बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त 2 जणांना एकावेळी टार्गेट करायचं होतं, हा नियम माझ्या लक्षात नव्हता आला येता जाता बघते मी म्हणून, रिपिट थोडं परत बघितलं तेव्हा हा नियम कळला.

मेघा बद्दल - स्रोत : https://wikibio.in/megha-dhade/
Megha Dhade was born in a middle-class family, in Jalgaon, Maharashtra. Her family was very strict about the studies. But as she used to participate in the school plays and had done a lot of Marathi theatre, she decided to become an actress. So, after completing her school, she started giving auditions for Hindi TV serials. After a few months of struggle, she bagged a role in Ekta Kapoor’s daily soap opera ‘Kasuti Zindagi Ki‘. After that, she appeared in many Hindi TV serials including ‘Kis Dhesh Mai Hai Mera Dil‘ and ‘Kasturi‘.

Megha Dhade being associated to the Marathi plays turned her focus to Marathi cinema. She did her first Marathi film ‘Matter‘ in 2012, and there was no looking back for her. Her decision was unique, but it proved to be the best for her career. She established herself as a successful mainstream actress of Marathi cinema and has also entered into production with her movie ‘Superstar‘ (2011) at a young age.

Megha Dhade along with Marathi films has also done a few reality shows including ‘Zhunj Marathmoli’ (2014) and ‘Bigg Boss Marathi Season 1‘ (2018).

Facts

  1. Megha Dhade started doing theatre at a very young age when she was in school.
  2. Her decision of moving from Hindi Tv serials to Marathi cinema is unique but has benefitted her.
  3. She has done various modelling projects, TV commercials and print shoots.
  4. Megha Dhade loves cooking and is a fine cook.

बर्यापैकी काम केलंय म्हणायचं या मेघाबाईंनी. धन्स योकु.
आता या सर्व कामांपैकी काहीच आम्ही पाहिलं नाही हा आम्हा पामरांचाच दोष म्हणावा लागेल. Wink

म्ग का? का क्रता?>>>> आता मी न चुकता भरपूर वोटस देनार...आजपून म्या म्येघातायचा दीवाणा झालो! Biggrin
देव करो अन मेघा बिबॉ विजेत्या होवोत!
तसंही त्या उ ना ना म्हटल्याच की आज्जी तुमचे दिवस गेले आता आमचे आलेत... Proud

मला ह्यातल्या झुंज मराठमोळी मध्ये होती एवढंच आठवतंय, तिथेही ह्या ताई, सोलंकी ताई, एक हेमलता बाणे ताई फुल टु राडा घालायच्या.

पुष्कर गरीब बिचारा होता तिथेही.

कसौटी जिंदगी की बऱ्यापैकी बघितली होती पूर्वी, ह्या ताई होत्या असं काही आठवत नाहीये, असतील ब्वा मध्ये मध्ये बघत नव्हते तेव्हा Lol

शॅम्पू, लोशन, माऊथवॉश अजून काय काय वाया घालवले! आता हे संपले ते संपले म्हणून परत बिबॉला मागायला गेल्यावर त्यांना आहे त्यात भागवा म्हटले पाहिजे Proud
मग परत मला येवढे त्याला तेव्हढ्यावरून भांडतील Lol

अंजली छान गेम शो होता, तसा कल्पक होता. श्रेयस तळपदे होस्ट .

ह्या तिघीच भांडायच्या. बाकी पुष्कर, paddy, मनीषा केळकर, दीप्तीदेवी वगैरे नाही भांडायचे. अजून पण कोण कोण होतं. आठवत नाहीये.

रेशमचं मी जेवण केलं तर तुम्ही जेऊ नका असं म्हणणे चुकीचं वाटलं. खरं म्हणजे बिग बॉस ला म्हणणे सांगणे वेगळं आणि डिसिजन घेणं वेगळं.

सई रडत बसली आणि बाकीच्यांनी विचारावं असं वाटलं तिला. खरं म्हणजे राजेश रेशम opposite team मध्ये हवे होते मीन्स एकत्र नको होते, बघायला मजा आली असती.

