Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे लोक खरेच चोवीस तास एकमेकां
हे लोक खरेच चोवीस तास एकमेकां सोबत असतात का? की फक्त तसं दाखवितात? शूट करुन?
पाप्पी दे पारूला वाल्या
पाप्पी दे पारूला वाल्या ताईंच्या खिशात (स्मिता गोंदकर का?) कायम ओष्ठशलाका असते . रात्री साडेअकरा वाजतासुद्धा त्या आपलं धनुष्य नीटनेटकं करत होत्या.

<
ओष्ठशलाका म्हणजे लिपस्टीक का ??
आता चोवीस तास ऑन कॅमेरा असल्यावर मग रात्रं काय अन दिवस काय , घड्याळ पण नाही म्हणे तिथे, एग्झॅक्ट किती वाजलेत कळायचा पत्ताही नाही
तुझे ओठ सुजलेत का? असं उषा नाडकर्णी जिला विचारणार होत्या, ती हीच का?
<<<
हो , तिच्या लिप फिलर्स वर गॉसिप करत होत्या .
आस्ताद खूप वर्षापासून काम
आस्ताद खूप वर्षापासून काम करतोय, असंभव मध्येही होता. सतरा वर्ष शास्त्रीय संगीत शिकला आहे तो. स्मिता, सई, थत्ते यांच काम बघितलेलं/वाचलेलं नाही. काल पहिला भाग परत दाखवला दुपारी. ती साडी नेसलेली कोण होती शनिवारच्या भागात. मोबाईलवरून काॅपी पेस्ट कसं करतात.
ऋतुजाला पब्लिक आणि स्पर्धक
ऋतुजाला पब्लिक आणि स्पर्धक सगळेच अंडरएस्टिमेट करताहेत. तिची लोकप्रियता आहे हे जाणूनच बिग बॉसच्या टीमने तिला निवडलं असेल ना? तिला मुद्दाम टार्गेट करणं आजिबात आवडलं नाही. तिचा टोन थोडा विचित्र आहे मात्र तसा आस्तादचासुद्धा टोन काय चांगला नाही. तो लोकांच्या मागे त्यांना किती घाण बोलतो. उर्मटपणा करून तो फूटेज खातोय. ऋतुजाला तिच्या डिक्शनवरून हिणवणं, तिच्याबद्दल इतरांचंही मत कलुषीत करणं हे डोक्यात गेलं. कुणाशीही बोलताना मी कसा भारी आहे आणि तुझं ऐकून तुझ्यावर उपकार करतोय असा त्याचा अॅटिट्युड वाटला. तो मला जायला हवाय आणि त्याच्या उर्मटपणामुळे त्याचे शत्रू वाढणार हे नक्की आहे पुष्कर/सई हे ऑलरेडी झालेत त्याचे शत्रू असे वाटले.
उना कितीही ओरडल्या तरीही त्या खरंच प्रामाणिक वाटतात.
रेशम ऋतुजाशी जसे वागतेय तो टिपिकल पुणे- मुम्बई अभिजन- सिनियर वाद वाटला.
ती निष्चितच ग्रूप करते आहे.
भूषण जिंकावा अशी इच्छा आहे, तो खरेच चांगला आहे.
मेघा धाडे लाऊड, ओव्हर रिअॅक्टिंग आहे. ती जावी.
थत्ते एकटे पडणार असे दिसते.
थोडक्यात, ऋतुजाला आपला फूल सपोर्ट आणि लोकांनी तिला भरभरून व्होट करून दाखवून दिलंच आहे की लोकांचं मत मह्त्वाचं प्रस्थापित दुड्ढाचार्य तुम्हाला अॅक्सेप्ट करतात की नाही हे नाही.
पुषकर, सई, जुई वाद करतील/ फूटेज खातील तर जिंकतील.
आरती, भुषण, स्मिता यांची
आरती, भुषण, स्मिता यांची संघर्षगाथा ऐकूण वाईट वाटलं.
भुषण- आरती यांचं बाँडींग खरेखुरे आहे असे वाटले.
विनित का रडत होता परवा? मला
विनित का रडत होता परवा? मला कळलंच नाही. काय चुक केली त्याने?
तो काय बोलतो ते नीट ऐकू येत नाही.
आरती काय घाणेरडेपणा करायची? तिला सतत वारा सरतो त्याबद्दल का?
थत्ते नी अस्ताद ला मत दिलं ते मला छान वाटलं. त्यांनी पर्सनल वाद मधे न आणता योग्य व्यक्तीला मत दिले. सॉर्टेड अॅक्शन होती ती.
ऋतुजा "धर्माधिकारी" असल्याने
ऋतुजा "धर्माधिकारी" असल्याने आपले वोट कायम तिलाच ती बाहेर जाइपर्यंत
आस्ताद कवितापण उत्तम करतो.
आस्ताद कवितापण उत्तम करतो. तसा तो कंप्लिट पॅकेज आहे पण भडक डोक्याचा आहे.
