डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खारुताई .. झाडावरचा ऊंदीर.. भारी आहे Happy

आमच्या शेजारच्या पिंट्याच्या घरात मागे एक खारुताई पाळलेली. एक कांडही झालेले. नंतर सविस्तर लिहितो. जमल्यास वेगळ्या धाग्यावर, ईथे फारच अवांतर होईल.

@ऋ भाऊ.
जरूर काढा नवीन धागा. पण माझे वैयक्तिक मत /निरीक्षण असे आहे की आजकाल तुमचा खास असा लिखाणाचा "ऋ टच" हरवला आहे सततच्या लिखाणामुळे.
अथवा कदाचित मीच जास्ती अपेक्षा ठेवत असेन तुमच्या लिखाणातून.
बघा विचार करून नाही तर अॅज युज्वल या प्रतीसादाकडे कानाडोळा करून चला पुढे. जाता जाता पुढील लेखास शुभेच्छा.

घरात चिलटे होउ नये म्हणुन खिडकीत एका प्लास्टीकच्या पिशवीत पाणी आणि त्यात एक रुपयाचा कॉईन टाकणे हे ही प्रकार पाहिले आहेत. दोघान्चेही लॉजिक कळले नाही. >>> हा उपाय माशांना पण वापरतात. बाणेर रोडच्या ग्रीन पार्क मध्ये केलेला पाहिला आहे आणि खरोखरीच बाकी ठिकाणी भरपूर माशा असताना तिथे औषधालाही माशी नव्हती. खरेतर इथेच माशा कशा नाहीत असे आश्चर्य वाटून विचारले तेव्हा त्यांनी त्या टांगलेल्या पिशव्यांकडे लक्ष वेधले. फक्त ह्या उपायामुळे की ह्या उपायाबरोबर केलेल्या एखाद्या स्प्रे, औषधामुळे हे कळायला मार्ग नाही.

खारुताई >>> Lol
कालचाच किस्सा
लेकाला नवीन शाळेत घेउन गेलो होतो. शालेचा परीसर खुप मोठा आहे. भरपुर झाडं वैगेरे. मोठ्या दोन झाडांवर दोन खारी पळत होत्या.
एक मुलगा त्याच्या आईला म्हणे "मम्मी ती बघ पाल" माझा लेक " अरे ती काय पाल नाही स्क्वीरल आहे ती" वर "हैना मम्मा" मला.
Happy

जरूर काढा नवीन धागा. पण माझे वैयक्तिक मत /निरीक्षण असे आहे की आजकाल तुमचा खास असा लिखाणाचा "ऋ टच" हरवला आहे सततच्या लिखाणामुळे.
>>
अगदी अगदी. तो वसईचा धागा काय जमलाच नाही बुवा.
असो. अवांतरासाठी क्षमस्व.

असेच पुर्वी परजिवी वनस्पती अमरवेल ही बल्बच्या जवळ/ घरात सेन्टरला लटकवलेली दिसे. त्याला चिलटे, डास जाउन चिकटलेले पाहिलेत.>>>

शेराची फांदी बांधतात सामान्यतः त्यावर बारिक किटक चिलट, कोळी वैगेरे चिकटतात!

राहुल, पाफा, धन्यवाद
आपले असे हक्काने सुचवणे हीच माझे मायबोलीवरची कमाई. Happy
फक्त हे प्रतिसाद माझ्या विपूत वा माझ्याच धाग्यावर येऊद्यात, ईतर धाग्यावर ईतरांच्या चर्चेमध्ये कोणाला अडथळा नको Happy

जरूर ऋ.
अरे पण तू ज्या धाग्यावर जातोस तिथे नवीन धाग्यांचे सुतोवाच करतोस. ते वाचूनच माझ्या पोटात गोळा येतो.

माझा पहिल्याच पानावरील प्रतिसाद सोमय्यांनी काही प्रमाणात खरा करुन दाखविला.

https://www.loksatta.com/mumbai-news/six-people-injured-in-leopard-attac...

फक्त (घटना पुण्याऐवजी मुंबईत घडल्याने) त्यांनी बिबट्यासोबत सेल्फी काढण्याऐवजी जखमींसोबत सेल्फी काढलेत.

डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता? >>>> चट्णी Proud
मच्छर पकडायचा त्याच्या कानात भुंsssssग करायचं , नंतर येत नाहीत. Proud

Happy

व्हॉटसप वर लिंबू कापून त्यात लवंग टोचून डास घालवायचा उपाय आहे.तो करून पाहिला.पण डास कमी झाले नाही आणि चिलटं बसली.

