Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जास्तीचा खवा आणला गेलाय. गाजर
जास्तीचा खवा आणला गेलाय. गाजर हलवा करुन झाला आहे, अजुन काय करता येईल?
धन्यवाद मैत्रिणींनो. ट्रे
धन्यवाद मैत्रिणींनो. ट्रे मध्ये घेऊन पाहते आणि ठरवते. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्स
जास्तीचा खवा आणला गेलाय --
जास्तीचा खवा आणला गेलाय ---गुलाबजाम, क्रीम ग्रेव्ही बेस्ड पंजाबी भाज्या उदा. मेथी-मटर-मलई, साटोरी
>>>>ज्यस्तीचा खवा आणला<<<
>>>>ज्यस्तीचा खवा आणला<<<
तीळ खवा वडी. मी कुठलातरी विडिओ पाहूनच केली होती. रेसीपी नीट नाही माहिती.
खव्याची पोळी/साटोरी , रवा खवा
खव्याची पोळी/साटोरी , रवा खवा ओला नारळ लाडू
सावजी मसाला,अगदी थोड्या
सावजी मसाला,अगदी थोड्या प्रमाणात करायचा आहे.मधे एका धाग्यावर त्याची कृती वाचली होती.आता कुठला धागा आठवत नाही.कृती माहित असेल तर प्लीज सांगा.
योकुंच्या जानेवारी २०१८ मधील
योकुंच्या जानेवारी २०१८ मधील हिरव्या मटाराची मसाल्याची उसळ धाग्यावर आहे
हिरव्या मटाराची मसाल्याची उसळ
हिरव्या मटाराची मसाल्याची उसळ
इथे सावजी मसाल्याची कृती आहे
कारवी,योकु धन्यवाद!
कारवी,योकु धन्यवाद!
राजसी, झंपी, मंजुताई
राजसी, झंपी, मंजुताई
धन्यवाद.
गुलाबजाम करायचा विचार आहे पण रेसिपी शोधावी लागेल.
रेसेपी का शोधावी लागेल? इथेच
रेसेपी का शोधावी लागेल? इथेच मायबोलीवर आरती यांनी लिहीलेल्या पाकृ आहेत की.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/55288 इथे आहेत गुलाबजाम.
अदिति , आधी थोडे करून बघशील
अदिति , आधी थोडे करून बघशील ना. कारण गु.जा. साठी वेगळा खवा मिळतो. म्हणजे सगळ्या प्रकारच्या खव्याचे सरसकट गुलाबजाम करत नसावेत बहुतेक.
@अदिती खव्याचे लाडू पण करतात
@अदिती खव्याचे लाडू पण करतात.
कॉलीफ्लॉवर_+ मटार + गाजर
कॉलीफ्लॉवर_+ मटार + गाजर याचं लोणचं कसं करतात? यामधे तेलाची फोडणी घातली होती. त्या फोडणीमधे काय काय घालायचं? आणि फोडणी व्यतिरिक्त अजुन काही सिक्रेट टेस्ट मेकर्स नक्कीच होते. इतकं अशक्य टेस्टी लोणचं मी कधीच खाल्लं नव्ह्तं. यातल्या भाज्या मऊ पडल्या नव्हत्या. ते कसं काय? हे बनवुन लगेच खाल्लं जातं का?
मनिमाऊ, गाजर, मटार आणि फ्लॉवर
मनिमाऊ, गाजर, मटार आणि फ्लॉवर ची माझी कृती- फ्लॉवर चे बारीक तुरे, मटारदाणे, गाजराचे बारीक तुकडे हे एका भांड्यात घेऊन वर मीठ आणि केप्र चा मसाला घालायचा; मसाला सगळ्या फोडिंना व्यवस्थित माखायला हवाय. वर हे सगळं प्रकरण ओलं होईल इतका लिंबाचा ताजा रस घालायचा आणि मग तेल (लोणच्याच्या जरा वर येइल एव्हढं) कडकडीत तापवून जरा गार होऊ द्यायचं; यात आता हिंग फुलवून घ्यायचा आणि पूर्ण गार झालं की लोणच्यावर ओतायचं. व्यवस्थित सगळं हलवून स्वच्छ बरणीत भरून ठेवायचं.
फार दिवस टिकत नाही हे, पण अतिशय चविष्ट लागतं. फोडिही करकरीत राहातात. २/३ आठवड्यात बहुतेक संपतच...
योकु,
योकु,
हे लोणचे फ्रीजमधे ठेवायचे का? आई फ्लॉवर हलकासा उकडून घेत असे.
बाहेर वातावरण कोरडं, थोडं थंड
बाहेर वातावरण कोरडं, थोडं थंड असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. अर्थात, मुंबईत असाल तर बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी फ्रिजात ठेवायच्या.
मी कुठलीही भाजी उकडून घेत नाही लोणच्याकरता; तरच त्या करकरीत राहातील ना
O.K.