सुसल्या एक सिरियल करुन बरीच फेमस दिसते, झी चं काहीही म्हणा सिरीयल्स कशाही असोत एका सिरीयल मधे नेम फेम देण्याची ताकद आहे त्यात. अर्थात ती नवीन म्हणून तिला नॉमिनेट करणं चुकीचं होतं. आरती इतकी वर्ष काम करुन बाहेर गेली. भुषण डेंजर झोनमधे होता. पण सुसल्या सेफ होती. प्रेक्षकांना कदाचित नवीन म्हणून टारगेट केलेलं पटलंही नसेल.
मी काही कोणाला वोटस देत नाही.
Bhushan kaduch jayla hava
Bhushan kaduch jayla hava hota pan, tyach kay kam nahiye thithe
रंगीत माणसाच आणी उनाच कधी ट ट
रंगीत माणसाच आणी उनाच कधी ट ट फ फ
भांडन होणार
मला खुप उत्सुकता लागलिये
आस्ताद कवितापण उत्तम करतो.
आस्ताद कवितापण उत्तम करतो. तसा तो कंप्लिट पॅकेज आहे पण भडक डोक्याचा आहे.>>>>>>१
बाय द वे ते वोटींग वगैरे खरंच
बाय द वे ते वोटींग वगैरे खरंच मॅटर करतं का, ह्यांचं ठरलेलं असतं असं वाटतं.
आस्ताद नीट गेला पुढे जास्त राडे न घालता तर चॅनेलची पसंती त्याला असेल. कारण त्यांच्या सुरु असलेल्या सिरीयलवरुन त्याला इथे पाठवलाय.
Submitted by पुंबा on 23
Submitted by पुंबा on 23 April, 2018 - 03:16
आरती, भुषण, स्मिता यांची संघर्षगाथा ऐकूण वाईट वाटलं.
>>>>>>>>>>>>>
हे कोणी थोडक्यात सांगेल काय .. काय कहाणी आहे ते?
भूषण ची बायको कोण होती मला
भूषण ची बायको कोण होती मला समजलं नाही. त्याच्यापेक्षा वयाने मोठी, कोणीतरी सेलिब्रिटी होती, असं म्हणत होता तो.
शेवटी अपेक्षित घडले... थत्ते
शेवटी अपेक्षित घडले... थत्ते साहेब घरात आणि आरती सोलंकी बाहेर..
आता तर आऊ वि. थत्ते ... सामना अधिक रंगतदार होणार. थत्ते बहुतेक निव्वळ काड्या लावाणे, टीआरपी टिकवणे यासाठी आहेत. when everyone else in the house considers him as outsiders it is going to be heck of fireworks! पण तरिही थत्ते यांना गाढव, मूर्ख, ईडीयट, इत्यादी विशेषणे थेट कॅमेरा समोर देणार्या लोकांचा बुध्यांक मात्र किती आहे हा ही एक प्रश्णच आहे.
म्हटलं तर बीग बॉस सारख्या वादग्रस्त कार्यक्रमातून शिकण्या सारखे बरेच काही आहे, किंवा निव्वळ Trash entertainment.
भूषणची पहिली बायको पोर्णिमा
भूषणची पहिली बायको पोर्णिमा नाव होतं, कोण फेमस काही आठवत नाही मला.
विनित का रडत होता परवा? मला
विनित का रडत होता परवा? मला कळलंच नाही. काय चुक केली त्याने? >>> अनिल थत्ते म्हणाला होता, big boss मध्ये तोकडया कपडयात असतात, तेच विनितने उघड केल. हे चुकल त्याच अस काही तरी म्हणाला होता तो.
सुसल्या एक सिरियल करुन बरीच फेमस दिसते>>> ते शरद उपाध्ये सुद्दा काल तिला सुसल्या म्हणत होते.
भूषण ची बायको कोण होती मला समजलं नाही. त्याच्यापेक्षा वयाने मोठी, कोणीतरी सेलिब्रिटी होती, असं म्हणत होता तो.>>> ती त्याच्याबरोबर 'श्यामची मम्मी' नाटकात होती म्हणे.
उनाची राशी मीन? आस्तादची राशी
उनाची राशी मीन? आस्तादची राशी मिथुन? जुईशी राशी मेष?
राजेश श्रून्गारपूरे घटस्फोटित आहे का? कारण काल शरद उपाध्ये त्याच्या आणि रेशमच्या राशीबद्दल म्हणत होते की, वृश्चिक राशीची माणसे (राजेश) मकर राशीच्या स्त्रियान्ना (रेशम) आदर देतात, पण ते त्याच्न्याशी romantic नाही होऊ शकत. राजेशच्या बोलण्यात बायकोचा उल्लेख नसतोच.
आरती काय घाणेरडेपणा करायची?
आरती काय घाणेरडेपणा करायची? >>> हो ना. मला सुद्दा तिच्या वागण कुठे खटकल नाही. ती Tomboy असली तरी मनाने हळवी होती.
