नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वादळवाट मी फार कमी बघितली. तिथे लोकेश जास्त आवडला होता. आदिती फारशी आवडत नाही म्हणून ती कवचित बघायचे कधीतरी. चि मा पण आवडला होता तिथे. उमेशकडे जास्त लक्ष नव्हतं गेलं तेव्हा.

वादळवाट मधे मला सु.भा. फार आवडायचा, चि. मा. पण. लोकेश पेक्षा आदितीला सु.भा. सुट करायचा त्यात.

सु भा मलाही आवडायचा पण लोकेश, चिमापेक्षा कमी. चिमाने फार सहज काम केलं. लोकेश आदीती जोडी आवडायची. माझी भाची यात मला अजिबात आवडली नाही, निर्मलाचं काम केलं होतं तिने. उगाच अति मेकअप होता आणि कामपण सो सो.

ही नवी साडेनवाची मालिका कधीपासून सुरू होते आहे? १-२ एपिसोड्स तरी बघेन म्हणते.

उम्मीद पे दुनिया कायम है... Proud

ही नवी साडेनवाची मालिका कधीपासून सुरू होते आहे? १-२ एपिसोड्स तरी बघेन म्हणते.>> 22 October पासून.
देवाशप्पथ ची वेळ बदलणार आहे.

२२ ऑक्टोबर ??
(२२ जानेवारी म्हणायचंय का?)

अरारारारा... Lol हो हो जानेवारीच. ऑक्टोबर कुठून लिहिला कोणास ठाऊक.

अन्जूताई, तुझी पोस्ट वाचल्यावर मी आठवत होते असंभव बद्दल पण आठवेचना. नंतर लक्षात आलं की मी ती अर्धवटच पाहिलेली का ते आठवत नाही आता. काल युट्युबवर शोधले भाग. आजपासून पहिल्यापासूनच बघायला सुरुवात करेन. Happy

'गुलमोहोर' पाहिली 2 दिवस.. तळपदे डोक्यात जात असल्याने एपिसोड विशेष आवडले नाहीत; पण थीम आवडली..
आधी अधुरी प्रेमकहाणी/ अव्यक्त प्रेमाच्या कथा दाखवणार आहेत वाटतं.. पुढच्या आठवड्यात विक्रम गोखले आणि सुहास जोशी आहेत

तळपदे डोक्यात जात असल्याने एपिसोड विशेष आवडले नाहीत >>>>> ह्याच कारणामुळे मी पाहिलिच नाही.

पुढच्या आठवड्यात विक्रम गोखले आणि सुहास जोशी आहेत >>> ह्या दोघांसाठी नक्की बघेन

मला श्रेयस विशेष आवडत असल्याने गुलमोहर पण विशेष आवडला. Happy "स्माईल प्लीज" हा विषयच फार सुंदर आहे.
डायलाॅग फार छान आणि वेगळे आहेत.
कथा सरधोपट वळणांचीच आहे असं वाटतंय. दोन्ही भाग प्रेडिक्टेबल होते.
शीर्षक गीतही आवडलं.

मला श्रेयस गिरीजा दोघेही आवडले. नेहमीच आवडतात, पण कथा सरधोपट वळणांचीच असल्याने फार नाही आवडली .

गुलमोहरचा end अजिबात आवडला नाही. मायरा हसली तर तुला हवे ते माग, देईन असं तिचे बाबा सुविला सांगतात आणि ती हसल्यावर तिने मागितलेलं नसताना आपला चुकीचा निर्णय सुविवर थोपतात आणि दोन प्रेमी जीवांना कारण नसताना त्याग करायला लागतो. एका मुलीचं हास्य आणताना दुसऱ्या दोघांचे घालवतात. अर्थात त्यांना माहीती नसतं पण लग्नाचा निर्णय असा जबरदस्ती थोपवणे चुक. बहिण बहिणीसाठी त्याग करते पण सुविच्या मनाचा कोणी विचार करत नाही, so sad.

मला गिरीजा खूप आवडली गोड आणि सहज काम. श्रेयस आवडतो पण काल समहाऊ एवढा भिडला नाही.

गुलमोहरचा end अजिबात आवडला नाही. >>> +११११

मायरा हसली तर तुला हवे >>> मायरा नाही, तिचे नाव माया होते.

