निरोप - स्वानुभव

Submitted by द्वादशांगुला on 23 February, 2018 - 10:36

नमस्कार माबोकरांनो! किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला. कुठल्या शिक्षकांना हे माहीत नव्हतं. वर आम्ही काही भाषणही देणार होतो. मी थोड्या जड मनाने, थोड्या उत्साहात ठीक साडेतीनला शाळा गाठली.

आणि पुढे जे घडलं ते अविश्वसनीय, सुखद धक्का देणारं होतं. मी शाळेत प्रवेश केला, अन् पाहते तर काय , माझीच कविता सुवाच्च अक्षरात शाळेच्या मुखदर्शनी लावलेली होती. अन् खाली माझं नाव.....! सुखद धक्का होता तो माझ्यासाठी. जणू तरंगतच पायर्या चढून वर गेले नि आमच्या मुख्याध्यापिका भेटल्या. त्या हसत म्हणाल्या," बघ तुम्ही देणार होतात ना शाळेला सर्प्राईज, आम्हीच दिलं तुम्हाला." आयुष्यातलं मोठ्ठं सर्प्राईज आहे ते माझ्यासाठी. आयुष्यात कायम लक्षात राहिल असं.

मग भाषणाचे सोपस्कार पार पडले. खुद्द शाळेच्या संचालकांनीही माझं कौतुक केलं. करियर गाईडन्सचं लेक्चर झालं, नि हा औपचारिक सोहळा बघता बघता पार पडला. मिठाईने तोंड गोड करून शाळेला कायमचा निरोप दिला. किती पटकन संपतो ना वेळ....

पण मी हे माबोकरांना का सांगतेय, तर नकळत सापडलेल्या मायबोलीशी थोड्याच वेळात अनोखं नातं जोडलं गेलंय. लेखनातल्या चूका थोड्या थोड्या समजायला लागल्यात. चूका दुरूस्त करणारे नि मनापासून प्रतिसाद देणारे सख्ख्या नातलगांसारखे माबोकर मिळालेत. आतापर्यंत शाळेने माझ्यातल्या लेखनाच्या सुप्त गुणांना वाव दिला, नि म्हणून इथे लिहू शकले. अशा या शाळेबद्दल माबोवर लिहिलं नसतं, तर पापच लागलं असतं मला. नि माबोवर हे शेअर करावसं वाटलं, म्हणून रखडलेले हे दोन शब्द.

आता म्हणाल ही दहावीची मुलगी तोंडावर परीक्षा आलीय नि लिहीत काय बसलीय. चार तास रखडून दोन पानं अभ्यास करण्यापेक्षा मला त्यातल्या अर्ध्या तासात काहीतरी लिहून मन प्रसन्न झाल्यावर उरलेल्या साडेतीन तासांत दहा पानं अभ्यास करायला आवडतो. तरी परीक्षा पाच दिवसांवर आलीय. अभ्यास तर हवाच ना. चला , शाळेला कायमचा नि माबोला तूर्तास तरी महीनाभर निरोप. पुन्हा भेटू २२ मार्चनंतर, माझे पेपर आटोपल्यावर. सुट्टीत भरपूर लिहीन. आत्तातरी टाटा........... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यांनीच चेक करा आपापल लिखाण तिथे दुसर्याच कोणाच्या नावाने लिहील असेल तर. तुमचा अभिषेक यांची' एक हरवलेली मैत्री' नावाची कथा पण प्रतिलीपीवर विनायक काकवीपुरे नावाने लिहीली आहे.अॅप वर जाऊन वरील नावाने सर्च करा सापडेल तिथे.