सध्या जास्त डास नाहीत.

@अनु
तुम्ही व्हाअॅ मेसेज नीट वाचला नाहीत. आणि बहुतेक सगळ्या डासांसाठी एकच लिंबू वापरलेत. त्या मेसेज प्रमाणे प्रत्येक डासासाठी वेगळे लिंबू वापरावे लागते (८ धारी लिंबू असेल तर परीणाम जास्ती चांगला येतो.)
तर तो डास उत्तरेकडे तोंड करून बसला आणि त्याने मागचा डावा पाय हवेत उचलला की पटकन त्यांच्यासमोरून लिंबू डावीकडून उजवीकडे ४ वेळा मग उजवीकडून डावीकडे ३ वेळा ओवाळायचे. आणि लिंबू बरोबर डासाच्या सोंडेच्या रेषेत १ फूट ३.५ इंचावर ठेवायचे. मगच त्यात लवंगा खोचायच्या.
हे सर्व करताना डासाने सांगितलेली पोझिशन बदलता कामा नये नाहीतर हे सर्व पुन्हा करावे लागेल. एखादी स्टेप चुकल्यास उलटा परीणाम होऊन घरात चिलटे येतात. त्यावेळी डास कमी होतात पण काही काळाने डास सातपट वाढतात. Rofl

Lol
व्हाटसप चालतं का आता ? Proud

उजवीकडे ४ वेळा मग उजवीकडून डावीकडे ३ वेळा ओवाळायचे. आणि लिंबू बरोबर डासाच्या सोंडेच्या रेषेत १ फूट ३.५ इंचावर ठेवायचे. मगच त्यात लवंगा खोचायच्या.
हे सर्व करताना डासाने सांगितलेली पोझिशन बदलता कामा नये नाहीतर हे सर्व पुन्हा करावे लागेल. एखादी स्टेप चुकल्यास उलटा परीणाम होऊन घरात चिलटे येतात. त्यावेळी डास कमी होतात पण काही काळाने डास सातपट वाढतात. Rofl>>>>

या सगळ्या स्टेप्स तुम्हाला डासाने सांगितल्या??? Proud Proud Proud

हो खरच.
एक बायकोला त्रासलेला पती डास माझ्या कानात गुणगुणून गेला. त्या पिडलेल्या पती डासाला त्याच्या मांत्रीकाने सांगीतलेला ऊपाय होता तो, त्या पती डासाच्या बायकोचा पाय त्यांच्या स्वतःच्या घरी टिकवायला. (पती डास, पत्नी डास आणि त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लू डासांचे सुखी घर सुंदर घर)

हुश्श बहूतेक आता यातून मिसकम्युनिकेशन होणार नाही. नीट सजवायचा प्रयत्न तर केला आहे. Rofl

Lol
लिखाण स (म)जवायचा प्रयत्न केला होता. पण पोपट झाला.
बघा त्या मांत्रीकाचा तोडगा किती पावरफूल आहे. माझ्याकडून सांगताना नक्की काहीतरी चुक झालेली दिसतेय. त्यामुळे माझ्या लिखाणात चुका झाल्या आहेत. Rofl

अवांतरः जरा विनोदी वाटेल पण हल्ली आमच्या मागच्या ओसरीत नारिंगी टाइल्स वर भल्या पहाटे रोज एक मांजर शी करुन जातं. ते येतं तेव्हा आम्ही झोपलेलो असतो.त्यामुळे हाकलता येत नाही.कामवाल्या मावशी येतात तेव्हा शी ओली असते त्यामुळे त्या तिथे झाडत नाहीत. मी लहान होते तेव्हा मांजरी मातीत शी करुन त्यावर माती टाकून ती पुरायच्या.मांजरींच्या सवयीत अचानक हा बदल कसा झाला?
मी एक दोन वेळा तिच्या शी करण्याच्या जागी सुंठ/दालचिनी पावडर टाकून पाहिली आहे.तिच्या पृष्ठभागाला लागून पुढच्या वेळी ती शी करायला घाबरेल म्हणून. पण ती फक्त थोड्या शेजारी सरकून टाईल वरच शी करते.संपूर्ण ओसरी वर दालचिनी पावडर टाकायला लागले तर जाम महाग पडेल.
जाम ताप झालाय राव.रोज ती वाळलेली शी झाडूने मातीत ढकलणे हे काम माझं असतं. Sad
मला मांजराने यायला नको/शी करायला नको/केली तर ती मातीत बसून करायला हवी म्हणून चांगला उपाय सांगा.

Pages