बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आठवतंय हिंदी बिग बॉस चा कार्यक्रम मी दुसऱ्या सेशन पासून बघायला सुरवात केली होती आणि तिथेच थांबवलं होत . नाही म्हणायला राखी सावंत च्या सेशन मध्ये अधून मधून बघत होते पण कंटिन्यूअस नाहीच . बिग बॉस हा कार्यक्रम हा परदेशी कार्यक्रमानुसार बेतलेला ( जसा कौन बनेगा करोडपती ) पण माणसाच्या स्वभावच खर खूर दर्शन घडवणारा . माणूस बाहेरच्या जगात कितीही नाटकीपणे वागत असला तरी बिग बॉस च्या घरात तब्बल १०० दिवस एकत्र असताना ( सगळ्या माध्यमांशी कट ऑफ अवस्थेत असताना ) एकमेकांशी नाटकीपणे बोलणं / खोटं खोटं स्तुतीपर बोलणं हि गोष्ट म्हणजे अशक्यातली अशक्यप्रायच गोष्ट आहे . म्हणून त्यांची टॅगलाईन पटते " इथे दिसत तसच असत "
एनीवे मराठी बिग बॉस ला सुरवात झाली आहे .

पहिला इंट्रोडक्शन चा भाग मस्त होता . उद्यापासून बघणार . आपला मराठी कार्यक्रम आहे बाबा . बघायला पाहिजे . उषा नाडकर्णी / जुही गडकरी / आस्ताद काळे वगैरे बऱ्यापैकी काम केलेले आहेत . बाकी सगळे एक दोन पिक्चर नंतर चे प्लॉप कलाकार . पण म्हणूनच ते ३ महिने वेळ देऊ शकतील . त्या सगळ्यांच्या मध्ये ते अनिल थत्ते ऑड आहेत त्यामुळेच ते मला नाही वाटत टिकतील असं . ते पहिल्याच आठवड्यात बाहेर जाण्याची शक्यता वाटते Happy

ती राखेचा मधली अभिनेत्री खुलता कळी खुलेना मध्येही होती ना? मोनिकाची अमेरिकेहून अचानक आलेली मैत्रीण म्हणून. उषा नाडकर्णीही होत्या त्या मालिकेत - विक्रांतची आजी.
या दोघींचे एकत्र सीन्स नसतील.
पण उषा नाडकर्णी तिला ओळखत नाहीत, असं दिसलं.

महेश मांजरेकरांनी काल 'तुमचं आमूलाग्र मत मला द्या" असं म्हटलं आणि म्हणायला लावलं राखेचावालीला.

मराठी वाईट आहे. शब्दाला शब्द ठेवून भाषांतर केलंय - बिग बॉस चाहते हैं 'चं
कोणीतरी व्हॉइस आर्टिस्टच असतात हे लोक.

मराठी वाईट आहे. शब्दाला शब्द ठेवून भाषांतर केलंय >>> काल कोणी एक मुलगी म्हणे मला तुमचं 'अमुलाग्र' मत द्या. अमुल्य मधली दोन अक्ष्ररं आठवली आणि जवळपास वाटेल असा शब्द ठोकुन दिला. मांजरेकरांनी सुद्धा दुर्लक्ष केलं किंवा त्यांनाही चुक कळाली नाही कोणास ठाउक.

अत्यंत भ्रष्ट नक्कल. Sad
बिग बॉस चं घर अतिशय उत्तम बनवलं आहे. आरती, भूषण कडू, तो छोटा, उषा नाडकर्णी, रेशम मला आवडतात. पुष्कर, राजेश पण ओके. अनिल थत्ते अगदीच ऑड. काय अवतार आहे त्यांचा Uhoh दर आठवड्याला पार्लर ला जावे लागते म्हणे त्यांना. आणि ते कपाळभर काय लावतात अश्या टिकल्या? Uhoh
ती गुलाबी ड्रेस घालून (मेधा की मेघा) उल्लाला नाचलेली बाई भयंकर वाटली मला. त्या ड्रेस मध्ये ती मागून भयंकर बेढब दिसत होती.
स्मिता गोंदकर चा ड्रेस ही अत्यंत अखूड होता, मला नाही आवडला. आणि ती इतकं इंग्रजी का बोलत होती Uhoh
हिन्दी बिग बॉस मध्ये भाषेचे बंधन होते, तसे इथे ही हवे.
बाकी टॅग लाईन्स, राडा, बा चा टिव्ही वगैरे अगदीच बकवास.
बक्षिसाची रक्कम काय असणार आहे? Uhoh
अस्ताद ला कसकाय घेतलं? सध्या त्याच्याकडे काही काम दिसत नाहिये. Uhoh

अस्ताद ला कसकाय घेतलं? सध्या त्याच्याकडे काही काम दिसत नाहिये. Uhoh >>> कारण सरस्वतीचे मोठे मालक गायब आहेत म्हणे.... Happy

कोण अनिल थत्ते. पत्रकार का, ज्यांना फार कोणी विचारत नाही. दाढी वगैरे आहे का. पूर्वी पेपरात बघितलेलं.