ह्म्म्म्म तसे तर अनेक लोकांचे अनेक लेख, कविता, इ. आंतरजालावर इतर अनेक लोक फिरवत असतात आणि स्वतःचे म्हणुन पण मिरवत असतात.
या विषयावर काही धागे पण येऊन गेले आहेत असे वाटते.
पंचाईत अशी आहे की या असल्या मुक्तचोरीला आळा घालणे आत्यंतिक कर्मकठिण काम आहे.
जर अगदी संशोधन, शोधनिबंध, पेटंट, इ. काही असेल तर त्याची प्राणपणाने जपणूक केली जाते, नव्हे तसे करण्याला काही संस्था, प्रक्रिया, कायदेशीर आधार, इ. आहेत.
पण ललित लेखनासारख्या प्रकाराला (विशेषतः डिजिटल) काय सोय असावी चोरी होऊ नये यासाठी ?
पुस्तक लिहून ते जर प्रताधिकारासाठी नोंदले असेल तर एकवेळ काही कारवाई होऊ शकेल चोरीच्या केसमधे.

या साक्षी कदम स्वतःच अस काही लिहीतच नाहीत का.दुसर्याच लिखाण काॅपी करून छापायला भीती कशी वाटत नाही यांना?

पण तारखेप्रमाणे बघायला गेल तरी जुईनेच आधी लिहीलय साक्षी कदम यांनी नंतर लिहीलय.आणि आशय सेम असला तर ठिक आहे पण शब्दांशब्द सेम नाही ना असू शकत.नेटवर लिहीताना काही अटी- नियम असतीलच ना. मग त्यानुसार कारवाई करता येईल.

त्या साक्षी कदमचा काहीच रिप्लाय नाही आलाय. मी आता त्या अॅपच्या डेव्हेलपरला मेल करायच्या विचारात आहे. फेसबुकवर अकाउंट उघडून त्यावरूनही सांगेन त्या लोकांना. परीक्षेआधी फेबु अकाउंट डिलिट केल्याचा पश्चाताप होतोय....

पण मायबोली वर कोणालाही सहज काॅपी करता येतं लिखाण. इतर साईट्सवर हे असं करता येत नाही...... पुढचं लिखाण इथे टाकू की नको या विचारात आहे........ Sad

अॅप डेव्हलपरलाच मेल कर.पण इथे लिखाण करायच नको सोडूस.असही इथे तू आधी लिहील आहेस ते दिसतय.लेखनाच्या सुरक्षिततेसाठी मात्र अशा प्रतिभाचोरांचा खरच मायबोलीने काहीतरी बंदोबस्त करायला हवा.

हम्म.... ते डेव्हलपर काहीतरी करतील अशी आशा आहे. फेबुवर पण टाकते तक्रार. अॅप पेजवर नि डेव्हलपर अकाउंटवर.

आदिसिद्धी थॅक्स... Happy तुझ्या बोलण्यानं धीर आलाय.

तुझं लेखन कोणीही चोरेल .पण तुझ्या नवीन कल्पना आणि तुझी लेखनाची प्रतिभा कोणीही चोरू शकत नाही याची100% खात्री आहे मला.

बापरे किती तारीफ...... Happy एवढंही काही भारी नाही लिहीत गं.... आपलं सुचतं ते लिहीते. बरीच प्रगती करायचीय मला अजून...

इतक्या लगेच नको फेसबुकवर टाकूस.मेल ला सकारात्मक रिप्लाय नाही आला आजच्या दिवसात तर उद्या टाक.

जुई त्यांनी लेख हटवलेला दिसतोय.आता त्या अॅपवर दिसत नाहीये.च्रप्स यांनी दिलेल्या लिंकवरही नाहीये...

बेधुंद लहरी च्या अॅप आणि वेबसाईटवरून त्या साक्षी कदम नामक साहित्य चोरणार्या व्यक्तीला योग्य ते शासन झाले आहे. माझा बिर्यानी हा त्यांनी त्यांच्या नावावर खपवलेला लेखही काढून टाकण्यात आलेला आहे.

मी मानायला हवेत गं आभार..... तुझे,च्रप्स, vb,किल्ली , सायुरी, महेश यांचे...... भरपूर मदत केलीय तुम्ही सर्वांनी..

<<< ललित लेखनासारख्या प्रकाराला (विशेषतः डिजिटल) काय सोय असावी चोरी होऊ नये यासाठी ? >>>
सोपे आहे. आंतरजालावरील लेखनाची चोरी होईल, अशी भिती वाटत असेल तर आंतरजालावर लिखाण करू नये.

Pages