना यावी.
आधी जे चांगले वाटत होते ते अनॉयिंग वाटत आहेत आणि आधी ज्यांची चीड यायची ते बरे वाटायला लागलेत
रेशम स्वतःला अति शहाणी समजते.
रेशम स्वतःला अति शहाणी समजते. ती पहीली जायला हवी.
राजेश पार डोक्यात गेला. स्मिता जुई भुषण यांनी स्वतःची मतं ठेवावीत, नुसतं रेशमताई करत बसतात आणि ह्या लोकांचं ऐकतात. नाहीतर ते तिघंही चांगले आहेत तसे.
>>हो राजेशचे ते "माझेही कपडे
>>हो राजेशचे ते "माझेही कपडे धू ना" ऐकून भयंकर चीड आली. ते पण जसे काही तो रेशम ला कहीतरी सन्मान देत आहे अशा थाटात म्हणाला!
नॉट फेअर हा.. 
>>टिपिकल एमसीपी कुठला, पालथा घडा क्लब चे सदस्यत्व द्या त्याला.
पण रेशम ला 'चालतय की'..
रच्याकने: काल राजेश म्हणला तीला: खरच तू मस्त मेन्टेन केलं आहेस.. You are very much Indian.. त्यावर ती आनंदाने म्हणाली.. Yes My Body is ...
आता यावर काय प्रतिक्रीया आहे 'जाणकारांची'.. ?
रे रा चा फालतू रोमान्स बघून
रे रा चा फालतू रोमान्स बघून उठून टीव्ही बंद करावा, इतकी चीड येते. कळवलं काल त्यांना फेसबुकात.
थत्ते माझ्या डोक्यात अजूनही
थत्ते माझ्या डोक्यात अजूनही जातायेत मात्र पण एकंदरीत ते किंवा रेशम लवकर बाहेर पडावेत असं वाटतं. मग तो राजेशही.
Pages