आस्ताद डिमांड मध्ये आहे की, उलट बिग बॉस साठी मालिकेतून गायब करणार थोडे दिवस असं वाचलं होतं. तो रिकामटेकडा नाहीये. बरेच जण ह्यातले रिकामटेकडे नसावेत.

आस्ताद डिमांड मध्ये आहे की, उलट बिग बॉस साठी मालिकेतून गायब करणार थोडे दिवस असं वाचलं होतं. तो रिकामटेकडा नाहीये. बरेच जण ह्यातले रिकामटेकडे नसावेत. >>> + १११ मलाही असे वाटते

कोण अनिल थत्ते. पत्रकार का, ज्यांना फार कोणी विचारत नाही. दाढी वगैरे आहे का. पूर्वी पेपरात बघितलेलं. >>> हो हो तेच, मी बरेचदा पाहिलेय त्यांना ठाण्यात असताना, फार विचीत्र आहेत ते

कोण अनिल थत्ते. पत्रकार का, ज्यांना फार कोणी विचारत नाही. दाढी वगैरे आहे का. पूर्वी पेपरात बघितलेलं. >>> हो हो तेच, मी बरेचदा पाहिलेय त्यांना ठाण्यात असताना, फार विचीत्र आहेत ते>>> मला तर अजूनही कळलं नाही कोण आहेत ते...गुगळून पाहिलं तर एखद्या जादूगारासारख्या माणसाचा फोटू दिसतोय...तेच का ते? Uhoh

अगदी अगदी. मराठीतले संजूबाबा!>>>

काल बघताना हे प्रकर्षाने जाणवले!
मांजरेकर ऐवजी दुसरा कुणीतरी हवा होता...
अर्थात हा शो बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही... हिंदी कधीही बघितला नाही...

ला तर अजूनही कळलं नाही कोण आहेत ते...गुगळून पाहिलं तर एखद्या जादूगारासारख्या माणसाचा फोटू दिसतोय...तेच का ते? >>> Lol माझेही असेच झाले.

पण उषा नाडकर्णी तिला ओळखत नाहीत, असं दिसलं. >>> ओळखल तिला आणि मिठीही मारली. Happy

अनिल थत्ते अगदीच ऑड. काय अवतार आहे त्यांचा Uhoh दर आठवड्याला पार्लर ला जावे लागते म्हणे त्यांना. आणि ते कपाळभर काय लावतात अश्या टिकल्या? >>> उषा नाडकर्णीन्नी अनिल थत्तेला पहिल्यान्दाच बघितल असाव. त्या स्मिता गोन्दकरला विचारत होत्या, कोण हा माणूस? Lol

ती गुलाबी ड्रेस घालून (मेधा की मेघा) उल्लाला नाचलेली बाई भयंकर वाटली मला. त्या ड्रेस मध्ये ती मागून भयंकर बेढब दिसत होती. >>> ती मेधा धाडे 'सुपरस्टार' चित्रपटात सिद्धार्थ जाधवची हिरवीण होती. त्या चित्रपटाची निर्माती सुद्दा होती म्हणे.

प्रिकेप पाहिला. अनिल थत्ते पहिल्याच दिवशी उषा नाडकर्णीन्ना घरातून घालवायला बघतोय. तर सुषमाला विनित भोन्डे नकोये घरात.

बाकी महेश मान्जरेकर मध्ये मध्ये सलमान खानची copy करत होता काल.

{पण उषा नाडकर्णी तिला ओळखत नाहीत, असं दिसलं. >>> ओळखल तिला आणि मिठीही मारली. Happy}
तू कोण? कोणत्या मालिकेत होतीस असं आधी विचारलेलं आमच्या टीव्हीत दाखवलं. मग मिठी.

मी तर अनिल थत्ते हा माणूस पहिल्यांदा ऐकला आणि पाहिला काल Uhoh
नक्की खूप गोन्धळ घालणारेत हे लोक. कारण कालच्या प्रोमोत अनिल थत्ते नी उषा नाडकर्णीला टार्गेट केल्याचं दाखवलं आहे.