ती हसल्यावर तिने मागितलेलं नसताना आपला चुकीचा निर्णय सुविवर थोपतात >>> हो ना, आणि पार्टीमध्ये सुद्दा ती बाबान्ना अडवत सुद्दा नाही.
Uhoh मेबी, तिने नन्तर आपल्याला सुवीव आवडत असल्याच सान्गितल असेल.

बहिण बहिणीसाठी त्याग करते >>>> हे तर डेलिसोपमधूनच आलय म्हणा Lol पण इथे आपल्या बहीणीच हसू पुन्हा हरवू नये म्हणून ती आपल्या प्रेमाचा त्याग करते.

मला गिरीजा खूप आवडली गोड आणि सहज काम. >>>> +११११११

पुढच्या आठवड्यात विक्रम गोखले आणि सुहास जोशी आहेत>>> प्रीकेप पाहून वाटत की, हि कथा विक्रम गोखल्यान्च्याच 'अनुमती' चित्रपटावरुन घेतली असावी.

१९ फेब्रुवारीपासून कट्टी बट्टी नावाची नवीन सिरीयल येतेय रात्री साडेसात वाजता. रुद्रम वाल्यांची आहे. अश्विनी कासार आहे, कमलाची भूमिका केलेली ती.

गुलमोहर - पहिली कथा - श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक दोघंही आवडतात म्हणून पेशन्स ठेवून पाहिली. स्टोरीची कल्पना चांगली होती; पण अति शब्दबंबाळ करून ठेवली. त्यामुळे विशेष आवडली नाही.

आणि कालची विक्रम गोखले-सुहास जोशी कथा (वचन) तर अर्धवटच सोडून दिली. अति कृत्रिम संवाद, प्रसंग, अर्ध्या तासाची कथा दोन एपिसोडात ताणलेली... अत्यंत कंटाळा आला. Uhoh

१९ फेब्रुवारीपासून कट्टी बट्टी नावाची नवीन सिरीयल येतेय रात्री साडेसात वाजता. रुद्रम वाल्यांची आहे. >>> काल याचा प्रोमो पाहायला मिळाला. प्रोमो पाहून मालिका बघावी असं काही वाटलं नाही. तसंही ७:३० ही वेळ जरा ऑडच आहे.

आणि कालची विक्रम गोखले-सुहास जोशी कथा (वचन) तर अर्धवटच सोडून दिली. अति कृत्रिम संवाद, प्रसंग, अर्ध्या तासाची कथा दोन एपिसोडात ताणलेली... अत्यंत कंटाळा आला >>> +१११११

रुद्रम नंतर मी zee yuva बघायचच सोडलं.आता एखाद्या वेळेस colors बघते.zee ने कोणतीच मालिका बघू नये याची. उत्तम काळजी घेतली आहे

मला उमेश आणि क्षितीची पर्याय कथा आवडली पण खूप स्लो होती. एक भाग पुरेसा होता. क्षिती खूप जाडी झालीय पण गोड दिसत होती आणि उमेश तर आवडतोच खूप. इतर दोघं नाही आवडले. बाकी विक्रम गोखले काही बघितली नाही.

उमेश आणि क्षितीची पर्याय कथा >>>
विक्रम गोखले कथेचा परिणाम असा की मी गेल्या आठवड्यातले दोन्ही भाग पाहायला चक्क विसरले Sad आणि नेमकी त्या आठवड्यातली कथा माझ्या आवडत्या कलाकारांची निघाली

ललिता मी ozeeवर बघितले दोन्ही भाग. आमच्या डेन केबलवाल्याचे आणि झी चं काही जमेना त्यामुळे झी channel स बंद. मला फारसा काही फरक पडत नाही पण लोकांनी बोंबाबोंब केल्याने झी मराठी सुरु केलं पण युवा नाही.

विक्रम गोखले कथेचा परिणाम असा की मी गेल्या आठवड्यातले दोन्ही भाग पाहायला चक्क विसरले Sad आणि नेमकी त्या आठवड्यातली कथा माझ्या आवडत्या कलाकारांची निघाली>> अरेच्चा. मी पण विसरले. आता वेळ काढून ओझीवर बघायला हवीय.

Pages