तलवारी काढा, कापून टाकेन, काय यांची भाषा ही. गल्लीतले गुंड वाटत होते राजेश, सुशांत , अस्ताद, राजेश बोलत होता लोकांना रस्त्याने मारत फिरतो तो, साधी मेणबत्ती पेटवताना नाकी नऊ यांच्या, बेत बादशहाचा आणि दुकान फुटण्याचा असली गत आहे यांची, नाही सहन होत तर उठायचं, टास्क होता तो, आणि झोपडपट्टी मेंटलीटी म्हणजे नक्की काय हे समजलं नाही मला, साधे फालतू कलाकार आहेत साले आणि माज तर एखाद्या हॉलीवूड नायकासारखा आहे, मजोरडे, ती रेशम काय विचित्र बाई आहे, कसली खुन्नस ने पाहत होती सई कडे, आणि जेवण फेकून द्यायच्या गोष्टी करत होती, कुठून उकिरड्यावरून आले आहेत हे लोकं

बरं, हे सगळं बघताना आणि लिहिताना लक्षात ठेवा की हे स्क्रिप्टेड असू शकतं.
आरंभीचे एपिसोड्स थंडगार, नॉन हॅपनिंग झाले. लोक बोअर झाले अशा कमेंट्स होत्या का इथे?

स्क्रिप्टेड नाहि/नसावं. पण एक मात्र नक्कि, दोन्ही टिम्सना बिग्बॉसचा फॉर्मॅट, टास्क कळलेले नाहित याची खात्री पटली. बिगबॉसच्या टास्कची बॉटमलाइन "हंट ऑर बी हंटेड" हि आहे/असते. माघार/माफिनामे वगैरे नाटकं करुन टास्कची हवाच काढली गेली. मांजरेकर या सगळ्यांची शाळा घेणार वीकेंडला...

एक लक्षात आलाय- हा कार्यक्रम तुमची सहनशक्ती तपासणारा आहे . कितीही काही झाल तरी तुम्ही मोडून पडायच नाही . मग तुम्ही दुसऱ्याला त्रास देण्याचं कुठलही तंत्र वापरा ( लिमिट मध्ये ) आणि स्वतःही तो त्रास सहन करण्याची तयारी ठेवा . बाहेरच्या जगात लोक कसे असतात . दुसऱ्याला त्रास झाला कि आनंद पण तीच वेळ स्वतःवर आली तर सहन नाही करू शकत . मग " ज्याचं जळत त्याच त्याला कळत " वगैरे म्हणी आठवायला लागतात . थोडक्यात तुमची सहन शक्ती चेक करणारा गेम आहे . त्यात तुम्ही पास झालात तर तरलात नाहीतर हरलात . म्हणून तर गेम च्या सुरवातीलाच त्या थत्ते सारखे डोकं फिरवणारे लोक्स घेतलेत बिग बॉसने . प्रचंड डोकं वापरलंय . या दृष्टीने गेम चा विचार केला तर मेधाला गेम समजलाय असं म्हणता येईल . कारण किचनमधला कचरा डोक्यावर टाकणं हे कितीही चिप असल तरी बिग बॉस ने अनाउन्समेंट करून ऑब्जेक्शन घेतल नाहीये . आणि स्मिता पण कितीही गरीब असली तरी तिलाही गेम समजलाय कारण ती तिच्या टिममधल्यांना सांगतेय . "अरे तुम्ही आमच्या करता भांडताय त्या बद्दल थँक्स पण हा गेम आहे आणि आम्ही सहन करू शकतोय "

माझ्या मते रेशम जरी नॉमिनेट झाली असेल तरी ती जाणार नाही . ती विरुद्ध मेधा आणि सईची भांडण लावून देतील . मात्र विनीत बाहेर जाण्याची शक्यता जास्त वाटते. . कारण तो कायम मी हे करणार नाही /मी ते करणार नाही / मला हे पटत नाही / मला ते पटत नाही याच मोड मध्ये असतो . अरे मग तू आलास कशाला गेम मध्ये ? का एक्सेप्ट केलीस त्यांची ऑफर ? बर तो गळ्यात माईक घालायचा पण कायम विसरतो तो Happy

>>. अरे मग तू आलास कशाला गेम मध्ये ? <<
हाच प्रश्न आस्तादला हि विचारला पाहिजे. अरे बाबा, तु कॅप्टन आहेस, रणांगणा वरुन पळ कसला काढतोस? Lol

सुजा, पर्फेक्ट अनॅलिसीस...