O.K.
योकु, थँक्यु ! केप्रचा
योकु, थँक्यु ! केप्रचा कोणता मसाला ते सांगा ना. घरात असेल तर आजच करुन बघते. भाज्या आहेतच.
मनिमाऊ, के प्र चा कैरी
मनिमाऊ, के प्र चा कैरी लोणचे मसाला बेस्ट. तो नसल्यास लिंबाच्या लोणच्याचा मसाला पण चांगला लागतो. तयार मसाला नसल्यास मिरची पूड, अगदी थोडे मेथी दाणे + जास्त मोहरी कोरडे भाजून पूड करुन ती, थोडी हळद असे मिक्स करुन घालता येईल.
फोडणीत मोहरी पण घालू शकता थोडी. छान लागते.
देवकी कच्चंच घे सर्व आणि
देवकी कच्चंच घे सर्व आणि कंपलसरी फ्रीजमधे ठेव. मी केल्यावर एक दिवस बाहेर ठेऊन फ्रीजमधेच ठेवते. मटार असतील तर लवकर संपवावं लागतं आणि फ्लॉवर गाजर असेल तर आठ दिवस फ्रीजमध्ये राहते. मी पण केप्र किंवा बेडेकर मसाला वापरून करते आणि मी फोडणी करते भरपूर तेलाची, फक्त तेल नाही घालत. बरोबर आलं पण टाकते आणि लिंबू पिळते. हिरवी मिरची ऑप्शनल. आंबेहळद पण छान लागते ह्यात.
धन्यवाद योकु, अन्जू! आजउद्या
धन्यवाद योकु, अन्जू! आजउद्या करेन.
मेधा, खुप खुप थँक्स !
मेधा, खुप खुप थँक्स ! उद्या सुट्टी त्यामुळे उद्या नक्की करणार. या ग्रुपवर आपण फोटो नाही टाकत ना, नाही तर फोटो नक्की टाकला असता. तुम्हा एक्सपर्ट्सना बघुनही कळेल कि रेसिपी यशस्वी आहे का?
रश्मी, धन्यवाद.
रश्मी, धन्यवाद.

रावी तुझ्या कॉमेन्ट मुळे गु.जा. चा बेत कॅन्सल केला
मी ह्या विकएन्डला मोठ्या प्रमाणात गाजर हलवा बनवुन फ्रेन्ड्स मधे वाटुन टाकयच ठरवलय
तापवून जरा गार होऊ द्यायचं;
तापवून जरा गार होऊ द्यायचं; यात आता हिंग फुलवून घ्यायचा>>> मला ही स्टेप नक्की कशी करायची ती कळली नाही.गरम तेलात च फुलवुन घ्यायच की तेल कोमट झाल्यावर टाकायच हिंग, की फेसुन घ्यायच.
अंकु, कढईत तेल घालून ती गॅसवर
अंकु, कढईत तेल घालून ती गॅसवर ठेवायची, गॅस चालू करून पेटवायचा. यामुळे काय तापेल? कढई! आणि त्यातलं तेलसुद्धा हों!
हे तेल चांगल, धुरावेल इतकं गरम झालं की गॅस बंद करून ५ मिनिटं थांबायचं, मग हिंग घालायचा. तेल पुरेसं गरम असल्यानी हिंग तळल्या जातो.
पुढे मग थंड झालं की लोणच्यावर ओतायचं...
मनिमाऊ, के प्र चा कैरी लोणचे
मनिमाऊ, के प्र चा कैरी लोणचे मसाला बेस्ट. >> मी त्याच्या बरोबर थोडी मोहरीची डाळ गरम करुन (भाजून नव्हे), थंड करुन, मिक्सर मधे थोडी वाटून घालते. फेसलेल्या मोहरी सारखाच स्वाद येतो
त्या फोडणीमधे काय काय घालायचं? >> मोहरी, हिंग आणि हळद (तेलाचा ताव थोडा कमी झाल्यावर म्हणजे हळद जळत नाही)
या ग्रुपवर आपण फोटो नाही टाकत ना, नाही तर फोटो नक्की टाकला असता >>> तु टाक. मी केलेल लोणच संपल नाही तर टाकला असता मी पण
मी नेहेमीसारखी फोडणी करते
मी नेहेमीसारखी फोडणी करते मोहरी, जिरं, हिंग, हळद, किंचित तिखट. मला फोडणीत जरासं तिखट टाकायची सवय आहे. चार मेथीदाणे पण घालते फोडणीत कधीकधी.
मलापण केप्रचा लोणचं मसाला जास्त आवडतो, त्यातला हीरा हिंग बेस्ट असतो.
यामुळे काय तापेल? कढई! आणि
यामुळे काय तापेल? कढई! आणि त्यातलं तेलसुद्धा हों!>>>> योकु,कित्ती कित्ती समंजस बोली हो!
Pages