तुमचा टिवी??!! Proud
जिला असं विचारलं ती सुसल्या होती राखेचा मधली.

अनिल थत्ते ८०-९० च्या दशकात एक गगनभेदी नावाचं एक पत्रक (पेपर) काहीतरी प्रकाशित करत, त्यात फक्त आणि फक्त मसाला/ प्रौढाकरिताचे विनोद वगैरे असत. नंतर गायब झाले आणि २००० नन्तर परत उद्भवले. स्वयंघोषित गुरू वगैरे, आणि स्वतःची चित्रं वगैरे असलेल्या गाड्या चालवतात, स्टेज शो करतात असं नेटवर वाचलं.

सो थोडक्यात असं आहे की शाहरूख सारखं, यू लाईक हिम ऑर यू डोन्ट लाईक हिम, बट यू कान्ट इग्नोर हिम. Proud

ह्या थत्तेला पहील्याच आठवड्यात बाहेर काढायला पाहीजे
जाम डोक्यात जातोय कस त्याच ते थोबड
गंदपटक माले तर आवडीच नई रायना तो जोकर कुठला

बाकी ती रेशमा मस्तये ना राव
आणी त्या छोट्याला का घेतलंउगी

सो थोडक्यात असं आहे की शाहरूख सारखं, यू लाईक हिम ऑर यू डोन्ट लाईक हिम, बट यू कान्ट इग्नोर हिम. Proud>>> दक्षिणा ताई, या एका वाक्यात 'बिग बॉस - मराठी'ला (धाग्याला) सहस्त्रकी वाटचालीकडे घेवून जायचं पोटेन्शियल आहे. Wink

प्रत्येक दरवाज्याला वेगळा रंग लावलेली वर काचेवर "मी वेडा आहे, माझ्या मागे येऊ नका माझ्यापुढे जाऊ नका" अस लिहीलेली अनिल थत्तेची गाडी ठाण्यात प्रसिद्ध होती.
स्वर्ग ज्वेलर्सच्या किंचाळाल्या आवाजातल्या जाहीरातीत ह्याचा फोटो असतो. बहुदा तिथे खड्यांवर मार्गदर्शन करतो.

गगनभेदी पेपर खुप चटकन प्रसिद्धीस आला होता. बहुदा ब्लॅकमिलिंगच्या केस मधे सापडला आणि गाशा गुंडाळला. आता काय झालं हे सांगण्यासाठीच तो आलाय.

स्वर्ग ज्वेलर्सच्या किंचाळाल्या आवाजातल्या जाहीरातीत ह्याचा फोटो असतो. बहुदा तिथे खड्यांवर मार्गदर्शन करतो.>>> ओह...तरीच याला पाहिल्यासारखं वाटत होतं...या वल्लीबद्दल जितकी चर्चा इथे चाल्लीये त्यावरुन तर हा एक 'शो स्टीलर' वाटतोय..असले लोक्स बिग बॉसमध्ये भरपूर टीआर्पी मिळवून देत असल्याने हा लंबी रेस का घोडा असणार..

आस्ताद काळे
त्याच्या कोथरूडच्या controversy बद्दल बोलेल.

मेधा घाटगे असेल तर
कुमारी माता बनायला चालली होती त्याबद्दल होईल

उषा नाडकर्णी
अर्वाच्य शिव्या देते पण खरं बोलायला भीत नाही त्यामुळे ती तिच्या काळातल्या आणि आताच्या लोकांच्या भानगडी सांगेल.

आस्ताद काळे
त्याच्या कोथरूडच्या controversy बद्दल बोलेल.>> काय होती ती controversy?
मेधा घाटगे असेल तर
कुमारी माता बनायला चालली होती त्याबद्दल होईल>>> मेघा घाडे का धाडे? आहे बहुतेक...या कोण आता? तज्ञांनी माहिती पुरवा.

त्याच्या कोथरूडच्या controversy बद्दल बोलेल.>> काय होती ती controversy?>>>>>
आस्ताद काळे, सुहृद गोडबोले, सई ताम्हणकर आणि त्यांचे काही सेलेब्रिटी (तथाकथित सेलेब्रिटी) मित्र-मैत्रिणी इ. मंडळींनी कोथरूडच्या एका सोसायटीत दारू पिऊन अपरात्री धिंगाणा घातला होता.. पोलीस केस झाली होती.. रात्रभर जेल मध्ये होती मंडळी.. 2012 किंवा 13
खरं तर सई या घटनेनंतरच ग्लॅमरस म्हणून प्रसिद्ध झाली..

Pages