नव्या वादळी नाव हाकारतो

Submitted by अनन्त्_यात्री on 26 February, 2018 - 01:55

पुन्हा भेदूनि दाट अभ्रांस थोडा
फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो
निळी पेटती रेष रेखीत गगनी
अनामिक उल्केस बोलावितो

भणाणून आवर्त झोंबे शिडांसी
सुकाणू दिशाहीन कैसे फिरे
पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा
कुणाला न ठाऊक कोठे विरे

जिभा अंध:कारास फुटती हजारो
तशी गाज ह्या सागराची उठे
रोरावती मत्त लाटा अनादि
किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे

उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा
उद्याच्याच सूर्यास मी जाणतो
तमाची तमा नाही आता जराही
नव्या वादळी नाव हाकारतो

-उदय

Group content visibility: 
Use group defaults

उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा
उद्याच्याच सूर्यास मी जाणतो
तमाची तमा नाही आता जराही
नव्या वादळी नाव हाकारतो >>>>
क्या बात है....... Happy

VB, मिसळपाव वर माझी कविता मी २५ फेब '१८ ला ( म्हणजे उपरोल्लेखित वेबसाईटवरील "प्रकाशनाच्या" १ दि अगोदर) मी प्रसिद्ध केली होती. सूज्ञांस अधिक सांगणे नलगे.

अनन्त्_यात्री , >>>

त्या वेब साईटवर साक्षी कदम या नावाने द्वाद्वाशुंगला हिची एक कथा टाकली आहे कळले, तिकडे हि कविता पण दिसली म्हणून सांगितले.

जर तुम्हाला चालणारे तुमची कविता कुणी दुसर्याने आपल्या नावाने प्रसिद्ध केलेली तर मला काय फरक पडणारे

ईग्नोर करा ती लिंक

अरे! Vb तुम्ही चुकीचं समजताय. वरची पोस्ट मी अनंत यात्रींना उद्देशून लिहिली होती की तुम्ही (म्हणजे vb) त्यांच्यावर शंका घेत नाहीयेत.

मॅगी >> मी प्रतिसाद संपादित केला आहे, मला असे वाटले की तुम्हालाही तसेच वाटले