राजेशने आल्या आल्याचं म मां
राजेशने आल्या आल्याचं म मां शी बोलताना केला की उल्लेख बायकोचा. जुलैमध्ये तिचा वाढदिवस असतो, दोन मुली आहेत, एका मुलीचा एप्रिल मध्ये आणि एकीचा मे मध्ये.
ऋतुजा कशीही असेल पण तिला बिग
ऋतुजा कशीही असेल पण तिला बिग बॉस ने इन्व्हाईट केलाय हे महत्वाचं . त्यामुळेच रेशम ने आणि आस्ताद ने तिच्या बद्दल जास्त जादा पणे बोलणं मला पहिल्यापासून आवडत नाहीये . त्यातून आस्ताद इतरांची मन तिच्या बद्दल कलुषित ही करतोय त्यामुळे सेकंड टाइम ती नॉमिनेशन मध्ये असू शकते . आस्ताद चा चेहरा कायमच मग्रूर सतत गुर्मीत आणि मी म्हणजे कोण असा असतो . त्याच्यात एकच प्लस पॉईंट म्हणजे त्याला मराठी चांगलं बोलता हि येत आणि लोकांना पटेल असं व्यक्त करण हि जमत . तो विनीत मात्र येडा आहे . पहिल्यांदी बरा वाटला . भूषण /जुई आणि तो राजेश यांच या आठवड्यात कुठलंच अस्तित्व जाणवल नाही
तरिही थत्ते यांना गाढव, मूर्ख, ईडीयट, इत्यादी विशेषणे थेट कॅमेरा समोर देणार्या लोकांचा बुध्यांक मात्र किती आहे हा ही एक प्रश्णच आहे.>> +१११ ते मात्र आहे . मला व्यक्तिशः थत्ते कितीही आवडत नसले तरी
आरती काय घाणेरडेपणा करायची? >> अरे ते त्यांच्या दीड तासात दाखवत नव्हते . काही ठराविक लोकांचच शूट दाखवतात
मी एकच पाहिला एपि... काहीतरी
मी एकच पाहिला एपि... काहीतरी भाषणे चालू होती. भुषण- आरती यांचं बाँडींग खरेखुरे आहे असे वाटले.>>>>>>>>>>>> तेव्हा भूषण सांगत होता ती माझी बहिण आहे. माझ्या अंगाखांद्यावर खेळली आहे. ममां म्हटले की ती तेव्हापासूनच ती भारी असेल तुला
आरती काय घाणेरडेपणा करायची? >त्यात आरती हे पण म्हटली की पुरूष एकत्र आले की "प्रुप"(तोंडाने आवाज काढत) यावर बोलू शकतात मग बायका का नाही? म्हणजे वारा सरणेच असू शकेल.
घाण कि बोलायची कि काय पाहिलं
घाण बोलायची कि काय पाहिलं नाही पण बरं झालं आरतीच गेली , अनॉयिंग होती, बस्स्लेल्या आवाजात सुध्दा फार लाउड वाटायची आणि फार बोलायची.
थत्ते काकांनी काय केलं आज?
थत्ते काकांनी काय केलं आज?
पुष्करच लग्न झालयं हे माहितच
पुष्करच लग्न झालयं हे माहितच नव्हतं....
थत्ते काकांनी काय केलं आज?>>>कॅमेरा समोर येऊन बडबड केली नेहमीप्रमाणे...
मग अचानक सेंटी झाले
गेले का काय घराबाहेर?
गेले का काय घराबाहेर?
घराबाहेर जायचा कार्यक्रम
घराबाहेर जायचा कार्यक्रम रविवारचा असतो ओ
नाही अजून आहेत बहुधा.
नाही अजून आहेत बहुधा.
सई सान्गतेय पुष्करला की आय नीड यू हिअर.
मेघा धाडे अत्यंत ओव्हर
मेघा धाडे अत्यंत ओव्हर कॉन्फिडन्ट आणि ओव्हर अॅक्टिंग करणारी बाई आहे
घराबाहेर घालवायचा कार्यक्रम
घराबाहेर घालवायचा कार्यक्रम रविवारी असतो . थत्ते आज बरेच सेंटी झाले आणि आता मला घरातल्या ( बिग बोस च्या घरातल्या नव्हे ) लोकांची किंमत कळतेय असं म्हणताहेत . रेशम नॉमिनेशच्या बाबतीत दोन नंबर आहे हे बर झालं अतिशय मग्रूर बाई आहे ती. मेधा धाडे कॉन्फिडन्ट आहेच पण हा खेळ कसा खेळायचा हे तिला चांगल समजलंय . ती टिचून तीन नंबरला उभी राहिली . मला स्वतःला दुसऱ्यापेक्षा खाली बघू शकत नाही म्हणे आणि स्मिता ने तिचा नंबर सोडला . स्मिता खरी स्वभावाने गरीब आहे
Pages