मला रेशम, राजेश आवडायचे पण त्यांनी खूप निराशा केली
ते जर इतके बॅलन्स राहू शकतात तर तर भाषा कशी अशी वापरली.त्यांनी ठरवून ड्रॅम क्रीयेत केला होता. आणि नन्तर पण एवढे रडून गोंधळ घालण्याची काय गरज होती एवढं काहीच घडलं नव्हतं.
त्या उलट मेधा धड़े आधी माहित पण नव्हती, पण ती छान करतेय
फक्त तिने सुशांत ची अश्या पद्धतीने माफी मागायला नको होती .
तसे सगळेच सुशांत च्या प्रेशर खाली असल्यासारखे वाटतात. कारण आऊंनी पण त्याची माफी मागितली.
बाकी पुष्कर खरंच डबल ढोलकी वागतोय. विनीत पण राजेश टीमच्या प्रेशर खाली आहे. साई आणि ऋतुजा पण ठीक आहे.
जुई आणि स्मिता ल गेम समजला होता त्या चांगल्या खेळल्या.
आस्ताद सगळ्यात वाईट खेळाला रादर खेळालाच नाही. कॅप्टन म्हणून असं वागणं नाही शोभत खिलाडूवृत्ती चा अभाव वाटला
वाटला सगळ्यानमध्ये
राजेश च्या टीम मेंबर्स नि बाकीच्यांना बाहेर काढलं तर ते आपसात प्रतिस्पर्धी होतील मग कस खेळाची स्ट्रॅटर्जी कशी ठरवतील काय माहित.

काल मॅच संपल्यावर लावले. आधीचा लफडा मिसला. नक्की काय गेम होता? कचरा डोक्यात टाकून खुर्चीवरून उठवायचा?

एक लक्षात आलाय- हा कार्यक्रम तुमची सहनशक्ती तपासणारा आहे.
>>>

मला वाटते त्याहीपेक्षा जास्त अहंकार चेक करणारा आहे.
कालचा लफडा मी मिसला. पण नंतर पाहिले त्यात बरेच अहंकार दुखावले गेलेले दिसले. बहुतेक एटीट्यूड असलेलेच यात जमा केले असावेत..

मेधा धाडे वगळता कोणीच कालचा टास्क चांगला केलेला नाही मुळात आस्ताद च स्वतः च्या ग्रुप ला रोखत होता असं वाटलं..नियम माहिती असुनही पाणी वापरून स्वतः ला बाद घोषित करणं मेधाला टास्क खेळु न देणं आणि सुशांत ने हि मेधाला झोपडपट्टी मेन्टँलिटी ची म्हणणं सगळंच खुप बाळबोध ..येताना होमवर्क केलेला दिसत नाही ...

आस्ताद मुद्दाम च पाणी टाकुन बाद झाला...कारण त्याच्याच कंपूच्या लोकांविरुद्द खेळायची त्याची ईच्छा नव्हती.
मेधा नीट खेळली असं पण नाही म्हणता येणार...कसलाही गेम असला तरी कचरा टाकणं हे मूर्खपणाचच लक्षण आहे...
राजेश आणि रेशम डोक्यात जाउ लागले आहेत आता....किती ते प्रेमात असण्याचं नाटक....

कालचा खरं तर टास्क मस्त होता.. खरं तर मेधा ने छान सुरवात केली पण आपल्या टिम ला प्रोत्साहन द्यायचे सोडुन आस्तादने सरळ मेधालाच बोलणी सुरु केली. सुरवातीला सगळे बरोबर घेत होते गेम जिथे आस्तादने हे बरोबर नाहि म्हटलं तिथे गेम बदलला अन मग सगळेच मेधा ला ओरडु लागले.. संचालकांनी जरा जरब दाखवावी तर शेवटी उ.ना ह्याच माफी मागत होत्या.. सगळा गेम वाया घालवला आस्तादने.. बाकीचे म्हणे काय तर आपण सगळे अ‍ॅक्टर आहोत अन अस कसं वागायच? अरे इथे तुंम्ही काय अ‍ॅक्टींग करायला आला आहात का? नाय पटत तर व्हा बाहेर.. ती रेशम त्या सईला काय खुन्नस देत होती.. हिंदी मध्ये काय खेळले असते मग हे सगळे? उगाच आवाज चढऊन गेम खराब केला.. दुसर्‍या पार्टीतली मग सगळी मांजरं झाली.. मेधा मस्त.. Happy

सुजाच्या अगदी शब्दाशब्दाला अनुमोदन , मला वाटलं मीच टाइप केलं का इतके सेम विचार Happy
टास्कच असा किडे करणारा होता जिथे राडा होणारच होता , रादर म्हणूनच ठेवला होता ज्यात रडी टिम गिव्हप करून उठून पळून जाऊन हारली.
आणि काय तो सुशान्त कसला रडत होता, हा पॉप्युलर अ‍ॅक्टर आहे ??? अगदीच सुमार वावर आणि चिडीचा डाव रडी.
त्या टिमची वयस्क्यं लोक (राजेश , रेशम , सुशान्त ) उगीच डॉनगिरी करत होती, खरंतर सगळ्या वयस्कं लोकांचं डोकं गरम आणि हार्मोन्स सैराभरा धावायला लागले या सहनशक्ती टास्क मधे Proud
त्या बिचार्या तरुण मुली बसून व्यवस्थित सहन करत होत्या सगळं आणि गेम स्पोर्टींग्ली घेत होत्या, हे वयस्कं मंडळी उगीच काही न करता रडारड Biggrin
मेघा, स्मिताला खरोखर गेम समज्लाय, कचरा टाकला , मग ? बिग बॉस हाउसमधे पुष्पवर्षाव आपेक्षित आहे का ?
टाकायला बिग बॉसने नाही थांबवलं, ऑबव्हियसली ती करणारच राडा!
अस्ताद माझा अजुनही आवडता मेंबर आहे पण आज मित्रांच्या ऑपोनन्ट टिमचा कॅप्टन झाल्याने त्याने ऑलमोस्ट गिव्हपच केलं , मुद्दामच पाणी टाकून स्वतः स्वतःला बाद केलं आणि नंतर आपण हिंदी बिग बॉस कलाकारांसारखे चीप लेव्हलला जायचं नाही सारखे माझी टिम लायक नाही टाइप बोलून एकदमच गिव्हप केलं , चांगला अ‍ॅग्रेसिव्ह कॅप्टन वाटला होता आधी, हवा गेली सगळी !
राजेश येडा काय संभाजीराजांच्या टॉर्चरची उपमा देत होता, कमाल किड्डिश आहे Rofl
बाकी काही म्हणा , उषाताई , थत्ते भारी एंटरटेनिंग Happy
आजच्या टास्कला सुरवातीला मजा येत होती खरं तर, जेंव्हा सईनी लिंबु पिळली दोघींवर तेंव्हा खूप हसु आलं अ‍ॅक्चुअली,
उषा ताई म्हंटल्या कचर्याचा डबा आणा तेंव्हाही हसाय्लाच आलं !
आजच्या एपिसोडमधे काय मेघानी स्मिताचा मेकप लपवून ठेवला का ?
उद्याच्या झलक एपिसोडमधे स्मिता ऑपोनन्ट टिम पोरींचे कपडे कातरताना दिसली.

आजच्या एपिसोडमधे काय मेघानी स्मिताचा मेकप लपवून ठेवला का ?
उद्याच्या झलक एपिसोडमधे स्मिता ऑपोनन्ट टिम पोरींचे कपडे कातरताना दिसली.>>
हो का मग मेधा टीमची कसोटी आहे आता

<या दृष्टीने गेम चा विचार केला तर मेधाला गेम समजलाय असं म्हणता येईल . कारण किचनमधला कचरा डोक्यावर टाकणं हे कितीही चिप असल तरी बिग बॉस ने अनाउन्समेंट करून ऑब्जेक्शन घेतल नाहीये . आणि स्मिता पण कितीही गरीब असली तरी तिलाही गेम समजलाय कारण ती तिच्या टिममधल्यांना सांगतेय . "अरे तुम्ही आमच्या करता भांडताय त्या बद्दल थँक्स पण हा गेम आहे आणि आम्ही सहन करू शकतोय ">
अगदी बरोबर..

* मेघा धाडे अती करतेय. मी घरची आहे पैशेवाली, हे लोक माझ्या स्टँडर्ड ला मॅच पण नाही करू शकत असं काहीतरी बोलली काल Uhoh काय संबंध असं बोलायचा? बिबॉ च्या घरात कुणी गरीब श्रीमंत नाही. सगळे टास्क करायला आलेत ना? खेळा गप आणि जा ना घरी २-३ महिन्यात. Uhoh
* राजेश ची भाषा अज्जिबात आवडली नाही.
* सई रडकी - तिला खूप फुटेज मिळेल असं वाटत होतं पण तो पुष्क्या पण फिरकला नाही तिच्याजव्ळ ४ तास, बसली टिपं गाळत.
पण काल मेघा धाडे ला टार्गेट केलं हे मलाही जाणवलं कुठेतरी. पण ती काही कमी नाही, तिच्याशी असंच वागलं पाहिजे.
* जुई आणि स्मिता अगदी थंडगार.....

* अस्ताद - :नेहमीच डोळ्यात बदाम : Proud

Pages